MINTOP lotion--- hair grow and problem solution

Submitted by dodo14 on 15 January, 2019 - 01:00

हल्ली केसांसाठी मिंटोप सोलुशन खूप वापरात आहे पण त्याचा side इफेक्ट असतो हे मला वापरल्यावर कळलं आहे, बेकार खाज, चेहरा वर सूज वैगेरे, मला माहिती हवी आहे कि हे खूप कॉमन आहे कि मीच कॉमन नाहीये, आणि हे वापरायचा का व्हिटॅमिन गोळ्या खाव्यात..waiting फॉर एक्स्पर्ट कंमेंट्स

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मिन्टॉप मधे मिनॉक्सिडिल आहे का? Lol
तसे असेल तर सांभाळा. स्वतः च्या मनाने आणून तर अजिब्बातच लावू नका. तुम्हाला ठाऊक नसलेला अजून एक भलताच साईड इफेक्ट या औषधाला आहे.

Mintop चे खूप साइड इफेक्ट्स आहेत.
स्मृती वर त्याचा खूप इफेक्ट होतो असे ऐकले आहे.
बाकी केसांची समस्या खूप बिकट असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

मिन्टॉप मधे मिनॉक्सिडिल आहे का? Lol
तसे असेल तर सांभाळा. स्वतः च्या मनाने आणून तर अजिब्बातच लावू नका. तुम्हाला ठाऊक नसलेला अजून एक भलताच साईड इफेक्ट या औषधाला आहे>>>>नकाच सांगू ..आधीच मला खूप issue झाले आहेत

सर्वोत्तम उत्तर
Mintop चे खूप साइड इफेक्ट्स आहेत.
स्मृती वर त्याचा खूप इफेक्ट होतो असे ऐकले आहे.
बाकी केसांची समस्या खूप बिकट असेल तर तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.>>>डॉक्टर चा सल्ला घेतला आणि मगch चालू केलं आणि लागली ना वाट ..पण आता थोडा कमी आहे बाकी आता हेअर लॉस वर काय करायचं हा प्रश्न अजून सुटला नाहीये

सॉरी, औषधांबद्दल मी काही बोलू शकणार नाही,
पण एक अनाहूत सल्ला, हवे तर घ्या नाहीतर जाऊ द्या.

केस गळती थांबवून डोक्यावर परत दाट केस उगवणे ( ट्रान्सप्लांट/विविंग शिवाय) हे प्रचंड मोठे मिथ आहे.

केस पूर्ववत करणे आणि xxx चा आकार/शक्ती वाढवणे या थापांवर स्वतः ला डॉक्टर म्हणवणाऱ्या बऱ्याच लोकांनी आपले बँक बॅलन्स फुगवले आहेत.
त्याच्या मागे लागू नका.

हवे तर त्या पैशात समुपदेशकाशी बोला, केस नसल्याने स्व- प्रतिमेला तडा जाऊ पहात असेल तर तो वेळीच सांधून घ्या,

मजेत जगा.
(स्व हस्ते zero नम्बर मशीन मारणारा सिम्बा) Happy

सॉरी,
स्त्री id आहे हे नंतर पाहिले,
वरचा सल्ला तुमच्या साठी नाही.

मी वापरलेय Mintop 5% , त्याचे दुष्परिणाम म्हणजे चुकून कपाळावर थेंब ओघळले तर तिथे केस आले Angry नशीब वेळेत लक्षात आले, अन एकाच थ्रेडिंग ने ते काढले अन पुन्हा आले नाही.

अन आता वर वाचल्यावर जाणवितेय की ते स्मृती वाले खरे असावे. म्हणजे मध्ये मध्ये विसरल्यासारखे वाटायचे , मी तसे तेव्हा मम्माला तसे बोलली देखील होती. पण ते कपाळावर केस दिसल्यावर मी ते वापरणे बंद केले. माझ्याकडे अजूनही दीड बॉटल आहे. कुणाला हवेय तर सांगा Wink

हो
बऱ्यापैकी
अजून इफेक्ट आला असता कदाचित, पण माझी हिम्मत नाही झाली

VB - हिम्मत का नाही झाली..? असं काय कारण घडलंय की तुम्ही अजुनही उरलेली दीड बॉटल वापरली नाही..??

कपाळावर ओघळले तर तिकडे केस आले म्हणजे फक्त टक्कलासाठी नाही तर दाढ़ी वाढवायलासुद्धा हे उपयोगी पडू शकेल का गालावर चोळून !
हल्ली कॉलेज मुलांमध्ये वाढलेली दाढ़ी ठेवण्याची भारी क्रेज दिसते तर त्यासाठी काही असे लोशन / केमिकल असते का ?

