सुलेखन (कॅलिग्राफी)

Submitted by हरिहर. on 26 March, 2019 - 23:29

मी केलेली काही सुलेखने. सुलेखनासाठी मायबोलीवरील काही कवितांच्या ओळी घेतल्या आहेत. सुलेखनाच्या नावाखाली बरेच ठिकाणी अक्षरांची वळणे रेखाटताना मोकळीक घेतली आहे.
वेळेचा अभाव आणि आयपॅडवर काम करताना येणारी अनेक बंधने या मुळे सुलेखनाला अर्थातच अनेक मर्यादा आल्या आहेत. कागद, ब्रश आणि रंग हाताशी येतील तेंव्हा पुन्हा प्रयत्न करेनच.
१.
purandares.jpg
२.
shashap.jpg
३.
मुग्धमानसी.jpg
४.
befikir3.jpg
५.
925D9DB5-30EC-42AF-A9E3-1D590AD37D3F.jpeg
६.
befikr2.jpg
७.
befiker1.jpg
८.
DF96E2F9-E5B6-45EB-9340-D0AF0D4578E8.jpeg
९. पद्मनाभ
3369F868-120D-4A7D-9D7D-8DBDEBEBA958.jpeg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुरेख Happy

विठ्ठल आणि अहम् अप्रतिम.

बाकीची अक्षरे पण सुंदर आहेत पण आशयानुरुप असती तर आणखी मजा आली असती.

सुंदर...

छान झालेय सुलेखन....
कवितेतील भाव नेमका दिसावा यासाठी अक्षरांची वळणे, स्ट्रोक, रंग कसे निवडतात याबद्दल लिहा ना थोडेसे.

प्रतिसादासाठी सगळ्यांचे खुप आभार!

माधव, आशयानुरुप काम करण्यासाठी ब्रश हवेत. अॅपवर काम करताना फार मर्यादा येतात. प्रयत्न करेन पुढच्यावेळी नक्की.

कारवी, मी फारसा अर्थ लक्षात न घेता काम केलय. खरंतर अर्थानुरुपच सुलेखन असावे पण जमतय आपल्याला या आनंदात मी वाटेल तसे काम केलय. Happy विठ्ठल हे जरा हस्तलिखित पोथीसारखे काढायचा प्रयत्न केला आहे तर बेफिकीर हे जरा बेफिकीरपणे स्ट्रोक मारुन जसे आले तसे घेतले आहे.

या अगोदर मी येथे काही सुलेखने प्रकाशित केली होती. त्यावेळी मिळालेल्या सुचनांचा फारच उपयोग झाला. आभारी आहे.

दक्षिणा, मुग्धमानसी यांच्या कवितेत बदल केला आहे.

अतिशय सुंदर सुलेखने.

सुलेखन पाहताना कविता आवडत गेल्या.... कवितांची निवड खुप आवडली.

शालीजी, मला वाटते यापूर्वी तुमची शब्दांशी सलगी होतीच.. तुमच्या लेखनात ती जाणवली.. आणि शब्दांनीच रंगांशी हातमिळवणी करून तुमच्या कौशल्याला सुंदर रीतीने प्रकट केले आहे.. व्वा.

Pages