अनाहूत

Submitted by अनन्त्_यात्री on 9 December, 2018 - 03:35

अज्ञाताच्या देशातून कुणी अनाहूत येतो
जड चेतनाच्या सीमा पार पुसून टाकतो
झिरझिर धुक्यातून क्षणमात्र डोकावतो
रस रंग नाद गंध सरमिसळ करतो
विझूविझू रोमरोमी ज्योती पेटवू बघतो
लेखणीच्या टोकापाशी हटवादून बसतो
आत ओथंबून येता सरसर बरसतो

अज्ञाताच्या देशातून
शब्द अनघड येतो
भवताल कोंदुनिया
दहा अंगुळे उरतो...

Group content visibility: 
Use group defaults

वाह, सुरेखच... Happy

निःशब्दी शब्द उमटता साकार झळाळत येते
व्यक्ताच्या वाटेवरती शब्द फूल वळुनी बघते.... Happy