निराशेवर तुम्ही मात कशी करता?

Submitted by चिखलु on 13 December, 2018 - 15:43

निराशेवर मात कशी करता? अनुभव, छंद इ इ...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

निराशा कशामुळे आणि किती काळापासून आली आहे त्यावर अवलंबून आहे.
जर बराच काळ- महिने निराश वाटत असेल तर समुदेशकाकडे जावे. चालढकल करू नये.

आता तुम्ही छंद म्हणताय म्हणुन - काल एटिंथ होलला ३ फुटर पट मिस केला, $१० हरलो, नामुष्कि वेगळी. बिग डिसअपॉयंट्मेंट, या निराशाजनक अवस्थेत एकच गोष्ट नाइटिंथ होलला मदतीला धाउन येते. यु नो व्हॉट आयॅम टॉकिंग अबौट... Wink

ज्यामुळे निराश झालो तो विषय डोक्यातून काढून टाकायचा. आपण सतत त्यावर विचार करत राहतो, आपली चूक असेल तर आत्मवंचना, दुसऱ्याची असेल तर त्याची निर्भर्त्सना मनातल्या मनात करत राहतो. यामुळे मन अजून खोल गर्तेत फसत जाते. नोकरी व तत्सम कारणांमुळे निराशा आली तर कुठे कमी पडलो ते चाचपून ती कमी करण्याचा प्रयत्न करावा. नातेसंबंधात असेल तर तटस्थपणे आपले वागणे पाहावे.

मी खूप काही विषयांत प्रचंड निराशा अनुभवली आहे, पण निराशेचा पहिला भर ओसरल्यावर मी आत्मनिरीक्षण करून निराशा का आली याची कारणे शोधायचा प्रयत्न केला. शंभरात नव्यांनव वेळा कारणे माझयातच सापडली. एकदा ती सापडल्यावर निराशा झटकून परत नव्याने सुरवात करायला वेळ लागला नाही.

या निराशाजनक अवस्थेत एकच गोष्ट नाइटिंथ होलला मदतीला धाउन येते. यु नो व्हॉट आयॅम टॉकिंग अबौट>> ऋन्मेऽऽष चे धागे आणि त्यांचे प्रतिसाद.. किंवा Trump चे speech बरोबर? Wink

माझ्या साठी तरी सध्या निराशा घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ऋन्मेऽऽषचे लेखन वाचणे... खासकरुन त्यांच्या शाहरूख संदर्भातील पोस्ट... Totally hilarious... It makes me laugh and feel energized every single time.
तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा... guaranteed entertainment every f***king time.

या निराशाजनक अवस्थेत एकच गोष्ट नाइटिंथ होलला मदतीला धाउन येते. यु नो व्हॉट आयॅम टॉकिंग अबौट>> ऋन्मेऽऽष चे धागे आणि त्यांचे प्रतिसाद.. किंवा Trump चे speech बरोबर? Wink

माझ्या साठी तरी सध्या निराशा घालवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे ऋन्मेऽऽषचे लेखन वाचणे... खासकरुन त्यांच्या शाहरूख संदर्भातील पोस्ट... Totally hilarious... It makes me laugh and feel energized every single time.
तुम्ही पण नक्की ट्राय करून पहा... guaranteed entertainment every f***king time.

खूप काही काही घडलं, कधी सोबतचे नैराश्येत गेले, पण सुदैवाने अजून कधी नैराश्येत गेलो नाही एक दोन दिवसांच्यावर. आणि नैराश्येतजाऊन परवडणारही नाही, काही झालं की सगळे माझ्याकडेच बघणार. कदाचित यामुळे असावे नैराश्य अद्याप तरी आले नाही.

माझा एकमेव उपाय - आयुष्य जगतानाच विचार कमी करा !

नैराश्य येतच नाही. घालवायचे कसे हा प्रश्न कधी पडलाच नाही.

@ हायझेनबर्ग - धन्यवाद.
आणि येस्स, माझ्या पोस्टही फार विचार न करता लिहील्या असतात. त्यामुळेच त्या आपले मनोरंजन करतात.

