गोष्ट साध्या गाउनची

Submitted by वैशाली अ वर्तक on 21 April, 2019 - 04:51

स्पर्धेसाठीः---

गोष्ट साध्या गाउनची

झाले मी आता 65 ची . आज पर्यत घरात वा बाहेर कुठेच , साडी शिवाय
वावरले नाही. पण आता मात्र वाटते ...कधी कधी घरात गाऊन घालावा. खर काय हरकत आहे ना? साडी पेक्षा सुटसुटीत राहिल. असेही ऊन्हाळ्यात फारच उकडत .आणि आपल्याकडे गुजराथ मधे तर गर्मी सदाच "मी" म्हणत असते. थंडी चे दोन महिने सोडता ,सदा सर्व काळ एकच ऋतु आणि तो म्हणजे ऊन्हाळा. आss णि रात्रीचे च घरात घालायला काय हरकत आहे. ? ...आता .. आहे मी तशी थो sडी जाडी वा जाड्यापैकी.....पण त्यात काय माझ्या सारख्या लठ्ठ बायका नाही का घालत गाऊन ? आणि मला कुठे बाहेर जायचय .? घरातच तर घालाचाय.!
शेवटी , मी विचार मनी पक्का केला. म्हटले दर मंगळवारी दारावर च गाऊन आणि इतर होजीयर मटेरियल घेऊन येतोच तो विक्रेता . अगदी मंगळवार ठरलेला
असतो त्याचा.
जसा मंगळवार उजाडला मी त्याच्या येण्याची वाट पहातच होते. तेवढ्यात विक्रेत्याची
" नाना मोटा बाळको माटे कपडा , तेमज काॕटनना गाऊन " अशी आरोळी ऐकली व मी बाहेर ओट्यावर येऊन बसले. म्हटले दाराशी आला की थांबवूया त्याला.
तो दाराशी आला .मी त्याला माझ्या मापाचा गाऊन मागितला. त्याने लगेच 5/6 वेगवेगळ्या रंगात गाऊन माझ्या हातात दिले. बर , दारातच असल्याने त्याने तुम्ही "द्या व घालून पहा ." माप व्यवस्थित होतोय ना पाहून घ्या. . मी लगेच रंग पसंत करुन दोन गाऊन घरात घेऊन गेले व घालून पाहिले.... ठीक वाटले .मग मनाची तयारी करुन एक नक्की केला. व दुसरा परत दिला.
सहजच समोर ओट्यावर भाजी निवडत बसलेल्या सुनेला पण विचारले,
"ठीक वाटतोय ना ग गाऊन ?"
तर ती म्हणाली . , "हो हो"
तिला म्हटले , "अग पैसे दे ना. "
तर ती चक्क नाही उत्तरली. असा राग आला मला.
मी विचारले , " का ग?"
तर म्हणे आमच्या जवळ कुठे पैसे आहेत ?
सासरे तुम्हाला पैसे देतात दर महिन्यात .आम्हाला कोण देत ? "
"नवरा (तुमचा मुलगा) आम्हाला दुध भाजी इतरचे पैसे देतो , ते सगळे रोजच्या खर्चात संपतात. "
मी उठले... तडक फोन लावला मुलाला. मुलगा व मीस्टर दोघेही , जवळच आमचे सोन्याचे दुकान आहे . तेथे दुकानात सकाळी जातात .मुलगा दुपारी जेवण झाल्यावर मार्केट मधे जाऊन पाॕलीश वा रिपेरिंग ला दिलेले दागिने द्यायला - घ्यायला जातो. , बsssर झाल तो तेव्हा दुकानातच होता.
फोनवर मुलाला झालेला प्रकार सांगून सूनेची तक्रार केली.
मुलगा तावातावाने आला. गाऊन वाला नेहमीचा च व नेहमी येऊन -येऊन ओळखीचा झालेला. पुढच्या बोळाशी गि-हाईकांच्या घेराव्यात उभा होता . मुलाने आधी त्याचे गाऊनचे पैसे देऊन त्यास मोकळे केले . आणि .नसते जरी दिले तरी त्याने उधारी ठेवली असती . ....कारण नेहमीचाच असल्याने.
मग घरात येऊन आई शी व आधी बायकोशी बोलला.
"काय ग तुला पैसे द्यायला काय झाले होते. ती-न-शे रु नव्हते तुझ्या जवळ.?
