मदत हविये - जॉब स्विच कसा करावा? परदेशात नोकरी कशी शोधावी?

Submitted by अज्ञातवासी on 6 January, 2019 - 12:37

नमस्कार!
सध्या मी एका नामांकित NGO मध्ये थर्ड पार्टी रोल वर कामाला आहे. ही NGO औद्योगिक धोरणे ठरविण्यापासून तर विविध औद्योगिक कार्यक्रम आयोजित करण्यासाठी काम करते. संस्थेचा आवाका फार मोठा असून, उद्योगाच्या प्रत्येक क्षेत्रात काम आहे.
मला संस्थेत २ वर्षे होत आली, पण अजूनही रोलवर येण्याची चिन्हे नाहीत, आणि काही होप्स नाहीत. पूर्वी संस्थेने होप्स दाखवल्याने मोठमोठ्या पगाराच्या ऑफर धुडकवल्या. आता संस्थेत MBA Marketing व HR असूनही तुटपुंज्या पगारावर काम करावे लागते.
माझ्या हातात सध्या पाच जिल्ह्याचा कारभार आहे. जॉबमधील रोल खालीलप्रमाणे.
Roles and Responsibilities
 Regular intraction with MNC's and MSME's for marketing and other activities.
 Identifying & Developing New Membership
 Sales of Services
 Policy advocacy and analysis.
 Sponsorships for programs
 Admin Management
 Project and program management.
 Maintenance of client database, through ERP
 Liasoning with government bodies and media representatives.
 Vendor Management.
 Collaboration with various department and local associations for marketing.
 Regular coordination of various Exhibitions in and out of Maharashtra.

तर माझा प्रश्न असा आहे, की या प्रोफाईलवर मला विदेशात नोकरीची संधी मिळू शकते का? मी विदेशात जॉब कसा शोधावा? फक्त पैसा हे कारण नाहीये, मला भारतात राहावं असंच वाटत नाहीये. मला अथपासून इतिपर्यंत मार्गदर्शन हवंय. करियर पाथ चुकल्यासारखा वाटल्याने आणि आयुष्यातले सगळे निर्णय चुकीचे ठरल्याने प्रचंड नैराश्य आलंय, आणि आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटतोय.
सॉरी, मी कधीच हे कुणासमोर नाही बोललो. मला कमीपणा वाटतो. पण आज नाही राहवलं.
आगाऊ धन्यवाद!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

कॅनडा PR apply करा भारतातून. तो छान मार्ग आहे.गूगल करा सगळ्या स्टेप्स मिळतील.
अमेरिकेत यायचे असेल तर एम्प्लॉयेर शोधावा लागेल, खूप किचकट प्रोसेस आहे.

तुम्हाला नक्की काय हवे आहे ते आधी ठरवा. फक्त पैसा हे कारण नसेलही पण मग मोठ-मोठ्या पगाराच्या नोकर्‍या ऑफर धुडकवल्या असे का वाटावे.

MBA marketing + HR झाले आहात, सोबत किमान दोन वर्षांचा अनुभव ह्या जमेच्या बाजू आहेत. काळ कधी खुप कठीण असतो, पण थोडे थांतपणे विचार केल्यावर तुमचा मर्ग मार्ग तुम्ही स्वत: निवडाल.

<< तर माझा प्रश्न असा आहे, की या प्रोफाईलवर मला विदेशात नोकरीची संधी मिळू शकते का? >>
------ प्रयत्न करा, नोकरीची संधी जरूर मिळतील... विदेशात नोकरी नक्की कशासाठी हवी आहे याचे उत्तर स्वत:ला द्या आणि मार्ग जरुर निघेल. भारतात नोकरीत असलेला काही त्रास तुम्ही टाळत असाल तर विदेशात त्रासाचे प्रकार वेगळे आहेत. जगात कुठेही असलात तरी मानवाचे जगणे हिच एक लढाई आहे. विदेशात सर्व काही आल-बेल आहे असे नाही, तिथे वेगळ्या प्रकारचे आव्हाने असतात.

<< मी विदेशात जॉब कसा शोधावा? >>
-------- अनेक वेब साईटस आहेत. मॉन्स्टर...,
कॅनडा, ऑस्ट्रेलिया, न्युझीलँड मधे प्रत्येक सरकारची आणि प्रांताची स्वतंत्र वेबसाईट आहेत. पण भारतात राहुन (भारतीय नागरिकत्व असे गृहित धरतो आहे) नोकरी शोधणे सोपे नाही. दिवसंदिवस परिस्थिती (HR criteria, expectations) बदलत असते. तुलनेने खासगी कंपनीत शिरकाव करणे सोपे राहिल.

