आचार्य (शतशब्दकथा)

Submitted by दासानु दास on 17 May, 2019 - 04:27

"शिस्त! शिस्तीचे पालन करण्यासाठी जर दृढता नसेल, तर आपल्यात आणि प्राण्यांमध्ये फरकच काय उरतो?" ते उद्गार गुरुकुलातील शांतता भेदून गेले.

पहिल्यांदा गुरुजींचा क्रोध दिसत होता. गुरुमाताही थक्क झल्या होत्या. क्रोधाचे कारण मात्र कळत नव्हते.

"अस्वलाप्रमानेच झोप आवडत असेल, तर मनुष्य जन्म मिळून फायदाच काय?..." आता कुठे गुरुजींच्या क्रोधाचे कारण कळाले. घोर निराशा आणि क्रोधामुळे गुरुजी खूप काही बोलून गेले. पण चुक कुणाची हे मात्र कळत नव्हते.

रात्री गुरुमातांनीच विचारले, "अहो, 'लहान मुलं आहेत ती, चुकणारच!' तुम्हीच म्हणता ना? कित्ती कठोरपणे बोललात. ज्याला उशिर झाला, त्याला कित्ती वाईट वाटले असेल? मी प्रेमाने समजावेन त्याला. कोण होतं?"

"मी! ती कठोरता माझ्यासाठी होती..."

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

छान

कथा आवडली
बाकी ''अस्वलाप्रमानेच झोप आवडत असेल, तर मनुष्य जन्म मिळून फायदाच काय'' हे काही पटत नाही

Chan

बाकी ''अस्वलाप्रमानेच झोप आवडत असेल, तर मनुष्य जन्म मिळून फायदाच काय'' हे काही पटत नाही>>>> हे न पटण्यासारखं आहेच. रागाच्या भरात लोकं असंच न पटणारं बोलतात....

प्रतिक्रियांबद्दल सर्वांना धन्यवाद!