बायको म्हणाली , "तुमचे वडील तुमच्या आईला पैसे देतात. तर , द्यावे ना त्यांनी त्यातूनच. .करावा स्वतःचा खर्च .
मुलगा बायकोला म्हणाला ," असे काय करता तुम्ही दोघीजणी ?
तर बायको रागाने बोलली तुम्ही आम्हाला देतात का वापरावयास पैसे ?
आम्ही ठरलो गृहीणी. कमवत नाही .नोकरी तर करु च दिली नाही. तुम्ही जे पैसे देतात ते रोजच्या दुध भाजीपाला किरकोळ खर्चात वापरतो. तेव्हा अशा खर्चा साठी तुम्हीच पैसे दिले पाहिजेत ना.?
अग, पण तुझ्या जवळचे पैसे आता दिले असते तर काय बिघडले असते..?
त्यावर लगेच सासू बोलली. हो ना आजकाल दोघी सुना कपडे रिपेअरींग
ची कामे घरात मशीन वर करतात .तर चार पैसे मिळवितात तर त्यातून हीने द्यावेत ना ..
पण ना ssssही. चक्क नाही आहेत म्हणतेय .
मुलाने पण आईच्या वाक्यास दुजारा दिला. व बायकोला म्हणाला , "अग आता दिले असते तर काय बिघडले असते. .प ss ण छे.! जरा ही समजून घेण्यास तयार
नाहीस तू.
आणि सासू म्हणाली
तुम्ही म्हणता पण , आमच्या वेळी कोण देत होते हातात पैसे .? काय हवे तेवढे सांगायचो. वस्तू पुरूष मंडळी घरात आणून टाकायचे.
तसेच मी केले तुमच्या शी फार काही वेगळे नाही केले .
तर सुन म्हणाली , तुम्हाला तुमच्या सोयी नुसार साडीतून गाऊन मधे बदल करावासा वाटला. व मी तर म्हणेन ,... तो योग्य पण आहे. .पण .....तसाच काळानुसार विचारांचा पण बदल करा की .
हं....
.खर काय झाल .दोघींचा अहं जागा झाला. आज पर्यंत सासूने सुनांना पैसे वापरण्यास दिले नाहीत . नव-याकडून मात्र मागून घेऊन स्वतः साठी खर्चत राहिली . आता सुना दोन पैसे कमवू लागल्या तर त्यांनी वाचविलेले व कमविलेले पैसे सहाजिकच आहे ना, ... त्या स्वतः साठीच ठेवणार.
प्रत्येक बाईने सुनांना पण मुली प्रमाणे वागविले पाहिजे. त्या आपल्या घरच्या लक्ष्मी आहेत .त्यांना घरात नुसते कामासाठी नव्हे , तर घरची आदरणीय व्यक्ती नात्याने मान दिला पाहिजे. तर ती घरातल्या माणसांना आपले मानते व घराला घरपण देते.
पहिल्या पासून अशी वागणूक न दिल्याने त्या सूनांनी त्यांच्या सासू मधे " आई" कधीच पाहिली नाही .त्यांना सासूत आई कधीच दिसली नाही. असे sssही सासू आई सारखी होउ शकते, ..,,
पण आईची जागा घेउच शकत नाही. आणि अशी वागणूक दिल्यास.,. .. तर कधीच शक्य नाही.
तेव्हा साध्या गाऊन विकत घेण्यावरुन उद्भवलेला हा प्रसंग. पण सासूला शिकवण रुप आहे. सासूने समजून उमजून आता तरी स्वभावात बदल करणे वा
बदलत्या काळा प्रमाणे वागली स्वतःला बदलले तर सुना, ...एक गाऊन काय त्या सासूसाठी तिच्या सुना ,जशा आपल्या आईची गरज भागवितात तशा सासूच्या गरजा पण स्व खुशीने भागवतील.
प ss ण हे सारे शेजारच्या सासूस कसे व कोण सांगणार .....?
पण होईल ... होईल सासूला पण भूतकाळात केलेल्या चूकांची उपरती , असेच छोटे मोठे प्रसंग तिला आपोआप स्वतः मधे बदल करायला लावतील. अनुभवाने ती पण सावरेल शिकेल. ....

