आपण असू लाडके : ३. समज आणि गैरसमज

Submitted by स्वाती_आंबोळे on 25 January, 2019 - 00:47

यापूर्वीचे लेखः
१. गुलाबी त्रिकोणात कैद
२. इंद्रधनुष्यात किती रंग?

परवाच वाचनात आलेल्या २० जानेवारी २०१९च्या या बातमीनुसार अमेरिकन वैद्यकीय महाविद्यालयांत शिकणार्‍या भावी डॉक्टर्सना आजच्या घडीलाही लैंगिक अल्पसंख्यांकांच्या आरोग्यविषयक समस्यांबद्दल पुरेसं शिक्षण मिळत नाही.

आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे 'मी कोण' हे समजून घेण्याची घालमेल आणि आधार देण्याऐवजी दूर लोटणारी कौटुंबिक आणि सामाजिक परीस्थिती यांमुळे लैंगिक अल्पसंख्यांकांत मानसिक विकार, एड्ससारख्या शारीरिक आधीव्याधींचा प्रादुर्भाव, नोकरीव्यवसायांत भेदभाव, छळ (हरॅसमेन्ट), गरीबी अशा अनेक समस्या सामान्यांपेक्षा अधिक प्रमाणात आणि अधिक गंभीर असतात. असं असताना आजच्या काळातसुद्धा वैद्यकीय व्यावसायिकसुद्धा त्यांना मदत किंवा उपचार देऊ शकण्याइतके माहीतगार नसतील तर तुमच्याआमच्यात पुरेशा माहितीअभावी त्यांच्याबद्दल गैरसमज नांदल्यास नवल काय?

वारंवार कानांवर पडणार्‍या काही प्रचलित गैरसमजांबद्दल या भागात बोलू.

गैरसमज १: नैसर्गिकरीत्त्या सर्व प्राणिमात्रांत स्त्री आणि पुरुष हे दोनच प्रकार असतात. यापेक्षा काहीही निराळं असणं हे 'अनैसर्गिक' आहे.
याबद्दल आपण आधीच्या लेखात बोललो आहोत. लैंगिक अल्पसंख्यांकांचा कुठलाच प्रकार अनैसर्गिक नाही. ही सगळी नैसर्गिक व्हेरिएशन्स आहेत, हार्ड वायर्ड आहेत, अपरिवर्तनीय आहेत.
आधी उल्लेख केल्याप्रमाणे किन्नर/हिजडे हाच एक प्रकार खरंतर बहुतेक वेळा नैसर्गिक वाढीत केल्या गेलेल्या मानवी ढवळाढवळीमुळे निर्माण होतो - आणि दुर्दैव असं की लैंगिक अल्पसंख्यांक म्हणताक्षणी बहुतेकांच्या डोळ्यांसमोर लोकल ट्रेनमध्ये टाळ्या पिटत भीक मागणारी व्यक्तीच येते!

ही नैसर्गिक व्हेरिएशन्स का आणि कशी होत असावीत याबाबत आत्तापर्यंतच्या संशोधनातून जे समजलं आहे त्याबद्दल कार्डिओलॉजिस्ट डॉ. जेम्स ओ'कीफ, जे स्वत: एका होमोसेक्शुअल मुलाचे वडील आहेत, या टेडएक्स टॉकमध्ये बोलले आहेत. अतिशय माहितीपूर्ण आणि हृद्य भाषण आहे, अवश्य पहा.

या व्याख्यानातील माहितीचा गोषवारा असा सांगता येईलः
"वरवर विचार करता असं वाटतं की समलैंगिकता ही प्रजननक्षम नसल्यामुळे 'नॅचरल सेलेक्शन'च्या थिअरीनुसार केव्हाच विलुप्त (extinct) व्हायला हवी होती, पण ऐतिहासिक नोंदी लक्षात घेतल्या तर सर्व प्राणिमात्रांमध्ये आणि सर्व मानवी संस्कृतींमध्ये ती पूर्वापार चालत आली आहे असं दिसतं. त्याचं कारण ती प्राणिमात्रांच्या टिकावासाठी (survival) उलट आवश्यक आहे.
अनेक अभ्यासांच्या निष्कर्षानुसार समलिंगी व्यक्ती सहसा सरासरीहून अधिक बुद्धीमान असतात - विशेषत: भावनिकदृष्ट्या. (higher Intelligence Quotient and specially higher Emotional Intelligence Quotient). त्या सहसा अधिक सृजनशील असतात तसंच सहसंवेदना आणि सहकार (compassion and cooperation) यात सहसा त्या पुढे असतात आणि त्यांच्यात शत्रुत्वाची भावना (hostility) कमी प्रमाणात दिसून येते.
आपली गुणसूत्रं (genome) हे आपलं 'हार्डवेअर' असतं. कॉम्प्यूटर किंवा स्मार्ट डिव्हाइससारखे त्यात अनेक डीएनए प्रोग्रॅम्स डाउनलोड केलेले असतात. आई गर्भवती असताना तिच्या सभोवतालच्या परिस्थितीनुसार - म्हणजे त्या परिस्थितीत बाळाला शक्य तितक्या उत्तमप्रकारे जगता यावं आणि या बाळामुळे परिस्थितीत सकारात्मक भर पडावी या दोन्ही निकषांनुसार - बाळाच्या शरीरात त्यातले कुठले प्रोग्रॅम्स सक्रीय (activate) केले जातील हे ठरतं. याला 'एपिजेनेटिक्स' असं म्हणतात.
उदाहरणार्थ मधमाश्यांची कॉलनी तयार होतानाचं वातावरण पुरेसं अनुकूल नसेल तर अधिक सैनिक माश्यांची पैदास होते, आणि जर बाकी परिस्थिती अनुकूल असून अन्न मिळवता येण्याला प्राधान्यक्रम असेल तेव्हा कामकरी माश्यांची पैदास केली जाते. राणीमाशीच्या शरीरातली रोगप्रतिकारक यंत्रणा तिच्या संततीत आपोआप तसे प्रोग्रॅम्स सक्रीय करते.
माणसातही काही कारणाने जर आई गर्भवती असताना तणावपूर्ण वातावरणात असेल, तर मूल समलैंगिक जन्माला येण्याची शक्यता वाढते. जणू निसर्ग तिला एक सहसंवेदनशील, प्रेमळ मित्र/मैत्रीण, सहकारी देऊ करतो.
तसंच मुलग्यांच्या बाबतीत त्यांच्या प्रत्येक मोठ्या भावागणिक ते समलैंगिक असण्याची शक्यता ३३%नी वाढते. लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याची ही निसर्गाची एक युक्ती असते. आपण गर्भनिरोधकं शोधण्याच्या कितीतरी आधी निसर्गाला ही युक्ती सुचलेली होती.
"

