काही पडलेले प्रश्न

Submitted by समाधी on 1 May, 2019 - 11:00

कालपासून मनात विचारांचे काहूर माजलेय. कुठेतरी बोलायला हवंय आहे , त्यासाठी मला सध्या तरी मायबोली बेस्ट माध्यम वाटले म्हणून लिहितेय.
मी आजवर खूप वाईट प्रसंगातून गेलीये, त्यातून सावरून खम्बिरपणे उभी राहिली, कारण हरणे मला मान्य नाही. पण तरी इमोशनल फुल असल्याने खूप त्रास होतो. एका जीवघेण्या प्रसंगातून बाहेर पडायला आयुष्यातील खूप वर्षे खर्ची पडली, त्यातून सावरते न सावरते तो दुसऱ्यात अडकली, माझंच मूर्खपणा अजून काय. पहिल्या वेळी जो खमबीरपणा होता तेव्हढा आता राहिला नाही. त्यात आंधळेपणाने प्रचंड विश्वास ठेवला त्यामुळे यावेळी त्रास जास्त झाला. हा धक्का सहनशक्ती पलीकडे होता, त्यामुळे दोन तीन वेळा जीव द्यायचाही प्रयत्न केला, पण मरण इतके सोपे नसते. काही वेळा वाचली तर काही वेळा ऐनवेळी कच खाल्ली. मग त्यानंतर मात्र खूप खूप प्रयत्नाने निर्णय घेतला की आता यापुढे त्रास करून घ्यायचा नाही. हळूहळू त्यात यशस्वी पण झाली मी, पण हे सगळे खूप टफ गेले, एकटीच होती न , आधीच माझ्यामुळे माझ्या माणसांना खूप त्रास झाला होता, यावेळी काही न सांगायचे ठरवले. तसेही आता मागे वळून बघायचे नाही , बस्स
काही काळ छान गेला, पण परवा अचानक सगळे आठविले , परत खूप त्रास झाला, परत एकदा मरणयातना भोगल्या. अगदी वेड लागायची पाळी आली, मला काय हवंय काय नको याबाबत ठाम होते पण तरीही त्रास झाला. कालची रात्र तळमळत गेली. त्यात घरी एकटी होते, फक्त या वेळी जीव देणार नाही ही मनाशी खूणगाठ होती म्हणून वाचले. हे सगळे वाचून मला सायकायट्रिस्ट किंवा कोनसेललेर कडे जायला सांगू नका, कारण ते शक्य नाही. मला फक्त प्रश्न पडलाय की असे का होतेय, मला जे नको आहे त्यातून बाहेर पडली म्हणता म्हणता मधेच कधीतरी असे का होते तेच कळत नाही.
आज फक्त एक गोष्ट चांगली झाली, परत एकदा खूप प्रयत्ननी बऱ्यापैकी नॉर्मल झाले. आता काही केले तरी परत फसायची नाही, हे मनाशी पक्के आहे. फक्त नको असणारे विचार अचानक का परत येतात हाच प्रश्न आहे.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

याला उपाय अध्यात्म.अध्यात्म म्हणजे कुणा बाबा, बापू,बुवा किंवा बुविणींमागे न लागणे. विपश्यना बरी राहील पण तुमच्या सारख्या अति संवेदनशील लोकांना तिकडे त्रास होउ शकतो. समाजात वीस टक्के लोक अति संवेदनशील असतात. या लोकांना अनेक समस्या असतात ज्या इतरांना जाणवतही नाहीत. नेटवर एच एस पी सर्च केल्यास यावरील उपाय समजतील. दुसरे म्हणजे नार्सिसिस्ट स्वभाव असणाऱ्या लोकांना बरेच त्रास असतात. सायकॉलॉजीस्ट कडून समस्या समजून घ्या पण औषधे घेणे टाळा. मनाने कणखर बनणं आपल्याच हातात असते.दुर्बलांना कुणीही सहज चिरडून टाकतात.

बापरे.सल्ला काही नाही.तुम्ही लवकर या स्थितीतून बाहेर पडाल.आयुष्यात खूप चांगले दिवस येतील.यासाठी शुभेच्छा.
(एकदा थायरॉईड, व्हिटामिन लेव्हल यासारख्या गोष्टीही नॉर्मल चेक म्हणून तपासून बघता येतील इच्छा असल्यास.)

