व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग ९(हेलॉंग बे भाग २) शेवट

Submitted by समई on 25 January, 2019 - 03:13

दुसऱ्या दिवशी ब्रेकफास्टनन्तर आम्हाला एक बेटावर नेण्यात आले.घनदाट जंगल होते.त्याच्या आत वर एक गुफा होती.त्याच्या आत वरतून पाणी पाझरून लाईमस्टोनचे वेगवेगळे आकार बनले होते.ते पाहून गुहेच्या दुसऱ्या बाजूने बाहेर पडलो.
गुहा घनदाट झाडीत आहे
IMG-20190123-WA0027.jpg
गुहेत जाण्याचा रस्ता
IMG-20190123-WA0018.jpg
आतमध्ये limestones ने बनलेले वेगवेगळे आकार
IMG-20190123-WA0021.jpgIMG-20190123-WA0020.jpgIMG-20190123-WA0019.jpg
गुहा दाखवणारी गाईड आणि दीर
IMG-20190123-WA0028.jpg
नन्तर क्रुज वर परतलो.आमचे सामान आधीच बाहेर आणले होते.क्रुज स्टाफचा निरोप घेऊन आम्ही परत हेलॉंगला आलो.अश्या तऱ्हेने क्रुजची सफर अविस्मरणीय झाली.
आज आमचा हनोई येथील शेवटचा दिवस होता.
तिसऱ्या दिवशी गाईडने हो ची मिन्ह ह्या त्यांच्या राष्ट्राध्यक्षांचे museum दाखवले.आमचा हा गाईड प्रशिक्षित नसावा.कारण त्याला नीट माहिती देत येत नव्हती.इंग्लिश ही बरोबर येत नव्हते.
त्याने नन्तर जगातले एकमेव temple of literature दाखवले.
हे देऊळ हनोई येथे १०७० मध्ये एक चिनी राजाने बांधले.ही व्हिएतनामची पहिली युनिव्हर्सिटी आहे.इथे लोकांना प्रशासनिक शिक्षण दिले जाई.जे पुढे राजाला राजकारभारात मदत करत असत.इथून जे लोक पास झाले त्यांची नावे एक विशिष्ट आकाराच्या दगडांवर कोरली आहेत.ही युनिव्हर्सिटी १९१९पर्यंत
कार्यरत होती,पण जेव्हा फ्रेंच लोकांनी व्हिएतनाम वर आक्रमण केले,तेंव्हा त्यांनी ही शिक्षण व्यवस्था बंद केली.आजही व्हिएतनामी लोकांवर confucian, taoism आणि buddhism चा प्रभाव आहे.ह्या देवळाच्या आसपास खूप सुंदर बगीचे आहेत
देवळाचे प्रवेशद्वार
IMG-20190124-WA0005.jpg
त्यावेळचा तिथला राजा
IMG-20190123-WA0075.jpg
त्यावेळी प्रशासनिक परीक्षेत पास झालेल्या लोकांची नावे दगडावर कोरलेली आहेत
IMG-20190124-WA0002.jpg
त्यांनतर तो आम्हाला एका बऱ्या भारतीय रेस्टॉरंट मध्ये जेवायला घेऊन गेला.जेवणानन्तर हनोई येथील मध्यवर्ती लेक वर नेले.लेक खूप मोठे आहे.खूप लोक तिथे दुपारनन्तर येतात.तिथे छान वेळ गेला.तिथे मी व्हिएतनाम मधले पहिले आईस्क्रीम खाल्ले.सगळ्यात शेवटी water puppet शो पहायला गेलो.तिथे आम्हाला पहिल्यांदा एक भारतीय लोकांचा ग्रुप भेटला.
हनोई लेकIMG-20190123-WA0076.jpg
वॉटर puppet स्टेज
IMG-20190123-WA0077.jpg
पपेट शो मध्ये ड्रॅगन
IMG-20190123-WA0078.jpg
अश्या तऱ्हेने आमची व्हिएतनाम यात्रेची सांगता झाली.आम्हाला सगळीकडे चांगले अनुभव आले.फक्त भाषेचा प्रॉब्लेम आला.पण लोक खूप चांगले आदरातिथ्य करणारे आहेत. इतकी परकीय आक्रमण ह्या देशावर झाली आहेत,पण आपल्या राष्ट्रभाषेशिवाय ते दुसरी भाषा बोलत नाहीत.मी इथे एखादाच बोर्ड इंग्लिश भाषेत पाहिला.एक चांगला अनुभव घेऊन आम्ही व्हिएतनामचा निरोप घेतला.इथे मी लेखनाला विराम देत आहे.कंबोडिया बद्दल परत कधीतरी.

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

खुप छान!!
कम्बोडीया बद्दलचा लेख लव्कर येउ द्या

ताई किती मस्त वर्णन व फोटो. सर्वात फोटो मला तुम्हा दोघांचा आव्ड ला कॄझ वरचा. स्टे ब्लेस्ड. एकदम फ्यामिली फील आहे सर्व लेखनात.
तो लेक किती छान वाट्तोय. युनिवर्सिटी पण सुरेख. किती इवॉल्व्ड कल्चर. अमेरिकेने कुप्पा केला युद्ध करून. पण हे त्यातून बाहेर आले हे सुदैव. कंबोडियाचा लेख लवकर लिहा.

ताई किती मस्त वर्णन व फोटो. सर्वात फोटो मला तुम्हा दोघांचा आव्ड ला कॄझ वरचा. स्टे ब्लेस्ड. एकदम फ्यामिली फील आहे सर्व लेखनात.
तो लेक किती छान वाट्तोय. युनिवर्सिटी पण सुरेख. किती इवॉल्व्ड कल्चर. अमेरिकेने कुप्पा केला युद्ध करून. पण हे त्यातून बाहेर आले हे सुदैव. कंबोडियाचा लेख लवकर लिहा.

छान माहिती.
१० वर्षापुर्वी ह्याच मार्गाने प्रवास केला होता. क्रुझ वर एक दिवस राहिलो होतो. तुमचा लेख वाचुन सगळ्या आठवणी ताज्या झाला.
हो ची मिन्ह म्युझियम मध्ये त्याचे घर सामान याबरोबर बॉडी ही लोकाच्या दर्शनासाठी ठेवली आहे.
हो ची मिन्ह च्या म्रुत्यु ला ५० वर्ष झाली आहेत.
हनोई लेक जवळ एका मंदिरात भारताच्या पहिल्या राष्ट्रपतीने भेट दिलेले झाड आहे (कसले ते आठवत नाही) पण त्या छोट्या रोपट्याचा मोठा डेरेदार वृक्ष झाला आहे.

भारतासारखी गरिबी असली तरी लोक शिस्तप्रिय वाटले. शहरात पण ट्रॅफिकचे नियम पाळणारे, कुठेही कचरा न टाकणारे. सरकारने दिलेल्या जागेव्यतिरिक्त बाकीच्या फुटपाथ वर कुठेही फेरीवाले दिसले नाहीत.

साहिलजी, माझेपण ह्या देशांबद्दल हेच मत झाले आहे.गरीब देश असले तरी राष्ट्रभीमानी आहेत.