ट्रिक ऑर ट्रिट. :)

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

DSC05305.JPG
या वेळी नेहमी प्रमाने pumpkin कार्विंग केलच. पण उर्विका लहान असल्यामुळे चाकु अजुन वापरता येत नाही. म्हणुन मग दुसरा काहीतरी पर्याय शोधत होते. शोधताना potterybarn वर "हॅलोवीन डेकोरेशन " साठी काही तयार सेट दिसले. त्या पासुन inspire होवुन आम्ही हे सेट स्वतःच तयार केले.
हॉबीलॉबी मधुन back side ला स्टिकी सरफेस असलेले फेल्ट मिळतात ते आणले.
साध्या कागदावर अगोदर pattern काढुन घेतला. आणि मग तो फेल्ट च्या मागच्या साईडला काढला.
मुलीने ते सगळे pattern कापले. (काही अवघड भाग मी कापले)
मग फेल्ट चा मागच कागद (पील ऑफ कागद असतो) काढला आणि भोपळ्यावर चिकटवला.
काही भाग टुथ पिक च्या सहाय्याने pumpkin ला जोडले.
जीथे धाग्यान विणल्यासारख दाखवायच होत तीथे ब्रशने अ‍ॅक्रिलिक पेंट वापरुन ठिपक्यांसारख काढले.
कॅट,स्पायडर, कवटी,पायरेट पम्पकिन तयार.:)
मुलीन खुप enjoy केल. स्टिकी फेल्ट असल्यामुळ पाहिजे तस लावता येत होत. काढता येत होत.

उर्विका sleeping beauty झाली आहे. Happy कार्विंग केलेल्या पम्पकिनचा फोटो नंतर टाकते.
सगळ्याना भरपुर कँडी मिळुदे हीच ड्रॅकुला चरणी प्रार्थना. Proud

DSC05304.JPGDSC05296.JPGDSC05309.JPG

विषय: 
प्रकार: 

गोड !!!

गुलाबी शेवंती खूपच सुंदर आहे!!! काय फुलली मस्तं.. सुवास येतो का?

तुझ्या भुतांची भुताटकी पण छान आहे Happy तुझं जुन्या पद्धतीचं घर पण यासाठी छान वाटतं आहे Happy ती हाडं कशी दिसताहेत Happy आणि ती विजेची दोन बटणं.. भारतातील विजेचा खांब आठवला अगदी Happy

thanks सगळ्याना. Happy कार्विंग केल असेल तर टाकलेच जातात ते भोपळे. मेन purpose या भोपळ्यांचा decoration हाच .
अजुन बरेच दिवस fall आहे.त्यामुळ प्लेन भोपळे front yard मध्ये फॉल संपु पर्यंत ठेवता येतात.
केपी LOL. भोपळे रोस्ट करुन खरच खुप मस्त लागतात.:) pumpkin pie पण मस्त लागतो. पण गंमत म्हणजे त्यासाठी टिन मधला भोपळा वापरतात. कारण त्याचीच चव जास्त चांगली लागते.