हल्ली कॉलेज मुलांमध्ये वाढलेली दाढ़ी ठेवण्याची भारी क्रेज दिसते तर त्यासाठी काही असे लोशन / केमिकल असते का ? >> Beardo

देवा...म्हणजे वापरायचे नाही हे सिद्ध्य होतंय ठीक आहे. बरं,कोणी कांद्याचा रस लावून पहिला आहे का..म्हणजे तू नळी वर इतके वेळा हे सांगितलं आहे कि बस अस वाटतंय कि लाव कांदा आणि मैलभर लांब केस..suggestion please

मी लावलाय कांदा केसांना, म्हणजे मुळांना.
एकदा लावुन देखिल खुप फरक जाणविला. केस छान काळे वाटत होते (माझे केस थोडेसे तपकिरी आहेत). पण कांद्याचा उग्र वास सहन न झाल्यामुळे परत नाही लावला.

कांदा सगळ्यांना सुट नाही होत. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव चांगला आहे तर दुसरीचा वाईट.

एवढं सगळं करण्यापेक्षा रात्री (व्हाट्सऐप फेबूला आराम देवून) नीट पूर्ण झोप घेतली आणि सकस आहार घेतला तर अधिक लवकर गुण येईल. चांगले सुदृढ़ केस हे सौन्दर्याचे लक्षण आहेच पण निरोगी आयुष्याचेही आहे.

आमच्या ओळखीत एक BAMS डॉक्टर आहेत आणि त्यांच्या काही गोळ्या आणि तेल ह्यासोबत योग्य आहार आणि पूर्ण झोप हयाने अगदी ४०प्लस वयातसुद्धा माझ्या नातलगाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला without any side effect

<<एवढं सगळं करण्यापेक्षा रात्री (व्हाट्सऐप फेबूला आराम देवून) नीट पूर्ण झोप घेतली आणि सकस आहार घेतला तर अधिक लवकर गुण येईल. चांगले सुदृढ़ केस हे सौन्दर्याचे लक्षण आहेच पण निरोगी आयुष्याचेही आहे>>
+100

मी लावलाय कांदा केसांना, म्हणजे मुळांना.
एकदा लावुन देखिल खुप फरक जाणविला. केस छान काळे वाटत होते (माझे केस थोडेसे तपकिरी आहेत). पण कांद्याचा उग्र वास सहन न झाल्यामुळे परत नाही लावला.कांदा सगळ्यांना सुट नाही होत. माझ्या एका मैत्रिणीचा अनुभव चांगला आहे तर दुसरीचा वाईट.>>>>>>accha धन्स ग. लावून पाहते मग.

वढं सगळं करण्यापेक्षा रात्री (व्हाट्सऐप फेबूला आराम देवून) नीट पूर्ण झोप घेतली आणि सकस आहार घेतला तर अधिक लवकर गुण येईल. चांगले सुदृढ़ केस हे सौन्दर्याचे लक्षण आहेच पण निरोगी आयुष्याचेही आहे.

आमच्या ओळखीत एक BAMS डॉक्टर आहेत आणि त्यांच्या काही गोळ्या आणि तेल ह्यासोबत योग्य आहार आणि पूर्ण झोप हयाने अगदी ४०प्लस वयातसुद्धा माझ्या नातलगाला पॉझिटिव्ह रिझल्ट मिळाला without any side effect>>>>>सगळं बरोबर आहे पण झोपेचं असं आहे कि सकाळी लवकर उठाव लागतं आणि रात्री लवकर लागत नाही, आहार पण ठीक ठाक आहे, BMS म्हणजे होमिओपॅथी ना...हम्म बघू काय ते

सगळयांना thank you अजून प्रतिसादाची वाट बघते आहे नवीन काही माहिती Mintop विषयी मिळाली तर, side effects alternate therapy वर अजून कोणाला अनुभव असेल तर share करा.

Mintop 2% असे search केल्यावर डॉक्टर reddy's लबोरतोरीज ला ओन्ली फॉर् males. असे लिहिलेले आढळले
म्हणजे हे फक्त पुरुषांनी वापरावयाचे आहे .

Mintop 2% Lotion is an antihypertensive and is also used to promote hair growth. It is used only in males to prevent hair loss. It should be used for 3 to 4 months to see the hair growth.