सिनेमे पहा, पर्यटन, गाणी यात मन रमवायचा प्रयत्न करा. काळ हेच औषध. तोपर्यंत कुणा न कुणाशी बोलत रहायचं..

यातून लवकर बाहेर येण्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा !

या धाग्याच्या निमित्ताने माझ्या मनातील विचार प्रकट करतो - तुम्हाला त्याचा उपयोग होईल की नाही माहित नाही.
स्वानुभवावरून सांगतो, कुठल्यातरी अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गोष्टीवर मन केंद्रित करण्याचा प्रयत्न करा. माझा देवावर फारसा विश्वास नाही, भरोसा तर नाहीच नाही. पण अनेक स्तोत्रे पाठ असल्याने व बरीच उपनिषदे वाचल्याने, मनातील वाईट, दु:खी करणारे विचार गेले.
तसे काय कळले गीता नि उपनिषदे वाचून विचाराल तर काही विशेष नाही. स्तोत्रे म्हणून काय फायदा झाला, कुणास ठाऊक. पण खरोखर निरपेक्ष बुद्धीने सगळे केले. ते सगळे अ‍ॅब्स्ट्रॅक्ट माझ्या दृष्टीने - जगाशी त्याचा संबंध काय हे कळले नाही, पण माझ्या मनातील जगातील सर्व दु:खे, समस्या विसरून गेल्या काही काळ, मन जरा शांत होते.

सिनेमा, नाटके, पुस्तके यातून नाही म्हंटले तरी या जगातील गोष्टींचा विचार जात नाही. म्हणून अ‍ॅब्स्ट्रॅक्ट गोष्टी. देव नाही तर सायन्स, गणित इ. गोष्टींचा अभ्यास करा, विचार करा. मुख्य म्हणजे प्रत्येक गोष्टीचा भौतिक फायदा झाला तरच ती करायची, असा दृष्टीकोन न ठेवता, आपले मन शांत होण्यासाठी, आपली दु:खे विसरण्यासाठी या गोष्टी करायच्या.

हळू हळू जाणीव झाली की जो तो/ जी ती आपापल्या बुद्धीने वागतात. कुठल्या गोष्टीचा किती त्रास करून घ्यायचा हे आपल्या मनावर असते. क्वचितच मुद्दाम दुसर्‍याला उपद्रव होईल असे वागतात, त्यांना एकतर उत्तर द्या नाहीतर सहन करा.
पूर्वी मी वाईट्ट वागलो, वेडपटा सारखा वागलो, त्यामुळे हाती यश आले नाही. घोर निराशा झाली. पण आता काय त्याचे? काय करणार आता? आजपासून पुढे काय करायचे ते नीट करावे. राग. हव्यास इ. गोष्टी सक्त मर्यादेत ठेवाव्यात, कुठली तरी गोष्ट (माझ्यासाठी, ब्रिज खेळणे) मनःपूर्वक पण निरपेक्ष मनाने करावी, फायदा काय असे विचारू नये. फायदा नि उद्देश एकच - आपले मन शांत करणे. त्यासाठी जमेल ते निरपेक्ष बुद्धीने करावे.

आयुष्यात खूप चांगले दिवस येतील.यासाठी शुभेच्छा.
+१११
मी खूप भाग्यवान आहे व अजून खूप आनंदी दिवस माझ्या आयुष्यात येणार आहेत हे स्वत:शी नक्की करा. लॉ ऑफ अॅक्ट्रॅक्शन साठी सिक्रेट हा व्हिडीओ जरूर पहा. सारखी इतरांची काळजी वाहणे सोडा.

नको असणारे विचार मनात परतपरत येतात? की
नको असणारे विचार अचानक, अनपेक्षितपणे कधीतरी मनात येतात?

ते जे काही विचार आहेत ते जसे येतात तसे लिहून काढा.
नंतर शांत मनस्थिती असताना वाचून बघा.
त्या विचारांना दुसऱ्या कुठल्या दृष्टिकोनातून बघता येतंय का पहा.
मग त्यांना पॉझिटिव्ह विचारांनी रिप्लेस करा.

तुम्हाला शुभेच्छा!

प्रत्येकाला आयुष्याच्या कोणत्यातरी टप्प्यावर असा प्रसंग येतोच . काहींच्या बाबतीत असे प्रसंग जास्त असतात तर काहींच्या बाबतीत त्याची तीव्रता कमी अधिक असते . मी स्वतः दीड वर्षांपासून मोठ्या आजाराशी लढतोय . माझं लग्न दोन महिन्यापूर्वी जमलं होत आणि काही दिवसांपूर्वी मोडलं सुद्धा . या मधल्या काळात जो मानसिक त्रास झाला तो मलाच माहित .
माझा अनुभवातून सांगतो - प्रवाहात वाहत चला . जीवनात शक्यतो कोणत्याही व्यक्तीला आणि कोणत्याही गोष्टीला गरजेपेक्षा जास्त गंभीरपणे घेऊ नका. कोणत्याही व्यक्ती आणि गोष्टीपासून फार अपेक्षा करू नका कि जेणेकरून अपेक्षाभंगाचं दुःख वाट्याला येईल. तुमची सपोर्ट सिस्टिम शोधा . हि फार महत्वाची असते . हि कोणीही असू शकेल एखादी/एकापेक्षा जास्त व्यक्ती (मित्र/कुटुंबीय ) आणि/किंवा एखादा छंद . दोन्ही असेल तर उत्तम . तुम्हाला यातून बाहेर पडण्यास खूप शुभेच्छा ....

तुमच्या आयुष्यात जे काही घडलंय, त्यातून तुम्ही बाहेर पडलाय ह्या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जुन्या गोष्टी आठवून त्याचा प्रचंड त्रास होणं हे नैसर्गिक आहे. त्रास झाला हे खरं आहे, तसंच तुम्ही त्यातून बाहेर पडलात हीपण वस्तुस्थिती आहे. मानसिक वेदनेची धार हळूहळू बोथट होत जाते हे निश्चित. काळासारखं दुसरं औषध नाही. पण होतं काय की जेव्हा आपल्याला त्रास होत असतो, तेव्हा हे सगळं शहाणपण सुचत नाही. पण त्यामुळे तुमची त्यातून बाहेर पडण्याची क्षमता आहे ही वस्तुस्थिती बदलत नाही.

सुदैवानं तुम्हाला लवकर असं काही मिळो की ज्यात तुम्ही स्वतःला विसरून, झोकून देऊन काम करू शकाल.

जिद्दु मी समजू शकते तुमच्या मानाची अवस्था.
मी पण तेच केलेय, माझे ठरत आलेले लग्न मोडले मी. जिथे माझीच ही अशी अवस्था, तिथे मी त्याला काय सुख देऊ शकत होते, खूप प्रयत्न केला, जवळपास दोन महिने गप्पा मारल्या आम्ही, एकमेकांना समजून घ्यायचा प्रयत्न केला, तरी माझ्या मनातील उदासी काही केल्या जात नव्हती. मग मला काय हक्क आहे त्याच्या आयुष्याची वाट लावायचा. म्हणून मोडले मी लग्न. त्याला काय मिळेल एखादी दुसरी, पण जिथे मलाच माहीत नाही की मी यातून बाहेर पडेल की नाही, पडली तरी किती काळ जाईल देव जाणे. मग मी तरी दुसरे काय करायला हवे होते

समाधी जी हे वाचून बिरबलाची खांबाला मिठी मारुन खांब मला सोडत नाही.. ही गोष्ट आठवली. कृपया भुतकाळाला, दु:खाला कवटाळून बसू नका. वैयक्तिक दुःख कोणाला सांगू नका. लोकांना कोलित मिळते. शरिराची ठेवण, रंग प्रत्येकाला वेगवेगळे मिळाले आहे पण बुध्दी सर्वांना समान मिळाली आहे. इन्स्पायरिंग गोष्टी वाचा, काही सॉफ्ट स्किल्स आत्मसात करा. अर्थात मला सांगणे सोपे आहे. तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार हे शंभर टक्के खरं आहे.

हे सगळे वाचून मला सायकायट्रिस्ट किंवा कोनसेललेर कडे जायला सांगू नका, कारण ते शक्य नाही.>>>> का शक्य नाही?

