घरातील ई-कचर्‍याचे काय करावे?

Submitted by हर्ट on 17 August, 2015 - 01:47

आजकाल घरोघरी मोबाईल असतात. ते जुने होऊन नवीन घेतले जातात. कधी ते बंद पडतात तर नवीन घ्यावेच लागतात. कधी नवीन मॉडेल्स येतात. हीच गत नवीन नवीन येणार्‍या प्रत्येक ईलेक्ट्रोनिक्स वस्तूंची आहे. पुर्वी ब्लॅक व्हाईट टीवी असायचा मग रंगीत टीव्ही आलेत आणि आता LED TV आलेत. घरात पुर्वी रेडीयो होते, ते जाऊन टेपरेकॉर्डर आलेत. मग MP3 प्लेअर आलेत, मोठमोठ्या सिस्ट्म दणाणून आवाज करायला लागल्यात. मग ईअर फोन आलेत. पीसी जाऊन लॅपटॉप आलेत. जुने रोल असलेले कॅमेरे जाऊन डिजिटल आलेत. आयपॅड आलेत. घरात अजून एका कचर्‍याची भर पडली आणि ती म्हणजे ई-कचर्‍याची!!!!

हल्लीच्या पिढीच्या मुलांमधे तर अगदी एक दोन वर्षापासून ह्या सर्वांची त्यांना सवय आणि आवड आणि नाद त्यांना असतो. घरात जुन्या ई वस्तू जाऊन नवीन येतात. अशावेळी घरातील ई-कचर्‍याचे काय करावे हा एक मोठा प्रश्न आहे. तुम्ही अशा वस्तूंची विल्हेवाट म्हणा किंवा टाकावूतून टिकावू म्हणा कसे काय करता ते इथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ewasteindia website is infected with a virus.
Exploit Blackchat SEO.

काही कल्पना नाही सर,

मी जवळपास अड़ीच वर्षे माझी रिप्लेस केलेली लॅपटॉप बॅटरी जपून ठेवली होती बबल व्रैप मधे पण काही कळत नव्हते कचराकुंडीत फेकायला मन मानत नव्हते शेवटी एक दिवस भंगारवाल्यास देऊन टाकली

spying on my girlfriends phone stealth mobile tracker site whatsapp spy blog cell phone track a phone app installing spyware on a phone here spyware for iphone 5 without jailbreaking 2015 android spy game android site spyware for monitoring cell link monitoring a cell phone how to use mspy app in android press whatsapp spy software for iphone cell phone monitoring software att site mobile phone tracker new zealand what is spymobilebiz cell phone spy news video spy mobile number spy dialer for ipad here iphone cheating spouse songs press spye spy on phone app that is untracable

आम्ही ई-कचरा साध्या कचर्‍यात टाकतो जुन्या सिडी बिडी खराब झालेले चार्जर फोन सगळे नंतर ते कचरे वाले वेगळे करत असतिलतर माहित नाही.एकदा असा कचरा वेगळा बाजुला बांधुन ठेवला होता कचरे वालिने ती बॅग पण इतर कचर्‍यातच टाकली.

साडेतीन वर्षांपूर्वीचा धागा आहे. पण तरी वरती काढतेय. उगाच नवा धागा कशाला काढायचा म्हणून. सध्या घरात बंद पडलेले दोन लॅपटॉप, जुने कॅमेरे, कॅमकॉर्डर वगैरे बराच ई-कचरा साठलाय. कोणी अश्या गोष्टींची नीट विल्हेवाट लावली आहे का? अशी काही सोय मुंबईत असल्यास कळवाल का?

अशी काही सोय मुंबईत असल्यास कळवाल का?
Submitted by स्वप्ना_राज on 26 January, 2019 - 17:37

विलेपार्ले पूर्व येथे बृहन्मुंबई महानगरपालिकेचे ई-कचरा संकलन केंद्र आहे. location खाली दिलेले आहे, पण ते कदाचित थोडेसे मागे-पुढे असू शकते.
https://goo.gl/maps/MmYrNcZYMVp

विशेष सूचना: ही सरकारी सुविधा असल्याने त्याची वेळ आपल्या सोयीची नसून त्यांच्या सोयीच्या वेळेत जावे लागते!!! त्यामुळे आधी जाऊन, ठिकाण पाहून मग सर्व सामान घेऊन जाणे योग्य!

जर आपण हे दिलेले location वापरून नेमकेपणाने त्या ठिकाणी पोहोचलात तर येथे कळविणे, जेणेकरून इतरांनाही फायदा होईल व मीही ते location Google Map मध्ये add करेन.

<<< जर आपण हे दिलेले location वापरून नेमकेपणाने त्या ठिकाणी पोहोचलात तर येथे कळविणे, जेणेकरून इतरांनाही फायदा होईल व मीही ते location Google Map मध्ये add करेन. >>>
@विक्षिप्त_मुलगा
तुमच्या या मदतीबद्दल आणि तळमळीबद्दल मनापासून धन्यवाद. _/\_

विक्षिप्त_मुलगा, अनेकानेक धन्यवाद! तिथे आपल्या डोळ्यांसमोर लॅपटॉप क्रश वगैरे करतात का नुस्ताच कलेक्ट करतात आपल्याकडून? काही माहिती असल्यास कळवाल काय? मी इथे जाऊन आले तर नक्की अपडेट करेन इथे.

तिथे आपल्या डोळ्यांसमोर लॅपटॉप क्रश वगैरे करतात का नुस्ताच कलेक्ट करतात आपल्याकडून? >>>>

बहुदा नुसताच कलेक्ट करतात. छोटेसेच केंद्र आहे ते. मी कधीही तिथे ई-कचरा घेऊन गेलो नाही. त्याभागात आमचे एक परिचित राहत असल्याने अधून-मधून जाणे होते, त्यामुळे ते ठिकाण माहित आहे.

cnbc awaaz techguru या चानेलवर हिंदीत कार्यक्रम असतो शनिवारी सकाळी 06:57 - 07:27 त्यावर एका कंपनीचे ( बहुतेक मालाडमध्ये आहे) हे इ कचरावरचे विडिओ दाखवले होते. सर्व व्हाइट इले वस्तू. कशा वेगळ्या करतात प्लास्टिक, तांबे, इतर धातू, कनेक्टरस, ट्रानस्फरमर्स, इत्यादि. युट्युबवर टेकगुरुचा चानेल आहे TG शोधावं लागेल.

https://youtube.com/user/TECHGURUAWAAZ

https://youtube.com/watch?v=Qx2sr1D6Z5c

माझ्याकड चा जास्ती चा आय फोन व मॅक विकला मी. आता जास्त कचरा उरला नाही घरात. अजून एक लॅपतोप आहे पण तो अन लॉक करायला कीबोर्ड हवा आहे. एम अक्षर गंडले आहे ते घ्यायला वेळ नाही.

माझ्याकडेही दोन डीव्हीडी प्लेअर आहेत काय करू ? लॅपटाॅप बाईच्या मुलाला द्यायचा आहे. तसं महत्वाच त्यात काही नाही पण हार्ड डिस्क रिकामी कशी करू फार बाळबोध प्रश्न विचारतेय.

रिसेट टू फॅक्टरी डिफॉल्ट करा आणि मग द्या. https://www.laptopmag.com/articles/reset-windows-10-pc इथे सूचना दिसत आहेत. वेगळी वर्जन असेल तर रिसेट टू डिफॉल्ट सर्च करा की सापडेल.