मुळशी पॅटर्न | मराठी चित्रपट

Submitted by हेला on 18 November, 2018 - 14:25

२३ नोव्हेंबर २०१८ ला "मुळशी पॅटर्न" हा फारसा चर्चेत नसलेला चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रविण तरडेंचे लेखन दिग्दर्शन आहे. ओम भुतकर हा प्रचंड ताकदीचा अभिनेता आहे असे जाणवते.
https://www.youtube.com/watch?v=M5iBVasSFQc

ट्रेलर बघून पुण्यातल्या मुळशी तालुक्यातल्या जमिनीच्या खरेदीविक्रीसंदर्भाने वाढलेल्या गुंडगिरी व गुन्हेगारीविश्वावर आधारित आहे असे वाटते.
चित्रपट विषय व त्यानुषंगाने येणारे इतर सर्व विषय, इतिहास, घटना, व्यक्ती, राजकिय, सामाजिक, आर्थिक, अशा सर्व अंगाने चर्चा व्हावी म्हणून वेगळा धागा काढला आहे.

संबंधित विषया ( मुळशी तालुक्यातल्या जमिनीच्या खरेदीविक्रीसंदर्भाने वाढलेल्या गुंडगिरी व गुन्हेगारीविश्वा)बद्दल आपणास जे काही माहित असेल, ऐकले असेल, वाटत असेल ते इथे लिहावे.
धन्यवाद.

विषय: 
शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

या पिक्चर बद्दल काही माहितीच नाही.
फक्त ते खतरनाक गाणं आणि काल दिग्दर्शकाच्या ऑफिस वर हल्ला झाला इतकंच माहिती आहे.

अजून एक पण प्रतिसाद नाही? >>> मी पण हेच पहायला आलो होतो कि पहिला प्रतिसाद कुणी दिला ?
येतील असेच अजून.

पुणे म्हणजे फक्त तुळशीबाग, चितळेची बाकरवडी, बालगंधर्वचा वडापाव, दगडूशेटचा गणपती, हिंजवडीचे आयटीपार्क, कोरेगाव पार्कची श्रीमंतीच असा समज पसरलेला आहे, त्याला जबरदस्त छेद देण्याच्ं काम हा चित्रपट करणार असे वाटते.,

आरारा रा गाणं काही वेळेस ऐकायला चांगले वाटते. ट्रेलर चांगला आहे पण प्रवीण सर मागच्या काही दिवसापासून टीवी news मध्ये दिसत आहेत.

चित्रपटातील लॅण्ड माफियाचे पात्र तिथल्या खर्याखुर्‍या ल्यांड माफियाशी मिळते जुळते आहे असे निर्माते प्रवीन यांच्या कार्यालयाव हल्ला करणार्‍या हल्ले खोरांचे म्हनणे आहे . असे प्रवीणचे म्हनने आहे. व त्याने तसे हल्लेखोराना पटवून दिले आहे. अर्थात चित्रपटाच्या प्रमोशनच्या नाटकाचा तो भाग असू शकतो. हल्ली निर्माते कोणत्या थराला जातील त्याचा नेम नाही. मुद्दम कॉन्ट्रोचर्सी निर्माण करून प्रदर्शनापूर्वीच लोकाना तो माहीत व्हावा म्हणून आधीच सामाजिक, जातीय, ऐतिहासिक वादाची वात लावून द्यायची. मॅनेज्ड हल्ले निदर्शने करायचे नन्तरअथवा आधीच पैसे देउन मिटवायचे . पूर्ण चित्रपट बण्दच झालाय असे कधी झालेय का? आता शहरुख्खानच्या चित्रपटाचे कुठल्यातरी समाजाजाचे चुकीचे चित्रण झालेय म्हणून आवै उठवून ' प्रदर्शित होउ देनार नाही वगैरे तमाशे सुरू झाले आहेत. मुळात चित्रपट प्रदर्शित झालेला नसताना लोकाना कसे कळते यात काय आहे ते ? निर्मातेच काही लोकाना उभे करून हे नाटक करतात...

ओढुन-ताणुन पब्लिसिटी स्टंट करवुन घेणारे मराठी पिक्चर्स प्रदर्शीत झाल्यावर फारसा धंदा करु शकत नाहीत हा इतिहास आहे..

