कमिटमेंट

Submitted by mrunal walimbe on 26 December, 2018 - 05:08

कल्पना Congratulations...
कल्पना Congratulations...
जो भेटतं होता तो प्रत्येक जण कल्पनाला असचं congratulate करतं होता नाही म्हणलं तरी ती थोडीशी बावचळली होती तरी अक्षय बरोबर असल्याने ती थोडीशी धीटपणे वावरतं होती.इतक्यांत अक्षय तिच्या कानाशी कुजबुजला काय madam केली की नाही commitment पुरी... अन् तिने विस्मयाने त्याच्याकडे बघितले...
खरं तर आज कल्पनाच्या आयुष्यातला परमोच्च क्षण होता. तिचे सासू सासरे अन् तिचा तिरस्कार करणारे तिचे बाबाही या सोहळ्याला उपस्थित होते.आज कल्पनाला सर्वोच्च मानला जाणारा साहित्य कला अकादमी चा उत्कृष्ट लेखिका हा पुरस्कार मिळणारं होता. तसं बघितलं तर या कल्पनाच्या यशातं तिचा नवरा अक्षयचा खूप मोठा वाटा होता.कल्पनालाही ते मान्यचं होते.पण तिच्यापेक्षा जास्त अक्षय excited होता कारण आज त्याला त्याच्या हक्काच्या कल्पनावर खराखुरा हक्क सांगता येणार होता.
इतक्यात आयोजक आले त्यांनीही इतरांसारखे चं कल्पनाला congratulate केले अन् पहिल्याचं रांगेत बसण्याची विनंती केली . थोड्यावेळाने अतिथींचे आगमान झाले अन् सारा हॉल टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. कल्पनाच्या तर अंगावर शहारे चं आले ज्या माणसाची पुस्तके वाचतच आपण मोठे झालो आज त्याच्याचं हस्ते आपण बक्षिसं स्वीकारणारं किती अनमोल क्षणं आहेत हे अगदी आपल्या मनातल्या कुपीतं बंद करावेतं असे.अन् दुसरं तिच्या आनंदाचं कारण होतं ते म्हणजे तिचे बाबा आज तिचं हे यश पहायला आले होते. तसं तर अक्षयने त्यांना खूप request केल्यावरचं ते आले पण राहिले उपस्थित हे काय कमी होते तिच्या सारख्या कमनशिबी मुलीसाठी...
कार्यक्रमाला सुरवात झाली मान्यवरांची भाषणे चालू होती. ती मात्र शरीराने तिथे अन् मनाने भूतकाळात हरवली होती तिच्या डोळ्यासमोरून भूतकाळातील एक एक प्रसंग आत्ताचं घडतं असल्यासारखे जात होते...
कल्पना हे तिचं तसं लग्नानंतर चं अक्षयने ठेवलेलं नावं. तिचं पहिलं नावं "नकोशी" तिच्या बाबांनी ठेवलेलं . तिला लहानपणापासून आई नव्हतीच. तिने कधीच तिच्या आईला पाहिले नाही. तिला जन्म देऊन तिची आई देवाघरी गेली असं तिला कळायला लागलं तेव्हा आजीकडून कळलं इतकचं .पण तिच्या घरात कुठेच तिच्या आईचा फोटो नव्हता. एकदा तिने हिंमत करून आजीला विचारले तशी आजीचं म्हणाली तुझ्या विक्षिप्त बाबाला फोटो लावला की तुझ्या आईची आठवण येते म्हणे.असचं परत एकदा तिने आजीला विचारले बाबा माझा इतका राग राग का करतात गं पण त्या दिवशी नेमकं तिने विचारायला अन् बाबांनी ते ऐकायला एक गाठ पडली. अन् जे घरात महाभारत घडलं त्यापुढे तिने बाबांशी बोलणेचं बंद केले ती खूप घाबरायचीचं त्यांना तशी तर ती तेव्हा जेमतेम पाचं वर्षांची होती पण बाबांचा तो आवाज अन् तिला म्हणणं 'कार्टे, तूचं खाल्लसं तुझ्या आईला' हे ती कधीच विसरु शकतं नव्हती.
