मुंबई पुणे मुंबई ३

Submitted by सनव on 24 January, 2019 - 23:36

मुंबई पुणे मुंबई हा माझा अत्यन्त आवडता चित्रपट आहे. फ्रेश, विनोदी, एव्हरग्रीन असा मूव्ही आणि त्यात स्वप्नील मुक्ताची केमिस्ट्री! याचा दुसरा भाग आला होता तोही छानच होता.

पहिल्या भागात फक्त गौतम आणि गौरी होते, दुसऱ्या भागात त्यांचे कुटुंबीय, मित्रमैत्रिणी, गौरीचा प्रियकर अर्णव हे भेटले.

मराठी मुव्हीची फ्रॅंचायजी होणे आणि त्याच कथेचा पुढचा टप्पा तिसऱ्या भागात येणे हे फारच अभिनंदनीय यश म्हणावे लागेल.
नुकताच मुंबई पुणे मुंबई भाग 3 बघितला. सर्वप्रथम, चित्रपट चांगलाच आहे. विशेषतः सध्या जितके वाईट चित्रपट बनतात त्या मानाने हा एकदा नक्कीच बघू शकतो.

पण..पहिल्या दोन भागांचं यश पाठीशी असताना दिग्दर्शकाने एकही रिस्क न घेता सेफ चित्रपट बनवला आहे. त्यामुळे तो अतिशय साचेबद्ध चित्रपट बनला आहे.

लग्नाला 3 वर्ष झाली आहेत आणि गौतम गौरी आता आईबाबा होणार आहेत. गरोदरपणात गौरीचा स्वभाव कसा बदलतो, गौतमला जबाबदारीच्या जाणिवेने बदलावं लागतं का याची उत्तरं पडद्यावर मिळतात.

एकूणात सगळं छान छान दाखवायचं हेच उद्दिष्ट असल्यामुळे पडद्यावर संघर्ष किंवा चाकोरीबाहेरील काहीच घडत नाही. अर्थात असे हलकेफुलके चित्रपटही मला आवडतात पण मग त्यात विनोदाचा तडका तरी भरपूर हवा. इथे काही सीन्स खूप विनोदी आहेत पण तसे अजून जास्त सीन असते तर मजा आली असती. ना धड कॉमेडी, ना काही ट्विस्ट ना धड रोमँटिक.

आपल्याला मूल हवंय की नकोय, हवं असेल तर का हवंय, आजच्या जगात मूल वाढवताना असे कोणते वेगळे प्रॉब्लेम आपल्याला येऊ शकतील जे आपल्या पालकांना आपल्याला वाढवताना आले नाहीत असा काही बेसिक विचार हे जोडपं करताना दाखवलेलं नाही.
उलट किमान एक तरी मूल असायला(च) हवं, आयडियली किमान दोन तरी मुलं हवीत, त्यातही शक्यतो एक मुलगा एक मुलगी अशी हवीत, त्याविरुद्ध करियर ,आर्थिक goals, भावनिक तयारी नसणं वगैरे फालतू कारणं मुलासुनेने देऊ नयेत, अबॉर्शनसारखं दुसरं पाप नाही असे रिग्रेसिव्ह जुनाट विचार मात्र हॅमर केले गेले आहेत. एका जोडप्याने चान्स कधी घ्यावा, किती चान्स घ्यावे ही गोष्ट सर्व कुटुंबाने एकत्र बसून चर्चा करण्याची आहे असंही दिग्दर्शकाने दाखवलं आहे. अरे ते काय तुम्ही केबल टीव्हीचं पॅकेज सिलेक्ट करताय का- प्रत्येकाने आपापलं मत द्यायला? का तुम्ही अर्णबच्या स्टुडियोत बसून आगामी बजेट कसं असावं यावर डिबेट करताय?
नुसतं पडद्यावर ऑनलाइन शॉपिंग किंवा व्हिडिओ कॉलिंग दाखवून 90s स्टाइल स्टेल फ़ॅमिली ड्रामा contemporary होत नसतो.

