बंड्याची कमाई

Submitted by ASHOK BHEKE on 8 December, 2018 - 08:57

New Picture (41).png

परवा माझ्या परिचित बंडोपंत यांचा नवी नोकरीचा पहिला पगार हातात आल्याबरोबर जींव आकाशाएवढा झाला, सगळीकडे वसंत ऋतूच सुरु असल्याच्या थाटात त्याच्या मित्रमंडळीना हॉटेलात पार्टी दिली. आयुष्यातील पहिली कमाई मुळे मिळणारा आनंद त्याने आपल्या मित्रांमध्ये वितरीत केला. तसं पहिले तर आयुष्यात प्रथम येणारी कोणतीही गोष्ट असो आनंददायी असते. शाळेचा पहिला दिवस मात्र डोळ्यातल्या समुद्राला उधाण आणतो. पण तुम्ही पहिली गाडी घेतली तर किंवा पहिला मित्र किंवा मैत्रीण आयुष्यात येणे. पहिले प्रेम प्राप्त होणे, यावर जंगी पार्टी देणे, हे आधुनिक युगातले उधळपट्टी लक्षण आहे. बंड्याने केले ते त्याला आवडले असेल. बंडोपंतमहाराजांचे पुराण ऐकून पार्टीला जमलेले मित्र कीर्तनाला बसल्यासारखे तल्लीन.... बंड्यामहाराजांचे कोणतेही वाक्य संपले की, हिप हिप हुर्रे चा गजर आणि टाळ्या. तेच त्याच्या वडिलांनी पहिली कमाई केली तेव्हा प्रथम काय केले असेल...! याचा मागोवा घेणे आजच्या अभिनव संस्कृतीला किळसवाणे नक्कीच. पहिली कमाई आईच्या हातात देणारा मुलगा. त्या कमाईला देव्हाऱ्यात जागा मिळायची. बंड्याने पहिला पगार हाती मिळाल्यावर *आज मै उपर, आसमां नीचे* हे गीत नक्कीच गुणगुणत घरी आला असेल. आलेला पगार खर्च कसा करायचा.. महिनाभर यातून पुरतील का...! याचा किंचितही विचार न करणारा बंड्या *आज सोनियाचा दिनू* म्हणून हॉटेलात मी काहीतरी दिव्यत्वाची ज्योत प्रकट करून आलो असल्याच्या अविर्भावात बाता मारीत होता. त्याची आई म्हणजे घरातले ATM होते. कामावर निघालेल्या मुलाच्या खर्चातल्या काटकसरीची गुंतवणूक हातावर देत, भाजी नाही आवडली तर कॅन्टीनमधून घे बरं का....! म्हणून बंड्याच्या आईने स्वप्न पाहिली असतील, पहिली कमाई माझा मुलगा माझ्या हातावर ठेवील. मग मी ते देवाजवळ ठेवील. त्याच पैश्यातून बंड्यासाठी छानशी कपडे, घड्याळ घेईल, आणि ताईडीला (बहीण) एक छानसा ड्रेस आणील. पण आत्मविश्वासाला बुडबुडा आला होता. भ्रमाचा भोपळा फुटला होता. भ्रमनिराश, बाकी काय....! आई ती. मुलगा कमावता झाला हाच आनंद नखशिखांत भिनभिनलेला असतो. एक पगार घरात दिला नाही म्हणून काय झाले. पुढच्या महिन्यात आईला विसरणार नाही. बंड्याच्या पाकिटाला चौदा कप्पे. एक वेळा बायकांच्या कमी कप्प्याच्या पर्स मध्ये खजिना सापडेल. पण महिनाअखेरीला पुरुषाच्या पाकिटाचे कप्पेंकप्पे रिकामे मिळतील. त्याचं आयुष्य आईस्क्रिम सारख असतं, टेस्ट केलं तरी वितळत नाही. केलं तरी वितळतं. मग ते आपल्या हातात आहे टेस्ट करायचं की वेस्ट करायचं. आता बंड्या ते जर टेस्ट करू इच्छित असेल तर काय हरकत आहे.

हा हा म्हणता बंड्याचा दुसरा पगार झाला. आता तरी आईच्या हातावर तो पगार देईल, असे वाटत होते. पण बंड्याने घरी येताना मोबाईलचे दुकान गाठले. दुकानातून भारी मोबाईल विकत घेतला. उर्वरीत रक्कम हप्त्याहप्त्याच्या बोलीवर....! सहा महिने बंड्याचे हप्ते भरण्यात गेले. भारी मोबाईल माणसाची शान वाढवितो. चारचौघात बोलबाला होतो. समाजात पत वाढते. मात्र ती कमाई नव्हे घरच्या माईचा आसमंत काळोखलेला म्हणून पणती धर्म सोडत नाही. तिच्या परीने, तिच्या पद्धतीने ती प्रकाशच देत असते. आई अशीच आहे. तिला अती दुःख पाहिलेल्या आणि पचवलेल्या छोट्या छोट्या गोष्टींमधील सुखाची किंमत माहित असते.

