शोधत होतो पुन्हा स्वत:ला

Submitted by अनन्त्_यात्री on 15 June, 2019 - 11:24

शोधत होतो पुन्हा पुन्हा मी
प्राचीनाची प्रचंड पडझड
आधुनिकाची अपार अडगळ
ऐकत होतो पुन्हा पुन्हा मी
भवितव्याचे भीषण पडघम
शोधत होतो पुन्हा स्वत:ला
ऐकत होतो माझी चाहुल
उमगत गेले नकळत तेव्हा
मौनाचे सामर्थ्य शुभंकर

Group content visibility: 
Use group defaults

सुरेख...
आधीच्या कवितेत मला कल्पना दिली होती पण एवढ्यात अम्मल होईल याची कल्पना नव्हती.
नेमक्या शब्दात कसं जमतं खूप काही सांगायला.....हा तुमचा शोध खरच अतुलनीय आहे.

सुंदर