असो. आता स्टारकास्टबद्दल बोलू. मुक्ता बर्वे खूप सुंदर दिसली आहे आणि तिने नेहमीप्रमाणे सहजसुंदर काम केलं आहे. स्वप्नील जोशीबद्दल बोलायचं तर he has nailed it in certain scenes, he is brilliant sometimes. पण इतर वेळी तो एकतर ठार वेडसर वाटतो किंवा high (on something) वाटतो.
मुक्ताच्या धाकट्या बहिणीचा रोल करणारी मुलगी छान आहे. प्रशांत दामले व इतर सर्व सिनियर कलाकार नेहमीप्रमाणेच उत्तम काम करून जातात पण कोणालाच फारसा स्कोप नाही. रोहिणी हट्टंगडीना मोठा रोल आहे आणि त्यांनी फारच सुरेख काम केलं आहे.
पण एकूणच या सर्व ज्येष्ठाना मिट्ट गोड वागणं, या कानापासून त्या कानापर्यंत छान छान हसणं हेच मुख्य टास्क आहे. ते गोड गोड हसरं वातावरण लवकरच फार फेक आणि फोर्सड वाटायला लागतं. कुठल्याही क्षणी नेरोलॅक, धारा रिफाइंड ऑइल किंवा तत्सम जिंगल लागेल असंही वाटतं.

चित्रपट तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार आहे. प्रत्येक फ्रेम देखणी आहे. गौतम गौरी, गौतमचे पालक सर्वांच्या घराचं इंटिरियर मस्त.
गाणी आणि त्यांचं पिक्चरायझेशन हे या चित्रपटाचं एक बलस्थान आहे. सर्व गाणी छान आहेत पण ढोल ताशा पथकात असलेल्या स्वप्नील मुक्तावर चित्रित 'आली ठुमकत नार' हे सर्वात भारी जमलंय. लोकेशन, मुख्य जोडीचा अभिनय, चित्रीकरण- सर्व भट्टी जमून आली आहे आणि आदर्श शिंदेने अफाट गायलंय.

कशासाठी पहावा- तुम्ही या फ्रँचायजीचे चाहते असाल तर जरूर पहा. साध्या सरळ कौटुंबिक कथा आवडत असतील तर नक्की बघा.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सनव परिक्षणातील प्रत्येक शब्दाशी सहमत!
सायको स्वप्नील जोशीपेक्षा प्रशांत दामलेला जास्त स्क्रीन स्पेस हवा होता, असं पावलोपावली वाटत राहतं.
अरे लहानपणी तुझा नटखट कृष्ण चालून गेला, म्हणून मोठेपणीही तेच चाळे करत बसायचे का? याला नटखट नव्हे, तर यडपट म्हणतात!

छान लिहलंय.
> पण इतर वेळी तो एकतर ठार वेडसर वाटतो किंवा high (on something) वाटतो. > Biggrin Biggrin

चित्रपट तांत्रिकदृष्ट्या दर्जेदार आहे. प्रत्येक फ्रेम देखणी आहे. गौतम गौरी, गौतमचे पालक सर्वांच्या घराचं इंटिरियर मस्त.
गाणी आणि त्यांचं पिक्चरायझेशन हे या चित्रपटाचं एक बलस्थान आहे.+१११
मी पडदे, उशा, सोफा, कव्हर्स हेच बघत होते Proud

माझे मत वेगळे आहे. पहिला भाग छान होता, दुसरा ठीकठाक आणि हा तिसरा अगदी कंटाळवाणा आहे. पैसे खर्च करून बघण्यालायक नक्कीच नाही.

पहिल्या भागातच तो कुठे लग्नाचा मुलगा न वाटता नुसतीच शारीरिक वाढ झालेला पण वयाने लहान असा स्पेशल चाईल्ड वाटतो
त्याचे हसणे देखील तसेच वाटते
त्यामुळे जेव्हा ती त्याला लग्नाला हो म्हणते तेव्हा प्रचंड धक्का बसला
दुसरा पार्ट न बघण्यापलीकडे होता आणि तिसरा तर अर्थात त्याच्या पुढची स्टेप

पहिला खुप आवडलेला. दुसरा कसाबसा पाहिला. तिसरा बघणारच नाहीये Lol

पहिल्यातली गोष्ट अगदी आपल्या काळातली आहे असे वाटलेले. पण आता हे परत ८० च्या दशकात घेऊन जायला लागले तर कसे होणार ?

