ट्रेडिशन्स

Submitted by rasika_mahabal on 5 September, 2019 - 13:28
विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

तूनळी लिंकवण्याऐवजी डायरेक मर्हाटीत लिवलं असतं तर वाचलं अस्तं. विंग्रजी लय डोक्यावरून जातं बगा माज्या.

रसिकातै,
इंग्रजीतला व्हिडिओ बघितला. वरती केवळ तूनळीची लिंक देण्याऐवजी धाग्यात मराठीमध्ये २-४ वाक्ये लिहायला जमले तर बघा जरा.

रक्षाबंधन हा सण म्हणजे we are following a tradition of women's helplessness, dependence. स्त्रियांनी असल्या ट्रेडिशनचा धिक्कार केला पाहिजे, हे तुमचे मत कळले.

नुकताच वाचलेला १ प्रसंग खाली देत आहे जो तुमच्या विचारांशी सुसंगत ठरेल.
पोलिसः तुझ्यासमोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तू काहीच मदत केली नाहीस?
.....
साहेब, मी त्या मुलीला ओळखतो. तिचं WhatsApp स्टेटस होतं, I can handle my problems.....Don't underestimate the power of woman.
.....
पोलिसः मग ठीक आहे.

परंपरा असे शी र्ष क देता येइल. व लेख लिहीला पाहिजे ना इथे पोस्ट करायचे तर. ज्यांचे भाउ आहेत त्यांना करू देत ना संरक्ष ण. नाहीत त्या शिकतात स्वतःची काळजी घ्यायला. राखी फेस्टिव्हल गोड आहे पण. अगदी ब्लॅक बेल्ट बहिणीला सुद्धा भावनिक आधाराची गरज भासू शकते ना.

खरंच, थोडी मराठी प्रस्तावना इथे लिहिली तर तुमच्या इंग्लिश व्हिडीओ चे व्ह्यूज वाढवायलाही जास्त बरे.
तुमच्या कडून तुमचा आधीचा फॅशन ब्लॉग बघता सेजल कुमार सारखा स्टायलिंग, शॉपिंग, फॅशन टिप्स चा व्हिडीओ लॉग मस्त होईल.

पोलिसः तुझ्यासमोर चोर त्या मुलीची पर्स हिसकावत होता आणि तू काहीच मदत केली नाहीस?
साहेब, मी त्या मुलीला ओळखतो. तिचं WhatsApp स्टेटस होतं, I can handle my problems.....Don't underestimate the power of woman.
पोलिसः मग ठीक आहे.

------------------>>>> म्हणजे हा तिचा whatzapp स्टेटस नसता तर त्याने तिची मदत केली असती असं म्हणणं आहे का तुमचं ? कारण मधे मुंबईत एका मुलीचा रेप झाला, बघणाऱ्या मुलाने त्याचा केवळ व्हिडीओ घेतला. तिचा whatzapp स्टेट्स काय होता कोणास ठाऊक.
----------------------------------
ज्यांचे भाउ आहेत त्यांना करू देत ना संरक्ष ण. नाहीत त्या शिकतात स्वतःची काळजी घ्यायला. राखी फेस्टिव्हल गोड आहे पण. अगदी ब्लॅक बेल्ट बहिणीला सुद्धा भावनिक आधाराची गरज भासू शकते ना.
--------- --------->>> बाप रे कुठल्या जगात जगता आपण? मला दोन भाऊ आहेत ते पण मोठे. thankfully तुमच्या विचारसरणीचे नाहीत हे बरे झाले. आणि भावनिक आधार फक्त मुलिंना लागतो असं म्हणणं आहे का तुमचं ? कारण थेरपीस्टस कडे पुरुषांची बरीच लाईन असते.
---------------------------
इथे टायिपले तर तु नळी वर views कसे वाढणार ?
-------------------------->>> भाषांतर करून टाईप करण्याचा कंटाळा.. हे खरे कारण. १०-१२ views वाढल्याने मला, तुम्हाला आणि youTube ला काहीच फरक पडत नाही.
----------------------------

