वास्तु

Submitted by जयश्री साळुंके on 7 May, 2019 - 11:25

प्रत्येक वास्तु ला स्वतःचा असा एक भुतकाळ असतो. मला देखील आहे. तो कोणता काळ होता ते नाही आठवत पण रंगनाथ रावांनी दिवस रात्र मेहनत घेऊन माझी घडवणुक केली, हा त्या आधी इथे येऊन राहून गेलेले बरेच पण सध्या कोणी इकडे फिरकत पण नव्हत, एकटेपणाचा कंटाळा आला होता मला म्हणून मी पण गपगुमान सगळे लाड करवून घेत राहिलो. आणि सौ रंगनाथ यांनी डोळ्यात तेल घालून माझ्या भिंतीना घरपण दिलं. त्यांची चिमुकली नातवंड दिवसभर घरात हुंदडत फिरायचीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्या लागल्या की घरात एक वेगळीच गडबड सुरू व्हायची. रंगनाथ रावांना तर संपुर्ण वाडा कमी पडायचा मुलांसोबत. रंगनाथ रावांचं कुटुंबाचा पसारा तसा मोठा होता, तीन मुलं त्यातल्या दोघांच लग्न झालेलं, दोन मुली, दोघींची लग्न झालेली. त्यामुळे घरात मोठी सात आणि लहान चार कायमची तर तीन आजोळी येऊन जाऊन राहणारी अशी सात छोटी माणसं राहत.
आता जरा स्वतः बद्दल सांगतो, मला रंगनाथ रावांच्या पूर्वजांनी बांधलं होत, म्हणतात कि कोण्या एका राजाच्या काळात हि जमीन त्यांना बक्षिसी म्हणुन दिलेली, आता या पडीक असलेल्या जागेवर काय करायचं म्हणुन आधी त्यांनी दोन मजली वाडा बांधला आणि मग त्या भोवती जीवन रुळायला लागलं. वाड्यात एकूण २२ खोल्या, मोठा चौसेपी वरंडा, समोरच्या अंगणात एक तुळस आणि एक मोठ शिवाच मंदिर, एक तळमजला ज्याच दार घरातल्या सगळ्यात शेवटच्या आणि कोपर्यातल्या खोलीत होत आणि त्यात घरातला कर्ता पुरुष राहायचा, ह्या दाराबद्दल फक्त त्या कर्त्या पुरुषालाच माहित असायचं आणि हे पिढीजात असचं चालत आलेलं, पाठीमागे एक मोठी बाग, ती बाग म्हणजे जणू स्वर्गच, आंबे, फणस, नारळी पोफळीच्या बागा. आणि यातच होती ती विहिर...
रंगनाथ रावांनी घराची डागडुजी केली तेव्हा पण ती होतीच तिथे, आणि त्या आधी कित्येक पिढ्यांपासून. त्यांना वाटलं की तेव्हडच घराला पाण्याची सोय, पण कोणास ठावूक माझी नव्हती ईच्छा की त्यांनी त्या विहिरीचं पाणी वापरावं, पाणी वापरणं तर दुर त्यांनी त्या विहिरीजवळ जावं असं पण मला वाटत नव्हत.
क्रमशः

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users