<<करियर पाथ चुकल्यासारखा वाटल्याने आणि आयुष्यातले सगळे निर्णय चुकीचे ठरल्याने प्रचंड नैराश्य आलंय, आणि आत्मविश्वास डळमळीत झाल्यासारखा वाटतोय. >>
-------- अशा "परिस्थितीत" कशाचाच विचार न करता मी गाणी एकतो, आवडीचे चित्रपट बघतो, वाचन कुठेतरी इतरत्र स्वत: ला गुंतवतो (सोपे नसेल... ). मग आहे त्या परिस्थिती मधुन मार्ग कसा काढायचा यावर विचार करतो.... शांत राहुन विचार केल्यावर मार्ग मिळतात.

मित्र परिवार, नातेवाईक, विश्वासू व्यक्ती यांच्या सोबत वेळ घालवा.... नैराश्य फार काळ रहात नाही, रहायला नको. तुम्हाला आहे त्या कठीण परिस्थिती मधुन बाहेर पडण्यासाठी शुभेच्छा.

धन्यवाद @उदय. सध्याच्या जॉब मध्ये काहीही त्रास नाहीये. सर्वकाही आहे, पण पैसा हा फॅक्टर नसला तरी, व्यवस्थित जगता येईल, असा मिळत नाहीये, आणि पुढे मिळण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे आता हा मार्ग शोधावा लागतोय. आणि भारतात न राहण्याची पैसा सोडून इतर कारणे आहेतच, वैयक्तिक सुद्धा! उदय तुम्ही कॅनडात जॉब कसा शोधला, हे ऐकायला नक्की आवडेल!
@ व्यत्यय धन्यवाद! बरीच माहिती मिळाली...

अज्ञातवासात जाण्याची घाई करू नका,
भारतातील सामाजिक परिस्थिती आत्ता कियीही निराशाजनक वाटली, तरी कदाचित 2019 नंतर थोडी सुधारू शकेल,

परदेशातच जायचा आग्रह का?
मोठ्या पगाराच्या ऑफर्स आधी आल्या होत्या, तर आताही येईल.
Personal environment पासून दूर जायचं असेल तर ते इथेही जाता येईल.
कशापासून तरी पळून जायचं म्हणून नका जाऊ. काय हवं आहे त्यासाठी जा.

@सिम्बा - भारताच्या सामाजिक परिस्थितीचा माझ्या प्रश्नाशी काडीचाही संबंध नाही आणि राजकारण, मोदी, राहुल गांधी यांच्याशी बिलकुल नाही.
@भरत - खूप संधी शोधल्या, पण मिळाल्या नाहीत. भारतात तुमच्या करंट CTC वर जॉब दिला जातो. माणूस काय काम करतोय, कोणत्या लेव्हलवर करतोय हे कुणीही लक्षात घेत नाही.
भरत मन नाही रमत आता इथे.

<< उदय तुम्ही कॅनडात जॉब कसा शोधला, हे ऐकायला नक्की आवडेल! >>
------- खुप काळ लोटला आहे. मी 'टिपटॉप' (आता linked वर पण नोकरी शोधत ची जाहिरात करणे शक्य आहे) वर जाहिरात ठेवली होती. यश आले. २००३ मधे मी न्युझीलंड मधे होतो, कॅनेडियन युनि. ची ऑफर होती पण जॉब अमेरिकेत होता. २००५ मधे कॅनडात आलो/ आणले. २०११ पर्यंत तो जॉब होता. प्रत्येक वर्षी employer/ univ. जाहिरात करायचे, जॉब तुझ्यासाठीच आहे असे सांगता येत नाही, पण आर्हतेमधे वाढता अनुभव मागायचे, असो. २०११ पर्यंत कॅनडात अशा जॉबसाठी एकच व्यक्ती होती. मी तो काळही एन्जॉय केला. नंतर तो जॉब सोडला. नोकरी मिळवण्यासाठी त्रास झाला, पण मला माझ्या निर्णयाबद्दल आनंद आहे.

