Submitted by अज्ञातवासी on 17 December, 2018 - 03:31
नमस्कार मायबोलीकर!
आजपर्यंत मी कधी परदेश प्रवास केलेला नाहीये. या मार्च महिन्यात मी पहिला परदेश प्रवास प्लॅन करतोय.
कंबोडिया!
आता कंबोडियाच का, तर जगातील सगळ्यात पहिल्या हिंदू साम्राज्याचे अवशेष बघण्यासाठी, आणि अजूनही बऱ्याच अनवट जागा आहेत त्या बघण्यासाठी.
तर मायबोलीकरांकडे ट्रिप प्लॅन करण्यासाठी मदत हवी आहे.
ठळक मुद्दे:
१. स्वता ट्रिप कशी प्लॅन करावी? कोणती साईट चांगली आहे.
२. व्हिसा ऑन अरायवल म्हणजे काय? हे कंबोडियात लागू आहे काय? त्याची प्रोसेस काय?
३. माबोकर मंडळींचे कंबोडियातील अनुभव.
तर अगोदरच धन्यवाद!
विषय:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
https://www.misalpav.com/node
https://www.misalpav.com/node/27143 अज्ञातवासी या लिंकवर क्लिक करा. आणी मिपाची मेंबरशीप पण घ्या. मायबोलीपेक्षा तिकडे सविस्तर माहिती असते.
रश्मी खूप खूप धन्यवाद. नक्की
रश्मी खूप खूप धन्यवाद. नक्की वाचतो.
मागे मी एकदा मिपाची मेम्बरशिप घेतलीय होती. पण नाही जमलं तिकडे वावरायला. बऱ्याच कटू आठवणी आहेत. पण मायबोलीवर आलो आणि रमलो. मुख्य म्हणजे आंतरजालीय वातावरणावर कसं वावरावं हे शिकलो.
बघुयात. मायबोलीकर मदत करतीलच.
पुन्हा एकदा धन्यवाद!
मी अंकोर पूर्ण पालथे घातले
मी अंकोर पूर्ण पालथे घातले आहे. मी उदयन इन्दूर करांची टूर घेतली होती. फारच मस्त सांगतात. ते माझ्या नवृयाचे कॉलेज सोबती व मला अगदी शाळकरी असताना पासून बघितले आहे. त्यांच्या हिंदू मतांशी माझे काही देणे घेणे नाही. पण ते मंदिर व सीम रीप मध्ये वर्शाला दोन टूर नेतात व सर्व लोके बांधलेली आहेत त्यामुळे भारतीय जेवण शाकाहारी मील्स वगैरे मिलण्यात मदत होते. ट्रिप जून मध्ये होती मागच्या वर्शी. ही टूर घेतलीत तर बरे पडेल. ते फेसबुकावर आहेत.
सीम रीप मध्ये फार उकडते. त्यामुळे त्यानुसार कपडे घ्यावेत. लाइट लेगिन्ग छत्री हॅट, सन स्क्रीन मस्ट आहे. मधूनच पाउसही पडतो. तेव्हा भिजून घ्यायचे. चालायला फारच लागते पण मी करू शकले तर तुम्ही करणारच. तसे कंफर्टेबल शूज घ्या. दिव्सा उन्हात चालून आल्यावर फूट मसाज ची सोय असते तो अवश्य घ्या. अमेरिकन डॉलर तिथे लागतात ते आवश्यक तेवढे घ्या. सीम रीप नाइट मार्केट पण तितकेच लै भारी आहे त्यामुळे तिथे ही फिरा. मसाज वाल्यांना दोन डॉलर पेपर मनी तरी टिप द्या. ते कॉइन घेत नाहीत.
मुंबई ते बँकोक फ्लाइट व तिथून सीम रीपची फ्लाइट टर्बो प्रोप विमान असते. एक तासाची फ्लाइट आहे. उतरल्यावर व्हिसा मिळतो. फार गर्दी नसते. ( भारताच्या मानाने) क्यूट एअर्पोर्ट आहे. मग बस घेउन हॉटेल. तिथे सेटल व्हायचे. खादडी आरामकरून लगेच पहिल्या दिवशी आंकोर बघू नका.
व्हिसा ऑन एंट्री म्हणजे एक लाइन असते त्यात उभे राहायचे एका ठिका णी पासपोर्ट द्यायचा ते शिक्का मारतात दुसृया टेबला वरून कलेक्ट करायचा. फी टूर ऑपरेटरने भरलेली असते नाहीतर ती द्यावी लागेल.