गैरसमज २: मनुष्यप्राण्याला असलेल्या अतिरिक्त बुद्धीचे दुष्परिणाम आहेत हे सगळे! निसर्गात बाकी कुठेही असलं काही दिसत नाही.
येल सायंटिस्टमधील या लेखानुसार जवळपास ४५० प्रकारच्या प्राणिमात्रांत होमोसेक्शुअल वर्तणूक दिसून आलेली आहे.
या लेखानुसार होमोसेक्शुआलिटी दर्शवणार्‍या स्पीशीजची संख्या १५०० आहे.
हा नॅशनल जिओग्राफिकमध्ये आलेला लेखही या दाव्याला पुष्टी देतो.
मानवाव्यतिरिक्त इतर अनेक प्राण्यांत 'केवळ आनंदासाठी'सुद्धा शरीरसंबंध केले जातात आणि त्यात समलैंगिक संबंधांचाही समावेश असतो.

गैरसमज ३: 'आपल्या'कडे 'पूर्वी' असलं काही नव्हतं. ही सगळी पाश्चात्य खुळं आहेत.
ख्रिस्तपूर्व ६०० साली लिहिल्या गेलेल्या सुश्रुत संहितेत सर्वसामान्यांपेक्षा निराळं लैंगिक वर्तन/आवडीनिवडी असणार्‍यांचे तेव्हा माहीत असलेले कुंभिक, आसेक्य, इत्यादी प्रकार विशद केलेले आहेत.
कामसूत्रात समलिंगी संबंधांचं वर्णन आहे आणि असे संबंध भावनिक प्रेम आणि विश्वासावरच आधारित असतात असाही उल्लेख आहे.
मनु:स्मृतीत समलिंगी संबंधांनंतर शुद्ध कसं व्हावं याबद्दल सूचना आहेत आणि शिक्षाही सांगितल्या आहेत.
असेच उल्लेख अत्रिस्मृतीतदेखील आहेत.

खजुराहोसारख्या प्राचीन देवळांत समलिंगी, उभयलिंगी, तसंच गटाने केलेल्या शरीरसंबंधांची यासारखी चित्रं/शिल्पं आहेत.

महाभारतातील 'मुलगी म्हणून जन्माला आलेल्या पण मुलगा असलेल्या आणि मुलग्यासारखं वाढवलं गेलेल्या' शिखंडीची कथा आपण ऐकली आहे. पुढे एका यक्षाच्या साहाय्याने त्याने पुरुषाचं शरीर प्राप्त करून घेतलं असं वर्णन आहे, हे आपल्या ट्रान्सजेन्डर व्यक्तींच्या माहितीशी मिळतंजुळतं आहे.

महाभारतातच अर्जुनाने अज्ञातवासात बृहन्नडेचा (बृहत् + नरा/डा = 'मोठे शीश्न असलेली स्त्री' असा एक अर्थ वाचनात आला होता, पण आत्ता हाताशी संदर्भ नाही.) अवतार धारण केला होता. हे केवळ वेषांतर नव्हतं कारण आपली मुलगी या पिळदार पुरुषी दिसणार्‍या नृत्यशिक्षिकेच्या सुपूर्त करण्याआधी विराटाने दासींकरवी तिची शारीरिक 'चिकित्सा' करवून घेऊन आपली मुलगी सुरक्षित राहील याची खातरजमा करून घेतली होती असा उल्लेख आहे.

