प्रकाशचित्रांचा झब्बू २: जुगाड

Submitted by संयोजक on 4 September, 2019 - 05:04

मायबोली गणेशोत्सव २०१९ घेऊन येतोय आपला लाडका खेळ - प्रकाश चित्रांचा झब्बू आणि या खेळातला दुसरा विषय आहे - "जुगाड"

गेल्या आठवड्यात दहीहंडीचा उत्सव होता. घराजवळच्या एका मोठ्या मैदानावर पहील्यांदाच एका भव्य दहीहंडीचे आयोजन केले होते. सहासाडेसहाच्या सुमारास सहज खिडकीतुन डोकावलो तर काहीच तयारी नव्हती. मला जरा गंमतच वाटली पण पुढच्या तासाभरात दोन क्रेन समोरासमोर येऊन उभ्या ठाकल्या. त्याच्या जीबवर दहीहंडीच्या दोरीचे एकेक टोक बांधले गेले आणि बूम उंचावून हव्या त्या उंचीवर हंडी नेत ॲडजेस्ट केली गेली. नंतर फक्त क्रेनच्या बटणांवरुन उंची कमीजास्त करत दहीहंडीचा खेळ मस्त रंगवला गेला!
फार भारी वाटले. म्हणजे ज्याच्या कुणाच्या डोक्यात क्रेनचा असा वापर करायची भन्नाट आयडीया सगळ्यात पहील्यांदा आली असेल त्याला सलाम. किती कष्ट वाचले या सगळ्यात आणि मुख्य म्हणजे दोन्ही बाजुला काहीतरी बांधायला लागते म्हणून अरुंद रस्त्यांवर करावी लागणारी दहीहंडी मोकळ्या मैदानात घेता आली.
या अश्या भन्नाट कल्पना, छोटेमोठे जुगाड आपल्या अवतीभोवती सर्रास घडत असतात. मग ते बाटलीला छोटेसे छिद्र पाडून घरच्या कुंडीसाठी घरच्या घरी केलेले ठिबक सिंचन असेल नाहीतर ST stand वर दोन बॅगा शेजारी शेजारी ठेवून बनवलेले तात्पुरते आसन असेल किंवा घरातली खुर्ची उचलून आणून अंगणात खेळण्यासाठी बनवलेल्या स्टंप्स असोत.... या सगळ्यात जुगाड आहे!
तर आजच्या आपल्या झब्बूचा विषयच हा आहे.... जुगाड!

20190904_142504.jpg

१. ही स्पर्धा नसून खेळ आहे.
२. झब्बू म्हणून एका वेळेस एकच प्रकाशचित्र टाकावे.
३. प्रकाशचित्र हे प्रताधिकारमुक्त असावे व संयोजकांनी दिलेल्या विषयाशी सुसंगत असावे. प्रकाशचित्र कोलाज स्वरूपातले नसावे.
४. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो, मात्र सलग दोन झब्बू देऊ शकणार नाही.
५. सर्व प्रकाशचित्रे मायबोलीच्या 'प्रकाशचित्रविषयक धोरणा'चे पालन करणारी असावीत.
६. झब्बूंचा खेळ मायबोलीकरांचे स्वतःचे प्रकाशचित्रसंग्रह सादर करण्यासाठी तयार केला आहे. तेव्हा कृपया तुमच्या जवळची (मग ती तुम्ही अथवा तुमच्या कुटुंबीयांनी काढलेली) प्रकाशचित्रे सादर करा. आंतरजालावरून घेतलेली प्रताधिकारमुक्त चित्रे झब्बूमध्ये देऊ नयेत.
७.मायबोलीवरील प्रकाशचित्रांचे धोरण इथे (https://www.maayboli.com/node/47635) पाहा.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आमचा हा व्हरांडा गावच्या घराचा आहे.
त्यामुळे बाहेरचा कोणीही पटकन तिथे येत जात असतो.
दुसरं म्हणजे ती पावसाची दिशा आहे म्हणून वर छप्पर असलं तरी पाऊसही थोडासा आत डोकावतो.
आणि दक्षिण दिशा असल्यामुळे सूर्याचाही उगवतीपासून मावळतीकडे जाताना दुपारचा प्रवास इथूनच होतो.
तेव्हा आडोसा, सावली, थोडीशी प्रायव्हसी यासाठी बिल्डींग कन्स्ट्रक्शनला वरुन विटा, वजनदार वस्तू पडू नये म्हणून आडवी वापरली जाणारी आणि तिच्या Purpose साठी आयुष्य संपलेली जाळी उभी करुन टांगली...
आता यावर बर्यापैकी फुलं येणारा आणि वर्षभर हिरवा रहाणारा वेल सोडला की वरचे उद्देश साध्य... फुलपाखरं फिरतील तो अतिरिक्त बोनस..

आमच्या घरी तुळस खिडकीत जाळीबाहेर ठेवली आहे. आईला तुळशीला पाणी घालताना रोज जाळी काढण्यासाठी द्राविडी प्राणायाम नको म्हणून बाबांनी केलेला हा जुगाड.
बलम पिचकारी बाटलीवरी.
Bottle.jpg

जुगाडाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे हे एक चांगले होत आहे. जुन्या वस्तू टाकून लगेच नवीन घेणे हे ठीक परंतू इलेक्ट्रॉनिक जुन्या वस्तू या त्याचे तंत्रज्ञान बदलल्याने वापरात राहात नाहीत. यातले काही भाग चांगले असतात. ते वापरता आले तर उत्तमच. उदा स्पीकर. टीवीपासून आपण दूर बसतो व आवाज मोठा ठेवतो. काही जण त्यास ब्लुटुथ युनिट जोडून दूरवर हेडफोनने ऐकतात. पण टीवीच्या स्पीकरच्या वायरी कापून त्यास एक्सटेन्शन वायर आणि टोकाला हेडफोन सॉकेट लावली आणि तोच ( दोनांपैकी एक) स्पीकर पुढच्या सोफ्यापाशी ठेवला आहे. स्पीकरला हेडफोन ज्याक लावलाय. सॉकेट मध्ये हा स्पीकर किंवा हेडफोन किंवा जुनया रेडिओ तला स्पीकर जोडता येतो. दुसऱ्याला स्विच जोडून टीवीपाशीच ठेवले आहे. तो चालू/बंद ठेवता येतो.
(( टीवीची ग्यारंटी मुदत संपल्यावरच स्पीकर वायरी जोडतोड करावी.))

२) बाजारात जे ब्लुटुथ स्पीकर मिळतात त्यामध्ये अ)ब्लुटुथ सर्कीट , ब) मोठा चांगला स्पीकर, आणि क) मोठी ब्याटरी यामुळे किंमत वाढते.
'अ' ची किंमत कमी असते पण 'ब' आणि'क'साठी आपण उगाचच जास्ती पैसे देतो.
जुगाड : स्वस्तातला ब्लुटुथ आणावा. उदा मिनी म्युझीक दोनशे रुपयांत येतो. त्यात हेडफोन सॉकेट नसल्यास जोडावे. त्यास फिलिप्सच्या रेडिओतला स्पीकर जोडता येतो. दहा वॉटसचा असतो आणि त्यास एक्सटरनल पॉवर द्यावी लागत नाही. युनीटची ब्याटरी उतरली की पावर बँक जोडली की आणखी चार तास चालेल.