एक जागा आहे तिथे तीन किंवा सहा दिवसाचे तिकीट मिळते ते घ्या.
अंकोर ची शिलप क् ला वेगळ्या प्रकारची आहे त्याची सवय व्हायला वेळ लागतो. चांगला कॅमेरा व मेमरी का र्ड ब्याटर्या व इतर टेक्निकल गो श्टी, चार्जर्स बरोबर नक्की घेउन जा. ह्याचा वेगळा पॅक झाला तरी बरे.
अंकोर थॉम ला पहिले जावा एक ब्रिज सारखे आहे तिथे एकाबाजूला देव व एकाबाजूला दानव फेसेस आहेत. तिथून सुरूवात करा. बस जाते आत ते गेटही बायोन शैलीत आहे. ह्याचे फोटो घ्या.
मग बायोन बुद्धा मंदीर बघा. सर्वत्र मंदीर चढा उतरा हे आहेच. एकूण मस्त आल्याचे सार्थक झाले अश्याच वास्तू आहेत. मग ता प्रोम परिसर व मंदीर करा. मग मागच्या बाजूने उतरून जंगला सारख्या भागातून चालून किंग्ज टेरेस येते ती बघा. मग नारळ पाणी पिऊन बसने परत.
भरपूरच चालावे लागते.
इथे जंगला/ गवतातून चालताना दग डा वर हात टेकल्यास कदाचित मोठ्या लाल मुंग्या डसू शकतात. तेव्हा ते जपून बघा.
डे वन इज ओव्हर.
खर्च माण शी ६००$ प्लस तिकीट वगैरे एक लाख परेन्त. शॉपिन्ग आपण करू तसे. ह्यात टू फ्रो तिकीट व हॉटेल समाविश्ट आहे. एक आठव्डा प्लॅन करा. सोमवारी हा पहिला दिवस. दुसर्या दिवशी बंती साम्रे व बंते श्रे ई. मग एक दिवस ते तळे नाव विसरले व म्युजीअम व्हिजीट. ही एकदम वर्थ आहे. तळ्याचे नाव शोधून लिहीते. मग एक दिवस ता प्रोम व इतर मंदिरे. लास्ट अंकोर एक दिवस.
फूट मसाज चे पैसे त्यांनीच भरले होते. पण दोन दोन $ टिप नोटा दिल्या की मसाजिस्ट सुखावतो. खादाडी पण भरपूर आहे. व्हेज व भारती य असा आग्रह नसेल तर उत्तम इटालिअन, व्हिएट नामी, थाई व अमेरिकन खाणॅ मिळते. वस्तू अप्रतीम आहेत. शिवाय सर्व वेस्ट्र्न ब्रांड्स मिळतात. मी जीवां ची चे एक स्प्रे व लेकीने एक लिप्स्टिक घेतलेली. सीम रीप नाइट मार्केट व सिटीतून रात्री टुक टुक मधून एक टूर अवश्य घ्या. फार रोमांटिक वेगळा अनुभव आहे. गार हवा असते. लाइट्स लावलेले. एखादे किशोर लता गाणे ऐकत फिरायचे.
अंकोर मंदीर अजूनही माझ्या स्वप्नात येत असते. अतिशयच वेग्ळा अनुभव आहे.
अजून तीन चार दिवसाचे आहे. वेळ काढून लिहीते.
डे टू: बन्ते सामरे व बंते श्री मंदिरे जरा दूर आहेत बसने दहा वीस मिनि टे लागतात. अगदी
खेडेगावात आहेत. सर्व मंदिरे अशी जंगलात एकदमच समोर येतात. त्यांना कुंपणे वगैरे नाहीत. तिकिट चेकिंग चे गार्ड उभे असतात. मेन मंदिरालाच फक्त त्याची स्वतःची गेट कुंपणे व पाण्याची मोट आहे.
बं ते श्री मंदीर जगातील सर्वात सुंदर पैकी एक आहे. अतिशय नाजूक कोरीव काम व एखादी बारीक छोटेखानी पण अतिशय अप्रतीम सुंदर स्त्री असावी असेच ते आहे. श्रे इ म्हण जे स्त्रीच.