वरील उदाहरणांवरून लक्षात येईल की प्राचीन भारतात सर्वसामान्यांपेक्षा निराळी शारीरिक जडणघडण आणि/किंवा लैंगिक वर्तन हे समाजमान्य नसेलही, पण अस्तित्वात आणि ज्ञात होतं. तसंच त्यासाठी सांगितलेल्या शुद्धी / प्रायश्चित्तंही सामान्य होती.

अशा वर्तनाला 'गुन्हा' समजण्याची कल्पना आपल्याला दिली ब्रिटिशांनी! (आठवा कलम ३७७!)
या पार्श्वभूमीवर आता आपण ही पाश्चात्य खुळं आहेत असं म्हणणं म्हणजे किती विरोधाभास झाला!

गैरसमज ४: स्वतःला लैंगिक अल्पसंख्यांकांत गणणं हे एक फॅड आहे.
लैंगिक अल्पसंख्यांकांचे या चर्चेत आलेले प्रश्न आणि संघर्ष लक्षात घेतले तर 'फॅड' म्हणून यात सामील होणं किती अशक्य आणि आत्मघातकी असेल हे लक्षात येईल.
तरीही या अनुषंगाने एका ट्रान्सजेन्डर मुलाच्या वडिलांचा हा टेडएक्स टॉक पहावा असा आग्रह करेन. त्याचा थोडक्यात सारांश:
स्किप पार्डी आणि वेरॉनिका यांची उतारवयात झालेली मुलगी डेना हा ट्रान्सजेन्डर मुलगा असल्याचं त्याने बावीसाव्या वर्षी घरी सांगितलं. वडील जुन्या वळणाचे, कर्मठ कॅथलिक आणि लष्करातील निवृत्त अधिकारी! त्यांची काय प्रतिक्रिया असेल या कल्पनेने डेना घाबरलेला होता. पण आईवडिलांनी वस्तुस्थितीचा स्वीकार अगदी सहज केला. डेनाला घरी 'तो डेना' असं म्हणायला लागण्यापासून ट्रान्सजेन्डरीझमचा शक्य तितका अभ्यास करून त्याला सर्वार्थाने समजून घेण्यापर्यंत या दांपत्याने सर्वकाही केलं.
डेनाला लहानपणापासूनच आपण चुकीच्या शरीरात असल्याची जाणीव असावी असं आता त्यांना मागे वळून पाहताना लक्षात येतं, पाचवीत 'मोठेपणी कोण होणार' या प्रश्नाचं उतर त्याने 'मुलगा होणार' असं दिलं होतं! कायम बारीक केस कापणार्‍या आणि शर्टपॅन्ट घालणार्‍या सातवीतल्या डेनाला अजून स्वतःच्या लैंगिकतेबद्दल नीट समजलं नसलं तरी त्याच्या शाळेच्या विरुद्ध खेळणार्‍या बास्केटबॉल चमूच्या प्रशिक्षकांनी त्याला लॉकररूममध्ये नेऊन ती मुलगीच असल्याची खातरजमा करण्यात यावी अशी मागणी केली होती. हे सांगताना आजही वडिलांच्या डोळ्यांत पाणी येतं.
पण या सगळ्या काळातही ते डेना 'टॉमबॉय' आहे असंच समजत होते. ट्रान्सजेन्डर हा शब्दसुद्धा त्यांनी ऐकला नव्हता. त्यात हायस्कूलमध्ये डेनानेही इतर मुलींसारखं केस वाढवून, ड्रेसेस घालून 'नॉर्मल' व्हायचा प्रयत्न केला. त्यांना वाटलं, बाकी अनेक टॉमबॉयिश मुली मोठ्या झाल्या की 'वळणावर' येतात तशीच डेनाही आली असेल!
सतराव्या वर्षी टीव्हीवर ऑप्रा विन्फ्रीचा ट्रान्सजेन्डर लोकांबद्दलचा कार्यक्रम पाहताना तिला अचानक आपण कोण हा साक्षात्कार झाला! आणि तरीही आपल्या प्रेमळ आईवडिलांना हे सांगण्याइतका धीर गोळा करायला डेनाला पाच वर्षं लागली.
वडील म्हणतात, ट्रान्सजेन्डर व्यक्तीने अखेर त्यांचा जेन्डर स्वीकारला आणि व्यक्त केला तरी माणूस म्हणून त्यांच्यात काहीच बदल होत नाही. ही सर्व गुणदोषांसह तीच व्यक्ती असते. त्यांच्यात फक्त दोन बदल दिसतात. एक म्हणजे त्यांचं बाह्य रूप बदलतं, ज्याची आपल्याला आपल्याही नकळत लवकरच सवयही होते, आणि दुसरं आणि महत्त्वाचं म्हणजे ते सुखी झालेले दिसतात!
आपल्या ट्रान्सजेन्डर मुलामुलीला दूर लोटण्यासारखं दुसरं पाप नसेल, कारण प्रेमाची, आधाराची आवश्यकता त्यांना इतर मुलांपेक्षा कितीतरी पटींत जास्त असते. तुमचं मूल ट्र्रान्सजेन्डर असेल तर ते गोंधळलेलं आहे, त्याला बहुधा शाळेत चिडवलं जात असतं, त्रास देण्यात येत असतो, ते नैराश्यात असू शकतं, त्याला हे सगळं संपवायचे विचार सतत सुचत असू शकतात या सगळ्या शक्यता ध्यानात घ्या आणि त्याचा आधार व्हा!

