“ ऑटो रिक्षा पुराण... ”

Submitted by sarika choudhari on 4 October, 2018 - 05:37

ऑटो रिक्षात तर मी रोजच बसते पण ऑटो रिक्षा पुराण लिहायचा साक्षात्कार मला आजच झाला. सर्व कृपा त्या ऑटो रिक्षा महाराजांची. बोला ऑटोरिक्षा महाराज की जय.
तर मंडळी ऑटो रिक्षातील प्रवास म्हणजे एकदम झक्कास सवारी असते बघा. ऑटोरिक्षा चे आणि आपले अतुट नाते आहे. तशी मला आवडणारी सवारी आहे. कारण एकतर हवेशीर दुसर म्हणजे रस्त्यानी जाताना आजुबाजुच्या निसर्ग सौंदर्याचा आस्वाद घेता येतो. तुम्ही म्हणाल निसर्ग सौंदर्य मुंबईत कुठे. इमारती सौंदर्य म्हणू या हव तर. तर चला मग ऑटोतून एक चक्कर मारून येऊ या. ऑटोरिक्षातील ऑटो चालका पासून ते ऑटोरिक्षात बसणाऱ्यापर्यत विविध अनुभव तुम्हाला येतील.
सर्वप्रथम ऑटोरिक्षा चालाकांमधील विविधता पाहु या. काही ऑटोरिक्षाचालक इतके नम्र असतात की आपण म्हणू ती पुर्व दिशा. या रस्त्यानी चला तर लगेच “ हो साहेब.” असे नम्रपणाने ऐकतात.आणि काहीना तर नम्रपणा कशाशी खातात हेच माहित नाही. तुम्ही विनंती जरी केली तरी, मी ऑटोरिक्षा चालवणारा आहे. ( जणू देश चालवणारा पंतप्रधान मोदी ) या अर्विभावात तो असतो. शेवटी म्हणाव लागत बाबा रे स्टेशनला पोहचव मग कोण्त्याही रस्त्यानी ने. काहीचं तर विचारायला नको. कोणी मंदीरासमोर ऑटोरिक्षा थांबवतो आणि नमस्कार सुरू होतो. त्याच पाहुन आपल्यालाही उगाच वाटून जात. याला गडबड करायला नको देव पापा देईल. काही पान मंदीरासमोर थांबवुन “ विमल ” विकत घेऊन निवांत ती फोडून मुखात टाकतात आणि मग ऑटोरिक्षापुढे नेतात.
आता ऑटोरिक्षा चालवण्याच्या पध्दती वरून विविधता पाहू या. काही ऑटोरिक्षा चालक असे ऑटो चालवतात जणू विमानच चालवत आहे. आम्ही बापडे ऑटोरिक्षात जीव मुठीत धरून बसतो. आता कालच घ्या ना असा काही ऑटो चालवला की असं वाटल आता घरी पोहचतच नाही. नवऱ्याला फोन करून सांगावे, “बाबा रे हा माझा शेवटचा फोन.” पण फोन बॅगेतून काढु देण्याची संधी तरी देतो का हा महामानव. बर त्याला हळू चालव म्हटलं तर म्हणतो कसा बाई तुम्ही खुपच घाबरता. त्याला म्हटले “ दादा दहा रुपयात स्वर्गात जायचे मला परवडणारे नाही.” तर तो म्हणतो कसा “ हे माझे रोजचे काम आहे ताई. काही होत नाही, बिनधास्त बसा.” बसा काय. माझी शरीर प्रकृती पहीलेच बारीक त्यात हा असा काही ऑटोरिक्षा चालवत होता की मी बसले कमी उडतच जास्त होते. एवढया ट्राफीक मधून भरधाव ऑटोरिक्षा चालवणे काही सोपे नाही. ऑलम्पिक मध्ये ऑटोरिक्षा चालवण्याची स्पर्धा असती तर सर्व पदक भारतालाच मिळाले असते. हसताय काय खरच आहे. डोळयाची पाती लवते न लवते तर आपण स्टेशनला पोहचलो असु. ऑटोत बसलो होतो की जादुनी येथे आलो ते कळतच नाही.
