मोबाईल हरवला तर ?

Submitted by AMIT BALKRISHNA... on 21 December, 2018 - 02:19

मोबाईल हरवला तर ?
शीर्षक वाचून गोधळलात का ? गोंधळून जावू नका पण आज मोबाईल या संवाद (?) साधना बद्दल काही सत्यता तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि हे करीत असताना एक विचार सुद्धा मांडत आहे कि तुमचा मोबाईल गहाळ झाला तर ? काय होवू शकेल? हा विचार सुद्धा मनाला शिवत नाही, हो ना ? याचही एक कारण आहे ते अस, एवढे दिवस अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा आहेत असं आपणं मानतं होतो पण २१ व्या शतकात या सोबत मोबाईल हि एक गरज बनली आहे. शाळा, कॉलेज मध्ये जाणाऱ्या मुलांपासून ते अगदी आजी आजोबांपर्यंत या मोबाईल ने सगळ्यांशी गट्टी जमविली आहे आणि गट्टी साधी सुधी नाही अगदी “जिगर” दोस्ती, मेड फॉर इच अदर म्हणाना ! थोडं आश्चर्य वाटेल पण वास्तव तर असच आहे. या मोबाईल ची फोन करणे, संवाद साधणे हि प्राथमिकता पण काही ठिकाणी तर हि प्राथमिकता सोडूनच इतर कारणांसाठी हा मोबाईल वापरला जातो. एक सर्वेक्षण असं सांगत कि हा मोबाईल एक वेळ आलेला फोन रिसीव्ह करायाला कमी वापरला जाऊ शकतो पण त्यावरील अॅप साठी हा मोबाईल वापरतात अलीकडे काही मंडळी ! आज भारतातील मोबाईल वापरकर्त्यांची संख्या हि ७७५ दशलक्ष एवढी आहे. आणि २०१९ पर्यंत हि संख्या ८१३ दशलक्ष एवढी होईल. हि संख्याच खूप काही सांगते.
मोबाईल अॅप (आय.ओ.एस. आणि गुगल प्ले स्टोअर) वापरण्यात आपण प्रथम क्रमांकावर आहोत, आपल्यानंतर अमेरिका आणि तृतीय क्रमांकावर चायना, हि क्रमवारी एका अॅप च्या वापराची आहे. (स्त्रोत:इंटरनेट) आपण किती अॅप-आधीन आहोत हेच जणू या आकडेवारी वरून लक्षात येतं. यामध्ये नेटफ्लिक्स सारखं अॅप भारतीय जनतेस मोबाईल वर बिझी ठेवण्यात अग्र-क्रमांकावर आहे आणि नंतर क्रमांक सोशल मिडिया अॅप्सचा त्यात व्हॉटस् अॅप, फेसबुक !! हि परिस्थिती झाली पण एका गोष्टीचा जर आपण विचार केला कि आपण सगळे एवढे का आहारी जातो आहोत या अॅप्स च्या तर त्याचं काही फार समाधान कारक उत्तर नाही मिळणार.... आजकाल कुठेही जा म्हणजे अगदी भाजी मार्केट पासून सुरुवात करू, भाजेवाले मोबाईल हातात धरून काही ना काही बघत बसलेले असतात, तुम्ही कोणती भाजी घेताय याकडे देखील त्यांचे लक्ष नसते, पैसे घेताना देखील मोबाईल स्क्रीन कडे पाहणे सुरूच असते. तुम्हालाही असा अनुभव आला असेल. हो ना ? हीच परिस्थिती सगळीकडे पहायला मिळते, हॉटेल, लंच रूम्स, थियेटर, रस्ता, बस थांब्यावर, कॉलेज मध्ये क्लास सुरु असताना (थोडं अति रंजित वाटेल पण वास्तव), वाहन चालविताना, जो तो मोबाईल स्क्रीन मध्ये व्यस्त ! कुणी ऑनलाइन गेम्स खेळण्यात व्यस्त तर कुणी ऑनलाइन व्हिडियो स्ट्रीमिंग पाहण्यात व्यस्त तर कुणी सोशल मिडीया मध्ये व्यस्त ! गृहिणी स्वयंपाक करीत असताना देखील मोबाईल हाताळताना दिसतात, लहान मुले जिंगल्स पाहण्यात व्यस्त, एकूण काय तर सगळेच व्यस्त !! पण हे एक व्यसन आहे का? अस वाटतं का तुम्हाला, संवाद सहज साध्य व्हावा या हेतूने मोबाईल ची निर्मिती करण्यात आली पण वापर फक्त करमणुकी साठीच जास्त होतो आहे हे आता ध्यानात घेतलं पाहिजे यामुळे आपलं आयुष्य या मोबाईल भोवतीच घुटमळतं आहे.
मग असा हा मोबाईल हरवला तर काय होईल? भाजीवाल्या पासून ते वाहन चालविणाऱ्या पर्यंत जो तो त्याच्या कार्यात मग्न होवून जाईल. एकाग्रता वाढेल आपसूकच कामे वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण होण्यास मदतच मिळेल. अगदी सर्व मंडळी जरी अजून मोबाईल च्या आहारी नाहीत गेलेली पण जे रोज दिसतं ते पाहिल्यावर वाटत कि जर खरचं एक दिवस मोबाईल हरवला तर......

