वर्क फ्रॉम होम बद्दल माहिती हवी आहे

Submitted by स्मितस्वप्न on 19 October, 2018 - 04:31

नमस्कार,
मी मायबोलीवर नवीन आहे. सध्या वर्क फ्रॉम होम चा option शोधत आहे. तरी याबाबत कुणाला काही माहिती असल्यास कळवावी.
काम genuine असावे, कारण पेपर मध्ये येणाऱ्या जाहिराती आणि नेटवर दाखवणार्या जाहिरातींवर खूप पैसे खर्च झाले आहेत, पण सगळे पैसे वाया गेलेत. कधी टार्गेट पूर्ण होत नाही तर कधी खूप चुका काढून पैसे मिळत नाहीत.
कोणाला genuine वर्क फ्रॉम होम बद्दल माहिती असल्यास कळवावी.

Group content visibility: 
Use group defaults

स्किलसेट काय आहे? आठवड्याला किती तास देण्याची तयारी आहे? घरी चांगला लॅपटॉप्/माईक सेटप आहे का?
(काही ऑप्शन्स माहित आहेत ते व्यक्तीगत निरोपातून सांगेन.माझे व्हेंचर नाही.)

काही टायपिंग ची व transcribing ची कामे केलेली आहेत. लॅपटॉप आहे. रोजचे चार पाच तास देऊ शकते.

मी मराठी आणि इंग्रजी टायपिंग केले आहे. मला पण वर्क फ्रॉम होम ( डेटा एन्ट्री, टायपिंग) बद्दल माहिती हवी आहे. इंटरनेट वर बऱ्याच वेबसाईट आहेत पण त्याबाबत कितपत विश्वासार्हता बाळगावी याबद्दल मी साशंक आहे. मी मायबोली वरील लेखन नेहमी वाचते म्हणून वाटले की इथे मला नेमकी आणि खरी माहिती मिळू शकेल. किंवा इथे कोणी मायबोलीकर मला अश्या प्रकारचे काम मिळवून देऊ शकतील का?

@ स्मितस्वप्न
माझ्याकडे कायमचे काम नाही, पण तुम्हाला छोट्या प्रोजेक्टपुरते काम करायचे असेल तर संपर्क करा.
साधारण ५७,००० रेकॉर्ड गव्हर्मेंटच्या वेबसाईटवरून एक्सेल मध्ये कॉपी-पेस्ट करायचे असे साधारण कामाचे स्वरूप आहे आणि डेडलाईन नाही. प्रत्येक रेकॉर्डमध्ये साधारण २५ कॉलम असतील, जे एक्सेलमध्ये फक्त कॉपी-पेस्ट करावे लागतील.

तुम्हाला घरी काँप्युटर आणि इंटरनेट लागेल. काम मिळवण्यासाठी मला पैसे देण्याची गरज नाही. पुण्यात किंवा मुंबईत रहात असाल तर कामाचे पैसे तुम्हाला प्रत्यक्ष मिळण्याची सोय करता येईल, अन्यथा ऑनलाईन पाठवावे लागतील. किती पैसे अपेक्षित आहेत, ते कळवा आणि संपर्क करा.

याव्यतिरिक्त मला रुबी ऑन रेल प्रोग्रामरची गरज आहे. घरून काम करावे लागेल आणि सपोर्टशिवाय (म्हणजे कुणाच्याही मदतीशिवाय) स्वतःचे स्वतः वेबसाईट डेव्हलपमेंटचे काम करावे लागेल.

@ पैचान कौन
मलाही कॉपी-पेस्ट किंवा Data Entry (इंग्लिश) चे काम part time (घरून) असेल तर please सांगाल का?
धन्यवाद
राजेंद्र

संपर्कातून माझा mobile Number व email address पाठवत आहे.