AVENGERS ENDGAME : WE WON, WE LOSE....(No spoilers)

Submitted by अज्ञातवासी on 27 April, 2019 - 12:02

तब्बल ११ वर्ष...

१. आयर्न मॅन
२. आयर्न मॅन २
३. आयर्न मॅन ३
४. कॅप्टन अमेरिका - द फर्स्ट अवेंजर
५. कॅप्टन अमेरिका - विंटर सोल्जर
६. कॅप्टन अमेरिका - सिव्हिल वॉर
७. थॉर
८. थॉर - द डार्क वर्ल्ड
९. थॉर - Ragnarok
१०. द अवेंजर्स
११. अवेंजर्स - एज ऑफ अलट्रॉन
१२. अवेंजर्स - इंफिनिटी वॉर
१४. गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी
१५. गार्डीयन्स ऑफ गॅलक्सी
१६. द इंक्रेडीबल हल्क
१७. अँट मॅन
१८. अँट मॅन अँड द वास्प
१९. स्पायडरमॅन - होमकमिंग
२०. डॉ. स्ट्रेंज
२१. कॅप्टन मार्व्हल.

तब्बल २१ चित्रपट...
अगणित सुपरहिरोज...
आणि एक शेवटची लढाई...

२०१९ हे वर्ष फक्त मला आवडणाऱ्या गोष्टी संपवणार असं दिसतंय. अवेंजर्सची कथा आज माझ्यासाठी एन्डगेम मध्ये संपली! गेम ऑफ थ्रोन्स संपणार आहे, आणि डिसेंबरमध्ये स्टार वॉर सुद्धा...
हा चित्रपट बघतांना, कोरी पाटी घेऊन बघणं मला शक्यच नव्हतं. हा चित्रपट बघताना मला अनबायस राहणं शक्य नव्हतं.
मार्व्हलचा आजपर्यंत मी एकही चित्रपट सोडलेला नाही. एक फॅनबॉय म्हणूनच हा चित्रपट मी बघितला, आणि... चित्रपट संपताना एक समाधान आणि दुःख घेऊनच बाहेर पडलो... काही गोष्टी नाही मिळत पुन्हा...
इंफिनिटी वॉर मध्ये थानोसतात्यानी निम्मं युनिवर्स खलास केलं. त्यांनंतर घडणारी ही कथा...
इंफिनिटी वॉर मध्ये टोनी स्टार्क हा अंतरिक्षात अडकून पडलेला असतो. २१ दिवस अन्नपाण्याचा पुरवठा न झाल्याने मरणाला टेकलेला असतो. त्यातच कॅप्टन मार्व्हल त्याला वाचवते. तो आणि नेब्युला पृथ्वीवर येतात आणि बाकीच्या उरलेल्या अवेंजर्स ला भेटतात. कॅप्टन अमेरिकाला इंफिनिटी स्टोन्स शोधून निम्या युनिवर्सला परत आणायचं असतं. त्याकामी तो टोनीची मदत मागतो, टोनी त्याला मदत करायचं नाकारतो. अशातच टोनीला एके दिवशी पीटर पार्करचा फोटो दिसतो, आणि तो त्याला पुन्हा सर्वकाही ठीक करण्याचा प्रयत्न करण्यासाठी उद्युक्त करतो.
बस... मी एवढीच स्टोरी सांगणार आहे, कारण हा चित्रपट बघताना प्रत्येक मायनर डिटेलही स्पोईलर असेन...
काय लिहू, आणि कसं लिहू, तेच कळत नाही... हा चित्रपट मी आजपर्यंत बघितलेल्या सगळ्या चित्रपटातील मास्टरपीस ठरावा. तीन चार वेळा तर मी मोठ्या मुश्किलीने डोळ्यातलं पाणी आवरलंय... तीन चार वेळा मी मोठ्या मुश्किलीने स्वतःला खुर्चीवरून उडी मारताना आवरलंय... आणि शेवटी थिएटरमध्ये सुन्नही बसून राहिलोय.
या चित्रपटाची कथा आणि पटकथा लिहिणं हे अशक्य कोटीतलं आव्हान आहे, हे माझं ठाम मत होतं. २१ चित्रपटांची समरी एका चित्रपटात सामावणं, त्यातील सगळ्या स्टोरी आर्कला एक ठोस क्लायमॅक्स देणं, खायची गोष्ट नव्हती...
पण, माझं मत अक्षरशः या चित्रपटात खोटं ठरवलंय, नाही, अक्षरशः जे दाखवलंय, ते खूप खूप खूप वेगळं आहे. यामध्ये प्रत्येक क्षणात एक काहीतर संपण्याची भावना आहे, काहीतरी नव्याची उमेद आहे, काहीतरी गणावण्याचं दुःख आहे, काहीतरी मिळवण्याची आशा आहे...