लहान मुलांना घेऊन बघण्या सारखा आहे का?
नाही..बरीच हिंसा आहे

एकंदर चांगला आहे का?
हो... मला आवडला, काही प्रसंगांना टाळ्या, शिट्ट्या पडत होत्या, एकंदरीत लोकांचा प्रतिसाद बघता चित्रपट सुपरहिट होईल असं वाटतं.

पुणे म्हणजे फक्त तुळशीबाग, चितळेची बाकरवडी, बालगंधर्वचा वडापाव, दगडूशेटचा गणपती, हिंजवडीचे आयटीपार्क, कोरेगाव पार्कची श्रीमंतीच असा समज पसरलेला आहे, > >>>>>

कोणाचा?

मुळशी तालुक्यातल्या जमिनीच्या खरेदीविक्रीसंदर्भाने वाढलेल्या गुंडगिरी व गुन्हेगारीविश्व
यासंदर्भात मी माझ्या मि. कडून प्रथम ऐकले आहे

पावर-फुल नेत्याचा आशीर्वाद असल्याने संदीप मोहोळ च्या डोक्यात हवा गेल्ती पण गेम होताना कोणी कुत्रबी नाय आलं त्याचसाठी ... अजून दोन जण जे सध्या काहीजणांसाठी युट्युब सेलिब्रिटी आहेत ते बी त्याच मार्गावर आहेत ...

काही बाबतीत अतिरंजित असणारा मुळशी पॅटर्न, लँड माफिया, बांधकाम व्यावसायिक, शेतकरी, पोलिस यांच्या संबंधांवर प्रकाश टाकणारा आणि विचार करायला लावणारा आहे. विषयाला धरून आणि प्रसंगांना अनुसरून असलेली शिवराळ भाषा आणि वास्तववादी पण भडक प्रसंग यामुळे लहान मुलांबरोबर बघण्यासारखा निश्चितच नाही.

आता शहरुख्खानच्या चित्रपटाचे कुठल्यातरी समाजाजाचे चुकीचे चित्रण झालेय म्हणून आवै उठवून ' प्रदर्शित होउ देनार नाही वगैरे तमाशे सुरू झाले आहेत.
>>>>

शाहरूखचा आता झिरो येतोय. त्याबाबत काही झाले का? काही सविस्तर माहिती असल्यास त्या झिरोच्या धाग्यात लिहाल का?

मुळशी पॅटर्नवाले हवा येऊद्यामध्ये आलेले. तेव्हा समजले. सत्यासारखा चित्रपट आहे. आरारा गाणे बरे आहे. ते देखील साजेसे आहे.

पुणे म्हणजे फक्त तुळशीबाग, चितळेची बाकरवडी, बालगंधर्वचा वडापाव, दगडूशेटचा गणपती, हिंजवडीचे आयटीपार्क, कोरेगाव पार्कची श्रीमंतीच असा समज पसरलेला आहे, त्याला जबरदस्त छेद देण्याच्ं काम हा चित्रपट करणार असे वाटते.

ओये उडताss पंजाब Happy

या वीकेण्डला पाहिला. आवडला. नक्कीच पाहण्यासारखा आहे. ओम भूतकर, मोहन जोशी, सुरेश विश्वकर्मा (सैराट मधला आर्चीचा बाप), महेश मांजरेकर या क्रमाने चांगली कामे आहेत. उपेन्द्र लिमये चे काही सीन्स इफेक्टिव्ह आहेत पण जरा स्टायलाइज्ड करताना थोडी शो बाजी जास्त झाली आहे. त्यामानाने बाकीचे पोलिस अस्सल वाटतात. सुरेश विश्वकर्माला जरा जास्त स्कोप हवा होता. उपेन्द्र लिमयेचे कॅरेक्टर जास्त फुटेज खाते.

सुरूवातीला राम गोपाल वर्माच्या (सत्या ई) चित्रपटांच्या वळणावर जातोय असे वाटतानाच काही सीन्स असे येतात की एकदम वेगळी ट्रीटमेण्ट जाणवते.