रसिका ताई, लॅश आऊट करण्या पेक्षा भावनांओ को समझो.
(भाषांतर करायचा,मराठी टाईप करायचा प्रचंड कंटाळा असतानाही फक्त इंग्लिश पोस्ट बद्दल 1 ओळीची युट्युब लिंक द्यायला मराठी साईट वर जायचं? त्यातही फक्त निगेटिव्ह प्रतिसाद अक्नोलेज करून निगेटिव्ह प्रतिसाद देणाऱ्या ना मूर्खांत काढायचं? )

बाप रे कुठल्या जगात जगता आपण? >> ह्याच. भावनिक आधार देणे व मला त्याची गरज आहे असे समजणे व भावावर प्रेम कर्णे ह्यात मला तरी काही मानसिक कमजोरी वाट्त नाही. ते प्रेम व्यक्त करायचा राखी हा एक छान मार्ग आहे. ब्रदर्स डे लाइक फ्रेंड शिप डे?

आंधळेपणाने सण साजरे करण्यापेक्षा ते समजून घेऊन साजरे करणे जास्त चांगले हे व्हिडिओतले मत आवडले.

पण हे मत व्यक्त करताना पाडवा, राखी पौर्णिमा ह्या सणांना, जे परस्पर प्रेम व विश्वासावर आधारित आहेत, त्यांना सरसकट रिग्रेसिव्ह म्हटले ते अजिबात पटले नाही. सणांमध्ये रिग्रेसिव्ह काय आहे? बहीण भावाला राखी बांधते ते मी कमजोर आहे म्हणून माझे रक्षण कर यासाठीच? आजच्या जमान्यात किती बहिणभाऊ सोबत राहताहेत रक्षण करायला? आणि जुन्या जमान्यात लग्न झाल्यावरही बहीण भावाला राखणदार म्हणून नेत होती का? राखी हे बहिणभावातील प्रेमाचे प्रतीक आहे. भावाला बहीण प्रेमाने ओवाळते तसे भावानेही ओवाळावे की..माझ्या घरातील पुढच्या पिढीने गेल्या वर्षांपासून एकमेकांना ओवाळायला सुरवात केलीय, यावर्षी आजीलाही ओवाळून राखी बांधली. आज सगळेजण एकत्र आहेत, पुढे कधी एखाद्या वर्षी एकत्र यायला जमले नाही तरी या गोड आठवणी असतील तेव्हा सोबतीला. पाडव्याला सुंदर सजलेली बायको बघून नवऱ्याला आनंद होत असेलच. हवे तर तिचे ओवाळून झाल्यावर त्याने तिचा हात धरून शेजारी बसवावे व हातातली आरती घेऊन तिलाही ओवाळावे. पाडवा हा वर्षभराच्या समंजस साथीसाठी एकमेकांना थंक्यु म्हणायचा सण आहे असे समजावे. सण-वार आनंद वाढवण्यासाठी साजरे होतात. त्यातले जे खटकते ते वगळा, पण म्हणून सगल्यावरच रिग्रेसिव्ह म्हणून काट मारली तर आनंद कशात मिळवावा? प्रत्येकाची आनंद मिळवायची वाख्या वेगळी असणार ना?

बाप रे कुठल्या जगात जगता आपण? मला दोन भाऊ आहेत ते पण मोठे. thankfully तुमच्या विचारसरणीचे नाहीत हे बरे झाले. आणि भावनिक आधार फक्त मुलिंना लागतो असं म्हणणं आहे का तुमचं ? कारण थेरपीस्टस कडे पुरुषांची बरीच लाईन असते.

प्रत्येकाचे जग वेगळे आहे. त्यामुळे एकाने 'ब्लॅक बेल्ट बहिणीलाही भावनिक आधाराची गरज भासू शकते' म्हटल्यावर दुसऱ्याला ते विधान 'मुलींनाच आधार लागतो' असे म्हटल्यासारखे वाटते. समोरचा काय बोलतोय हे शांतपणे वाचून, समजून घेऊन मग व्यक्त होणे हेही कठीण होत चाललेय.
-

साधना ताई तेच सांगितलं आहे मी व्हिडीओ मधे, कदाचित अजून स्ट्रेस करायला हवं होत की ट्रेडीशन्स मध्ये equality नाही, पुरुष केवळ देव व for some reason त्यांच्या गाडयांना ओवाळतात. when was the last time you saw a man doing a woman's aarati? this has to be mentioned as according to hindu tradtions ओवाळण्याला महत्व आहे, त्याचा अर्थ हाय रिस्पेकट, कोणाला तरी पूजण असा होतो. त्यामुळे ट्रेडीशन्स celebrate करायचे असल्यास ते update करायला हवे. हा मुद्दा शेवटी मांडला आहे.