आता या उलट काही असे ऑटोरिक्षा चालवतात की असे वाटत यांनी “Slow but steady wins the race” ही गोष्ट पाठच करून ठेवली आहे. काही म्हणा ऑटो मी अगदी हळुच चालवणार. “मेरा ऑटो, मेरी स्पीड” असच काहीस त्याचं असत. चालत गेलो असतो तर पोहचलो असतो अस वाटायला लागत. आपल्या पाठचे पुढे जातात. आणि पुढे जाऊन टोमणे मारतात. काय चौधरी माझ्या अगोदरच्या ऑटोत होता ना. तरी वेळ लागला. तेव्हा वाटतं याला याच ऑटोरिक्षात बसून मंत्रालयाच्या दहा चक्करा माराव्यात.
कधी कधी वाटत ऑटोरिक्षाला चालवण्याच्या स्पीड नुसार रंग दयावा भरधाव चालवणारे लाल रंग., हळु चालवणारे हिरवा रंग, आणि दोन्ही नाही ते पिवळा रंग. म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्या त्या ऑटोत बसावे. भारी कल्पना आहे ना. वेळ झाल की लाल रंगाच्या ऑटोत मस्त विमानी सफर करायचा.आणि निवांत जायच असेल तर हिरव्या रंगाच्या ऑटो निवांत मटर सोलत जायच.
येथे ऑटोरिक्षा चालक पुराण समाप्त. बोला ऑटो रिक्षा चालक महाराज की जय.
आता वळु या पुढील अध्याया कडे कलयुगातच काय तर सत्ययुगापासून व्यक्ती तितक्या प्रकृती पहायला मिळतात. त्यामुळे ऑटोरिक्षात सवारी करणारे काही कमी नाहीत. आमा हेच पहा ना पहील्यादां ऑटोरिक्षात बसणारा असा काही बसतो जणू ऑटोरिक्षाच पुर्ण भाडे तोच देणार आहे. आणि वरून सांगातत याच रस्त्यांनी ऑटोरिक्षा काढा. कारण का तो पहील्यांदा ऑटोरिक्षात बसला ना मग तो म्हणेल तिच पुर्व दिशा. ऑटोरिक्षात दोन्ही जर स्थुल व्यक्ती बसले तर माझ्या सारख्यानीच त्यात बसावे. बर थोडं सरका म्हणावं तर अश्या काही नजरेने बघतात की त्या स्थुल आहे यात आमचाच दोष आहे. पुरूष असेल तर मग विचारूच नका. काही तर असे बसतात का त्यांचा ऑटोरिक्षात बसण्याचा उद्देशच वेगळा असावा. ऑटोत बसल्यावर बरोबर त्यांचा फोन वाजणार मग मागच्या खिशातून फोन काढायचा आतोनात प्रयत्न करायचा आणि बाकीच्यांना ही नाहक त्रास द्यायचा. अश्या वेळेस ऑटोत बसण्यापुर्वी आपले पाकीट, फोन समोरच्या खिशात ठेवावे ही सुचना ऑटोत लिहायला हवी असे आमच्या सारख्या गरीब प्राण्यांना चुकुन वाटून जाते.
काही पुरुष तर जाणीवपुर्वक घरी बसल्यासारखे बसतात. पण अश्या त्रासाला कंटाळुन काही स्त्रीया एकतर अंग चोरून बसतात, तर काही धिटाईने बसण्यापुर्वीच निट बसा सुचना देतात (धक्का लागण्यापुर्वीच ) .आणि काही तर पुरुष बसत असतील तर पुर्ण भाडे देतात आणि मस्त एकटयाच बसून जातात . पण स्त्रीयाच अंग चोरून बसत नाही तर काही पुरुषही बिचारे अंग चोरुन बसतात. इतके अंग चोरतात की स्त्रीयांचा स्पर्श यांना वर्ज असावा अस वाटत.