शेतकर्‍यांच्या जमिनी गेल्यावर नवीन जगाशी जुळवून घेताना येणारे प्रॉब्लेम्स, विकासाबरोबर येणारा बकालपणा, त्या विकासात भूमिपुत्रांनाच स्थान नसणे वगैरे सुरूवातीला खूप चांगले उभे केले आहे. तो मेसेज पुढे मात्र भाईगिरी दाखवण्यात हरवून जातो. तरीही चांगले स्क्रिप्ट, अभिनय वगैरेंमुळे खिळवून ठेवतो.

मुळशी तालुक्यातील एका गावात एका कंपनीचा प्रोजेक्ट चालू होता. मी व्यवस्थापनात काम करत होतो. बऱ्याच अल्पभूधारक शेतकऱ्यांची जमीन कंपनी ने घेतली होती. एजंट लोकांना भरीला पाडून जमीन विकायला लावत होते. कोणत्याही दळणवळण, इतर सोयी नसल्याने शेती ही परवडत नव्हती. तरूण पिढी शहरात कामाला जात होती. आमच्या व्यवस्थापनात पाटील म्हणून बार्शीचा एकजण होता, फार घमेंडखोर ,व उध्दटपणे स्थानिक लोकांशी वागायचा. आमच्या भावकीत झालेल्या भांडणात आम्ही एका जणाचा भर बाजारात खून केला पण आमचं काही वाकडं झाले नाही हे तो वारंवार सांगायचा.
तिथला एक स्थानिक गावावरून ओवाळून टाकलेला माणूस होता, तो कंपनीला नडू लागला. अगोदर गावातील लोकांना फसवणे, मारहाण करणे, चोरी करणे हे प्रकार करुन लोकांना फार छळले होते. पण पाटीलला दम देतो म्हणल्यावर गाववाले खूष झाले. मला दुसरीकडे चांगली नोकरी मिळाली नि मी ही कंपनी सोडली.
त्यानंतर मला पंधरा एक दिवसांनी समजलेली हकिकत. पाटिलने त्या माणसाला गोड बोलून कंपनीत कामावर घेतले. रस्ता बनवण्यासाठी फायर लावून खडक फोडण्याचे काम चालू होते. फायरवाल्याने लोकांना दूर जा आवाज दिला, सगळे दूर गेले पण हा गुंड/दादा म्हणाला उडव फायर.‌मी नाही घाबरत व तो सुरक्षित अंतरावर गेला नाही. फायरवाल्याने सुरूंग उडवताच मोठा दगड दादाच्या छातीवर आदळला व दादा क्षणात ढगात गेले. दादा मेला हे पाहताच झाडून सारे स्थानिक जमा झाले. कंपनीत तोडफोड झाली व पाटीलला आम्ही जीवे मारू असे म्हणायला लागले, पाटील कसा तरी लपतछपत पळाला व पौड ला एसटीत शिरला, लोक त्याच्या मागे होतेच . लोकांनी खाली ओढला तर निसटून पोलिस स्टेशन मध्ये पळत गेला. पोलिसांनी त्याला वाचवलं. ही घटना पंचवीस वर्षांपूर्वी घडली होती. नंतर तर किती शेतकऱ्यांना भुमीहिन केलं असेल या एजंट लोकांनी.

मेरी मती मारी गयी थी, म्हणून piff मध्ये हा पिक्चर पहिला,
नंतर डोके जड झाले म्हणून पुढचे पिक्चर मिस करायला लागले .

चित्रपट तुकड्या तुकड्यात चमकदार वाटतो,
पण स्टोरी मध्ये खूप लूप होल्स वाटले,
उदा, बापाने दहशतीखाली शेती विकली, कळल्यावर नायकाचे त्याबद्दलचे मत बदलत नाही. पण तो ते करणाऱ्या गुंडाचा बदला घेतो.

शेती विकून देशोधडीला लागलेला नायक, ज्याची त्याला सल आहे, पुढे जाऊन इतर शेतकऱ्यांना देशोधडीला लावतो याचे लॉजिकल स्पष्टीकरण आले नाहीये.

शेवटचा तो raw material वाला ट्विस्ट उगाचच,
आधी वाटलेले त्या मुलाच्या माध्यमातून गुन्हेगारांच्या ग्लॅमर वर भाळणार्या पिढी बद्दल भाष्य असेल, पण ते काहीतरी तिसरेच निघाले.

कामे सगळ्यांचीच छान, ओम भूतकर लक्षात राहतो.