चिखलू, रडणं , अगदी मोठ्याने हुंदके देवून बर्‍याचवेळा सगळ्या भावनांचा निचरा करतं. Happy
तसचं एकटं रहाण्याच्या ऐवजी भरपुर लोकांच्यात मिक्स होण, बाहेर जाण वगैरे त्यांच्याबरोबर हेल्प्स.
वॉलंटीअरिंग, ऑफिस मध्ये टाईट डेड लाईनचा प्रोजेक्ट घेणं , अशा प्रकारची एखादी जबाबदारी घेणं कि ज्यात यू हॅव्ह ट आन्सर समवन , सायकल ग्रुप, टेनिस ग्रुप , नविन एखादी ऑपोर्च्युनिटी जस की स्मॉल बिझिनेस व्हेंचरची चाचपणी असं बरच करता येत.
अ‍ॅज अ‍ॅन अ‍ॅडल्ट आपल्यावर खुप रिस्पॉन्सिबिलिटीज असतात. तुमच्यावर डिपेंड असणारे खुप सारे असतात.
निराश होवून सोफ्यावर लोळत पडायला काय फारसं टॅलेंट लागत नाही. निराश वाटतय आणि तस वाटत असतानाही एखादा प्रोजेक्ट करण्/करायला भाग पडणं जास्त अवघडं. यु मेक अ चॉईस. Happy छंद वगैरे तात्पुरते उपाय आहेत. At the end of the day, छंद वगैरे संपला, टिव्ही बघून झाला कि मग काय ? निराशा असणारच कि. Its better to work really hard , earn good money and keep on going.
एक उदा माझं सांगते.
यावेळी आई आलेली समर मध्ये आणि फक्त ८ दिवसच रहायला मिळालं तिच्याबरोबर. ती परतल्यावर सॉलीड डिप्रेस वाटत होतं. उगाच फाल्तु पणा म्हणुन कार मध्ये रडकी गाणी ऐकण, फ्रेंडस/को वर्क्र्स ना बोअर करणे असले सेंटीमेंटल टिपिकल प्रकार नेहमी प्रमाणे केले. तेवढ्यातच दिवसाला १०/१२ तास काम केलं तरी संपणार नाही असल्या सॉलिड डेडलाईनचा प्रोजेक्ट सुरु झाला. ' राणी सीमावती ' झक मारत निराशे मधून बाहेर पडल्या आणि घोड्यावर बसून , तलवार चालवत काम करू लागल्या. :LOL: नंतर आईला फोन पण करायला विसरल्या ते सोडाच.

सगळ्यांनाच अधून मधुन निराशा येतं असते. काळजीच कारण केव्हा होईल जेव्हा तुम्ही त्यातून बाहेर पडू शकत नाहीये, ऑबसेसिव्ह विचार मनात येताहेत. मग निराशा आजार म्हणुन ट्रीट केली पाहिजे आणि डॉक कडे जायलाच पाहिजे. तस तुम्हाला वाटत असेल तर प्लिज गेट हेल्प.

स्वतःवर विश्वास ठेवा !!! आतापर्यंत कितीतरी मोठे प्रॉब्लेम मी सोडवलेले आहेत तर हा तर काहीसुद्धा नाही. असा अॅटिट्यूड ठेवा. वर साधनाताईंनी सांगितल्याप्रमाणे आत्मनिरीक्षणात जर स्वतःची चूक आढळली तर तो एक स्वतःला धडा होता असा विचार करून आभार माना आणि जर दुसऱ्या व्यक्तीची चूक असेल तर योग्य वेळ आल्यावर योग्य मार्गाने त्या व्यक्तीला धडा शिकवा.

वरच्या सगळ्या उपायांबरोबरच डॉ कडे जाऊन योग्य त्या चाचण्या करुन विटॅमिन्स, थायरॉईड सारखे काही छुपे शत्रु नाहीत ना बघा..