तब्बल ११ वर्ष...
१. आयर्न मॅन
२. आयर्न मॅन २
३. आयर्न मॅन ३
४. कॅप्टन अमेरिका - द फर्स्ट अवेंजर
५. कॅप्टन अमेरिका - विंटर सोल्जर
६. कॅप्टन अमेरिका - सिव्हिल वॉर
७. थॉर
८. थॉर - द डार्क वर्ल्ड
९. थॉर - Ragnarok
१०. द अवेंजर्स
११. अवेंजर्स - एज ऑफ अलट्रॉन
१२. अवेंजर्स - इंफिनिटी वॉर
१४. गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी
१५. गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी
१६. द इंक्रेडीबल हल्क
१७. अँट मॅन
१८. अँट मॅन अँड द वास्प
१९. स्पायडरमॅन - होमकमिंग
२०. डॉ. स्ट्रेंज
२१. कॅप्टन मार्व्हल.
तब्बल २१ चित्रपट...
अगणित सुपरहिरोज...
आणि एक शेवटची लढाई...
२०१९ हे वर्ष फक्त मला आवडणाऱ्या गोष्टी संपवणार असं दिसतंय. अवेंजर्सची कथा आज माझ्यासाठी एन्डगेम मध्ये संपली! गेम ऑफ थ्रोन्स संपणार आहे, आणि डिसेंबरमध्ये स्टार वॉर सुद्धा...
हा चित्रपट बघतांना, कोरी पाटी घेऊन बघणं मला शक्यच नव्हतं. हा चित्रपट बघताना मला अनबायस राहणं शक्य नव्हतं.
मार्व्हलचा आजपर्यंत मी एकही चित्रपट सोडलेला नाही. एक फॅनबॉय म्हणूनच हा चित्रपट मी बघितला, आणि... चित्रपट संपताना एक समाधान आणि दुःख घेऊनच बाहेर पडलो... काही गोष्टी नाही मिळत पुन्हा...
इंफिनिटी वॉर मध्ये थानोसतात्यानी निम्मं युनिवर्स खलास केलं. त्यांनंतर घडणारी ही कथा...
इंफिनिटी वॉर मध्ये टोनी स्टार्क हा अंतरिक्षात अडकून पडलेला असतो. २१ दिवस अन्नपाण्याचा पुरवठा न झाल्याने मरणाला टेकलेला असतो. त्यातच कॅप्टन मार्व्हल त्याला वाचवते. तो आणि नेब्युला पृथ्वीवर येतात आणि बाकीच्या उरलेल्या अवेंजर्स ला भेटतात. कॅप्टन अमेरिकाला इंफिनिटी स्टोन्स शोधून निम्या युनिवर्सला परत आणायचं असतं. त्याकामी तो टोनीची मदत मागतो, टोनी त्याला मदत करायचं नाकारतो. अशातच टोनीला एके दिवशी पीटर पार्करचा फोटो दिसतो, आणि तो त्याला पुन्हा सर्वकाही ठीक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करतो.
बस... मी एवढीच स्टोरी सांगणार आहे, कारण हा चित्रपट बघताना प्रत्येक मायनर डिटेलही स्पोईलर असेन...
काय लिहू, आणि कसं लिहू, तेच कळत नाही... हा चित्रपट मी आजपर्यंत बघितलेल्या सगळ्या चित्रपटातील मास्टरपीस ठरावा. तीन चार वेळा तर मी मोठ्या मुश्किलीने डोळ्यातलं पाणी आवरलंय... तीन चार वेळा मी मोठ्या मुश्किलीने स्वतःला खुर्चीवरून उडी मारताना आवरलंय... आणि शेवटी थिएटरमध्ये सुन्नही बसून राहिलोय.
या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिणं हे अशक्य कोटीतलं आव्हान आहे, हे माझं ठाम मत होतं. २१ चित्रपटांची समरी एका चित्रपटात सामावणं, त्यातील सगळ्या स्टोरी आर्कला एक ठोस क्लायमॅक्स देणं, खायची गोष्ट नव्हती...
पण, माझं मत अक्षरशः या चित्रपटात खोटं ठरवलंय, नाही, अक्षरशः जे दाखवलंय, ते खूप खूप खूप वेगळं आहे. यामध्ये प्रत्येक क्षणात एक काहीतर संपण्याची भावना आहे, काहीतरी नव्याची उमेद आहे, काहीतरी गणावण्याचं दुःख आहे, काहीतरी मिळवण्याची आशा आहे...
या चित्रपटात प्रत्येकाने कुणीतरी खूप जवळचं गमावलय आणि त्यांना परत आणायचंय. त्यासाठी उरलेले सगळे हिरोज एकत्र येतात, आणि सुरू होतो एक प्रवास. एक काळाचा प्रवास, ज्यात ते अनेक व्यक्तींना भेटतात, आणि प्रत्येक क्षणात एक भावना असते, काहीतरी गमावल्याची, आणि तो क्षण गेल्यानंतर एक समाधान आहे, काहीतरी परत मिळवल्याची. हीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सगळं काही...
चित्रीकरण... इट्स लाईक अ पेंटिंग... कलरफुल... प्रत्येक कॉस्च्युम, प्रत्येक फ्रेम ठळकपणे उठून दिसते. सूर्यप्रकाश असेल तर थेटर लक्ख उजळून निघतं. प्रत्येक ग्रह स्वतःची नवी ओळख जपतो... थानोसच शेत तर बिलकुल चुकवू नका. क्लायमॅक्स मात्र प्रचंड सुंदर आहे, शेवटची फाईट नव्हे, महायुद्ध अक्षरशः शेवटच्या युद्धासारखंच आहे, हे महाभारत आहे, आणि प्रचंड आहे... अविश्वसनीय आहे.