राजाने बांधलेले ते मोठे अंकोर व हे मंदीर त्याच्या पुरोहिताने बांधलेले आहे. इथे एकेक शिल्प फार डीटेल वारी बघावे. इंद्रप्रस्थ बांधायच्या आधी जे जंगल जाळले संहार झाला त्याचा पट आहे.
कंस वध व सीताहरण ह्याची शिल्पे आहेत. अभि षेक लक्ष्मी आहे मेन गेट वर. तिच्यावर दोन हत्ती अभिषेक करतात. इंद्र देव व पाउस सर्वत्र आहे. स्पेंड अ लॉट ओफ टाइम हिअर.
नेक्स्ट डे टोनले साप तलाव हा फार भारी आहे. आत एक बेट आहे तिथे परेन्त फेरीने नेतात व परत आणतात. तिथे बेटावर एक शॉप आहे तिथे जरूर खरेदी करा. पैसे पुरतील की नाही ह्या भीतीने मी इथे काही घेतले नाही. पण घ्यायला हवे होते. इथे बोट लोड चिनी बायका माणसे येतात. एक उगीचच क्रोको डाइल ब्रीडिन्ग सेंट र आहे चार मगरे सुसरी पडलेल्या असतात. ह्या नंतर कंबोडिअन वॉर म्युझीअम बघायला जा. हा एक सुन्न कर णारा अनुभव आहे. अमेरिकेचे व कंबो डिअन हुकुम शहाचे अत्याचार जुनी शस्त्रे, रणगाडे बाँब गन्स आहेत. माइन्स आहेत. पाण्यात वीष भरून ठेव ले होते ते खड्डे असे दाखवले आहेत.
इथे सर्वत्र ठीक ठिकाणी जंगलात अमेरिकेने लँड माइन्स पसरून ठेवले आहेत त्यात जखमी होउन हात पाय कान गमावलेले लोक त्यांचे एक संगीत वाजवत बसलेले असतात. डोनेशन मागतात.
एक दोन पिढ्या केमिकल्स मुळे जायबंदी झालेल्या आहेत. त्यांना शिक्षण नाही. फक्त फूट मसाज व अशीच कामे येतात. आता तिथे रिफॉर्म चालू आहेत.सरकारने क्लि अर केलेल्या मंदिरातच जाता येते. इतर जागी जंगलात कधी लँड माइन्स असू शकतात म्हणून
साहसी अन ऑथोराइज्ड ट्रेक करू नये.
तसेच कंबोड्या मध्ये युरोप आम्रविकेत ले इथे काहीही कल्चरल कनेक्षन नसलेले तरूण पब्लिक मजा ड्र्ग्ज पबिन्ग व क्लबिंग करण्यासाठी देखिल येते. ही देखिल एक बाजू आहे. मंदिरे लाइव्ह नाहीत म्हण जे आपले पर्वती काशी विश्वनाथ बालराजेश्वर जसे इथे रोज पूजा अर्चा भाविक दिसतात तसे नाही. कुठे कुठे बुद्ध मूर्ती व अगरबत्या दिसतात. अगदी अल्प प्रमाणात. मी अंगोर चढलयवर तिथे ओम जय जगदीश हरे आरती ऐकली माझ्या फोन वर. माझ्या पुरती.
अमा फार मोलाची माहिती दिलीत.
अमा फार मोलाची माहिती दिलीत. तुम्ही तर एक विकिपीडियाच आहात मायबोलिवर. धन्यवाद....
सुन्दर माहिती दिलीत अमा,
सुन्दर माहिती दिलीत अमा, वाचून जावेसे वाटत आहे
मंदिराचा प्रतिसाद उडला परत
मंदिराचा प्रतिसाद उडला परत लिहीते.
अमा, पण मंदिरात सगळीकडे मुक्त
अमा, पण मंदिरात सगळीकडे मुक्त वावर allowed आहे का non-cambodians ना? बाली आणि थायलंड मध्ये फक्त बलिनीज, थाई लोकांना respectively प्रवेश होता.
छान माहिती अमा.
छान माहिती अमा.