काही सल्ले खूपच चांगले दिले गेले आहेत. आपण लवकरच यातून बाहेर पडाल. शुभेच्छा. विसरणे खूप महत्वाचे.

>> परवा अचानक सगळे आठविले
हि घसरण असते. पूर्वी घडलेल्या वाईट घटना मनात येत आहेत (एखाद्या ट्रिगरमुळे) असे लक्षात येताक्षणीच मनाला सावरावे लागते. तिथेच त्या आठवणींवर हल्ला करून त्यांना पिटाळावे लागते. तत्क्षणी लगेच दुसरे विचार दुसरी कृती करायची. मनाला घसरायला वेळच नाही मिळायला पाहिजे.

ज्यात तुमची तहानभूक हरवून जाईल असे तुमच्या आवडीचे एखादे कार्य/प्रोजेक्ट हाती घेऊन तो पूर्ण करण्याचा ध्यास घ्या. सतत कायर्मग्न राहा. कार्यमग्नता हि मनासाठी वाहत्या पाण्यासारखी असते. मन स्वच्छ राहते. उसंतच नाही मिळाली तर कटू आठवणींच्या बुरशीला थाराच नाही मिळत मनात.

हे सगळे वाचून मला सायकायट्रिस्ट किंवा कोनसेललेर कडे जायला सांगू नका, कारण ते शक्य नाही.>>>> का शक्य नाही?>>>>> मलाही हाच प्रश्न पडला. शरीराला दु:ख/रोग झाला तर डाॅची मदत घेतो तर मनाला झाला तर का नाही ?
सगळ्यांनी सेन्सिबल सल्ले दिले आहेत. योग्य उपाय सापडून बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा !

सस्मित, please stop , you are one of the biggest troller of Maayboli, of course according to me.

मलातरी तुमचे सगळीकडे निगेतिव कमेंट्स किंवा तिरकस कमेंट्स असतात

वैयक्तिक दुःख कोणाला सांगू नका. >>>> हो, पण बरच वेळ मनात साचल्याने खुप त्रास होतो, कुणाला तरी सांगावेसे वाटते पण ओळ्खिच्या कुणाला सांगु शकत नाही किंवा सांगीतले तर त्याचे adverse effect खुप जास्त असत्तात
म्हणुन तर मी ईकडे लिहीले, कारण ईकडे मला कोणी ओळ्खत नाही

माझ्याच नकळत मी कोडगी बनत चाललेय, माणसां वरचा, आयुश्या वरचा, जगण्या वरचा विश्वास आणी आस दोन्ही संपलेय

त्यात जरा कुठे मोकळे व्हावे वाटले तर तीथे ओळख पाळख नसतानाही सस्मित सारखी माण्से मागे लागतात , जिवंटपणी मरण यातना, दुखे काय असते हे देव न करो यांना कधी कले

सस्मित, please stop , you are one of the biggest troller of Maayboli, of course according to me.

मलातरी तुमचे सगळीकडे निगेतिव कमेंट्स किंवा तिरकस कमेंट्स असतात>>>>>गेट वेल सून.

त्यात जरा कुठे मोकळे व्हावे वाटले तर तीथे ओळख पाळख नसतानाही सस्मित सारखी माण्से मागे लागतात , जिवंटपणी मरण यातना, दुखे काय असते हे देव न करो यांना कधी कले>>>> मी तुमच्या कधी मागे लागले? आर यु सिरीयस? तुम्हाला कधी वाईट बोलले? तुमच्या कुठल्या लेखावर, प्रतिसादावर तिरकस कमेंट केल्या? उगीच काही पण बरळायचं का? गेट वेल सून.
लिहिणार नव्हतेच पण उगीच्च किडे करताय म्हणुन लिहिलं.

ज्या कुणी काळजीने प्रतिसाद सल्ला दिलाय त्या सगळयांचे आभार

हे सगळे कधी संपेल माहित नाही, पण त्यावर एक तात्पुर्ता सोलुशन काढायचे विचार कर्तिये.