गैरसमज ५ : आपण लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडतो असं एखाद्या व्यक्तीने जाहीर केलं आणि तिच्या वर्तुळातल्या व्यक्तींनी ते स्वीकारलं, तर पुढे 'आणि मग ते सुखाने नांदू लागले' असं लिहून गोष्ट संपेल.
इतकं सोपं असतं तर फार फार बरं झालं असतं, पण दुर्दैवाने अनेकदा तसं होत नाही. गणगोताकडून स्वीकारलं जाणं अत्यावश्यक असतंच आणि त्यामुळे अशा व्यक्तींना मोठाच मानसिक आधार मिळतो, पण खरा प्रवास त्यानंतर सुरू होतो. समाजात त्यांना आपली नव्याने सापडलेली ओळख मिरवताना अनंत अडचणी येतात. चरितार्थासाठी काम मिळवणं अवघड होतं (अमेरिकेत ट्रान्सजेन्डर व्यक्तींना लष्करी सेवेत घेण्यापासून प्रतिबंध करणारा कायदा गेल्याच आठवड्यात सर्वोच्च न्यायालयाने मंजूर केला!), शिकण्याच्या किंवा कामाच्या ठिकाणी धडधडीत किंवा छुपी छळवणूक आणि भेदभाव होतो. व्यक्तिगत आयुष्यात मनासारखा जोडीदार शोधणं/मिळणं अवघड असतं. डेटिंग साइट्स किंवा LGBTQI बार यांसारख्या ठिकाणी भेटणारे अनेक लैंगिक अल्पसंख्यांक तोवरच्या त्यांच्या तणावपूर्ण आयुष्यामुळे स्वतः आक्रमक किंवा छळवादी (predatory/abusive) झालेले असतात किंवा अन्य मनोविकारांनी पीडित असतात.
मुळात मनाजोगत्या सेक्शुअल जोडीदारांची कमतरता, असुरक्षित प्रकारे केलेले शरीरसंबंध, HIV आणि STD चिकीत्सा (ज्या खरंतर वार्षिक करून घ्यायला हव्यात) आणि प्रादुर्भाव झाल्यास वैद्यकीय उपचार घ्यायचं आपली लैंगिकता लपवण्यासाठी टाळणं यामुळे अशा व्यक्तींच्यात HIVसारख्या व्याधींची शक्यता अधिक असते. त्यामुळे अशा जोडीदारांसोबत कोणतंही पाऊल उचलण्याआधी सुरक्षिततेची खात्री करून घ्यावी लागते. इच्छा असूनही निरामय नाती निर्माण होणं अशावेळी कठीण होऊन बसतं.

प्रश्नच प्रश्न आहेत. त्यांच्या निराकरणाची पहिली पायरी समाज म्हणून आपल्या समजुतीच्या आणि जाणिवांच्या कक्षा रुंदावणं (awareness) आणि आपापल्या वर्तुळातील लैंगिक अल्पसंख्यांकांना खुल्या दिलाने स्वीकारणं (acceptance) हीच असू शकते.

या पहिल्या पायरीवर चढायला या लेखांनी थोडीतरी मदत केली असेल अशी मला आशा आहे.

मला लैंगिक अल्पसंख्यांकांबद्दलची प्राथमिक माहिती आणि हे लेख लिहिण्यासाठी प्रेरणा माझा मुलगा आदित्य याच्यामुळे मिळाली. तसंच संदर्भ शोधायला श्री. दिलीप नगरकर आणि मायबोलीकर मृण्मयी यांची मोलाची मदत झाली. मी त्यांची ऋणी आहे.

तळटीप:
मी या विषयात तज्ज्ञ नाही, तसंच माझ्या निकटच्या परिचयातील कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांत मोडत असल्यास मला त्याबद्दल कल्पना नाही, मी इथे देत असलेली माहिती सर्वसामान्यांसारखी गूगल करून मिळवली आहे (जिथून घेतली ते दुवे जागोजागी दिले आहेत). ती काही अंशी चुकीची किंवा अपूर्ण असूच शकते. तुम्हाला त्यात काही त्रुटी आढळून आल्या तर त्या जरूर नोंदवा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वाचलं.
थोडं जास्त विस्तारानं लिहिलं असतं तर चाललं असतं. (हे मी दिलेल्या लिंक्स न पाहता लिहितोय. इंटरनेटवरच्या लिखाणात शब्दांच्या जोडीला दृक्श्राव्य सादरीकरणाचाही आधार घेता येतो, हे सोयीचं आहे, पण सगळेच तिथे जातीलच असं नाही). हे एखाद्या लेखाचा १/३ सारांश केल्यासारखं , त्यातलं सार सांगणारं, तरीही सगळे मुद्दे लक्षात घेणारं वाटलं. पहिल्यांदा वाचणार्‍याला सगळं थोडं जड वाटेल का?

