“दहीहंडी” पुन्हा प्रकशित

Submitted by तुषार विष्णू खांबल on 8 August, 2019 - 07:56

“दहीहंडी”
शब्दरचना:- तुषार खांबल/महेश घाणेकर
काल रक्षाबंधनानिम्मित बहिणीकडे गेलो होतो. सोसायटीच्या आवारात १५-२० लहान मुले दहीहंडीचा सराव करताना दिसली. त्यांच्या एकंदरीत हावभावावरून हा सण कसा करायचा याबाबत चिंतातुर असावे असं वाटत होत.
त्यांच्याच दुसऱ्या बाजूला त्या सोसाटीमधील काही जेष्ठ (३५ ते ४५ वयोगटातल्या) व्यक्ती बसलेल्या होत्या. आम्ही असताना कसे सर्व छान चालायचं, कसे सण साजरे होत असत, आम्ही कसे थर लावायचो यावर फुशारक्या मारत बसले होते.
हे चित्र बघून मनात एक विचार आला, “दहीहंडी हा उत्सव आपल्या मराठी संस्कृती-परंपरा आणि एकात्मतेचे प्रतीक आहे. भारतातील सणांचे वैभव दर्शवणाऱ्या सणांपैकी एक असलेल्या ह्या सणाची आज किती बिकट परिस्थिती झाली आहे. जर आपणच याकडे दुर्लक्ष्य केला तर मग हे जपायचं कोणी????”
“या धकाधकीच्या आणि धावपळीच्या जीवनात आपण आपल्या कुटुंबासाठी वेळ देतोच ना??? मग गोविंदा पण आपले कुटुंबच नाही का?? मग जेव्हा हि मुले सर्व करत असतात तेव्हा वाटत नाही का आपणही जावे यांच्या मध्ये?? थराला नाही जमणार तर धरायला तरी जाऊया.”
“आपला अनुभव आणि शिस्त आता दाखवले तरच पुढची पिढी त्याचे अनुकरण करेल. नाही तर पुढचा काळ याहूनही कठीण असेल. आजची तरुण पिढी हि संस्कृती-परंपरा टिकावू पाहत आहेत त्यांना योग्य ते मार्गदर्शन मिळालं नाही तर हे सण भविष्यात दिसतील ह्याची खात्री बाळगता येत नाही. सर्व सण साजरे होऊ शकतात. फक्त आपल्यात एकोपा असला पाहिजे. कारण बोलून काही होत नाही; प्रत्यक्ष कृतीतून ते समोर आलं पाहिजे.”
असा विचार करता करता सहज पावले त्या मुलांच्या घोळक्याकडे वळली. कारण मला एकच गोष्ट कळते ह्या सणांबद्दल 'सण साजरे करण्यासाठी आपल्याला खाज नाही तर माज असला पाहिजे'

Group content visibility: 
Use group defaults

वाहता धागा कश्यासाठी ?

विषय महत्त्वाचा आहे.
सण साजरे झालेच पाहिजेत. नाहीतर हिंदू संस्कृती लयाला जाईल.

फक्त आपल्याच लोकांना त्रास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी.
फटाके फोडण्या ऐवजी दिप माला बनवणे, किल्ले बनवणे; लाऊड स्पीकर वर गोंगाटगाणी 'आवाज वाढव DJ' 'शांताबाई' असे काहीतरी कर्कश्श आवाजात लावण्याऐवजी एखादे वाद्य शिकून त्यावर गणपतीबाप्पांची गाणी वाजवणे असे केले तर अतिउत्तम !

मागच्या वर्षी सोसायटीच्या प्रांगनात गणपती बसवलेला असतांना स्पिकरवर कोणती गाणी लावावीत ह्यावरुन जेष्ठ नागरीक आणि तरुण नागरीक ह्यांच्यामध्ये जाम वादावादी झाल्या होत्यमागच्या वर्षी सोसायटीच्या प्रांगनात गणपती बसवलेला असतांना स्पिकरवर कोणती गाणी लावावीत ह्यावरुन जेष्ठ नागरीक आणि तरुण नागरीक ह्यांच्यामध्ये जाम वादावादी झाल्या होत्या.

तुषार तुमच्या लेखाचा विषय चांगला आहे.पण दहीहंडीसारखा सण साजरा करताना.एकावर एक मानवी थर चढवताना तरुणांचा नाहक जीव जातो.याचे वाईट वाटते.

सण साजरे करण्यासाठी आपल्याला खाज नाही तर माज असला पाहिजे>>>>

माज दाखवायचा असेल तर सैन्यात भरती व्हा. तिथली कडक शिस्त लगेच माज उतरवेल.

सण माज दाखवायला रचलेले नाहीत. ते केवळ माज दाखवायला साजरे केले जाताहेत म्हणून त्रास वाढतोय.