भाऊ मना समरट

Submitted by king_of_net on 9 May, 2019 - 00:51

"भाऊ मना समरट" या अहिराणी भाषेतील गाण्याचे शब्द कोणाकडे असल्यास कृपया share कराल का?

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

देवकी, त्या लिंकमध्ये शब्द लिहिलेले नाही आहेत, ऐकून नीट समजत नाही. ज्यांना अहिराणी भाषा येते/समजते त्यांना सांगता येईल.

सारजा येसु वं येसू वं
तुनी करवली व्हसू वं

नको येऊ बह्यना
तुले हिवाळामा हिव लागी वं
भाऊ मना सम्राट सम्राट
तुले शेकोटी लाई वं
सारजा येसू....

नको येऊ बह्यना
तुले पावसाळामा पाणी लागी वं
भाऊ मना सम्राट, सम्राट,
माले छतरी लई वं
सारजा येसु..

नको येऊ बह्यना
तुले उन्हाळामा ऊन लागी वं
भाऊ मना सम्राट, सम्राट
माले बाजीले (something) वं
सारजा येसू वं येसू वं
तुनी करवली व्हसू वं

बाजीले (something) >>इथे वयली जुती वं असे आहे . म्हणजे बैलगाडीला वर छत लावेल टांग्याला असते तसं.