कलाकारांचा अभिनय हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, कारण गेल्या अकरा वर्षांपासून हे कलाकार या भूमिका जगतायेत. पण तरीही एक शॉर्ट कॅरेकटर समरी द्यायचं ठरलंच तर...
टोनी स्टार्क - हा माणूस हॉलीवूड चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. एक प्लेबॉय ते एक पृथ्वीची जबाबदारी शिरावर असलेला माणूस, हा प्रवास अविश्वसनीय आहे. आणि त्यातही अनेक भावनिक कंगोरे हा माणूस ज्या पद्धतीने मांडतो, ते कुणीही मांडू शकत नाही. हा माणूस मार्व्हलचा बापमाणूस, आणि याला लीडर का म्हणतात, हे चित्रपटात कळतं.
नेब्युला - शी इज वारीयर, बट शी हॅज हर्ट. अँड आय लव्ह हर. (खरंच नेब्युला खूप सुंदर दिसते)
कॅप्टन अमेरिका - ही इज लीडर, आणि या चित्रपटात त्याची लीडरशिप खूप छान रंगवलीये. आणि ही इज रियली वर्थ 
हल्क, ब्रूस बॅनर - डीसअपॉइंटेड... हल्क म्हणजे तोडफोडीचा सुपरहिरो, त्याला एक कॉमिक कॅरेकटर करण्यात आलंय. तेही जमत नाही.
थॉर - ब्रूस बॅनर पेक्षा मोठी डीसअपॉइंटमेंट. खरंच, टोटल वेस्ट ऑफ गॉड ऑफ थंडर.
ब्लॅक विडो - खूप छान भूमिका रंगवलिये. हीसुद्धा एक को लीडर म्हणून काम करते.
कॅप्टन मार्व्हल - मला हे कॅरेकटर नाही आवडलं. ओवरपॉवर, बट नॉट ऑफ एनी युज. आणि लार्सनबाई या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत.
वॉर मशीन - चांगलं रंगवलय.
रॉकेट - मस्त, कॉमिक रिलीफसाठी तर अजून छान.
अँट मॅन - बरा आहे. गरजेपुरता ओके... जास्त अपेक्षा नाहीत आणि मी ठेवल्याची नव्हत्या.
थानोस - मागच्या भागात थानोस जितका कमाल होता, तितकाच या भागात तो एकसुरी वाटतो. पण हा विलनच जबरदस्त आहे, आणि खरंच, हा एकच विलेन आहे, जो सगळ्यांना एकटा पुरून उरू शकतो...
दिग्दर्शकांना मात्र मी मुजरा करेन. एवढे सगळे कॅरेक्टर एकत्र आणणं, त्यांना एक ठोस दिशा देणं खायचं काम नाही. इतकं भव्यदिव्य महायुद्ध आणि इतके सगळे इमोशन्स, खरंच दंडवत...
आज एक सुन्नतेची भावना आहे, काहीतरी गमावल्याची... यापुढेही मार्व्हलचे चित्रपट येतील, पण मीतरी ते बघणार नाही, कारण ते फक्त आता एक वाढवायचं म्हणून वाढवायचं काम असेल. काही कॅरेक्टर नाही दिसणार यापुढे, ज्यांच्याशिवाय मी मार्व्हलची कल्पना करू शकत नाही.
आज फॅन जिंकले... फॅन हरले...
WE WON... WE LOSE...
ब्लॅक पँथर राहिला का लिहायचा
ब्लॅक पँथर राहिला का लिहायचा
आय लव यु ३०००:
आय लव यु ३०००:
https://www.loksatta.com/manoranjan-news/tony-stark-i-love-you-3000-by-m...
अरे फाल्कन च. माझा
अरे फाल्कन च. माझा दोघांच्यात गोंधळ झाला. फ्युनरल ला र्होडी पण आलेला. सो क्युट. निक फ्युरी व रॉबिन परत आलेत म्हणजे शील्ड चालूच राहील. स्पाइ डी पोरगा पण परत आला सो क्युट.
thanos google doodle खूपच
thanos google doodle खूपच भारी .....google वर thanos अस search करा . result count नोट करा. उजव्या बाजूला तो glove दिसेल..त्याच्यावर click करा म्हणजे चुटकी वाजेल. आणि ५०% results गायब होतील..
टायटॅनिक बुडाली शेवटी....
टायटॅनिक बुडाली शेवटी....
बहुतेक अवतार नाही बुडणार!!
सोल स्टोन साठी बॅनरने जायला
सोल स्टोन साठी बॅनरने जायला हवे होते. म्हणजे बॅनरने सॅक्रिफाईस केले असते आणि हल्कने त्याला मरू पण दिले नसते एका फटक्यात दोन पक्षी.... आणि लगे हाथो रेड स्कलला (हायड्राला) दोन चार दणके सुद्धा मिळाले असते.
टेक्निकली, पुन्हा अस्तित्व मिळालेले सगळे लोक ... बाकीच्या लोकांपेक्षा पाच वर्षांनी तरूण असणार का?
कॅप्टन अमेरिका थोरचा हातोडा
कॅप्टन अमेरिका थोरचा हातोडा कसा हाताळू लागला अचानकच?
Pages