<आधीच्या लेखात उल्लेख केल्याप्रमाणे 'मी कोण' हे समजून घेण्याची घालमेल आणि आधार देण्याऐवजी दूर लोटणारी कौटुंबिक आणि सामाजिक परीस्थिती यांमुळे लैंगिक अल्पसंख्यांकांत मानसिक विकार, एड्ससारख्या शारीरिक आधीव्याधींचा प्रादुर्भाव, नोकरीव्यवसायांत भेदभाव, छळ (हरॅसमेन्ट), गरीबी अशा अनेक समस्या सामान्यांपेक्षा अधिक प्रमाणात आणि अधिक गंभीर असतात. >
हे अधिक विस्ताराने लिहिता येईल. कारण याच गोष्टींशी समाजातल्या बहुसंख्य लोकांचा संबंध, आला तर , येऊ शकतो. कदाचित पुढे सकारात्मक पाऊल म्हणून त्यावर लिहिणार असाल.

आणि असे संबंध भावनिक प्रेम आणि विश्वासावरच आधारित असतात असाही उल्लेख आहे.>> हा गोड गैर समज आहे. समलिंगी संबंधात देखिल किंवा किंबहुना जास्तच पॉवर प्ले व शोषण दिसते. समलिंगी पुरुष वेश्यांचे प्रश्न फार भयानक आहेत. त्यांना रिहॅब किंवा मदतही जितकी हेट्रो वेश्यांना मिळते त्या प्रमाणात मिळत नाही सहानु भूति तर नाहीच नाही. हेटरो लोकांचे संबंध ही प्रेम व नात्यातील गोडवा वगैरे उडून गेल्यावर शोष णात्मकच उरतात. मग एकत्र राहुन सहजीवन एंजॉय करणे वगैरे धुवट कल्पनांवर समाधान मानून जगावे लागते.

थायलंड व आजू बाजूच्या देशांत फिरल्यास लेडिबॉय कल्चर प्रामुख्याने दिसते. ह्यांना पैसे कमव ण्याचे व जगण्याचे फार कमी मार्ग उपलब्ध आहेत. व वय तारुण्य गेले की काय करत असतील असा प्रश्न पडतो. अमेरिकेने युद्धात वापरलेल्या रसायनांचे हे परिणाम आहेत. लिहिण्यास कारण कि मानसिक कल शारिरिक घडण ह्या बरोबरच आता बाहेरचे वातावरण हे ही लैंगिक जडण घडणीस कारणि भूत होत आहे.

>>आणि असे संबंध भावनिक प्रेम आणि विश्वासावरच आधारित असतात असाही उल्लेख आहे.>> हा गोड गैर समज आहे. >>
अमा,
थोडा गोंधळ होतोय का? वरचे वाक्य आहे ते कामसूत्राच्या संदर्भात आहे. ज्या काळात कामजीवन हे लपून छपून, काहीतरी लाजीरवाणे असे काही नव्हते. पुढे गैरसमज ५ या मुद्द्यात आत्ताच्या परीस्थितीचा आढावा घेतलाय त्यात >> इच्छा असूनही निरामय नाती निर्माण होणं अशावेळी कठीण होऊन बसतं.>> असे म्हटलयं ना.

स्वाती,
हा भागही आवडला मात्र अजून विस्तारीत हवा होता असे वाटले.

इच्छा असूनही निरामय नाती निर्माण होणं अशावेळी कठीण होऊन बसतं.>> असे म्हटलयं ना.>> हो हे दोन्ही बाजूनी कसलेही कंपल्शन नसेल तर ठीक आहे. पण जिथे शोषण होते तिथे नाही. कंफर्ट झोन मधली अशी नाती आणि त्या बाहेरची नाती ह्यात हा फरक आहे. कामसूत्र हे आता पण रेलिवंट आहे असावं .

भरत, तुमचं म्हणणं पटलं. टेड टॉक्सबद्दल आणि तुम्ही उल्लेख केलेल्या मुद्द्यांबाबत अधिक विस्ताराने लिहायचा प्रयत्न करते.
खरंतर त्या मुद्द्यांच्या अनुषंगाने काही मुलाखती घ्यायचा विचार आहे आणि त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

अमा, बरोबर आहे, आणि लेखातही सामाजिक परीस्थितीच्या रेट्यामुळे अशा व्यक्ती स्वतःच शोषणकर्त्या होण्याचा धोका संभवतो याबद्दल उल्लेख केला आहेच. स्वाती२ यांनी म्हटल्याप्रमाणे सध्याची विषम आणि विषारी व्यवस्था सुधारली तर त्यांनाही नॉर्मल सहजीवनाचा आनंद घेता येईल.
त्यादृष्टीने वाटचाल सुरू झालेली आहे, पण बराच मोठा पल्ला गाठायचा आहे.

स्वाती
हा भाग सुद्धा आवडला, पण भरत म्हणतात तसं अजून विस्ताराने आले असते तर जास्त आवडले असते.

शेवटचे पराग्राफ निरवा-निरावी चे वाटतायत, पुढचा भाग येईल अशी अपेक्षा आहे.