आशुचँप>>+१

पहिल्या भागात ती त्याला बघायला/भेटायला/नकार द्यायला जाते ना.... पण शेवटीत हो म्हणते. चित्रपट आता नीट आठवत नाही.
दुसर्या भागात लग्न ठरते पण लग्न करायचे कि नाही याबद्दल गोंधळ होतो अन् शेवटी लग्न होते. ... चित्रपट जराजरा आठवतो.
तिसर्या भागात बाळ येणारे पण ते आता येऊ दे कि नको यावर गोंधळ..... मधेमधे एक बाळ बोलत असते.... पहिल्या १५-२० मि. नंतर चित्रपटाचा कंटाळा आला. बंद केला.
स्वजो काही काम करत असतो का? कि फक्त खाणे - लहान मुलांना त्रास देणे आणि माकडचाळे?

हा(3) पण आला आहे प्राईम वर Happy। >>>> आभारी आहे, फार उत्साह नाही बघण्याचा पण सहज विचारलं.

मी पडदे, उशा, सोफा, कव्हर्स हेच बघत होते Proud। >>>> Lol हे मी पण बऱ्याचदा करते. बोअर कार्यक्रम असला की फॅशन्स, इंटेरिअर हेच जास्त बघत बसते.

नवीन Submitted by आशुचँप on 25 January, 2019 - 19:24 >>>> पुर्ण पोस्टशी सहमत आहे.

मी पण पाहिला प्राईम वर. चित्रपट चांगला आहे, फक्त स्वजो वगळून. बाकी सगळ्यांची कामं चांगली झाली आहेत. जरी हा सिक्वेल असला तरी स्वजो च्या ऐवजी दुसरा कुणीही चालला असता.

बोर झाला मला हा... घर, ईंटिरिअर, सग्ळं मस्त आहे. सिनिअर कलाकारांमधे फक्त प्रशांत दामले आवडला. स्वजोची जी कोण आई दाखवलीये तिचा विग अत्तिशय गंडलाय. स्वजोचं ते ह..ह..ह.. करत हसणं प्रचंड डोक्यात गेलं/जातं. मुक्ता पण ओके. मला फक्त ती रुद्रम मधेच आवडली.

प्राईमवर दिसला म्हणुन थोडा बघीतला. आता ही मूल कधी हवं कधी नको करत रहाणार, हा 'आपलं ठरलंय पण तू म्हणशील तसं' करत रहाणार आणि घरचे इमोशनल ब्लॅकमेल करत राहणार असा स्पॉइलर दिग्दर्शकाने सुरवातीलाच स्पष्ट केल्यावर पुढे बघण्याची हिंमत झाली नाही.

अंजली >>+111
मलाही.. एरवी अभिनयात चांगली असली तरी बर्‍याच वेळा अतिधीट /(आगाऊ जास्त वाईट शब्द आहे म्हणून ) वाटते

सर्वाना धन्यवाद!

@आदू - पहिल्या भागात त्याचं नाव कळत नाही.

@अज्ञातवासी - प्रशांत दामलेना मोठा रोल देऊनही जर स्टोरीच फुसकी असेल तर ते तरी काय करणार? संवाद तर अगदीच कृत्रिम आणि बाळबोध लिहिले आहेत.

@उपाशी बोका - हो एका महिन्यात चित्रपट प्राईमवर आला त्यामुळे वेगळे पैसे मोजावे लागले नाहीत.

@धनि - अगदी अगदी! पहिला भाग खरंच फ्रेश आणि क्युट आहे. आणि तिसऱ्या भागात ऐंशीचं दशक किंवा ज्या कोणत्या दशकात सौभाग्याचं वाण, आमचे लाडके ममीपपा, सासरची तुळस टाईप मराठी मुव्हीज यायच्या तसा फील आहे.