प्रत्येक वर्षी 'गरजेनुसार' परिस्थिती बदलेली असते. आजची अवशक्ता उद्या असेलच असे नाही. काही वर्षांपुर्वी (बहुधा २००५-०६ असावे) मधे कॅनडामधे नर्सेसची कमतरता होती.... ५००+ नर्सेस फिलीपिन्स मधुन आणले, मग त्या कॅटेगिरीसाठी इमिग्रेशनमधे शिथिलता आणतात. आज तुलनेने तेवढी गरज नाही आहे.

https://www.canada.ca/en/services/immigration-citizenship.html
कॅनडात येण्याबाबत विविध मार्गांची येथे माहिती मिळेल. जसा वेळ मिळेल तसे वाचत रहा.

कॅनडाच्या प्रत्येक प्रांताची गरज वेगळी असते. कुठले skills, experience हवे आहेत त्या नुसार immigration चे धोरणे बदलतात. जोडीला निर्वासित (refugee) या श्रेणी साठी पण काही एक कोटा ठेवतात.

एका जॉब मध्ये कंटाळा आला की जॉब बदलावा, आणि नव्या ठिकाणी मूव्ह होणं शक्य असेल तर अवश्य करावं.
तुमच्या फील्ड मध्ये काय असतं माहीत नाही, मी काम शोधायला LinkedIn वर शोधलं असतं, LinkedIn वर रिक्रुटरना संपर्क केला असता, जॉब पोर्टल (इंडिड, monster इ.) वर शोध केला असता, जिकडे जॉब करायला आवडेल तिकडे काम करणाऱ्या कोणाला संपर्क केला असता, कोणी ओळखीचे नसेल तर linkedin वर फ्रेंड रिक्वेस्ट टाकून ओळख तयार केली असती. त्या फील्डचा काही ग्रुप असेल तर तो जॉईन केला असता.
रिमोटली काम शोधणं ते ही भारतातून कदाचित तितकं सोपं नसेल पण प्रयत्न करत रहा. आणि कम्फर्ट झोन च्या बाहेर शोधायची इच्छा झाली आहे तर जोरदार प्रयत्न करा. पहिलीच संधी लय भारी असणार नाही याची खात्री बाळगा. पण ती स्टेपिंग स्टोन म्हणून वापरून थोडे दिवसांनी जॉब बदला. तेव्हा तुमचे कॉन्टॅक्त वाढले असतील, त्या देशातला अनुभव असेल, तुम्हाला तिकडे आवडतंय का ते ही तुम्हाला थोडं जास्त समजलेलं असेल. नाहीच आवडलं तर तो देश फिरून परत या आणि भारतात परत शोधा. बाहेरून आलेल्या व्यक्तीला कॅनडा मध्ये जॉब केल्याचा अनुभव नसेल तर का कोण जाणे कॅनडा काँझर्व्हेटिव्ह आहे. पण दुसऱ्या जॉबला ते त्रास होणार नाही.
उडी मारलीत की काही ना काही रस्ता मिळत जातो.
शुभेच्छा Happy

अज्ञात्वासी, तुमच्या जॉब प्रोफाईल वरून सुचवाव्स वाटल. वेगळा पाथ आहे थोडा. IT नाही.
सप्लाय चेन मॅनेजमेंट Phd /MBA/MS (मला माहित आहे मास्टर्स केलेल आहे पण परदेशातील/अमेरिकेतील डिग्रीससाठी)
ते करताना Six Sigma मध्ये पुर्वीचा एक्स्पेरिअन्स वापरून सर्टीफिकेशन करून चांगल्या संधी मिळु शकतील.
सिक्स सिग्मा विषयी गुगल केल्यावर बरीच माहिती मिळेल. सप्लाय चेन मॅनेजमेंट मधली डिग्री University of Texas at Dallas हा एक ऑप्शन आहे. आणि अजुन हजारो आहेत. मला माहित आहे तो सांगितला. हेल्थ केअर मॅनेजमेंट , डेटा अ‍ॅनालिटिक्स मध्येही बर्‍याच संधी आहेत.
माझ्याकडे डिग्री आहे ,आता जॉबच डायरेक्ट पाहिजे असा अ‍ॅटीट्युड ठेवू नका. कारण मग इकडे यायची संधी निघून जाईल जॉब मिळविता मिळविता. शिक्षणासाठी पैसे साठवा आणि जरूर उडी मारा. आपण म्हातारे झाल्यावर थोडीच संधी मिळनार आहे? Happy

अजुन काही फार वेळ झाला नाहीये. दोन च वर्ष झाली आहेत ना ? भारतात रहायच नाहीये तर त्यात इतरांना एक्स्प्लेन करायची खरतरं गरज नाही. आहे त्यापेक्षा अधिक प्रगती करायची आहे, या एका निकषावर बाहेर पडून प्रय्त्न करा. नक्की यश मिळेल.