>>अर्थात मोठा विषय आहे हा << +१
विषयाचा आवाका मोठा असल्याने तीन लेखांच्या मालिकेत त्याची व्याप्ती बसवणं अशक्य आहे. मालिकेद्वारे सर्वसामान्यांना या सो कॉल्ड टबू समजल्या जाणार्‍या विषयाची ओळख करुन दिली गेली हे जास्त महत्वाचं आहे...

हाही भाग चांगला जमला आहे. पुढील भागाकरता शुभेच्छा Happy
विषय मोठा आहेच वर मै म्हणलीय तसा; अजून वाचायला नक्की आवडेल.
बाकी प्रदेशांत (परदेशात - प्रगत, प्रगतीशील इ) याबद्दल काय कसं आहे, अ‍ॅक्सेप्ट्न्स आहे पण इथवर ते कसे पोहोचले, काय जनरीत आहे इ वर सुद्धा वाचायला आवडेल.

तिन्ही लेख काही ना काही नविन शिकवून गेले. >>> +१

या गैरसमजांबद्दल आधीच्या लेखांत कसे काही नाही याचे आश्चर्य वाटले होते. आता तिसरा लेख बघून लक्षात आले.

सर्व प्रतिसाददात्यांचे अनेक आभार.

दोन्ही टेड टॉक्सचा गोषवारा समाविष्ट केला आहे, तसंच काही मुद्दे आणखी थोड्या विस्ताराने लिहिले आहेत.
आधीच्या पोस्टमध्ये म्हटल्यानुसार काही मुलाखतींची जमवाजमव करत आहे, त्या मिळाल्या तर / मिळतील तसतशा प्रकाशित करेन.

तुमच्या माहितीत कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांपैकी असतील आणि निनावी मुलाखत द्यायला तयार असतील तर मला कळवा, मी प्रश्नावली पाठवेन.

तुमच्या माहितीत कोणी लैंगिक अल्पसंख्यांकांपैकी असतील आणि निनावी मुलाखत द्यायला तयार असतील तर मला कळवा, मी प्रश्नावली पाठवेन.
Submitted by स्वाती_आंबोळे on 27 January, 2019 - 12:32

यामुळेच हे काहीतरी अनियमित, अनैसर्गिक असल्याचा फील येत राहतो. जर हे खरोखरच इतकं नैसर्गिक, नॉर्मल आहे तर या लोकांनी आपली ओळख लपवू नये.

बिपिनचंद्र, कोणाच्याही खाजगी आणि possibly traumatic अनुभवांची जाहीर चर्चा करताना पाळायचा प्राथमिक शिष्टाचार आहे तो. त्याचा मुलाखतदात्याच्या लैंगिक जडणघडणीशी किंवा कलाशी संबंध नाही.

बाकी प्रदेशांत (परदेशात - प्रगत, प्रगतीशील इ) याबद्दल काय कसं आहे, अ‍ॅक्सेप्ट्न्स आहे पण इथवर ते कसे पोहोचले, काय जनरीत आहे इ वर सुद्धा वाचायला आवडेल.>>>>
पुर्वी कधीही डायरेक्ट संबध आला नव्हता.
पण आता गेले एक वर्षापासून दोघ जण टीम मध्ये आहेत. (लग्न झालेल आहे. दोघांचे आपाआपले पाअर्टनर आहेत) फक्त सुरुवातीच्या एका १:१ ला ऑड(हा शब्द चुकीचा होईल. भोचक उत्सुकता जास्त योग्य होइल. ) वाटलेल जेव्हा ते फॅमिली विषयी सांगत होते. (टीम बर्‍यापैकी एकमेकांशी क्लोज आहे. घरगुती चर्चा भरपुर होतात. टिपिकल फक्त प्रोफेशनल रीलेशनशिप असेल तर एवढाही संबध येत नसावा.)
एक ६० चा आहे. नवर्‍याच्या तक्रारी आपल्या कडच्या ६० च्या बाया करतात, अगदी तशा करत असतो. पुर्वीच्या लग्नापासून मुल आहेत. १५ वर्षाच्या संसारानंतर He came out of Closet and then married this guy.
दुसरा आहे तो ३०चा आहे. नविन रोमान्स आहे. स्पाउस इकडे घेवून गेला, हे गिफ्ट घेतल वगैरे अगदी नविन प्रेमात पडल्यावर्/लग्न नविन असताना सांगतात तसा सांगतो. मुलं अ‍ॅडॉप्ट करायचा विचार आहे.
सुरुवातीचा मेंटल ब्लॉक गेल्यावर सगळ्या तडजोडी, इशुज वगैरे आपल्या संसारासारखेच आहेत हे लक्षात आलय. प्रोफेशनली तर सेम आपल्यासारखीच स्वप्न, आकांक्षा वगैरे.
अ‍ॅक्सेप्टनस ची गरज नसावी किंवा they are so comfortable that they don't care about acceptance असं वाटल.