माझ्या कंपनिने मला वर्शभरापुर्वी ट्रान्सफर ऑफर केलती, जि त्यावेळी मी नाकारली
आजुनही तिकडे एक जागा आहे असे माझ्ये बॉसने आजच सांगितले, तर विचार करतीये की जावे.
शहर बदलणे हे माझ्या प्रोब्लेम चे सोलुशन नाहीये, कारण ज्याच्यामुळे मला त्रस होतोय ति व्यक्ती माझ्या शहरात नाहिचे.
पण तरी वाटतेय की नविन शहर, नविन लोक , हा बदल , मे बी जगण्याला एखाद नवि उमेद देइइल कि काय
काही नाही झाले , हे मायबोलि वाचायचे व्यसन सुटले तरी बरे त्यातल्या त्यात

सस्मित , u need to get well soon

माझ्या बाबतित तरी मला काय बिनसलेय ते माहित आहे, पण तुम्हाला तुमच्या बाबतित ते अजुन उमग्ले नाही असे दिसते

मी तुमच्या कधी मागे लागले? आर यु सिरीयस? तुम्हाला कधी वाईट बोलले? तुमच्या कुठल्या लेखावर, प्रतिसादावर तिरकस कमेंट केल्या? उगीच काही पण बरळायचं का? गेट वेल सून.
लिहिणार नव्हतेच पण उगीच्च किडे करताय म्हणुन लिहिलं. >>> मी कीडे करत नाहिये, तर तुम्ही ते करु नये म्हनुन आधिच रोखले
तुम्ही जे ईतरांशी करता, वर साळसुदपणाचा आव आणता तो माझ्याकडे चालणार नाही

हे मायबोलि वाचायचे व्यसन सुटले तरी बरे त्यातल्या त्यात
खरं आहे. मी अनू, अॅमी, साधना ताई , मार्गी, कुमार सर , दक्षिणा असे काही निवडक वीस एक आयडी सोडले तर बाकीच्यांचे वाचत नाही. पण या लोकांचे लिखाण वाचावेसे वाटते म्हणून माबोवर यावं लागतं.

Instrumental music aika khup upyogi padel >>> निखिल , seriously
आधिच डिप्रेस्स्ड आहे, कायमची झोपुन जाईन मी अश्याने

छोटे छोटे छंद जोपासा... जसं गॅलरीत छोटी झाडं लावुन त्यांच संगोपन.. किंवा एखादं गाणं शिका व म्हणा.. कलेची आवड असेल तर चित्र काढा, घरातलं कपाट आवरा.. अशी छोटी मोठी कामं यामध्ये वेळ घालवा .. किंवा नविन नविन मेनु शिका.. बनवा... बाकीच्या गोष्टी मनातच येणार नाहित मग.. रिकाम्या मनात विचारांचं थैमान असतं.

फक्त नको असणारे विचार अचानक का परत येतात हाच प्रश्न आहे.> मनाला काही दुसरे interesting दिसत नसले तर ते जुन्या वाईट गोष्टीच आधी आठवते...! Happy आवडीची गोष्ट करा बरे वाटेल

लहान मुलासारखे वागावे
आयुष्य खरेच छान सोपे सुटसुटीत होते Happy
कारटून बघा.. लहानपणीची वह्यापुस्तके चाळा, गमती आठवा
कशात तरी मन रमवा, कोणावर तरी जीव लावा..
एक जवळचे कोणीतरी म्हणून कासव, hamster पाळा
झाड लावून त्यावर माया करा..
लहानपण घालवलेल्या ठीकाणी भेट देऊ शकता.. शाळा वगेरे
त्रास विसरुन बालपणात कधी जाल कळणार नाही
घडलेले ते वाईट स्वप्न समजून उद्याचा दिवस छान जगा

सगळ्यात जास्त काय आवडते...? त्या गोष्टीचाच विचार करा..
नवे मिर्तमैरीण ( friends.. Maza keyboard nit chalat nahi aahe ) जमवा... नव्या ठिकाणी फिरायला जा..
Shopping करा.. एखाद्या children's park मधे जाऊन बसा
परतफेडीची अपेक्षा न ठेवता दुसर्याला मदत करा
मनस्ताप होईल अशा गोष्टी पासून लांब रहा
माबोपासून दूर रहा

वर च्या उपायांनी खरेच मदत होईल
कधीकाळी मी स्वत बेक्कार depression मधून गेलो आहे
वर उपायांनी खरेच चांगली मदत होते
आताचे माझे life चांगले होण्यास यांनी खूप मदत केली

स्वताला जे वाटतं ते करा.
आपल्या जे आवडत ते काम केल्याने आपण काही वेळ का होईना बीजी पण राहातो आणी मन शांत पण राहते.

