व्हिएतनाम आणि कंबोडिया प्रवास भाग ८(हेलॉंग बे भाग १) क्रमश:

Submitted by समई on 23 January, 2019 - 08:11

IMG-20190122-WA0007.jpgहनोईला गेल्यावर सगळ्या टुरिस्टची प्राथमिकता हेलॉंग बे ला असते.हे ठिकाण उत्तरपूर्व व्हिएतनामला आहे.travel xp वर हे मी आधीच पाहिले होते आणि त्यावेळेपासून इथे जाण्याची सुप्त इच्छा होती.आणि ती अशी अचानक पूर्ण झाली. तसे मला लहानपणापासून पाण्याचे भारी वेड.समुद्रकाठी तासनतास बसायला आवडते.अमेरिकेतल्या नायगरा फॉल पाहून अशीच
हरखले होते.त्यावेळी शरीराला सहस्त्र डोळे हवे होते असे वाटले.किती पाहू आणि काय काय डोळ्यात साठवू असे झाले
होते.अगदी तसेच हेलॉंग बेला गेल्यावर वाटले.
हेलॉंग बे हे युनेस्कोने world heritage site घोषित केले आहे.
हेलॉंग चा अर्थ descending ड्रॅगन असा होतो.
IMG-20181209-WA0131.jpg
आम्ही एक रात्रीची cruise घेतली होती.हनोईहून हेलॉंगला पोचायला दोन तास लागले.छोट्या मोटरबोटीने क्रुज वर नेतात तेंव्हा कल्पनाही येत नाही की पुढे निसर्गाने उधळलेला खजाना आहे.कृजचा स्टाफ स्वागताला बाहेर उभाच होता.आमची peoney क्रुज
IMG-20190123-WA0030.jpg
आम्ही जवळजवळ 80 टुरिस्ट होतो.क्रुजचे नाव Peony होते.आत गेल्याबरोबर डायनिंग रूम मध्ये कलिंगड ज्यूसने स्वागत झाले.मग आम्ही फ्रेश व्हायला आमच्या खोल्यात गेलो.खूप सुंदर रूम्स होत्या
तो पर्यंत क्रुज हळूहळू पुढे निघाली होती.मग सगळे बाहेरच्या डेकवर आलो तसे डोळे समोर असलेल्या दृश्याने विस्फारले गेले.इतके अप्रतिम सौन्दर्याने नटलेले वेगवेगळ्या आकाराचे पहाड आमच्या समोर उभे होते.क्रुज त्यातूनच हळूहळू पुढे जात होती.कुठे पाण्याची निळाई,तर कुठे पाचूसारखे हिरवेगार पाणी पाहून मन वेडावले होते.इकडचा फोटो घेऊ की तिकडचा असे वाटत होते

आमची रूम
IMG-20190123-WA0029.jpg
आम्ही दोघे
IMG-20190122-WA0013.jpgIMG-20190123-WA0024.jpgIMG-20190119-WA0037.jpgIMG-20190122-WA0006.jpgIMG-20181210-WA0030.jpgIMG-20190123-WA0025.jpg20190111_085858.jpg
डेकवर आराम20190111_085452.jpg
क्रुजवर संध्याकाळी ज्या लोकांना कायाकिंग करायचे असते,अश्या लोकांना कायाकिंग करायला नेतात.
आमच्यापैकी माझे मिस्टर पहिल्यांदाच कायाकिंग करायला गेले,त्यामुळे माझ्या मनात थोडी धास्ती होती.पण एक तासांनी ते परतले,आणि जीव भांड्यात पडला.
IMG-20190123-WA0071.jpgIMG-20181209-WA0174.jpg20190101_162149.jpg
कायाकिंग करताना त्यांना दिसलेली घळ, आणि टेकडीवर एक घर.

गाईडने आम्हाला कृजवरचा सनसेट आणि सनराईज चुकवू नका अशी आधीच सूचना दिली होती,पण आमच्या दुर्दैवाने संध्याकाळी एकदम आभाळ भरून आले,व पाऊसही पडला.त्यामुळे हवेत एकदम थंडपणा आला.मग आम्ही टाईमपास म्हणून मस्त फुटमसाज घेतला.
IMG-20181122-WA0006.jpg20190111_142924.jpgIMG-20181122-WA0003.jpg

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults