किडनी संबंधीत आजारामधील आहार

Submitted by सूर्यगंगा on 1 July, 2019 - 06:26

नमस्कार. माझ्या नातेवाईकाला किडनी संबंधीत दोष आहे. तरी त्यांच्या आहारामध्ये काय असावे व काय नसावे ? डाळी,कडधान्ये यांचा समावेश आहारात कितपत असावा ? पालक, टोमँटो यासारख्या भाज्या जेवनात चालतात का? क्रियाटीन वाढू नये याकरीता काय पथ्य कराव ? कृपया,आहार -विहार ,पथ्य- अपथ्य याबाबत मार्गदर्शन करा.धन्यवाद

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

क्रिएटिनिन लेव्हल किती आहे सध्या ? क्रॉनिक किडनी डिसीझ असे निदान आहे का ? नेफ्रॉलॉजिस्टना भेटा आणि ते सांगतील तसे पथ्य पाळा. ओळखीपाळखीच्या लोकांनी काही बाही सांगून तुम्ही संभ्रमावस्थेत आहात तर इथे अनोळखी लोकांच्या सल्ल्यांनी काय फरक पडणार?

कोणत्या उपचारात गोळ्या चालू असल्यामुळे क्रियाटिन वाढते, किडनीस त्रास होत असतो हे त्या गोळ्यांबद्दल जाणून घ्या.
तसले काही नसेल तर साण्डुचा पुनर्नवादी काढा दोनदा घेतल्यास गुण येतो. इतर कोणती अन्टीबायो, चालू नसावीत. गोखरु काढा किंवा गोक्षुरादि गुग्गळ एकेक गोळीही चालेल. या तिनांपैकी एकच घेणे. अगदी सौम्य आणि स्वस्त धमासा काड्यांचे उकळून पाणी किंवा चूर्ण.
बाकी आहारात क्षारवाले टाळणे बरे.

डॉ. ना विचारलेले की काय चालेल किंवा काय नाही तर त्यानीं सांगीतले सगळंच चालते फक्त मोसंबी,संत्री नको परंतू ओळखीतील एक काका आहेत त्यांच्या डॉ नी त्यांना डाळी खाऊ नका म्हनून सांगीतले , म्हनून कनफ्युजन . माझ्या नातेवाईकाला मधूमेह आहे.

Halli hospital mdhe seminar astat tyat health chart detat.. tyana kiti Vela dialysis ahe weekly..

कबालीचाचा,

दीर्घकालीन मूत्रपिंड विकारात (CKD) आजाराच्या स्थितीनुसार प्रत्येक रुग्णाचा आहार गणिती सूत्राने ठरवला जातो. त्यामुळे इथे फक्त त्याची रूपरेषा देतो:

१. प्रथिने कमी द्यायची का, हा तसा वादग्रस्त मुद्दा आहे. आजाराच्या ५ व्या स्थितीत याची शिफारस आहे.
२. मधुमेह + हा विकार असल्यास मीठ-नियंत्रण करावे.

३. फॉस्फेटयुक्त आहार कमी : म्हणजे दूध व मांस.
४. पोटॅशियमयुक्त कमी : म्हणजे टोमॅटो, , ब्रोकोली, वाटाणे, केळे, मांस व मासे

५. पाणी मोजून पिणे , सल्ल्यानुसार.

कबालीचाचा,
माझ्या नातेवाईकाला किडनी संबंधीत दोष आहे ----- हे अतिशय मोघम विधान आहे.
याच्या आधारावर सामान्य माणसेच काय पण मायबोलीवरील डॉ ही योग्य / काहीच मार्गदर्शन करू शकणार नाहीत.

काय त्रास आहे? किती मुरलेला आजार आहे? कशमुळे झालाय? यावर इलाज करताना अजून काही वैद्यकीय गुंतागुंत होऊ शकेल काय? --- या वैद्यकीय माहितीशिवाय काही बोलणे इष्टही होणार नाही.

अनेक किडनी विकार आहेत आणि त्यामागे १७६० कारणे / शारीरीक व्याधी / चालू असलेल्या इतर औषधांचे साईड इफेक्ट असू शकतात.

ऐकीव माहिती आणि भेटायला येणार्‍यांनी आस्थेने दिलेले सल्ले याच्या वापराने इलाज करण्याचा किडनी हा अवयव नव्हे.

तुमचे डॉ जे म्हणतात ते पाळा कारण त्यांनी पेशंटचे शरीर, त्याची तब्येत, त्याचे रिपोर्ट पाहिलेले आहेत.
नातेवाईक / भेटायला येणार्‍यांच्या सल्ल्याविषयी तुमच्या डॉ कडूनच शंका समाधान करून घ्या. ते पेशंटच्या हिताचे राहील.

