मुंबई पुणे मुंबई ३

Submitted by सनव on 24 January, 2019 - 23:36

मुंबई पुणे मुंबई हा माझा अत्यन्त आवडता चित्रपट आहे. फ्रेश, विनोदी, एव्हरग्रीन असा मूव्ही आणि त्यात स्वप्नील मुक्ताची केमिस्ट्री! याचा दुसरा भाग आला होता तोही छानच होता.

पहिल्या भागात फक्त गौतम आणि गौरी होते, दुसऱ्या भागात त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, गौरीचा प्रियकर अर्णव हे भेटले.

मराठी मुव्हीची फ्रॅंचायजी होणे आणि त्याच कथेचा पुढचा टप्पा तिसऱ्या भागात येणे हे फारच अभिनंदनीय यश म्हणावे लागेल.
नुकताच मुंबई पुणे मुंबई भाग 3 बघितला. सर्वप्रथम, चित्रपट चांगलाच आहे. विशेषतः सध्या जितके वाईट चित्रपट बनतात त्या मानाने हा एकदा नक्कीच बघू शकतो.

पण..पहिल्या दोन भागांचं यश पाठीशी असताना दिग्दर्शकाने एकही रिस्क न घेता सेफ चित्रपट बनवला आहे. त्यामुळे तो अतिशय साचेबद्ध चित्रपट बनला आहे.

लग्नाला 3 वर्ष झाली आहेत आणि गौतम गौरी आता आईबाबा होणार आहेत. गरोदरपणात गौरीचा स्वभाव कसा बदलतो, गौतमला जबाबदारीच्या जाणिवेने बदलावं लागतं का याची उत्तरं पडद्यावर मिळतात.

एकूणात सगळं छान छान दाखवायचं हेच उद्दिष्ट असल्यामुळे पडद्यावर संघर्ष किंवा चाकोरीबाहेरील काहीच घडत नाही. अर्थात असे हलकेफुलके चित्रपटही मला आवडतात पण मग त्यात विनोदाचा तडका तरी भरपूर हवा. इथे काही सीन्स खूप विनोदी आहेत पण तसे अजून जास्त सीन असते तर मजा आली असती. ना धड कॉमेडी, ना काही ट्विस्ट ना धड रोमँटिक.

आपल्याला मूल हवंय की नकोय, हवं असेल तर का हवंय, आजच्या जगात मूल वाढवताना असे कोणते वेगळे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतील जे आपल्या पालकांना आपल्याला वाढवताना आले नाहीत असा काही बेसिक विचार हे जोडपं करताना दाखवलेलं नाही.
उलट किमान एक तरी मूल असायला(च) हवं, आयडियली किमान दोन तरी मुलं हवीत, त्यातही शक्यतो एक मुलगा एक मुलगी अशी हवीत, त्याविरुद्ध करियर ,आर्थिक goals, भावनिक तयारी नसणं वगैरे फालतू कारणं मुलासुनेने देऊ नयेत, अबॉर्शनसारखं दुसरं पाप नाही असे रिग्रेसिव्ह जुनाट विचार मात्र हॅमर केले गेले आहेत. एका जोडप्याने चान्स कधी घ्यावा, किती चान्स घ्यावे ही गोष्ट सर्व कुटुंबाने एकत्र बसून चर्चा करण्याची आहे असंही दिग्दर्शकाने दाखवलं आहे. अरे ते काय तुम्ही केबल टीव्हीचं पॅकेज सिलेक्ट करताय का- प्रत्येकाने आपापलं मत द्यायला? का तुम्ही अर्णबच्या स्टुडियोत बसून आगामी बजेट कसं असावं यावर डिबेट करताय?
नुसतं पडद्यावर ऑनलाइन शॉपिंग किंवा व्हिडिओ कॉलिंग दाखवून 90s स्टाइल स्टेल फ़ॅमिली ड्रामा contemporary होत नसतो.