योकु, अमेरिकेत, विशेषत: सनातनी कॅथलिक विचारसरणी प्रामुख्याने असलेल्या भागांत लोक वस्तुस्थिती सहजपणे स्वीकारत नाहीत. गेल्याच आठवड्यात प्रेसिडेन्ट ट्रम्प यांचा ट्रान्सजेन्डर लोकांना लष्करात नोकर्‍या न देण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने उचलून धरला.
जून २०१५ पासून अमेरिकेच्या सर्व राज्यांत समलिंगी विवाहांना कायद्याने मान्यता मिळालेली आहे. सामाजिक अ‍ॅक्सेप्टन्सइतकाच या बाबतीत कायदाही महत्त्वाचा आहे,कारण त्यात आजारी जोडीदाराच्या संदर्भात वैद्यकीय उपचारांसंबंधी अनुमती, मालमत्तेची व्यवस्था, मुलं दत्तक घेण्याची परवानगी, इत्यादी बर्‍याच बाबी येतात.

हा भाग आणि प्रतिसाद अजून वाचायचे आहेत पण हे तिन्ही लेख आणि सिम्बाचा तो लेखदेखील 'ललित'एवजी 'लैंगिकता' ग्रुपमधे असावेत असे वाटते

https://www.maayboli.com/node/65536

मुलं दत्तक घेण्याची परवानगी, इत्यादी बर्‍याच बाबी येतात.
Submitted by स्वाती_आंबोळे on 29 January, 2019 - 02:08

भारतात विवाहित जोडप्यांना (अर्थातच हेटरो - म्हणजेच एक महिला व एक पुरुष अशी जोडी) व एकल मातांना (महिला पालक) मूल दत्तक घेता येते. एकल पुरुष पालकांना मूल दत्तक घेण्यास कायद्याने परवानगी नाही. कदाचित सुरक्षिततेच्या दृष्टीने असू शकेल की पुरुषाकडून मुलाची लैंगिक पिळवणूक होईल वगैरे...

अशा परिस्थितीत दोन गे पुरुषांच्या जोडीला मूल दत्तक घ्यायला परवानगी मिळणे अशक्यच दिसते. त्यामुळे ज्यांना मुलांची आवड आहे त्यांचे संगोपन करण्यात रस आहे अशा पुरुषांना तरी हेट्रोसेक्शुअल विवाह करावे लागतील असे वाटते.

छान लेखमाला.
परवाच रेडिओवर फ्रेंच भाषा नॉन सिंग्युलर फ्रेंडली करण्यासाठी कॅनडात चळवळ चालू होत्येय वाचलं. फ्रांस मधल्या फ्रेंच भाषेच्या वॉचडॉग इस्टिट्युटचा ( The Académie Française) अर्थातच विरोध आहे. फ्रेंच भाषेत नाम, विशेषण लिंगाप्रमाणे बदलते. मराठीतही आत्ता विचार केला तर ते कधीकधी बदलतंय असं आत्ताच जाणवलं. पण नेहेमी अर्थात बदलत नाहीये.
आपली भाषा आपल्याला सामावून घेऊ शकत नाहीये म्हणून कंफर्टेबल बोलण्यासाठी जेव्हा सदर व्यक्तीचे ग्राहक फ्रेंच टाळून इंग्रजीचा आधार घेऊ लागले तेव्हा त्याला ह्या प्रश्ना धसास लावावासा वाटला.
शो चं ट्रान्सस्क्रिप्ट इथे पेस्ट करतोय.
लिंकः https://www.cbc.ca/radio/asithappens/as-it-happens-wednesday-edition-1.4...

GENDER-NEUTRAL FRENCH
Guest: Alexander Reid

KG: To non-French speakers, it might seem like an odd quirk. But putting a gender on nouns and adjectives is part of the DNA of the French language. A house is not "le maison" but "la maison." A "feminine" noun. And I am an "animatrice" -- not an "animateur." That integral linguistic gendered-ness is making life difficult for French-speaking non-binary people. In English, there's at least a "they-them" pronoun. In French, it's not so simple. Alexander Reid has been raising the issue. He's a transgender man, and vice-president of a trans support organization in Windsor, Ontario. That's where we reached him.

CO: Mr. Reid, when did you start to notice that your French speaking clients were uncomfortable speaking in their own native language?

ALEXANDER REID: I would say a few months ago, when I began peer mentoring at WE Trans Support. I noticed that with my French clients especially that they were feeling uncomfortable in their native language when seeking medical or government services. Despite being a bilingual country, I find that in Windsor or in Canada in general that people who speak French, due to the gendered nature of the language, really can't accommodate those of us who are transgender and not binary.

CO: Being in a bilingual country, you should be able to get services — government services — in the language of your choice. So what happens when your clients seek those services in French?

AR: Everyone who seeks services in French will be addressed either using masculine or feminine pronouns, masculine or feminine adjectives, etc. because the entire language is based upon two separate genders. So for a trans person — whether non-binary or not — if the person that they're speaking to registers them as one gender then that's what they will be referred to as. So not just for non-binary people, who would prefer to be not gendered at all. But, for example, if you are a trans woman who is seemingly more masculine-presenting, if someone registers you as a man rather than a woman in a public space, if they are speaking in French, they may refer to you using masculine pronouns are masculine adjectives, right? So it comes further into difficulty when the person doesn't want to be gendered at all. So in English, we have the they/them pronouns, right? That non-binary people can use to kind of genderless themselves. And that works very well in English because most of our words are not gendered anyways. But in French, for example, if you are using he or him in French, and you are speaking to someone who prefers to use they/them pronouns, they don't really have that option. Words such as il est patient, like if you want to say he is patient or she is patient, it changes the word to a feminine version.