कदाचित समाधी जी तुम्हाला आवडणार नाही पण एक सत्यघटना सांगतो. वीस वर्षांपूर्वी मी पुना हॉस्पिटलमध्ये अॅडमिट होतो. शेजारी एक पेशंट सुभाष नावाचा होता. तो मानसोपचारतज्ज्ञ डॉ वाटवे यांचा पेशंट होता. बरोबर वृध्द वडील होते. सुभाष पंढरपूर,बार्शी भागातला होता. तो प्राथमिक शाळा शिक्षक होता. त्याच्या वडिलांनी सांगितलेली हकिकत.
सुभाष एका खेडेगावात नोकरी करत होता. शाळेशेजारच्या घरात पाणी पिण्यासाठी जाणे-येणे होते. घरातील लग्नाच्या वयाची तरुण मुलगी त्याला आनंदाने पाणी, कधीमधी भाजी देत असे. सुभाष मनोमन तिच्यावर प्रेम करू लागला, पण मुलीच्या मनात तसं काही नव्हतं. एक दिवस मुलीने तिचं लग्न ठरलं असे सुभाषला सांगितले. हे ऐकल्यावर सुभाष चक्कर येऊन पडला व त्या दिवसापासून वेड्यासारखा करु लागला. उपचार केले की बरा व्हायचा. काही दिवसांनी परत ते विचार आले की माणसांत नसायचा. दवाखान्यात असताना तो प्रत्येकाच्या पाया पडायचा. संडासातच आंघोळ करायचा. पण खूप सज्जन माणूस होता. त्याने वेळेवर भावना व्यक्त न केल्यामुळे, भावनांचा कोंडमारा होऊन ही परिस्थिती उद्भवली होती. आठवडाभर डॉ. वाटवेंचे उपचार घेताच तो नॉर्मल झाला हे मी डोळ्यांनी पाहिलं. अशा लोकांना ओसीडी त्रास देते. वर अतुल पाटील साहेबांनी सांगितल्यानुसार ट्रिगर क्षणाला सावध राहिलं पाहिजे. तुम्ही सध्या वाईट मनस्थितीत आहात हे समजू शकतो पण कुणाला दुखावू नका व कुणी दुखवायचा प्रयत्न केला तरी शांत रहा. धन्यवाद.

शक्तिवान, तुमची काळजी समजली म्ला, मनात साचुनच त्रास होतो हे माहित आहे मला
म्हनुन तर जेव्हा कुठेच बोलु शकत नव्ह्ते तेव्हा ईकडे लिहीले.
लिहायची, माझी घुसमट शेअर करायची गरज होती मला. माझ्या आप्तेष्टांशी बोलता येत नव्हते, बाकी ओळखीतल्यान्ना सांगुन फक्त हसे झाले असते
ईकडे लिहील्यावर खुप बरे वाटले, थोडेसे दु:ख हलके झाले. तसेही आभासी जगात कोण कोणाचे असते, कोणी काही बोलले तरी फरक काय पडतो, म्हनुन लिही शकले

माझ्याबाबतीत काय बिघडलेय, मला काय हवेय , काय नकोय, सगळेच माहीत आहे. माझ्या विचारावर , निर्णयावर मी ठाम आहे. सध्यातरी प्रेम आनी द्वेश दोही टोकाचा झालाय म्हणुन तर घुसमट होतेय.

पण आता सावरायचे ठरविले आहे तर मिळेल मार्ग हळु हळु यावर विश्वास ठेवायचा प्रय्त्न करतेय. बघु शहर बदलुन काही फरक पडतो का

नक्कीच चांगला फरक पडो. माणसांच्या भलेपणावर, चांगुलपणा वर विश्र्वास ठेवा. जगात चांगली माणसे जास्त आहेत असा माझा अनुभव आहे. जास्त लिहीत नाही, कदाचित तुम्हाला राग यायचा. हा माझा शेवटचा प्रतिसाद. धन्यवाद.

Pages