सादर चित्रपट आक्षेपार्ह नाही ? भाग ३

Submitted by हस्तर on 15 July, 2019 - 13:46

गाभा:

अमिताभ चा जुना चित्रपट जमीर ( जंजीर नाही ) देव आनंद च्या बम्बई का बाबू वर बेतलेला १९७५ चा

विनोद खन्ना चा छोटासा रोल ,सायरा बानू अभिनेत्री
अमिताभ सायरा बानू चे सूत जुळते

नंतर अमिताभ हा शम्मी कपूर चा हरवलेला मुलगा आहे हे कळते
पार्टी चालू असते सायरा बानू येते आणि शम्मी कपूर ओळख करून देतो हि तुझी बहीण
इंटर्वल

दुर्भाग्य असे कि नंतर पण ते एक दुसऱ्या बाबत फीलिंग ठेवतात

शेवटी शेवटी कळते कि ते भाऊ बहीण नाही पण हे जे आहे ते योग्य आहे का ?
त्यावेळी INCEST वगैरे म्हणून संस्कृती रक्षक गप्प का होते

कमाल म्हणजे ३१ ची सायरा बानू स्टुडन्ट दाखवली आहे ,अमीर खान ३ इडियट मध्ये वाटत तरी होता पण इथे तसे नाही

विषय: 
Groups audience: 
Group content visibility: 
Use group defaults

त्यात काही आक्षेपार्ह आहे असं मला तरी वाटत नाही. पस्तिशीची लोकं डबल पी एच डी करताना दिसतात. ती तर फक्त एकतीशीची.

पूर्वी खूप शिकून पाया भक्कम करण्याकडे कल होता.
३१ हे काही वय नव्हतं बाद होण्याचं. त्या वेळी विशी, तिशी आणि चाळीशीत नवी पालवी फुटत असे.

हस्तर भाई मला पहिल्यापासून शीर्षक समजलं नाही. मला वाटतं सदर असायला हवे. मला वाटायचं सादर नावाचा चित्रपट आहे काय की बुवा. कृपया मज अडाण्यास समजून सांगावं.

नाव लक्षात नाही, पण एक अलीकडच्या काळातील अशाच सारखा मराठी सिनेमा आहे. मृणाल कुलकर्णी आणि तिचा कॉलेज मधला मित्र मध्यमवय उलटून गेल्यावर लग्न करायचं ठरवतात. त्यांची पूर्वीच्या लग्नातली मुलं ओळख करून घेण्यासाठी भेटत रहातात आणि तीच दोघे प्रेमात पडतात.

मला माहिती आहे त्यानुसार: इन्सेस्ट हा भारतात कायद्याने गुन्हा नाही.

वर उल्लेख आलेल्या प्रत्येक चित्रपटात वेगवेगळे सिनारिओ आहेत.

बम्बई का बाबू - देवला माहित असतं की ती आपली बहीण नाही. सुचित्राला त्याच वागणं विचित्र वाटतं. मी भाऊ नाही हे सांगितलं तरी शेवटपर्यंत ती नाहीच म्हणत राहते. देव तो निर्णय मान्य करतो.

मीराने सांगितलेल्या चित्रपटात तर इन्सेस्टचा काहीच प्रॉब्लेम नाहीय. रक्त नाते नाहीय तिथे.

राजकुमार, कमल हसन, हेमामालिनी, पद्मिनी कोल्हापूरे यांचा जो चित्रपट होता त्यातदेखील रक्तनाते नसते.

सांगत्ये ऐका (आणि मंडी)- तमासगीर बाई (आणि वेश्या) ग्राहक प्रेमात पडतात. नंतर कळते की त्यांचा बाप एकच आहे. म्हणजे ते सावत्र भाऊ-बहीण असतात.

जमीरमधेदेखील असंच आहे, फक्त शेवटी ते भाऊ बहीण नाही हे कळत.

भूमिकामधे स्मिता लग्न करते अमोल पालेकरशी. तो तिच्या आईचा (एक्स?)प्रियकर असतो.