बरं काहीप्राणी जरा अतिशोयक्तीच करतात. आता हेच पाहा ना सकाळी ऑटोरिक्षात बसले.तेवढयात मध्यमवयीन जोडप पण ऑटोत बसलं. बरं बाई बसल्यावर मला सरकवयाला लागली. बरं मी मघा सांगीतल्याप्रमाणे किरकोळ प्रकृतीची त्यात ती दोघही ठीकठाक म्हणजे आम्ही ऑटोरिक्षात व्यवस्थीत बसणार. नवरा तिच्याच बाजुला बसलेला तरी ही बया नवऱ्याला आत बसा, बरोबर बसा, सरका अलीकडे.....अश्या सारख्या सुचना देत होती. बर ऑटोरिक्षा चालू झाल्यावरही बाईच्या सुचना सुरूच. बरोबर बसला ना ...पाय आत घ्या. पाच वर्षाच्या मुलालाही आपण इतक्या सुचना करणार नाही. मला तर असं वाटायला लागल की आता ही बाई नवऱ्याला मांडीवरच बसवते की काय. नवऱ्यावर एवढं प्रेम मी पहील्यांदा पाहील आणि तेही ऑटोत....जीवन धन्य धन्य झालं.
ऑटो म्हणजे एक मनोरंजनाच साधन पण असू शकत. एखाद्या वेळेस घरात बसून कंटाळा आला तर मस्त ऑटोतून फेर फटका मारा. कमी पैश्यात भरपुर मनोरंजन. ऑटोत बसणारे आपण कुठे बसलो याच भान ठेवत नाही. घरातील गोष्टी मोबाईल वर बोलतात. कालचच घ्या ना एक बाई बसली आणि फोन लावला. फोन उचलला नसावा बहुदा....उचलल्यावर काय हो कुठे गेला होता...बर ते जाऊ द्या भाजी काय आहे घरात...आणि हे काय असं काय बोलता....त्यात आवाज कट झाला...लगेच बाई इकडुन काय माणुस आहे ..फोन वरही निट बोलत नाही...असं म्हणून स्वत:शीच बडबड करत होती. आता काय बोलाव......सांगा.
एकदा ऑटोरिक्षात एक जोडप आणि त्यांचा चार वर्षाचा मुलगा बसला. मुलगा खुप बडबड करत होता. थोड्या वेळानी म्हणाला आई तुला माहित आहे तू घरी नसताना बाबा तुला वेडी म्हणतात. स्टेशनला पोहचेपर्यंत ऑटोरिक्षात स्मशान शांतता.
येथे ऑटोरिक्षात बसणाऱ्यांचे पुराण समाप्त. बोला ऑटो रिक्षा चालक महाराज की जय.
आता या पुराणाचा शेवटचा अध्याय. निट लक्ष देऊन ऐका. हा अध्याय वाचल्यावर जीवनाचे सार्थक होईल. जिथे माणुसकीवर माणसाचाच विश्वास उडत चालला आहे. पण आपले ऑटोरिक्षा चालक मात्र वेळ आली की माणुसकी अजुनही जिवंत आहे हे दाखवुन देतात. एकदा मी पुण्यावरून वांद्रे स्टेशनला आल्यावर ऑटोरिक्षा मिळेल की नाही ही शंका होती. कारण रात्री आमच्या भागात यायला ऑटोरिक्षावाले तयार होत नाही. मी एकादोघांना विचारल पण कोणी तयार होईना. मी बराच वेळ उभी होती. तेवढयात एक ऑटोरिक्षावाला आला. बाजुला उभा असलेला मुलगा ऑटोरिक्षात बसला. त्यात एक मुलगी अगोदरच बसली होतीच. त्यांनी मला विचारले व लगेच त्या मुलाला उतरवले व मला बसायला सांगितले. माझा चेहऱ्यावरील तणाव पाहून त्यांनी मला बसवले बहुदा. व त्या मुलीला दुसाऱ्या भागात जायचे असतानाही आम्हाला दोघींनाही त्यांनी घरापर्यंत पोहचवले. मी पैसे जास्त देण्याच प्रयत्न केला पण तो नाही म्हणाला . तुम्ही घाबारलेल्या दिसला म्हणून त्या मुलाला उतरवुन तुम्हाला बसवले. तुम्ही सुखरुप पोहचला यातच सर्व आलं.
तर मंडळी मजा आली ना ऑटोरिक्षा सवारीची. अशीच मजा रोज घेत रहा. पहा तुमचा अर्धा तणाव तर ऑट रिक्षा चालक महाराजच दुर करतील.
“इति ऑटोरिक्षा महात्म्य समाप्त. बोला ऑटो रिक्षा चालक महाराज की जय.”