CO: Right. But in English as you point out that this has been dealt with using the gender-neutral pronouns like they and them, but also finding other ways of using pronouns. Is there there no blend of il and elle that could work?

AR: So yes, there is one pronoun in specific that I've heard a few times in conversation, which iel, and that is a gender-neutral pronoun that could be used in French. However, due to the gendered nature of the language and really the culture that's founded in the French language, most French speaking people have either never heard of this, or are uncomfortable using it, or simply don't know how. Really the whole language would have to be un-gendered in order for it to work perfectly. And there really is no gender-neutral way to express adjectives in particular.

CO: Canada is not the only country that uses French. So what have you learned from other French speaking countries like France, for instance? How a trans people dealing with it? What's the discussion there?

AR: I have a few friends in France that I've met during my time there, and honestly, they expressed the same concern. So when it comes to gendered language, they find that even in France — where the main language is French — people don't know how to use the non-binary pronouns, or they're reluctant to do so because of their attachment to the culture.

CO: To suppor what you're saying, the French language watchdog in France — The Académie Française — says has called these efforts to make French gender-neutral… they're saying it's an aberration, and it puts the French language in mortal danger.

AR: Absolutely. So when people who are you know at the very top of the administration of the French language, who are saying you know this is not appropriate for our language, this defies our culture, it becomes really difficult to try and convince the general population to change their views as well.

CO: Why does it matter? I mean maybe just explain so people understand what effect this has not being able to have gender-neutral language when you're trans. What effect does it have on people?

AR: From my professional perspective, what comes into play here is the respect that you receive being acknowledged. It's called the gender euphoria. So kind of the opposite of gender dysphoria would mean gender euphoria is when someone calls you or refers to you using gendered language or non-gendered language that makes you feel at home in your body, that makes you feel comfortable with yourself. So for me, when I was younger and I was being referred to as she and her, I felt a sense of gender dysphoria. Where I was really uncomfortable, I didn't feel right with that language, and now that I am presenting a masculine and people refer to me as he and him and MR, it gives me a sense of gender euphoria. Really, it's human nature for us to feel validated or invalidated by other people's perception of us. So if it comes to someone who prefers to be gender-neutral, and they don't want to be referred to as a man or a woman because that's how their gender identity is reflected within themselves, being validated like that by using them pronouns in English really allows them to have that space where they can be themselves and they can feel gender euphoria. And I think really everyone deserves that opportunity.

CO: Very interesting. Mr. Reid, I appreciate you explaining all this to us. Thank you.

AR: No problem.

CO: Bye-bye.

KG: Alexander Reid is vice-president of the WE Trans Support in Windsor, Ontario. That's where we reached him.

[Music: Indie rock]

समलैंगिक व्यक्तींचा इतर समलैंगिक व्यक्तिंकडून होणारी पिळवणूक हा पण एक पदर आहे. तसेच समलैंगिक व्यक्तिचा उल्लेख झाला की भारतात साधारण तरुण व्यक्ति लोकांना डोळ्यासमोर येतात. ४५/५०च्या आसपासच्या व्यक्तिंचे हाल अजून जास्त होतात.
हे सर्व किती जेनेरिक आहे माहिती नाही. मला जवळच्या नातेवाइकामुळे जितके माहिती आहे त्यावरून लिहितो आहे. समाजात हे उघडपणे वावरू शकत नसल्याने एकुणात कुचंबणा फार होत असते. जोडीदार उघडपणे राहत नसल्याने जोडीदाराची स्थैर्यता बहुतेक भिन्नलिंगी जोड्यांच्या तुलनेत कमी असते. माझ्या नातेवाईकाला दुसर्‍या एका समलैंगिक व्यक्तीने काम दिले व तो ते करत राहिला. महाराष्ट्रातल्या सर्वात वरच्या इंजिनिअरींग कॉलेजातून इंजिनीअर झालेला हा मनुष्य कमी पगारावर काम करत राहिला कारण प्रोप्र्याटर बरोबर असलेले संबंध. लैंगिकच संबंध होते असे नाही, पण एकुणात माहिती होती एकमेकांची. कधी कधी बोलताना प्रोप्रायटरने गैरवापर करून घेतला असे म्हणतो.
५०च्या आसपास आल्यावर एकटेपणा फार जाणवतो. समवयीन इतर नातेवाइक आपापल्या संसारात गुरफटलेले असतात. नवीन मित्र मिळण्याची शक्यता फार कमी झालेली असते. दुर्दैवाने फक्त सोबतीसाठी म्हणून भिन्नलिंगी विवाह तरी करावा असे वाटू लागले. ते अजून जास्त दु:खी होते.

Pages