अमित बाळकृष्ण कामतकर
सोलापूर (२१/१२/२०१८)
www.amitkamatkar.blogspot.com
ता.क.: माझा हा लेख माझ्या नावासह फॉरवर्ड करण्यास माझी हरकत नाही.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

मग असा हा मोबाईल हरवला तर काय होईल? भाजीवाल्या पासून ते वाहन चालविणाऱ्या पर्यंत जो तो त्याच्या कार्यात मग्न होवून जाईल. एकाग्रता वाढेल आपसूकच कामे वेळेत आणि गुणवत्तेसह पूर्ण होण्यास मदतच मिळेल. अगदी सर्व मंडळी जरी अजून मोबाईल च्या आहारी नाहीत गेलेली पण जे रोज दिसतं ते पाहिल्यावर वाटत कि जर खरचं एक दिवस मोबाईल हरवला तर......>>>काही नाही ओ. मोबाईल हरवला तर एकदोन दिवसात नवा मोबाईल घेतील Happy

मोबाईल असा हरवला तर तुम्ही हा लेख सोमीवर टाकू शकणार नाही आणि कोणीही तो टाक म्हटले (ता.क.: माझा हा लेख माझ्या नावासह फॉरवर्ड करण्यास माझी हरकत नाही.) तरी फेब्रु व्हाट्सआपला टाकू शकणार नाही .... ह्यापालिकडे फार काही होईल असे सध्या तरी वाटत नाही.

मोबाईल हरवला तर एकदोन दिवसात नवा मोबाईल घेतील >>> एकदोन दिवसांत? लगेचच घेतील. डिलिव्हर व्हायला काय जो वेळ लागेल त्यातही एखादा स्टँडबाय फोन लागेलच.

पाहिल्यावर वाटत कि जर खरचं एक दिवस मोबाईल हरवला तर......
<<
मी अग्दी अस्साच निबंध नव्वीत अस्ताना लिहित असे. सुरुवातही अशीच अन शेवटही अस्साच.
विषय्ही तसेच असत.
सूर्य उगवलाच नाही तर.
मी पंतप्रधान झालो तर.
वगैरे.

बाकी या निभंदाला धापैकी पाच मारकं. कारण मोबाईल गेल्यावर कार्यक्षमता वाढेल हा चुकीचा शाळकरी निष्कर्ष.

मस्त विचार अणि कल्पना अमितजी
खरच अर्थ डे सारखा आपण सगळ्यांनी मनाच्या शांततेसाठी आणि संपूर्ण कार्यमग्न होण्यासाठी मोबाईल हरवला नाही तरी महिन्यातून एक दिवस तो पूर्ण बंद ठेवला पाहिजे.