असो. आता स्टारकास्टबद्दल बोलू. मुक्ता बर्वे खूप सुंदर दिसली आहे आणि तिने नेहमीप्रमाणे सहजसुंदर काम केलं आहे. स्वप्नील जोशीबद्दल बोलायचं तर he has nailed it in certain scenes, he is brilliant sometimes. पण इतर वेळी तो एकतर ठार वेडसर वाटतो किंवा high (on something) वाटतो.
मुक्ताच्या धाकट्या बहिणीचा रोल करणारी मुलगी छान आहे. प्रशांत दामले व इतर सर्व सिनियर कलाकार नेहमीप्रमाणेच उत्तम काम करून जातात पण कोणालाच फारसा स्कोप नाही. रोहिणी हट्टंगडीना मोठा रोल आहे आणि त्यांनी फारच सुरेख काम केलं आहे.
पण एकूणच या सर्व ज्येष्ठाना मिट्ट गोड वागणं, या कानापासून त्या कानापर्यंत छान छान हसणं हेच मुख्य टास्क आहे. ते गोड गोड हसरं वातावरण लवकरच फार फेक आणि फोर्सड वाटायला लागतं. कुठल्याही क्षणी नेरोलॅक, धारा रिफाइंड ऑइल किंवा तत्सम जिंगल लागेल असंही वाटतं.

चित्रपट तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार आहे. प्रत्येक फ्रेम देखणी आहे. गौतम गौरी, गौतमचे पालक सर्वांच्या घराचं इंटिरियर मस्त.
गाणी आणि त्यांचं पिक्चरायझेशन हे या चित्रपटाचं एक बलस्थान आहे. सर्व गाणी छान आहेत पण ढोल ताशा पथकात असलेल्या स्वप्नील मुक्तावर चित्रित 'आली ठुमकत नार' हे सर्वात भारी जमलंय. लोकेशन, मुख्य जोडीचा अभिनय, चित्रीकरण- सर्व भट्टी जमून आली आहे आणि आदर्श शिंदेने अफाट गायलंय.

कशासाठी पहावा- तुम्ही या फ्रँचायजीचे चाहते असाल तर जरूर पहा. साध्या सरळ कौटुंबिक कथा आवडत असतील तर नक्की बघा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Amazon prime वर पळवत पळवत पाहिला. पूर्ण करायचा म्हणून. जाम bored.
Bollywood आणि मराठी चित्रपटाचे sequel बघण्यासारखे नसतात हे माझा वयक्तिक मत आहे. अपवाद race2

भाग १ ठिकठाक होता, भाग २ रटाळ आणि फालतू वाटला. त्यात इतके फोर्स्ड प्रॉडक्ट प्लेसमेंट चित्रपटात पाहून डोकंच फिरलेलं. त्यामुळे भाग ३ च्या वाटेला जाणार नाही.

वरील सर्व पोस्टींशी सहमत.

उत्तम स्टारकास्ट असताना सगळी पटकथा अगदी सरधोपट करुन काय साधल काय माहित , तिसरा पार्ट आला हे समाधान?

खरंय. राजवाडेंनी आधी चांगलं काम केलंय. पण इथे फेल झाले आहेत. त्यांच्या बायकोने स्टोरी लिहिली म्हणे. आता स्टोरी नव्हतीच तर काय लिहिलं देवच जाणे.

मी प्राईमवर बघितला. बोअर झाला. काही प्रसंग चांगले जमलेत. उदा. नर्स सूचना देते तो, गौतमला ओकाऱ्या येतात तो.
स्वप्नील जोशी मला बिलकुल आवडत नाही. मुक्ता बर्वे खूप आवडते. त्यामुळे हिने याच्यात नेमकं काय पाहिलं असा प्रश्न वारंवार पडतो Wink . त्याची व्यक्तिरेखाही गंडलेली आहे.
प्रशांत दामले, विजय केंकरे यांना त्यांच्या क्षमतेच्या मानाने काहीच काम नाहीये. आणि डॉक्टर जरी नातेवाईक असले तरी डिलीव्हरीसारख्या प्रसंगी खोटं खोटं सांगून घाबरवत वगैरे नाहीत. आधी पण जुळं आहे सांगताना केवढी गंभीर हवा केली आहे.