@अरुण - तसा स्वप्नील जोशी ऍक्टर चांगला आहे. मंगलाष्टक वन्स मोअर मध्ये त्याचा पूर्ण सिरीयस रोल आहे जो त्याने छान केलाय. पण इथे कथा डिरेक्टर संवादलेखक यांनी माती खाल्लि आहे. रोल नीट लिहिलाच नाहीये. त्यामुळे तो पार झबा मोडमध्ये गेलाय.

पहिला च भाग चांगला होता. दुसरा न तिसरा मला बोर झाले. न बघितले तरी चालले असते. घरात सगळे एकदम व्यवस्थित like ते इंटिरिअर वैगरे आणि लग्नाला ३ वर्ष झाली असताना सुध्दा मुक्ताचे घरी काही ही काम न करणे ( चहा अन् मॅगी सोडून) असे असताना ही दोघं financially stable नसणे हे विसंगत वाटते. अर्थात हे मा वै म .

घरातल्या ज्येष्ठ व्यक्तींच्या आग्रहामुळे मी हा सिनेमा थेटरात जाऊन पाहिला. तसा ठिक वाटला. Interval पर्यंत बर्‍यापैकी interesting आहे. Interval नंतर मात्र फारच कंटाळवाणा वाटला.
आई-बाप होण्याचा निर्णय घेताना किंवा घेतल्यावरही बहुतेक सर्व जोडप्यांना आपण घेतोय तो निर्णय बरोबर आहे ना? आपल्याला ही जबाबदारी झेपेल ना? अशी anxiety वाटते. आपल्या आई-बाबांनाही ती वाटली असणार. पण ती व्यक्त करण्याची मुभा त्यांना नव्हती. हल्लीच्या पिढीला ती व्यक्त करता येते. सिनेमाचा पुर्वार्ध हेच दाखवतो त्यामुळे पटला/ आवडला. त्यामुळे उत्तरार्धाकडून अपेक्षा उंचावल्या. वाटल की पालकत्वाबद्दल असेच काही वेगळे विचार हा सिनेमा मांडेल. पण तसं काहीच घडत नाही. नेहमीप्रमाणेच सगळ प्रेमळ आणि गोड-गोड घडत रहातं.

अतिशय बोअर झाला तिसरा भाग, एकतर स्वप्निल-मुक्ता मधे जे काही बोन्डीग दिसायला हव ते अजिबात दिसत नाही, बिअर पिण म्ह्णणजे कपल मॉडर्न असल्याची सकल्पना धन्यवाद आहे, गैरी प्रेन्गन्ट आहे हे कळल्यावर ती मस्त लाजते बिजते मग अचानक जोडप साशन्क होत जे अतिशय क्रुत्रिम वाटत राहत, आख्खा सिनेमाभर सगळि पात्र प्रचन्ड बालिश अभिनय करत राहतात फक्त प्रशान्त दामले आणी रोहिणि हट्टगडी सोडुन, पहिल्या भागापासुन स्वप्निल नाक गोळा करुन एका विचित्र लकबित हसत राहतो , खरतर स्वजो तितकासा वाइट अभिनेता नाही पण तिनही भागात त्याच ते वेडगळ हसण , कुत्रिम वागण बोलण चढत्या क्रमाने प्रचन्ड खटकत राहिल .
मुक्ता पहिल्या भागात स्वतत्र विचारची एक छान मॉडर्न सॉर्टेड मुलगी म्हणून आवडली होती, तिने ते छान कॅरीही केल होत, दुसर्‍या भागापासुन तितकिच कन्फ्युज का दाखवली ते कळल नाही, तिसर्यात तर ती मला प्रेग्नट करुन हा निघुन तर जाणार नाही ना असल्या काहितरी लाइन वर दाखवलिये, उत्तम स्टारकास्ट असताना सगळी पटकथा अगदी सरधोपट करुन काय साधल काय माहित , तिसरा पार्ट आला हे समाधान?

Pages