अंकोर वट मंदिर भेटः
अंकोर वट मंदिर भेटः
इथे मंदिरातून सुर्योदय बघायला जायची एक चूष आहे पण ते फार वर्थ नाही. कारण गर्दी असते. लोकांपेक्षा जास्त कॅमेरे अस्तात. ब्रेफा करून
बरोबर पाणी व टोपी, आत रुमाल घालून निघा. आज फार चालायचे आहे. कॅमेरा व एक्स्ट्रा चार्ज मेमरी कार्ड घ्या. अम्कोर बघायला सरकारी गाइड घ्यायला लागतो. रामायण महाभारत व समुद्र मंथन ह्याचे आपले सामान्य ज्ञान गाइड पेक्षा जास्त असू शकते. पण ही एक सरकारी रिक्वायर मेंट आहे.
पहिले चालायचे लेव्हल पाण्याच्या खंदकावर बाम्धलेला पूल आहे. तिथून पुढे मंदिर चालू होते. पण वरचे पाच कळस अजूनही दिसत नाही.
कसे लपवले आहे कोण जाणे. मग अजून तितकेच चालायचा एक रस्ता आहे. ह्यात मधोमध रस्त्याच्या डाव्या व उजव्या बाजूला दोन लायब्ररी इमारती आहेत.
ह्या रस्त्याम्वर असताना पाउस आल्यास काही ही संरक्षण नाही भिजायचेच. पण तो ही एक सुरेख अनुभव आहे.
इथून पुढे आल्यावर पायर्या चढून मंदिराची फर्स्ट लेव्हल आहे. चार बाजूंना चार भिम्तींवर शिल्पचित्रे आहेत. ही फार डिटेल्ड आहेत. समुद्र मंथन,
राजा जयवर्मन दोन, महा भारत युद्ध. नरकाच्या लेव्हल्स व इतर कथा आहेत. मंत्रमुग्ध व्हाल. थोडे मागे वळून पण बघा. खाम्बां मधून हिरवे लॉन फार सुरेख दिसते.
भिंत संपली की कोन्यात एक एक ब्रेक घ्या. पाय दुखले तर दगडावर बसून घ्या. व वर नजर टाका. वरच्या कोनाड्यांत तीन बाजूं ना रामायणातील चित्रे कोरलेली आहेत. कृस्ण चरित्रातील कथा सीताहरण व अनेक कथा आहेत. असे चालत चालत चौथी भिम्त संपली की
आपण बाहेरच्या बाजूस येतो इथे पायर्या उतरून समोर नारळ पाणी मिळ ते, पुस्तके टीशर्ट वगैरे खरेदी करा. रेस्ट्रूम्स आहेत ब्रेक घ्या व
थोडा आराम करा. एक फेज संपली.
आता नव्या जोमाने पायर्या
आता नव्या जोमाने पायर्या चढायला लागा. आता स्टीप चढ आहे वीस ते तीस पायर्या चढाव्या लागतात. एका लेव्हल ला चौक व पाण्याचे हौद पूर्वी भरलेले होते ते आता रिकामे आहेत तो भाग आहे. इथे काही बौद्ध प्रीस्ट बसलेले असतात व त्यांचे धार्मिक कार्यक्रम चालू असतात.
एक एक फ्रेम फोटोत मस्त येते.
आता अजून एक लेव्हल चढा. मग आपण मेन प्रांगणात येतो ह्याच्या वर पण अजून एक लेव्हल आहे. जिथे पाच कळस आहेत. इथे चढायला परवानगी असली तर नक्की चढून घ्या. वन्स इन अ लाइफ्टाइम एक्स्पी रीअन्स. मोक्षच. आपल्या कार्मिक जबाबदार्या अजून संपल्या नाहीत म्हणून ती लेव्हल अजून आपल्याला शक्य नाही म्हणून ं मी खालूनच सर्व फोटो घेतले. ह्या पायर्या जाणून बुजून अवघड व फार फार स्टीप आहेत. पाउल पूर्ण ठेवायला पण जागा नाही. तिरके आ डवे ठेवावे लागतील. खालच्या प्रांगणा तही शिल्पे, पेडिमेंट अप्सरा शिल्पे आहेत.
मनसोक्त फिरून मग उतरायला घ्या . पूर्ण उतरोन मग लंच करा. समोर रेस्टॉरंट आहेत. टूर ऑपरेटर असेल तर भारतीय जेवणा ची सोय होउ शकते . बेसिक लंच आलू पराठे दही. भात पनीरची भाजी असे. बाकी इतर ऑप्शन आहेतच.