तुम्हाला हे खा / खाऊ नका सांगणार्‍या नातेवाईक लोकांना आणि तुमच्या पेशंटला एकच आजार आहे / होता का? हाही विचार करावा लागेल.
ढोबळ मानाने ---
लघवीतून अधिक प्रमाणात प्रोटीन जाणे हा एक आजार असतो ----- त्यावेळी प्रोटीन युक्त आहार -- डाळी कडधान्ये मांसाहार इत्यादिवर बंधने येतात.
मुतखडा या विकारात -- पालक, अळू, वांगे, टोमॅटो यावर बंधने येतात.

क्रिअ‍ॅटिनीन वाढणे यामागे अनेक कारणे असू शकतात. ती नेमकी शोधून मग त्यावर इलाज करावा लागेल.

जर तुमचा पेशंट मधुमेही आहे तर दीर्घकाळ, अनियंत्रित मधुमेहामुळे (खूप वाढलेली साखर, खूप दिवस किंवा सातत्याने) किडनीच्या कामात दोष निर्माण होतात. अनियंत्रित मधुमेहामुळे हृदय, डोळे, किडनी, मेंदू, पावले या महत्त्वाच्या अवयवांचे गंभीर आजार उद्भवू शकतात.

त्यात पथ्य + औषधे यांच्या मदतीने साखरेची पातळी आटोक्यात आणणे हे पहिले करतात मग बाकी अवयवाम्च्या त्रासावर इलाज होतो. डॉ च्या सल्ल्याने पुढे जात रहा. सेकंड ओपिनिअन घ्यायचाच असेल तर तो दुसर्‍या सक्षम डॉचा घ्या. आमच्या शुभेच्छा.

दुसर्‍या धाग्यावर तुम्ही नागपूरमधील युरोलॉजिस्ट ( मूत्र शल्य विशारद) विचारलायत. तो यासाठीच होता का?
माझ्या माहितीप्रमाणे,
युरोलॉजिस्ट किडनीचे पेशंट बघत नाहीत. मूत्रमार्गाचे विकार / दोष यांचे पेशंट ते बघतात.
मूत्र शल्य विशारद म्हणजे युरो सर्जन -- मूत्रमार्गाचे ऑपरेशन करणारे डॉ
नेफ्रॉलॉजिस्ट हे किडनी विकार बघतात.
तिथेही तुमच्या चुकीच्या प्रश्नामुळे चुकीची नावे मिळाली असतील.
म्हणजे डॉ निष्णात पण तुमच्या कामाचे नाहीत. कारण त्यांचे कौशल्य क्षेत्र वेगळे.

तुम्ही किडनी विकार ऐकून घाबरला असाल तर आधी स्वतः शांत व्हा. डॉ ना दाखवा, तपसण्या करून घ्या.
नेमका काय त्रास, किती सिरीयस समजून घ्या --- रिपोर्टवरून + डॉ शी बोलून.
उपचार काय काय होऊ शकतात, त्यातले कुठले जास्त योग्य / तातडीने करण्यासारखे / दीर्घकाळ चालणारे --- हे सर्व समजून घ्या. शांत डोक्याने निर्णय घ्या
चालू डॉ च्या उत्तरांनी समाधान झाले नाही / फरक पडला नाही तर दुसर्‍या डॉ चा सल्ला घेता येईल.

*** योग्य ज्ञान असलेल्या व्यक्तीकडून सल्ला आलेला आहे कबालीचाचा. डॉ सल्ल्यानेच पुढे चला कृपया.

Kumar sir+11111.. actually mi 2/3 seminar attend kele hote tyamule tevdhi jast mahiti nahi .. Ani maza vadilana weekly twice dialysis ahe from last 3 years... Khup grass hoto kadhi kadhi ... Oftenly thik Astana ekte suddha jatat te dialysis sathi .. but cure is always better so mith aslele packing food salty fish Ani egg yellow vgre talta yeil tevdh ok.. paneer, egg white , tandul Ani dal vgre direct na shijvta thod soak krun ghetlel changl ast.. Pani agdi pramanat ghyav juice vgre nahi ghetl tri chalel .. direct fruit bt te hi pramanat ghyave..

कारवी,मी किडनी संबंधीत दोष म्हटले कारण अजूनही नेमके निदान झालेले नाही.औषधोपचार करनाऱ्या डॉ.नी युरोलॉजीस्टनाच भेटायला सांगीतले आहे . नेफ्रोलॉजीस्ट नको म्हनाले. आतमध्ये नळी(काय म्हनतात माहीती नाही) टाकून तपासनी करायची आहे,जी इथे होत नाही आहे , म्हनून त्यांनी नागपूरचे डॉ. सांगीतले आहे.

मायबोलीकर कुणी डॅा कडे न जाता इथेच सल्ले विचारून स्वत:च उपचार नक्कीच करत नसणार.

इतर रोगांवरची काही औषधं पोट, किडनी आणि लिवरवर वाइट परिणाम करतात. तसं त्यात लिहिलेलं असतं. एक बरा करता दुसरा उदभवतो.