हळूहळू ती मोठी होतं होती. तशी बुद्धिने तल्लख असल्याने ती सगळ्या इयत्ता तं पहिली यायची पण लहानपणापासून वडील नीट वागतं नसल्याने अन् आजीशी किती काय बोलणारं म्हणून तिला डायरी लिहायची सवय लागली अन् हळूहळू त्या डायरी लिहण्याचं रुपांतर कविता तं अन् कथांत होऊ लागलं पण घरात कोणाला वाचून दाखवणारं बिचारी ती मग ती शाळेतल्या बाईंना मैत्रिणींनाचं वाचून दाखवे. जशी ती आठवीतं गेली शाळेच्या मुख्याध्यापिका बाईंनीचं तिला शाळेच्या नियतकालिकाचं संपादक केलं अन् मुखपृष्ठावर तुझीचं कविता छापायची सांगितलं ती खूप आनंदली तिने घरी जाऊन आजीसं सांगितले आजीने देवासमोर साखरं ठेवली अन् म्हणाली गुणाची माझी बाय ती खूप मोठी हो. नतंर ती दहावी झाली छान मार्कस् मिळाले होते पण तिच्या बाबांना तिला पुढे शिकवायचे नव्हते तरी तिने जिद्दीने scholarship वर काँलेजातं अँडमिशन घेतली जेमतेमं बारावी झाली अन् बाबांनी सांगितले शिक्षण आता बासं मी एक स्थळ बघितलं आहे मुलगा चांगला आहे लग्न लावून टाकणारं तुझं. बसं झालं आता तुझं तोंड बघणं. बाबांना ती विरोधच करु शकत नव्हती.
तिचं लग्न झालं अक्षय बरोबर. पण तिने मनाशी खूणगाठ बांधली होती हे नवीन नाते विश्वासाच्या जोरावर पुढे न्यायचे. तिने पहिल्याचं रात्री अक्षयला सांगितले माझे बाबा माझा खूप तिरस्कार करतात त्यामुळे मला पुरूष जातीची भिती अन् घृणा वाटते मला please समजून घ्या मला पुढे शिकू द्या.अक्षयने तिचे सारे ऐकून घेतले अन् म्हणाला तू पुढे शीक माझी आडकाठी नाही. पणं एकचं सांगतो सगळे पुरुष सारखे नसतातं मी हे सिध्द करुन दाखवीनं अन् तुला आपलीशी करीन 'कमिटमेंट' आहे माझी. ती अवाक् झाली होती. पण अक्षय त्याच्या शब्दाला जागला होता. तिचं लेखनाचं potential लक्षात घेऊन तिला वेळोवेळी प्रोत्साहन देत होता गेले वर्षभर..
"कल्पना राजाध्यक्ष " तिच्या नावाची announcement झाली अन् ती एकदम कुणीतरी हलवावे तशी वर्तमानात आली . जागेवरून उठून स्टेजवर गेली पुरस्कार घेण्यासाठी. पुरस्कार घेतल्यानंतर तिला दोन शब्द बोलण्याची विनंती केली गेली तेव्हा ती म्हणाली ह्या पुरस्कारचा खरा मानकरी माझा नवरा अक्षय आहे की ज्याने मला यासाठी खूपं प्रोत्साहन दिले. अन् हा पुरस्कार मात्र मी माझ्या बाबांना अर्पण करते की ज्यांनी माझा कायम तिरस्कार केला म्हणून चं माझ्या लेखणीला धार आली. हे तिचे वाक्य पुरे होते न होते तोचं अक्षय तिच्या बाबांना घेऊन स्टेजवर आला होता. अन् गेल्या पंचवीस वर्षातं जे घडले नव्हते ते या स्टेजवर सगळ्या जाणकार साहित्यप्रेमींच्या साक्षीने घडत होते. कल्पना ला तिच्या बाबांच्या कुशीतं आज इतक्या वर्षांनी जागा मिळाली होती.
कल्पनाला अश्रू अनावर झाले होते. कार्यक्रम संपला होता.पण सगळा हॉल मात्र दिङमूढ झाला होता.
अक्षय कल्पना हॉल मधून बाहेर पडले. गाडीत बसले.गाडी चालू झाली अजूनही कल्पनाला आपण स्वप्नात आहोत का हे चं सत्य समजत नव्हते. घरी पोचल्यावर ती पहिली fresh होण्यासाठी बेडरूम कडे धावली अन् दार उघडताच स्तिमित झाली.. अक्षय तिच्या पाठोपाठ होताचं तिने त्याकडे बघितलं तसं तो म्हणाला आज आपलं राहिलेलं पहिल्या रात्रीचं celebration.... तशी ती चक्क लाजली...
साऱ्या खोलीत केवड्याचा सुगंध पसरला होताअन् मारव्याचे स्वर कानी पडत होते....अक्षयने तिच्या आवडीचा अबोलीचा गजरा तिच्या डोक्यात माळला तशी ती अधिकचं मोहरली अन् अत्यानंदाने परत तिचे अश्रू ओघळू लागले. तिला काहीही कळायच्या आत ती अक्षयाच्या मिठीतं विसावली....

मृणाल वाळिंबे

Group content visibility: 
Use group defaults

छान

छान

छान.