या चित्रपटात प्रत्येकाने कुणीतरी खूप जवळचं गमावलय आणि त्यांना परत आणायचंय. त्यासाठी उरलेले सगळे हिरोज एकत्र येतात, आणि सुरू होतो एक प्रवास. एक काळाचा प्रवास, ज्यात ते अनेक व्यक्तींना भेटतात, आणि प्रत्येक क्षणात एक भावना असते, काहीतरी गमावल्याची, आणि तो क्षण गेल्यानंतर एक समाधान आहे, काहीतरी परत मिळवल्याची. हीच या चित्रपटाची कथा, पटकथा आणि सगळं काही...
चित्रीकरण... इट्स लाईक अ पेंटिंग... कलरफुल... प्रत्येक कॉस्च्युम, प्रत्येक फ्रेम ठळकपणे उठून दिसते. सूर्यप्रकाश असेल तर थेटर लक्ख उजळून निघतं. प्रत्येक ग्रह स्वतःची नवी ओळख जपतो... थानोसच शेत तर बिलकुल चुकवू नका. क्लायमॅक्स मात्र प्रचंड सुंदर आहे, शेवटची फाईट नव्हे, महायुद्ध अक्षरशः शेवटच्या युद्धासारखंच आहे, हे महाभारत आहे, आणि प्रचंड आहे... अविश्वसनीय आहे.
कलाकारांचा अभिनय हा स्वतंत्र अभ्यासाचा विषय आहे, कारण गेल्या अकरा वर्षांपासून हे कलाकार या भूमिका जगतायेत. पण तरीही एक शॉर्ट कॅरेकटर समरी द्यायचं ठरलंच तर...
टोनी स्टार्क - हा माणूस हॉलीवूड चित्रपटसृष्टीच्या इतिहासात एक स्वतंत्र अभ्यासाचा विषय ठरेल. एक प्लेबॉय ते एक पृथ्वीची जबाबदारी शिरावर असलेला माणूस, हा प्रवास अविश्वसनीय आहे. आणि त्यातही अनेक भावनिक कंगोरे हा माणूस ज्या पद्धतीने मांडतो, ते कुणीही मांडू शकत नाही. हा माणूस मार्व्हलचा बापमाणूस, आणि याला लीडर का म्हणतात, हे चित्रपटात कळतं.
नेब्युला - शी इज वारीयर, बट शी हॅज हर्ट. अँड आय लव्ह हर. (खरंच नेब्युला खूप सुंदर दिसते)
कॅप्टन अमेरिका - ही इज लीडर, आणि या चित्रपटात त्याची लीडरशिप खूप छान रंगवलीये. आणि ही इज रियली वर्थ Wink
हल्क, ब्रूस बॅनर - डीसअपॉइंटेड... हल्क म्हणजे तोडफोडीचा सुपरहिरो, त्याला एक कॉमिक कॅरेकटर करण्यात आलंय. तेही जमत नाही.
थॉर - ब्रूस बॅनर पेक्षा मोठी डीसअपॉइंटमेंट. खरंच, टोटल वेस्ट ऑफ गॉड ऑफ थंडर.
ब्लॅक विडो - खूप छान भूमिका रंगवलिये. हीसुद्धा एक को लीडर म्हणून काम करते.
कॅप्टन मार्व्हल - मला हे कॅरेकटर नाही आवडलं. ओवरपॉवर, बट नॉट ऑफ एनी युज. आणि लार्सनबाई या भूमिकेत अजिबात शोभत नाहीत.
वॉर मशीन - चांगलं रंगवलय.
रॉकेट - मस्त, कॉमिक रिलीफसाठी तर अजून छान.
अँट मॅन - बरा आहे. गरजेपुरता ओके... जास्त अपेक्षा नाहीत आणि मी ठेवल्याची नव्हत्या.
थानोस - मागच्या भागात थानोस जितका कमाल होता, तितकाच या भागात तो एकसुरी वाटतो. पण हा विलनच जबरदस्त आहे, आणि खरंच, हा एकच विलेन आहे, जो सगळ्यांना एकटा पुरून उरू शकतो...
दिग्दर्शकांना मात्र मी मुजरा करेन. एवढे सगळे कॅरेक्टर एकत्र आणणं, त्यांना एक ठोस दिशा देणं खायचं काम नाही. इतकं भव्यदिव्य महायुद्ध आणि इतके सगळे इमोशन्स, खरंच दंडवत...
आज एक सुन्नतेची भावना आहे, काहीतरी गमावल्याची... यापुढेही मार्व्हलचे चित्रपट येतील, पण मीतरी ते बघणार नाही, कारण ते फक्त आता एक वाढवायचं म्हणून वाढवायचं काम असेल. काही कॅरेक्टर नाही दिसणार यापुढे, ज्यांच्याशिवाय मी मार्व्हलची कल्पना करू शकत नाही.
आज फॅन जिंकले... फॅन हरले...
WE WON... WE LOSE...

Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मी पण आधीचा गृहपाठ पूर्ण करेन. एकही पाहिला नाही.(हॉलिवूड पटाबाबत आपण ढ आहे.)
एन्ड गेम ची जादू बातम्यांत वाचून आता हा सर्व प्रकार काय आहे बघावंच लागेल.ग्रुहपाठ पूर्ण करेपर्यंत हा प्राईम वर येईलच.

अव्हेंजर्स endgame ने शेवट करण्याऐवजी बरीच दारे पुढच्या कथेसाठी उघडली असे मला वाटले. उदाहरणार्थ: Quantum Realm , Time Travel, कॅप्टन अमेरिका चे shield आणि सर्वात महत्वाचे जेव्हा मॉर्गन स्टार्क Ironman चा मास्क घेऊन खेळते ह्या सर्व सूचक आहेत पुढच्या कथेसाठी

शेवटी न राहवुन इन्फिनिटी वॉर पाहिलाच नेट्फ्लिक्सवर. अर्थात तो मधलाच भाग असल्याने आधीचे संदर्भ माहीत नव्हते पण हळूहळू रुची वढली व मग आधीचे पाहिले नाहियेत हे फारसे जाणवले नाही.
हो, युट्युबवर पैसे देऊन आता पहिले जमेल तितके पहायचे ठरवले आहे व २-३ आठवड्याने हा पहायचा विचार आहे. महिनाभर तरी काही आता हा जाणार नाही त्यामुळे निवांतपणे पाहू.
आणि इन्फिनिटी वॉर पहाताना मजा आली. भारी आहे एकदम. सुपरहीरो ही संकल्पना विशेष आवडीची नसल्याने हे चित्रपट पाहिले नव्हते. पण प्रचंड कल्पनाशक्ती व भन्नाट पेशल इफेक्ट पाहुन आता वाटतंय निदान त्याकरता मोठ्या पडद्यावर पहायला हवे होते.
आता हा ३डी मधे असेल तर पाहीन.

@अमा - धन्यवाद!
@ॲमी - नक्की बघ. वेगळंच विश्व आहे हे!
@मोसा - नक्कीच. पण त्यात ती मजा नसेन. मॉर्गन स्टार्कला मी कधीही आयर्नहर्ट म्हणून मी इमॅजिन करू शकणार नाही.
मला असं वाटतंय, Quantum Realm चा रोल इथेच संपेन. बाकी स्पॉयलर असल्याने चर्चा नको
@सुनिधी - महिनाभर तर नक्कीच हलणार नाही. तो फालतू SOTY2 आल्यावर थेटर नक्कीच कमी होतील पण. आनंदाची बाब म्हणजे कलंक उडवला endgame ने...

बुक मे शो वर सहज चेक करत होतो.
एका शोचं मंगळवारच तिकीट, 1528 रु + टॅक्स वेगळे, तेही हाऊसफुल दाखवलंय!!
मला एंडगेमला भारतात दंगल आणि संजू आणि जगात अवतारचा रेकॉर्ड तोडताना बघायचंय!!