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

मस्त लिहलय. ऐकदम गमतीशीर. मजा आली वाचतांना.

"मला तर असं वाटायला लागल की आता ही बाई नवऱ्याला मांडीवरच बसवते की काय. नवऱ्यावर एवढं प्रेम मी पहील्यांदा पाहील आणि तेही ऑटोत....जीवन धन्य धन्य झालं".->>>>हे भारीच.

शुद्धलेखनाच्या भरपूर चुका आहेत
नवीन Submitted by टकमक टोक on 4 October, 2018 - 17:42
<<
कुणाला कश्याचे..तर......
---

बाकी लेख एकदम भन्नाट जमलाय ! Happy

धन्यवाद , मी पहिल्यांदा मायबोली वर लिहीत आहे. सर्वांनी छान प्रतिसाद दिला. आपल्या सर्वाचे खुप खुप आभार. असेच प्रोत्साहन देत रहा..........

छान जमलाय हा लेख.

फक्त ते "बोला ऑटो रिक्षा चालक महाराज की जय." मधेमधे नसतं आलं तर बरं झालं असतं.े

<<< आई तुला माहित आहे तू घरी नसताना बाबा तुला वेडी म्हणतात. स्टेशनला पोहचेपर्यंत ऑटोरिक्षात स्मशान शांतता. >>> हे खूप भारी आहे. Happy

<<< तुम्ही घाबारलेल्या दिसला म्हणून त्या मुलाला उतरवुन तुम्हाला बसवले. >>> मुंबईत नवीन आहात काय? मुंबईतल्या मुली रात्री 12 वाजता पण एकट्याने रिक्षाने बिनधास्त जातात.

उपाशी बोकोबा. . .हो , मुंबईत ४ वर्ष झाली पण ७ नंतर घरी यायची कधी वेळचं आली नाही. त्यामुळे जरा घाबरते

अनिरुध्द ,चुका सुधारण्याचा प्रयत्न करेल...तुम्ही सर्व असल्यावर धडपडत का होईना पण लिहीण्याचा प्रयत्न करेल

मजेशीर आहे. Happy
स्टेशनला पोहचेपर्यंत ऑटोरिक्षात स्मशान शांतता व बसले कमी उडले जास्त >> हे फार हसवुन गेले.

छान आहे.

मराठी स्पेल चेक साठी फायरफॉक्स वर हे जोडून घ्या.

https://addons.mozilla.org/en-us/firefox/addon/marathi-dictionary/

म्हणजे परत कधी 'लेखनात चुका आहेत' असा शेरा यायला नको!

आता फायरफॉक्स वापरून लिहीत राहा!!

छान बारकावे टिपलेत ....

ऑटोरिक्षाला चालवण्याच्या स्पीड नुसार रंग दयावा भरधाव चालवणारे लाल रंग., हळु चालवणारे हिरवा रंग, आणि दोन्ही नाही ते पिवळा रंग. म्हणजे ज्याच्या त्याच्या सोयीनुसार त्या त्या ऑटोत बसावे. भारी कल्पना आहे ना. वेळ झाल की लाल रंगाच्या ऑटोत मस्त विमानी सफर करायचा.आणि निवांत जायच असेल तर हिरव्या रंगाच्या ऑटो निवांत मटर सोलत जायच.

आडिया वाईट नाही .