आली माझ्या कार्यालयात दिवाळी..

Posted
14 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
14 वर्ष ago

इथे सिंगापुरात पेशवाई नावाचे एक मराठी दुकान आहे. त्यांच्याकडचे फराळ इतर दुकानात मिळणार्‍या फराळाच्या तुलनेने खूपच छान असते. खरे तर दिवाळीचा फराळ आणि नेहमीचे गोड्धोड यात किती फरक असतो हे मराठी लोकांना सांगणे न लगे.
13.jpg

दरवर्षी दिवाळी संपली की पेशवाई मधे कैकदा उरलेले फराळाचे डबे मला दिसत आणि जरा खंतच वाटायची कारण नंतर ते डबे विकले जायचे की नाही कुणास ठावूक. यावर उपाय म्हणून मी मागिल वर्षी ऑफीसमधील काही जणांना पेशवाई सुचवून पाहिले. त्यांना ते दुकान फारचं आवडले. त्यांच्या उत्तम प्रतिक्रिया ऐकून मग आम्ही सर्वांना आमच्या कार्यालयातीन मलय, चिनी, फ्रेन्च, ईटालियन आणि खास म्हणजे भारतीय लोकांसाठी मराठी फराळ मागविला. काल दुपारी मी आपण असे करू का विचारले आणि संध्याकाळ पर्यंत मग बेत पक्का झाला. सर्व तयारी मीच केली. सर्वांना आपला मराठी फराळ फारचं आवडला Happy त्यावेळेसचे काही प्रकाशचित्र खास तुमच्यासाठी Happy

06.jpg02.jpg17.jpg57.jpg68.jpg

बी, मस्त उपक्रम. Happy टेबल तर झकास सजवले आहेस.
मराठी फराळाची ओळख सिंगापुरी लोकांना करून द्यायची तुझी कल्पना छान वाटली.

बी , दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा .
मराठी / भारतीय फराळाच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल अभिनंदन .

ही आयडीया भारी, फराळ सगळ्यांसाठी मागवल्यामुळे एकदम दिवाळीचे वातावरण तयार झाले असेल ना ऑफीसमध्ये.

हो ना.. सकाळची १० ची वेळ होती. पँट्रीच्या खिडकीतून कोवळे ऊन आत शिरत होते. मी फराळाचा टेबल लावत होतो. मी आधी एक अगरबत्ती लावली आणि मग दिवे लावले. एकदम प्रसन्न वाटले. असे वाटले आकाशकंदील पण लावायचा असता. सर्व जण तयारी पाहून आणि मेनू चाखून अगदी थक्क झाले. काहीच नाही उरले.

बी, हे एकदम मस्त केलेस. आपली संस्कृतीची ओळख करून देतोस ते. Happy
माझ्या ऑफीसमध्ये सुद्धा सगळ्यांना दिवाळी माहीतीय्(म्हणजे फ्रेंच्,इटालियन, अमेरीकन वगैरे वगैरे नॉनदेसीजना). माझा बॉस सुद्धा म्हणाला,पाहिजे तर लवकर घरी जा आज. सोमवारी कूकीज,काजूकतली घेवून ये. Happy
कॉस्कोच्या कृपेने बॉसने फुकटात बरेच नानकचे काजू रोल्स,काजूकतली वगैरे रवीवारी शॉपिंगला गेलो असताना खाल्ले सांगत होता. Happy

बी, शुभ दिपावली!
>>मराठी / भारतीय फराळाच्या प्रचार आणि प्रसाराबद्दल अभिनंदन .

अगदी हेच म्हणते!

छान उपक्रम बी. आमच्या कार्यालयात आज दिवाळी करता स्पेशल भारतीय डिजर्ट ठेवलय आणि बाहेर टेबलावर पणत्या वगैरे लावुन दिवाळी बद्दल माहिती मोठ्या फलकावर लावली आहे.

सहीच् मस्त साजरी केलीत दिवाळी!!...आम्ही इथे ईटालियन केक आणुन साजरी केली. असाच फराळ इथे पण मिळो.

सही रे बी! 'महाराष्ट्रधर्म वाढवावा!'. Happy
पेशवाईतल्या चकल्या, कडबोळी जबरी आहेत! त्यांनी बनवलेला सर्व माल फन्ना झाल्यास नवल वाटणार नाही.

धन्यवाद!
एक गम्मत म्हणजे काही अभारतीय लोकांनी मला कोक वगैरे विचारले आहे का... मी कल्पनाही केली नव्हती की कुणी कोक वगैरेची अपेक्षा ठेवेल. त्यावर मग मी उत्तर दिले पुर्वी कोक वगैरे प्रकार नव्हते त्यामुळे मी परंपरेचा मान ठेवून कोक नाही ठेवले Happy

बी, इथल्या लोकांना सहसा कोरड्या पदार्थांबरोबर अथवा नेहमीच्या जेवणाबरोबरही काही पेय पिण्याची सवय दिसून येते. फूडकोर्टांमध्ये जेवतानादेखील लोक चहा/कॉफी, कोक वा तत्सम पेयांचा कॅन आणि बर्फाचा ग्लास घेऊन जेवायला बसलेले तू बघितले असशीलच.
वर दिसणारा मराठी पद्धतीचा फराळ बर्‍यापैकी कोरडा असल्याने कदाचित लोकांनी कोक वगैरे पेयाची विचारणा केली असावी.

छान उपक्रम बी! माझा मुलगाही शनिवारी ऑफिसला फराळाचे घेऊन गेला होता. बेसनाच्या लाडवास़कट सगळ्याचा फडशा पडला. इंडियन फूड म्हणजे पंजाबी स्टाईलचे असाच समज असतो. आपले पदार्थ लोकांना माहीतच नसतात.

बी, सहीच रे..
चकल्या खावून गोर्‍यांनी हाय हाय केले की नाही.
मी अमेरिकेत माझ्या एका कलीगला दिली होती चकली खायला. दोन तुकड्यांत डोळ्यांत पाणी आणून
नाचायाला लागली हाय हुय करत. Proud

बी चान्गली साजरी केलीस दिवाळी
अन फोटो काढून इथे शेअर करुन अधीक मजा आणलिस
नेक्स्ट टाईम किमान "लिम्बूसरबत" तरी ठेव जमल तर!

Pages