मराठी भाषा दिवस २०१९ - संयोजक हवेत

Submitted by Admin-team on 15 January, 2019 - 18:05

कविवर्य कुसुमाग्रजांचा जन्मदिवस २७ फेब्रुवारी मराठी भाषा दिवस म्हणून साजरा केला जातो . २०१५ चा अपवाद वगळता गेली ८ वर्षे आपण हा उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला. या वर्षी ही काही मायबोलीकरांनी आवर्जून तो साजरा करण्यासाठी विचारपूस केली आहे. तुम्हाला जर या उपक्रमाच्या संयोजनात भाग घ्यायचा असेल तर इथे कळवा.
उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
याआधीचे सगळे मराठी भाषा दिवस कार्यक्रम इथे बघता येतील.

मराठी भाषा दिवस हा उपक्रम मायबोलीवर साजर्‍या होणार्‍या गणेशोत्सवाचे छोटे रूप मानायला हरकत नाही. फरक इतकाच की गणेशोत्सव हा दहा दिवस साजरा केला जातो, मराठी भाषा दिवस हा २७ फेब्रुवारी आणि त्याच्या आगचेमागचे काही दिवस असा एकूण मिळून ३ किंवा ५ दिवस किंवा त्या त्या वेळेच्या संयोजकांनी ठरवल्यानुसार पार पाडला जातो. आणि हा उपक्रम करताना मुख्य भर मराठी भाषेशी संबंधित कार्यक्रम/ स्पर्धा करण्यावर असतो हे गेल्या वर्षांतले उपक्रम पाहिलेत तर लक्षात येईल. या कार्यक्रमांची आखणी आणि आयोजन संयोजकांनी करायचे असते.

१. संयोजनात भाग घेऊ इच्छिणार्‍यांची नावे बघून अ‍ॅडमिन संयोजक निवडतील आणि मायबोलीवर त्यांचा क्लोज्ड युजर ग्रूप तयार करतील. या ग्रूपमधे उपक्रमाचा कालावधी आणि स्वरूप ठरवणे आणि उपक्रमाशी संबंधित इतर चर्चा करता येते.
२. उपक्रमाचे स्वरूप यामधे मायबोलीकरांसाठी स्पर्धा, कार्यक्रम, पाहुण्यांकडून/ मायबोलीकरांकडून लेखन मागवणे इत्यादी ठरवावे. त्यासाठी परवानगीची आवश्यकता असल्यास त्या योग्य प्रकारे मिळवणे.
३. या सर्व कार्यक्रम/ स्पर्धांची जाहिरात मायबोलीवरील गप्पांच्या बाफवर करणे.
४. प्रत्यक्ष उपक्रम राबवणे.
५. उपक्रमाचा समारोप आणि निकाल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

वेळ देण्यासंबंधी:
रोज ठराविक वेळेला १-१.५ तास वेळ देऊ शकेल.. अधुन मधून जास्तच गरज पडली तर वाढवता येइल.. पण सगळे व्याप सांभाळून सध्या तरी एव्हढाच वेळ खात्रीने देऊ शकते..

मी मायबोलीवर नवीन आहे तरीही संयोजक म्हणून काम करायला आवडेल. दिवसभरात तासभर देऊ शकेन.यापूर्वी विश्वकोश निर्मिती प्रकल्प मध्ये काही काळ काम केले आहे अभ्यागत संपादक म्हणून. त्याचा काही उपयोग झाला तर बघू

उपक्रमात सहभागी होणार्‍या स्वयंसेवकांना उपक्रमाच्या कालावधीत आपले खरे नाव स्वतःच्या मायबोली प्रोफाईल मधे लिहावे लागेल.
>>> आपला पास.

उपक्रमाला शुभेच्छा !!

दिवसभरात तासभर देऊ शकेन.यापूर्वी विश्वकोश निर्मिती प्रकल्प मध्ये काही काळ काम केले आहे अभ्यागत संपादक म्हणून. त्याचा काही उपयोग झाला तर बघू>>>>
मगतर आय वोट अँड लॉबिंग फॉर प्राचीन Lol