हो . मी हैद्रा बादला जायच्या आधी मागच्या रविवारी बुक केलेले तर घरापासल्या मॉल मध्ये आय मॅक्स विवीआना सकाळच्या सातच्या शोचेच उपलब्ध होते मग पीव्हीआर आयकॉन लोअर परळ इथले उपलब्ध होते ते करून ठेवले ते असेच १५७६ ला पडले. प्लस जायचे यायचे टॅक्सी उबर दोन पॉपकॉर्न व एक पेप्सी एक पाण्याची बाटली एव्ढे असून महागच प्रकरण आहे. बघायचे शास्त्र आहे म्हणून केला खर्च.

खरेतर विवीआना आय मॅक्स व फोर एक्स डी दोन्ही ऑप्शन जास्त छान आहेत. मी थिएटर मध्ये जाउन आता काहीच बघत नाही. असले काही आलेतरच.

बुक मे शो वर सहज चेक करत होतो.
एका शोचं मंगळवारच तिकीट, 1528 रु + टॅक्स वेगळे, तेही हाऊसफुल दाखवलंय!!
मला एंडगेमला भारतात दंगल आणि संजू आणि जगात अवतारचा रेकॉर्ड तोडताना बघायचंय!!

>> दोन्ही सहज तुटणार , वीकेंडला च १.२ बिलिअन झाले . ३ बिलिअन तर सहज होतील

एक तिकीट १५७६ ₹ ला :-O :-O

आता किती पैसे कमावले याऐवजी किती तिकिटं विकली गेली यावर रेकॉर्ड बनवणे/मोडणे चालू करायला हवे...

@अमा - खरंच! Whatever it takes!
मला सकाळी ८ च तिकीट (3D) ४७० + TAXES + PARKING + पाण्याची बाटली असं पडलं! त्यामानाने स्वस्तच की...

@ॲमी - मग तर gone with the wind आणि star wars चा रेकॉर्ड कधीच तुटणार नाही...

एक तिकीट १५७६ ₹ ला :-O :-O नाय गो दोन तिकीटे. ती सुद्धा अ‍ॅड्वान्स बुकिन्ग केले म्हणून मिळाली.

Screenshot_20190429-151116.png

सोल्ड आउट!

तो कुठला तो आवेनजर की काय बघितला. 300 रु घालून.

मागचे 20 न बघून 6000 रु वाचल्याबद्दल स्वतःचेच आभार मानले.

20 पार्ट अन 50 पार्ट .....

डार्क लोर्डची मजा कशालाच नाही.

छान लिहला आहे लेख. जबरी फॅन दिसता तुम्ही. या मार्वलच्या सिरीज, मुव्हीजसाठी नवीन स्ट्रिमिंग ऍप काढणार होते ना डिझनी?

बाकी रेकॉर्ड ब्रेक म्हणाल तर टायटॅनिक पुढे सगळे चाय कम पानी Wink
जागतिक माहेरची साडी आहे तो सिनेमा, त्याचा रेकॉर्ड मोडणे केवळ अशक्य. Biggrin

Nice
Happy

छान लिहिलाय review अगदी मनापासून. खूप इमोशनल व्हायला झालं या भागात. टोनी स्टार्क ने जिंकलंय. जे काही एक्स्प्रेशन आलेत इन each अँड every फ्रेम , क मा ल !! हाच तो arrogant टोनी का असं वाटलं . लास्ट सीन येऊ नये असं वाटत होतं अगदी. स्टिव्ह पण छान. त्याची कोणतीही फ्रेम बघा.. हलू नये कधीच डोळ्यासमोरून . Happy बदाम बदाम बदाम Happy पण thor ने खरच disappoint केलं . माझं आवडता character आहे पण ठीके. ओव्हरऑल मूवी फॅन्स साठी मस्ट watch आहे. मला इन्फिनिटी वॉर जास्त आवडला.

अवेंजर्स एन्डगेम प्रचंड हिट होण्याची कारणे - माझं अनालिसिस!
१. या समरी ऑफ २२ मुविज. त्यामुळे या २२ सगळ्या मुवि बघितलेल्या लोकांनी एंडगेम थेटरात बघण्याची शक्यता शतपटीने वाढते. (मीसुद्धा)
२. फिनाले - एंडगेमची जाहिरातच फिनाले म्हणून झाली होती, त्यामुळे फायनल मॅच सारखी बघणाऱ्यांची गर्दी वाढली.
३. इमोशनल अपील - इंफिनिटी वॉरचा शेवट अनपेक्षित होता. अर्ध जग संपलंय, आपले फेवरीट सुपरहिरो गेलेत. एंडगेममध्ये ते परत कसे येणार आहेत, यामुळे लोक थेटरात खेचले गेले.
४. फियर ऑफ मिसिंग - बऱ्याचशा थियरीज आयर्न मॅन आणि कॅप्टन अमेरिकाच शेवटचं अपियरन्स असेल, अशा होत्या. या दोन सुपरहिरोजला मोठ्या पडदयावर शेवटचं बघण्यासाठी लोक आकर्षित झाले
५. इमर्जिंग मार्केटस - चायना, मेक्सिको, साऊथ कोरिया आणि भारतात या चित्रपटाची पब्लिसिटी खूप आधीपासून चालू झाली होती. या देशांत मार्व्हलचे प्रचंड फॅन आहेत, आणि तेसुद्धा थेटरात ओढले गेले.
६. ओन्ली इन थिएटर एक्सपीरियन्स - भव्यदिव्य मांडणी, स्पेशल इफेक्स्ट्स आणि कलरफुल कॅरेक्टर! त्यामुळे थिएटर एक्सपेरीयन्स घेण्यासाठी एंडगेम बघणं मस्ट झालं!

Infinity वॉर खूपच छान होता त्यामानाने endgame बोर झाला. 45 min तर एकदम gloomy होता, निरुपा रॉय इतका! थानोस हल्क पेक्षा पॉवरफुल होता? रेडिएशन नी मरणार तर त्यांनी आधीच विचार करायला हवा होता तो glove कोण घालणार ते!

आधीच्या कथां बरोबर इमोशनल कनेक्ट असेल तर सिनेमा बोअर होणार नाही. प्रत्येक पात्राला लॉजिकल एंड दिला आहे.

सोल स्टोन साठीचा प्रसंग. धनुर्धारीला फॅमिली आहे. स्कार जो ला कोणी नाही. ती बलिदान देते. धनुर्धारीची फॅमिली त्याला परत मिळते.
ही फॅमिली न ष्ट होते ते फार भयानक वाटले. एस्प. आत्ताच श्रीलंकेत झालेल्या चर्च हिंसेत लोकांच्या अर्ध्या पूर्ण फेमिली अशाच एका क्षणात गेल्या आहेत. हे ताजे होते.

कॅप आपल्या मैत्रीणी बरोबर सुखाचा संसार जगून घेतो. व शेवटी रोमँटिक दृश्य आहे. फार भारी. टाइमलाइनचा लोच्या आहे. पण समजून घेतले. शेवटी शील्ड ब्लॅक पॅथर च्या हातात सोपवितो ह्यात रेस च्या पलिकडे जायचा एक प्रयत्न आहे.

आयर्न मॅन वडिलांना भेटतो व मला पण एक मुलगी आहे सांगतो. हे फारच हृ दय आहे कारन त्या च्या जवळ सर्व काही होते पण फॅमिली नाही. व आपले सूख शेअर करायला वडील आई नाहीत. मला तर तिथेच रडू आलेले.

निक फ्युरी व रॉबिन हे पक्के समजुतदार जुने कलीग भेटावेत तसे परत दिसले.

डॉ. स्ट्रेंज आयर्न मॅन कडे बघतो व एक पॉसिबिलिटी असे सुच वतो तेव्हाच काळजात ध स्स झालेले.

आयर्न मॅन फ्युन रल . अश्या प्रकारच्या प्रसंगातून मी प्रत्यक्ष गेले असल्याने. बारकी पोर व फ्युनरल, हे फारच रेलिवंटअवाटले. या वेळी येणारे लोक. एकटी पेपर तिला आपण कधी एकटे पाहिलेलेच नाही.

पोरगी तुला काय हवे विचारल्यावर चीज बर्गर हवाय म्हणते ते ही फार गोड व एकदम करेक्ट. आयर्न मॅन पहिल्या सिनेमात जेव्हा वाळवंटा तून अमेरिकेत परत येतो तेव्हा पण पहिले चीज बर्गर मागवून खातो. व प्रेस कॉन्फरन्स घेतो. बरोब्बर घेतले आहे. आमचा ड्राय्वर कम हॅपी हरकाम्या असाच मुलीला डोसा आणून देत असे. Happy त्याची आठ्वण झाली.

एंड गेम व पार्ट ओफ द जर्नी इज द एंड अशी नाव व वाक्ये असल्याने दु:खांतिका आहे हे बरोबरच आहे.

Pages