आता वेळ व क्षमता असल्यास ता प्रोम मंदिर परत करा. हे तर फोटो काढायला पर्वणी आहे. त्यामुळे चाय्नीज पर्यट्कांच्या झुम्डी एका लोकेशन पासून दुसृया लोकेशनला फिरत असतात. लाइन लावुन सेल्फी काढून घेता येते. हे प्रज्ञा परामिता देवीचे मंदिर आहे. रिस्टोअरेशन चे काम चालू असल्याने आ खुन दिलेल्या मार्गानेच जावे लागते. इथे आपल्या भारतीय कोलॅबरेशन ने रिस्टोअरेशन चालू आहे. परत बाहेर आले की चालत बस पाशी येउन आपली टूर संपते.
हौस वेळ असल्यास कंबोडिया टूअ र बरोबर वीएत नाम कंबाइ न करता येइल.
परतताना बँकोक विमान तळावर देखील एक झगमगीत समुद्र मंथन शिल्प आहे ते बघा. ओरिजिनल बघितल्या वर हे खूपच नकली वाटते
चमकीचे.
कंबोडिया स्टेट म्युझीअम नॉम पेन व सीम रीप दोन्ही ठिकाणी आहे. इथे सुवेनिर चांगली मिळ तील व इथे अंकोर वटची प्रतिकृती आहे. शो असतो. हा आधी बघितलयस मंदिराची कल्पना करता येइल.
इथल्या वनस्पती पन बघण्याजोग्या आहेत. व फ्रेश रान जंगल बघून बरे वाटते. बाकी सर्व खेडवळ भाग आहे. तीन ते सहा दिवसाचा पास घेतल्यास खूप मंदिरे करता येतात. व टुक टुक वाल्या बरोबर भाडे ठरवून जाता येते. सर्व दोलार मध्ये.
तसेच पाण्याचा चर खणलेला आहे त्याच्या बाजूला जेवण घेउन एक गवतातली आरामाची पिकनिक करता येते.
एक टेक्सटाइल म्युजीअम पण आहे. जिथे तिकीट घेता तिथे चौकशी करून काय काय बघता येइल ते ठरवून घ्या.
नाइट मार्केट मध्ये त्या भागातल्या उत्तम हस्त कला वस्तू मिलतात तसेच रस्त्यावर् ची खादा डी पण बेस्ट आहे. फळे आइसक्रीम कबाब व इतर अन्न पदार्थ.
परतताना तीन चार दिवस बँकोक पटाया पण करता येइल . कंबोड्या च्या मानाने हे फार च कमर्शिअल वाट्ते. मंदिराचा दैवी अनुभव घेउन आल्यावर जरा मन अलिप्त होते त्यातून परत यायला बरे.
अमा, बेस्टच!
अमा, बेस्टच!
अज्ञातवासी,
TripAdvisor साईटवर पण बघा किंवा अॅप डाऊनलोड करा. तिथल्या माहितीचा, फोरम्सचा खूप उपयोग होतो.
छान माहिती अमा.
छान माहिती अमा.
chan mahiti
chan mahiti
खूप छान अमा. तिथे जाण्याआधीच
खूप छान अमा. तिथे जाण्याआधीच जाऊन आल्यासारखं वाटलं.
http://aisiakshare.com/node
http://aisiakshare.com/node/6255 >>
.. इतिहास
अमा, छान माहिती
अमा, छान माहिती
अमा, मस्त माहिती, जावंसं
अमा, मस्त माहिती, जावंसं वाटलं एकदम
अमा, नीट वेगळा बाफ काढून
अमा, नीट वेगळा बाफ काढून फोटोंसकट लिहायचंत की हो..
अमा, नीट वेगळा बाफ काढून
अमा, नीट वेगळा बाफ काढून फोटोंसकट लिहायचंत की हो>> बीच्या प्रवास वर्णन मालिकेत फोटो छान आहेत. सर्च करून इथे लिंक देते.
मायबोलीपेक्षा तिकडे सविस्तर
मायबोलीपेक्षा तिकडे सविस्तर माहिती असते.>>>>>>> माझे हे शब्द मीच मागे घेते. अमांचे अनेकोनेक आभार. अमा, तुम्हाला सांष्टांग नमन.
अज्ञातवासी, असु दे. मायबोली आपली वाटली ना यातच सारे आले. तुमची ट्रिप छान होऊ दे. आल्यावर फोटो टाका आणी नवीन काही असेल तर ते पण अॅड करा . ( म्हणजे आताचा प्रवास खर्च वगैरे )