बंड्याच्या शेजारी राहणारा धोंड्या असा नव्हता. तो जेव्हा कामाला लागला आणि पहिला पगार जेव्हा हातात मिळाला तेव्हा तो प्रथम आपल्या आई वडिलांपुढे नतमस्तक झाला. ते पगाराचे पाकीट त्यांच्या पायावर ठेवले. आईसाठी त्याने एक स्वेटर आणले होते. वडिलांसाठी छानसा सदरा आणला होता. त्यांना पहिल्या पगाराचे बक्षीस म्हणून दिले. वडिलांचे डोळे पाणावले होते. डोळ्यातले कारुण्याने, धन्यतेने ओथंबलेले भाव लाख मोलाचे. ते आनंदाश्रू असले तरी आईने त्या स्वेटरला डोळ्याची किनार अलगद पुसतच अंगात घातला. तेव्हा त्या मातापित्याच्या डोळ्यातले भाव न्याहाळायला अदृश्य शक्तींनी तेथे बैठक मारली असेल. आई बाबांचे मन आनंद आणि समाधानाने काठोकाठ भरले होते. चेहऱ्यावरचे समाधान हे पहिल्या पगाराचे कौतुक समजून धोंड्याने बाजी मारली होती. पहिल्या पगाराची मिळकत त्याच्या निरस आयुष्याला बराच अर्थपूर्ण करून गेली. बुरसटलेल्या आयुष्याला विविध रंगांनी ओतप्रोत भरले. दुसऱ्या पगाराला कामावरून येताना त्याने डझनभर कपबश्या आणल्या आणि आईच्या हातात देत सांगितले. आई यापुढे त्या फुटक्या, कानतुटक्या कपबशीतून चहा नको. रात्री १० वाजता जेवण तयार असून सुध्दा आईला चहा करायला सांगितले. धोंड्याचे आई बाबानी धोंड्यासाठी अर्ध्यापोटी दिवस काढले होते. भाकरीतला अर्धा हिस्सा वेगळा आणि उरलेल्या अर्ध्यात आई बाबा. पण त्यांनी कधी कळू दिले नाही. बंड्याला लागणाऱ्या उपयुक्त वस्तूसाठी कामाला जुंपून त्या पूर्ण केल्या. बंड्याच्या घरची परिस्थिती देखील अशीच होती, वडील लवकर गेल्याने आईने त्याला वाढविले होते. दिवसभर त्या शिलाई मशीनवर राबायची. अगदी लाडात वाढविले. पण बंड्याला त्या माऊलीचे योगदान त्या पहिल्या वहिल्या अनन्य साधारण महत्व असलेल्या कमाईची उधळपट्टी करताना कळले का नाही...?

नाण्याला दोन बाजू असतात. त्याप्रमाणे समाजातले दोन रंग, सगुण- दुर्गुण. एक पैसे कमवू लागल्यावर आईच्या मनाला उभारी देऊ शकत नाही. दुसरा मात्र आपल्या मात्यापित्याची स्वप्न साकार करायला तयार आहे. एक अवगुणाची उधळण करीत असताना दुसरा मात्र गुणांची फक्त बेरीज करण्यात मग्न आहे. बंड्या धोंड्याची चुटपूट लावणारी कहाणी खऱ्या अर्थाने समाजातील नवीन घटक समजून घेतील तेव्हा खरी वैचारिक प्रगती नक्कीच होईल. परंपरा रूढी नको म्हणणारी आजची पिढी फक्त आपल्या मातृपितृ भक्तीचे अवमूल्यन करणार नसतील तर समाधान आणि अभिमानाच्या घागरी भरल्याशिवाय राहणार नाहीत. हे अपेक्षित आहे. मग त्या मातेच्या मुखातून *माझे गुणाचे पोर* हे शब्द उमटल्याविना राहणार नाहीत.
बंड्या आणि धोंड्या हे माझ्या मनातले विचार म्हणा किंवा विचारांमधले काल्पनिक मन रंगवताना दोघंही थकले... मग मीच हात टेकले...! पुरे आता.

*अशोक भेके*
*घोडपदेव समूह*
बंड्याची कमाई.....!

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

बंड्या धोंड्याची चुटपूट लावणारी कहाणी खऱ्या अर्थाने समाजातील नवीन घटक समजून घेतील तेव्हा खरी वैचारिक प्रगती नक्कीच होईल. परंपरा रूढी नको म्हणणारी आजची पिढी फक्त आपल्या मातृपितृ भक्तीचे अवमूल्यन करणार नसतील तर समाधान आणि अभिमानाच्या घागरी भरल्याशिवाय राहणार नाहीत. हे अपेक्षित आहे. मग त्या मातेच्या मुखातून *माझे गुणाचे पोर* हे शब्द उमटल्याविना राहणार नाहीत. >>> +११११११११११११११११११११११११११११११११
नेहमीप्रमाणेच खूप छान लिहिलं आहे

त्याचं आयुष्य आईस्क्रिम सारख असतं, टेस्ट केलं तरी वितळत नाही. केलं तरी वितळतं. >> ह्यावरून प्रसिद्ध फॉरेस्ट गंप सिनेमातले एक सुप्रसिद्ध वाक्य आठवले.

अरे हो ... दोनदा प्रिंट झाले वाटतं..
काही हरकत नाही... छानच लिहिले आहे त्यामुळे दुसर्‍यांदा वाचतांनाही तेवढेच छान वाटले.