|| कर्म ||

Submitted by शिवाजी उमाजी on 12 December, 2018 - 01:49

|| कर्म ||

दया क्षमा भाव । मना चित्ती धरी ।
वसे जो अंतरी । रत्नगर्भे  ।। 

जगता असावा । निर्मळ स्वभाव । 
पारदर्शी भाव । जळा परी ।।

प्रयत्ने रहावे । उध्दाराया तमा । 
येवो जन्म कामा । कवि जैसा ।।

अदृष्य रूपात । तारतो सर्वांस ।
अहर्निश श्वास । देतो प्राण ।। 

ह्रदयी जपावी । वात्सल्य करूणा । 
जसा नेत्री पान्हा । गो मातेच्या ।।

वृक्षाचीये ठायी । जैसा सेवा धर्म ।।
आचरावे कर्म । सर्वां प्रती ।।

रत्नगर्भा (पृथ्वी), कवि (सुर्य), प्राण (वायु)
©शिवाजी सांगळे
मो.९५४५९७६५८९
http://marathikavita.co.in/marathi-bhakti-kavita/t30186/new/#new

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

हा कर्मयोग श्रीमद्भगवद्गीतामध्ये संस्कृतमध्ये लिहिला आहे तोच आपण स्वरचित काव्यात सांगत आहात ना?

होय, तो कर्मयोग शाश्वत आहेच, मी केवळ साधेपणात मांडायचा प्रयत्न केला पाटीलजी.
मनस्वी धन्यवाद हायझेनबर्ग व पाटील जी.