तो जुळे असणे सीन गंडला आहे,
सोनिग्राफी मध्ये काय दिसतेय ते बाईला त्या टेबल वर झोपल्या झोपल्या दिसते, दिसले नाहींतर बाई तेव्हाच विचारते,
हे असे पॅथॉलॉजि रिपोर्ट आणल्या सारखे " सोनिग्राफी चे रिपोर्ट आलेत" म्हणून पाकीट फोडत नाहीत

२ महिन्यात नवऱ्याला (ते पण प्रेमळ नवऱ्याला ) फोन करायला वेळ मिळू नये किंवा मी बिझी आहे हे सांगायला / मेसेज करायला वेळ मिळू नये हे वॉअ ,फेबु च्या जमान्यात अगदीच अशक्य आहे. मुंबईला आल्यावर तो ९ महिन्याच्या बायकोबरोबर शर्यत काय लावतो कि कोण अगोदर दारात पोहोचेल , बायको पण पळत पळत जाते, शेवटी डॉक्टर गंमत काय करतात, झबा बाळांना पाहून समाधीत काय जातो,आतमध्ये बायकोला जाऊन काय डालोग मारतो (२ मिनिटं फोन करायला वेळ नव्हता याला) छ्या काहीही दाखवतात , फुकट गेले २ तास.

२ महिन्यात नवऱ्याला (ते पण प्रेमळ नवऱ्याला ) फोन करायला वेळ मिळू नये किंवा मी बिझी आहे हे सांगायला / मेसेज करायला वेळ मिळू नये हे वॉअ ,फेबु च्या जमान्यात अगदीच अशक्य आहे. मुंबईला आल्यावर तो ९ महिन्याच्या बायकोबरोबर शर्यत काय लावतो कि कोण अगोदर दारात पोहोचेल , बायको पण पळत पळत जाते, शेवटी डॉक्टर गंमत काय करतात, झबा बाळांना पाहून समाधीत काय जातो,आतमध्ये बायकोला जाऊन काय डालोग मारतो (२ मिनिटं फोन करायला वेळ नव्हता याला) छ्या काहीही दाखवतात , फुकट गेले २ तास>>>>>>:हाहा:
हे असं सगळं आहे ह्या सिनेम्यात. आता टीव्हीवर आला तरी बघणार नाहीच.

एलदुगो मध्ये स्वजो असंच हैद्राबादला जाऊन फोन बंद करून झोपला आणि फ्लाइट हुकवली त्याने. तिथे दोन दिवस झोपला होता.
इथे दोन महिने झोपला असेल.

मुक्ताने अकख्या चित्रपटात ओके ओके अकटिंग केलीय पण जी व्हिडीओ क्लिप ती स्वजो ला पाठवते, एक नंबर एक्सप्रेशन्स... मराठी न कळणाऱ्यांच्या मनाला पण भिडून जाईल.
गुड जॉब मुक्ता !

२ महिन्यात नवऱ्याला (ते पण प्रेमळ नवऱ्याला ) फोन करायला वेळ मिळू नये किंवा मी बिझी आहे हे सांगायला / मेसेज करायला वेळ मिळू नये हे वॉअ ,फेबु च्या जमान्यात अगदीच अशक्य आहे. मुंबईला आल्यावर तो ९ महिन्याच्या बायकोबरोबर शर्यत काय लावतो कि कोण अगोदर दारात पोहोचेल , बायको पण पळत पळत जाते, शेवटी डॉक्टर गंमत काय करतात, झबा बाळांना पाहून समाधीत काय जातो,आतमध्ये बायकोला जाऊन काय डालोग मारतो (२ मिनिटं फोन करायला वेळ नव्हता याला) छ्या काहीही दाखवतात , फुकट गेले २ तास>>>> Lol
इथे जर अशी चिर्फाड होत राहीली तर हा सिनेमा पहायची इच्छा होईल Happy

Biggrin

चिरफाड करायला योग्य चित्रपट आहे पण पहिला भाग खूप आवडला असल्यामुळे मला अगदीच अपमान करावासा नाही वाटला या टीमचा.
पण ओव्हरऑल सगळेच डोक्यात जात होते प्रशांत दामले आणि मुक्ताचे बाबा सोडून!

Pages