मला वाटतं बळजबरी जेंडर चेंज शस्त्रक्रिया करून सगळ्यांना एकतर पुरुष नाहीतर स्त्री बनवावं. विविधताही असंतोष का कारण हय. रच्याकनं लेखिका मराठीत लिहू शकते हे लक्षात आले.

भावनिक आधार देणे व मला त्याची गरज आहे असे समजणे व भावावर प्रेम कर्णे ह्यात मला तरी काही मानसिक कमजोरी वाट्त नाही. ते प्रेम व्यक्त करायचा राखी हा एक छान मार्ग आहे. ब्रदर्स डे लाइक फ्रेंड शिप डे? ---- >>>>>> फ्रेंड शिप डे मध्ये दोन्ही लोक एकमेकांना band बांधतात.

ड शिप डे मध्ये दोन्ही लोक एकमेकांना band बांधतात.>> रक्षा बंधन ह्याला समोरुन भाउबीज पण असते. परंपरा जुन्या व न बदललेल्या आहेत म्हणून त्या परंपरा आहेत. ही पूर्ण पुरु ष प्रधान सिस्टिम बरखास्त करून नवी इक्वल सिस्टिम आणायची आहे तर हा वेगळा मुद्दा आहे. जीवनात आधारा ला पुरुष नसणे व त्या शिवाय जीवन परिपूर्ण करणे शक्य आहे. ते एका वेगळ्या अर्थाने परिपूर्ण होतेच. पण म्हणून आहेत ते
प्रेम व्यक्त करायचे छान नाजुक मौके पण चिडून हातातून घालवायचे ह्यात काही अर्थ वाटत नाही.

आपले सण समारंभ शेतीवर आधारित जीवन होते तेव्हा बांधलेल्या जीवन क्रमानुसार आहेत. आता आपण शहरात मेट्रो मध्ये राहतो समजा तर वर्क डे वीक पाच दिवस व दोन दिवसाचा वीकांत ह्यात कसली सुगी कसली पेरणी कसला बैल पोळा. पण आपण वेगवेगळ्या स्वरूपात साजरे करतोच ना. हा एक जीवन पद्धतीचा आनंदाचा भाग आहे. फॅमिली एकत्र भेटायचे मौके.

ह्या प्रथांची मुळे न स्त्री स्वातंत्र्यम अर्हति ह्या काळातली आहेत. पहिले बापाची प्रॉपर्टी व मग लग्न केल्यावर नवर्‍याची. ह्यापैकी दोघांनी अब्युज केला तर तिला सुटका नाही. तिने न्याय कोणा कडे मागा यचा हा मेकॅनिझमच सेट केलेला नाही. हे दोघे दयावंत असले मारझोड झाली नाही तर तिचे नशीब चांगले. पदरात मुलगा पडला तर वंश सातत्या साठी तिचा उपयोग झाला म्हणून थोडे उच्च स्थान घराच्या हायरार्कित. तरीही

सांसरिक सं बंध बिघडल्यास नातू ठेवून घेउन ह्या बाईला रस्ताच दाखवला जातो. घटस्फोट झाला तर भाउ देखील मदत करायला काचकुच करतो. ही सद्य परिस्थिती आहे. त्यात पाळी सुरू झाल्या पासून प्रत्येक पुरुष हा नरच त्यामुळे तसे न वागणारा व बलात्कार किंवा कमी प्रकारचा अब्युज झाल्यास त्या पासून संरक्षण करणा रा तो भाउ . त्या कर्तव्याची आठवण म्हणून ही राखी बांधायची पद्धत.

