आसिंधू

Submitted by मी मधुरा on 14 August, 2019 - 03:41

स्वार्थापायी त्यांनी देशाचे केले तुकडे
नशिबी भूमातेच्या लिहिले केवळ दुखडे

मानाचा तो भगवा.... नि हक्काची भूमाता
आसिंधू अखंड आमुचा, आरक्त जाहला होता

काळ्या मातीच्या पायी लाली रक्ताची होती....
ते दृष्य शवांचे होते, ती जमीन केशरी होती....

ना धीर सोडला आम्ही, ना त्यांनी केली पर्वा
कष्ट उपसले कोणी, कोणाची झाली चर्चा!

मातीत रुजवला त्यांनी पुन्हा नव्याने मत्सर
पानोपानी लिहिले असत्य अधर्मी अक्षर!

ना रंग आता तो आहे, ना गंध तिथे मातीला!
नापाक अधर्मी हेतू नि कपट असे साथीला

हातात कटोरा तरीही, धमकवती दुसऱ्याला
अणू रेणूस धमकावे जणू लांघून मर्यादेला....

@मधुरा

#14August

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान