Submitted by माउ on 11 May, 2019 - 13:45
अंधार असा ओघळतो
रात्रीची ढळते काया
चंद्राला घालुन फुंकर
अवतरते पहाटछाया
छायेची चाहुल ओली
भिजलेला श्वास नभाचा
अत्रुप्त तनावर येतो
उरलेला भास सुखाचा
सुख चाखुन घेता होते
ही पहाट रात्र धुक्याची
इच्छांना मिळते चादर
काजळल्या कुंद मनाची
मन रुजून होते अंकुर
या ओल्या प्रहराखाली
स्वप्नांची हिरवी पाने
निजल्या श्वासांना आली
-रसिका
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
चंद्राला घालून फुंकर.. सुंदर
चंद्राला घालून फुंकर.. सुंदर कल्पना!
Sundar
Sundar
सुंदर कविता
सुंदर कविता
मस्त
मस्त
धन्यवाद!
धन्यवाद!
वाह! अगदी सुरेख!
वाह! अगदी सुरेख!
ग्रेसांची 'पाऊस कधीचा पडतो'
ग्रेसांची 'पाऊस कधीचा पडतो' ही कविता आठवली.
आवडली कविता
आवडली कविता
सुंदर
सुंदर
ग्रेसांची 'पाऊस कधीचा पडतो'
ग्रेसांची 'पाऊस कधीचा पडतो' ही कविता आठवली.>> अगदी मी हेच लिहायला आलेले
भिजलेला श्वास नभाचा
आणि
मन रुजून होते अंकुर
या ओल्या प्रहराखाली
स्वप्नांची हिरवी पाने
निजल्या श्वासांना आली>> हे खूपच आवडलं !!
सुंदर कविता !!
खूप खूप धन्यवाद!!
खूप खूप धन्यवाद!!
सुरेख.
सुरेख.