........ वैशाली वर्तक

.

Sent from Yahoo Mail on Android

Group content visibility: 
Use group defaults

प्रयत्न चांगला आहे,
पण ते प्रथम पुरुषी एकवचनात सुरू झालेली कथा, मध्येच तृतियपुरुषी होते, तो जरा बदल करा.

कोण सासु कोण सून कोण निवेदन करणारी कोण मुलगा कोण नवरा कोण आहे कोण...?? Uhoh

स्पर्धेसाठीः > मायबोलीवर कोणती स्पर्धा सुरू आहे..?

प ss ण हे सारे शेजारच्या सासूस कसे व कोण सांगणार .....? > गोष्ट नक्की कोणाच्या घरात घडते..? निवेदन करणारी की शेजारीण..? की आर्धी गोष्ट निवेदिकेच्या घरात आणि आर्धी गोष्ट शेजारच्या घरात असे घडते..? Uhoh
बरोबर आहे ना निवेदन करणारी ने स्वतःच्या गाऊनचे पैसे शेजारणीच्या सूनेकडे मागितले तर ती ठामपणे नाहीच म्हणेल ना..!!

दारावरून गाऊन घेवू नयेत. एकदा धुतले की आटतात. पैसे देत नसेल तर पण शिवण येत असेल तर सुनेला चादरी, पडदे द्या आणि त्याचा गाउन शिवायला सांगा. सुई-धागा मध्ये वरूण धवनने अस्सेच केले होते.

अगदी असा काही खरा खाण्याचा पदार्थ असेल तरी आम्ही बिझी माणसं आहोत.अकबरी बनवत आणि खात नाही.साधा
खिचडी चा कुकर लागला तरी नवरा मुलं देवाचे आभार मानतात ☺️☺️☺️

कथा वाचली.स्वतः गाऊन घेणार असल्यास स्वतःकडे पैसे आहेत याची खात्री करून घेतलेला बरा.पैसे द्यायला कोणी समोर असेलच असं नाही.

अगदी असा काही खरा खाण्याचा पदार्थ असेल तरी आम्ही बिझी माणसं आहोत.अकबरी बनवत आणि खात नाही.साधा
खिचडी चा कुकर लागला तरी नवरा मुलं देवाचे आभार मानतात > मग आईने अकबरी म्हणजे काय..?

खिचडी चा कुकर लागला तरी नवरा मुलं देवाचे आभार मानतात ☺️☺️☺️ >> लोक अकबरी बद्दल विचारतात तर बिरबल की खिचडी बद्दल सांगतात. काय म्हणावं अशा माबोकरांना !! Wink Happy (मी_अनु हलके घ्या..)
वरूण धवनला नाही, त्याच्या आईला गाऊन घालायला बरा पडणार असतो. पण वरूण कडे पैसे नसतात. मग तो अनुष्काला पडदे, लिहाफ मागतो आणि गाऊन शिवतो.

मग आईने अकबरी म्हणजे काय..>>>>

आई ने अकबरी.

अकबर टॉकीजमध्ये धवनचा चित्रपट लागलाय, हे आई, मला तिथे घेऊन चल.

प्रयत्न चांगला आहे,
पण ते प्रथम पुरुषी एकवचनात सुरू झालेली कथा, मध्येच तृतियपुरुषी होते, तो जरा बदल करा.
>>+१.
लेख इथे पेस्ट करताना या संकेतस्थळानुरूप बदल करण्याचे राहून गेले आहे (स्पर्धा, परत येणारे शीर्षक वगैरे...) ते करावेत.

काये हे??>>>
सासूला गाऊन घालावासा वाटल्याने विकत घेतल्यावर पण पैसे न दिल्याने तरीही सुनेने पैसे न दिल्याने मुलाला बोलावल्याने त्याने पैसे दिल्याने शेजारणीच्या सुनेने पैसे न दिल्याने सासूने घेतलेला गाऊन!

तात्पर्य -
सासूने गाऊन घेतल्यावर सुनेने पैसे न देता शेजारच्या सासूच्या सुनेने शेजारच्या सासूच्या गाऊनचे पैसे द्यावेत जिची सून सासूच्या गाऊनचे पैसे देत नाही.

सारांश आणि तात्पर्य!!!

बरं झालं गाऊन चे पैसे उशिरा का होईना पण मिळाले,‌‌‌चला पुढं. " नाना मोटा बाळको माटे कपडा , तेमज काॕटनना गाऊन ं

प ss ण हे सारे शेजारच्या सासूस कसे व कोण सांगणार .....?
>> या वाक्यामुळे सर्व गोंधळ उडाला आहे. शेजारच्या म्हणजे शेजारी बसलेल्या स्वत:च्या सासूस असा अर्थ घ्यावा.
गोष्टीचं तात्पर्य थोरांचे अनुकरण करून गुरुची विद्या गुरुला असे होऊ नये म्हणून थोरांनी आत्मपरीक्षण करावे व वागण्यात बदल करावा. झाले.

वाक्यामुळें नाही तर सासू मुळे गोंधळ झालाय
या वयात गाऊन मिळाल्यामुळे ती इतकी हरखून गेली आहे की कोणी का होईना पैसे दिल्याशी मतलब
मग मुलगा सून शेजरची सासू तिची सून यांनी काही का गोंधळ घालावा कथेत काही फरक पडत नाही

काय है नेमकं कथा वाचुन तर कळलंच नाही वर अज्ञातवासी तुमी तर मला अजुनच कनफ्युज केलं कि ओ!
कुणाचा गाऊन कुणी विकत घेतला का अन कुणी पैसे दिले नुसती खिचडी!

जुन्या माबो वरचा एक जोक आहे, आपण जुने सभासद आहोत हे दाखवण्यासाठी काही आयडी हा आईने अकबरी चा रेफेरेन्स मारत असतात.
ही घ्या लिंक -
http://www.maayboli.com/hitguj/messages/46/137643.html?1203754627

Pages