मला ह्या विषयात काही माहिती नाही, सो उत्तर देऊ शकत नाही..
पण शुभेच्छा देऊ शकते Happy

तुम्हाला भरभरून शुभेच्छा !
आशा आहे की तुम्ही नकीच ह्या परिस्थितीतून बाहेर पडाल Happy
उमेद ठेवा, keep Smiling Happy

मला ह्या विषयात काही माहिती नाही, सो उत्तर देऊ शकत नाही..
पण शुभेच्छा देऊ शकते Happy

तुम्हाला भरभरून शुभेच्छा !
आशा आहे की तुम्ही नकीच ह्या परिस्थितीतून बाहेर पडाल Happy
उमेद ठेवा, keep Smiling Happy>>>>>>>>>>>>>>> +१

नाउमेद होऊ नका.

Nowadays working in India is better than abroad. US getting visa is tough. Middle east sistution is volatile. Crude prices are low now. Singapore Malaysia not much jobs. I suggest to get a job in MNC in India and after 2/3 years try outside. MNC experience will help you to find better job. Supply chain option suggested above is also good.
Decision is yours.

भारतात राहायचं नाही म्हणून परदेशात जायचं याला आता तसा अर्थ नाही, कारण सगळीकडे भारतीय(च) असतात!
'जहां भी जाऊ ये लगता है तेरी महफिल है'!

धन्यवाद सीमा. पण आता जॉबच शोधवासा वाटतोय. साईड बाय साईड आता मी mba इंटरनॅशनल बिजनेस मॅनेजमेंट करतोय. कधीकधी लोक ओव्हर क्वालिफाईड म्हणूनही संधी नाकारतात!
किल्ली, सस्मित खूप धन्यवाद. जिथे जवळच्या लोकांच्या तोंडून एक शब्द येत नाही, तिथे तुमच्या शब्दांचा खूप आधार वाटतो.
मंदार, सनव, बघुयात जाऊन तरी!!

व्यवस्थित शोधाल नोकरी.शुभेच्छा.
मला वर लिहिलेल्या पैकी थोडे शिक्षण आणि नोकरी हा पर्याय चांगला वाटला.युरोप देशांचाही विचार करा.
(बाकी फार मार्गदर्शन करण्या इतके ज्ञान नाही.)

तुमचे शिक्षण आणि कामाचे स्वरूप पहाता तुम्हाला भारतातच मार्केटींग वा कार्पोरेट कम्युनिकेशन्स या विभागात आणि खाजगी मल्टीनॅशनल कंपनीत नोकरी मिळू शकेल असे वाटते. गाव बदलून बघा.
काहीही कारण असले तरी स्वतःच्या माणसात एकट वाटते असे असताना एकदम परदेशात जाणे जमेल का हा प्रश्न स्वतःला एकदा विचारा. जमेलही, पण तो एक फार मोठा बदल असेल हे नक्की.
शुभेच्छा.

मला हा धागा आत्ताच दिसला. मी सुद्धा थोड्याफार प्रमाणात ह्या स्थितीतून जात आहे. सोफ्टवेअर मध्ये डेवलपमेंटचा अनुभव आहे अनेक वर्षांचा. पण सध्या जोब जो आहे तो नसल्यासारखाच आहे व सध्या जॉब शोधतोय. वरील सर्व प्रतिक्रया वाचल्या. विशेषतः कॅनडा मध्ये जाऊन नोकरी शोधण्याबाबत जे पर्याय दिलेत त्याबद्दल क्युरीयस आहे. यासंदर्भात वर दिलेल्या लिंक्स मी पाहीनच पण काही मुलभूत प्रश्न आहेत त्यांची उत्तरे कोणाकडे असतील तर शेअर केल्यास आभारी राहीन:

१. कॅनडा मध्ये भारतातून स्वत: व्हिसा अप्प्लाय करून जाणे व तिथे जॉब शोधणे हे कितपत व्यवहार्य आहे? कि इथून आधी जोब शोधून मग जावे?
२. यासाठी खर्च कितपत येईल?
३. सोफ्टवेअर मध्ये डेवलपमेंटचा अनुभव असलेल्या साठी कॅनडा मध्ये जोब मिळणे सध्या किती सोपे/अवघड आहे?

धन्यवाद