माझी भेटवस्तू ..

Submitted by अभिजीत... on 28 April, 2018 - 01:21

मी प्रथमच काल्पनिक गोष्ट लिहतोय , जरा सांभाळून घ्या मला लिहण्याचा अनुभव कमी असला तरी जमवण्याचा हा प्रयत्न. हा प्रसंग माझ्यावर घडलेल्या प्रसंगाशी मिळताजुळता असला तरी यामधील पात्रे काल्पनिक आहेत.

पुण्यापासून ६० किमी अंतरावर असलेले एक छोट गाव त्या गावात तश्या मुबलक सुविधा नसल्यामुळे त्या गावातील बरीच तरुण पिढी हि पुण्याला जाऊन तिथे नोकरी-धंदा करत होती त्यामधीलच एक म्हणजे चिन्मयचे बाबा.

चिन्मय हा १२ वर्षाचा दिसायला गोंडस आणि शाळेमध्ये हुशार असा गोड मुलगा होता ,तसे शाळेमध्ये त्याचे खूप मित्र होते पण सुधीर नावाचा त्याचा जिवलग मित्र होता ; सुधीर हा शांत आणि प्रेमळ स्वभावाचा मुलगा त्याची घरची परिस्थिती नाजूक असल्यामुळे त्याला घरच्यांना कामात मदत करावी लागत असे त्यामुळे त्याची शाळेमधील प्रगती हि तशी बरीच म्हणावी लागेल अशे हे दोन जिवलग मित्र नेहमी एकत्र असायचे, सुधीर हा शेतात गेल्यावर आवर्जून चिंचा-आंबे -बोरे असे आणत असे तर चिन्मय आपल्या बाबांनी आणलेला खाऊ सुधीर ला देत असत दोघे बारा वर्षांचे असले तरी त्यांची हि मैत्री मोठ्या मनाची होती.

काही दिवसांनी चिन्मयच्या बाबांनी सर्वाना घेऊन शहरातच राहायचा निर्णय घेतला चिन्मयला याची कल्पना नव्हती पण जशी चिन्मयची वार्षिक परीक्षा संपली तेव्हा त्याला बाबांनी सांगितले कि आपण आता शहरातच रहायला जायचे म्हणून हे एकूण चिन्मय खूप खुश होता त्याने हे लगेच सुधीरला जाऊन सांगितले सुधीरला हे एकूण खूप वाईट वाटले त्या रात्री तो झोपता झोपता आईला विचारतो ,"आईगं , आपण का शहरात राहायला जात नाही म्हणून ,कधी जायच आपण ? हे एकूण आईने त्याला कसेबसे करून झोपी घातलं आणि आपल्या नशिबाला कुठलं आल शहर असा विचार करत तिचा पण केव्हा डोळा लागला हे कळलंच नाही.

त्या सुट्टी मध्ये चिन्मय आजोळाला गेल्यामुळे त्याची आणि सुधीरची जास्त भेट झाली नाही आणि त्यात चिन्मय च्या बाबांनी लवकरच जायचा निर्णय घेतला आणि चिन्मयचा जायचा दिवस आला सुधीरचा निरोप घेऊन चिन्मय आता मोठ्या शहराच्या गर्दीत हरवून जाणार होता , चिन्मयचे बाबा हे मोठ्या हुद्यावर असल्यामुळे त्यांनी मोठ्या सोसायटी मध्ये घर घेतले होते, चिन्मयला असलेली शहराची आवड आणि हुशार असल्यामुळे तिथल्या वातावरणामध्ये लगेच मिसळून गेला होता तिथे त्याचे आता मित्र झाले होते. इकडे सुधीर मात्र नेहमीची तिच शाळा तेच गाव तेच काम हे करता करता यामध्ये काही दिवस गेले ,सुधीरला प्रश्न पडला होता कि चिन्मय आपली आठवण काढत असेल ,कि नाही. कारण काही दिवसावरच चिन्मयचा वाढदिवस आला होता आणि चिन्मयचा एक हि वाढदिवस सुधीरने चुकवला न्हवता कारण त्याच्या वाढदिवसाला सुधीरने नेहमी त्याला आवडणारे लाडू देत असत यंदा हि सुधीरला वाटत होत कि आपण चिन्मयच्या वाढदिवसाला जावं म्हणून पण कसे जायचे आई काय म्हणेल याचा विचार तो करत होता पण तरी त्याने हे आईला सांगितले आई पहिल्यांदा त्याला ,'कुठे जातो शहरात! आता ते विसरले असतील तुला,तो येईल कि सुट्टीला इकडे असे सांगून टाळू लागली पण त्याने बाबांपाशी हट्ट करून एकदा जाऊयाना बाबा? म्हणून जायचा होकार मिळवला त्या दिवशी तो खूप खुश होता चिन्मय कसा असेल? आता काय म्हणेल भेटल्यावर असे विचार करत त्या दिवसाची वाट बघत होता चिन्मयचे बाबा हे कुठे राहतात याची गावात चौकशी करून सुधीर आणि त्याचे बाबा हे चिन्मयच्या वाढदिवसाला निघाले सुधीरने जाताना चिन्मयला आवडणारे लाडू घेतले होते आणि त्याला मिळणारे थोडे थोडे पैसे करून साठवलेले पैश्यातून एक छोटी भेटवस्तू घेतली आणि सुधीर बाबांबरोबर शहरात गेला आणि कसे बसे करून त्यांना चिन्मयचे घर सापडले आणि तिथे पोहचतात चिन्मयला पाहून सुधीर हा खूप खुश झाला चिन्मयच्या घरच्यांना हि आश्चर्य वाटले कि हा लांबून एवढ्या आला ते चिन्मयच्या बाबांना त्याचे फार कौतुक वाटले .