पूर्वी धर्माचा भाउ, मानलेला भाउ अशी नाती होती त्यातही हेच समीकरण असे. आता जीवनात पुरुषाचा आधार ( त्याच्या स्वार्थी समीकर्णांव्यतिरिक्त न) नसावाच स्त्रियांनी सबल व्हावे हे आमचे चलन आहेच. त्या पासून मागे फिरणे नाही. पण ज्याम्चे भाउ आहेत नवरे आहेत त्याम्नी असे काही सेलिब्रेट केले तर आपण चिडचिड करायची ह्यात काही अर्थ नाही. जगात आनंद मिळवणे फार कठिण आहे सध्या. लेट देम एंजॉय.

तुम्ही नवफेमिनिस्ट आहात का? तर अजून खूप मजल गाठायची आहे.

साधना ताई धन्यवाद छान प्रतिसाद आहेत दोन्ही.

देवीची पूजा आरती नाही करत का आपण.
वडीलधाऱ्या स्त्रियांच्या पाया नाही पडत का फक्त पुरुषांच्याच पडतो.
मुलीचा वाढदिवस असतो तेंव्हा औक्षण नाही करत का?

फेमिनिस्ट लोकांशी वाद घालणे अशक्य आहे , ते इक्वलीस्ट कधीच होऊ शकणार नाहीत .भाऊ बहिणीच्या नात्यात पण स्त्री पुरुष आणला . वाह.

फेमिनिस्ट लोकांशी वाद घालणे अशक्य आहे , ते इक्वलीस्ट कधीच होऊ शकणार नाहीत .भाऊ बहिणीच्या नात्यात पण स्त्री पुरुष आणला . वाह.

नवीन Submitted by च्रप्स on 7 September, 2019 - 08:39+११११

आमच्याकडे "फ़क्त ताईलाच का निरांजन द्यायचे हातात.." म्हणून भांडणे होतात, मुख्य म्हंजे ताईच सध्या आमचे संरक्षण करते..
In any case, दोघेही एकमेकांना ओवाळतात.. भाऊबीजेला पण आणि रक्षा बांधनाला पण.. आणि आमच्या circle मध्ये पण आम्ही हेच enforce करतो ..
हाय काय नि नाय काय.. बदल स्वतःपासून सुरू करायचा..

ओवाळण्याला महत्व आहे, त्याचा अर्थ हाय रिस्पेकट, कोणाला तरी पूजण असा होतो. >> परंपरांमध्ये सुधारणा हवी हा मुद्दा मान्य आहे पण ओवाळणे ह्याचा अर्थ पूजनीय आहे असा नाही. आरती वेगळी. आरती मध्ये आर्तपणे बोलावणे असते, आरती देव-देवीची करतात. औक्षण म्हणजे फक्त एखाद्याच्या उदंड आयुष्याची मागणी करणे. परंपरेनुसार स्त्रियांनी औक्षण करणे हे श्रमविभाजनाच्या तत्कालीन धारणेनुसार आहे. जन्म देणे, संगोपन करणे स्त्रियांची जबाबदारी तर कुणी मेल्यावर पुढची उस्तवार करणे पुरूषाची जबाबदारी. काळापरत्वे लिंगभेदानुसार कामाचे विभाजन न करता ज्याला ज्या कामासाठी वेळ व इच्छा आहे ते ते त्याने/तिने करावे.
पुरुष केवळ देव व for some reason त्यांच्या गाडयांना ओवाळतात >> पुरूषाने औक्षण करून ही फार फायदा नव्हता कारण बाळंतपणातील मृत्यूंमुळे स्त्रियांचे आयुर्मान फार फार कमी होते. स्त्रीचे उदंड आयुष्य मागणे म्हणजे जे कधी घडणारच नाही त्याची मागणी करण्यात किती वेळ कोण घालवणार. १९८० च्या दशकात भारतात भारतीय स्त्रीची लाईफ एक्स्पेक्टन्सी पहिल्यांदा पुरुषाच्या इतकी झाली. बाकी सत्यवानाऐवजी सावित्री मेली असती तर सत्यवान आणि यमाने "हल्ली रेडा किती मायलेज देतो?" च्या डिस्कशन मध्येच वेळ घालवला असता अशी शंका मलाही येते. पुरूषाची गाडी त्याच्या आयुष्यातील स्त्रियांपेक्षा अधिक टीकायची.

अर्रर्र !!
क्या दिन दिखाया अल्लाताला
इस कदर निकला ट्रेडिशन का घोटाला ।