जॉन

Submitted by शिवाजी उमाजी on 14 December, 2018 - 00:45

जॉन

डोक्यावर अस्ताव्यस्त वाढलेले केस, बाकी शरीर पुर्णपणे उघडं आणि लाज झाकण्यासाठी सुतळीच्या तुकड्यांनी कमरेला आवळलेली रंगहीन कळकट, मळकट पँन्ट, दोन्ही हातांच्या बोटांनी कसली तरी आकडेमोड करतोय अशा हालचालींसह अस्पष्ट, अतर्क्य बडबड करीत, मात्र रस्त्याच्या कडेने आपल्याच तंद्रीत झपाट्याने चालणारा, कधीकधी कचराकुंडी जवळ घुटमळत, काही बाही चीज उचलणारा 'जॉन' बरेच दिवस दिसला नाही...

तो कुठला? त्याचं खरं नाव काय? कुणालाच माहीत नव्हतं, तब्येतीने तसा तो उंचापुरा, भक्कम म्हणून कुणीतरी जॉन हाक दिली, तो पण मागे वळला... तेच त्याचं बारसं, लोक काहीतरी शिळंपाकं देण्यासाठी, तर कधी मुलं चिडवण्यासाठी, उगाच त्याला याच नावानं हाका मारायची. तो सुद्धा वळून पहायचा, कधी थांबायचा, पुढे केलेली वस्तू जवळ येऊन निमुटपणे घेऊन पहायचा, आवडली तर खायचा, नाही तर... शाहणी माणसं करणार नाहीत असं करायचा, 'ती वस्तू जवळच्या कचराकुंडीत अलगद सोडायचा'.

कधीकधी मनात विचार येतो, याचं पण कुणी तरी सख्खं असेल ना? कुठे असतील ते? त्यांना याची व याला त्यांची आठवण येत असेल का? असले ना ना प्रश्न मनात येतात आणि मन स्वतःलाच विचारू लागतं "तु सर्वांचा आहेस म्हणवतोस, पण ते मानतात का तसं? किंवा ते तसं म्हणत असतील तर, तु मानतोस का तसं?" काहीच उत्तर मिळत नाही याचं, पण कदाचित जॉनला याचं उत्तर सापडलयं! म्हणूनच का तो निर्धास्त हिंडत फिरत असतो, कुठेही आडोशाला झोपतो, जे मिळेल ते खातो? काय असावं बरं कारण?
जाणीवेच्या पल्याड गेलाय का तो?

=शिवाजी सांगळे,
मो.+91 9545976589
http://marathikavita.co.in/marathi-lekh/t30866/new/#new

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

वाईट वाटले जॉन बद्दल वाचून... जे लिहिले त्याला छान तरी कसे म्हणावे. Sad
अशा लोकांची काळजी करणारी एक संस्था आहे.. मागे मायबोलीवर कोणीतरी त्याबद्दल लिहिले होते.
रेफरंस शोधून ईथे देतो.... काही ऊपयोग झाला तर चांगले होईल.

आपली तळमळ रास्त आहे, बराच काळ होता तो आसपासच्या परिसरात, नंतर कुठे गायब झालाय कुणास ठाऊक.