चिन्मयचा वाढदिवसाला त्याच्या सोसायटी मधील त्याचे सर्व मित्र शाळेमधील मित्र त्यांच्या जवळचे लोक असे सर्व जण आले होत त्यामध्ये सुधीर आणि त्याच्या बाबाला अवघडून गेल्या सारख वाटत होत. चिन्मयचा वाढदिवस मोठ्या थाटात पार पडला त्यामध्ये चिन्मयचे सुधीरकडे फार लक्ष नव्हते वाढदिवस संपताच सुधीरच्या बाबांनी चिन्मयच्या घरच्यांकडे आम्ही निघतो आता असा निरोप घेतला तर सुधीरने चिन्मयला आणलेले लाडू आणि भेटवस्तू त्याच्याकडे दिली आणि येतो आता आम्ही असे बोलला चिन्मयने सुद्धा हो चालेल असे म्हणून त्याला तिथल्या मित्रांनी आणलेल्या मोठ्या भेटवस्तू बगण्यात गुंग झाला. सुधीरसुद्धा त्याच्या बाबांसोबत आपल्या गावी निघून गेला सुधीर खूप प्रश्न पडले होते चिन्मय खूप बदलला आहे आता आपण खूप मागे पडलो आता आपल्या सारखे छोटे मित्र आता तो कशाला लक्षात ठेवतोय अशा अनेक प्रश्नाचा गदारोळ त्याच्या डोक्यात चालला होता इकडे चिन्मय दुसऱ्या दिवशी सर्व भेटवस्तू घेऊन घरच्यांना दाखवत होता तेवढ्यात सुधीरने आणलेली भेटवस्तू घेऊन तो बाबांना दाखवतो आणि बोलतो बघाना सुधीरने माझ्यासाठी काय छोटीशी भेटवस्तू आणली आहे हे ऐकताच बाबांनी वाचायला घेतलेला पेपर बाजूला सारून चिन्मयला जवळ घेतले आणि बोलले चिन्मयानंदा,हे बघ भेटवस्तू हि लहान मोठ्या मध्ये तोलायची नसते भेटवस्तू हि भेटवस्तू असते तू इथल्या मुलांनी आणलेल्या भेटवस्तू मोठ्या आहेत म्हणून ते तुला आवडली आणि सुधीरने आणलेली छोटीशी भेटवस्तू तुला आवडली नाही पण त्या भेटवस्तू आणण्याचा मागचा प्रयत्न आणि त्याला त्या भेटवस्तूची किंमत हि सुधीरच्या मानाने त्यासाठी खूप मोठी आहे तू त्याच्या बाजूने विचार कर म्हणजे समजेल याची जाणीव होताच चिन्मय पळत जातो आणि त्याने आणलेले लाडू खात खात त्यांच्या गावाकडच्या आठवणीत हरवून जातो आणि बाबांच्या खुशीत जाऊन रडत रडत बाबांना म्हणतो माझे खूप चुकले का? मला असे नको वागायला हवे होते मी त्याच्याशी नीट बोललो पण नाही मला खूप आठवण येते त्यांची हे पाहून बाबा त्याच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि बोलतात उद्या आपण जाऊ गावाला सुधीरला भेटायला , बाबांच्या तोंडावर स्मितहास्य होत त्यांना आपला मुलगा मोठा झाल्याच दिसून येत होत .........

चिन्मयला वाढदिवसाची हि सर्वात मोठी भेटवस्तू मिळाली होती ..... जीवा भावाची मैत्री.....

काय कशी वाटली, तुम्हाला सुद्धा असा अनुभव आला असेल..... कारण माझ्या या भेटवस्तू मुळे तुम्हाला तुमच्या अश्या भेटवस्तूंची आठवण येईल .....

धन्यवाद ,

अभिजीत मोहिते

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

thank u...

Nice