माळढोक पर्वाचा अंत झाला

Submitted by सिद्धेश्वर विला... on 8 October, 2018 - 10:31

माळढोक पर्वाचा अंत झाला

आता हळूहळू माळरानही संपेल

अशीच भूक वाढत राहिली

तर उद्या फक्त माणूसच उरेल

तो डौलदार असेल ,

रुबाबदार असेल

तो कसा होता ?

ते मात्र आता पुस्तकात दिसेल

त्याचाही पुतळा बनेल

निर्लज्जासारखे रोवत सुटतील त्याला

प्रत्येक बागेत

किंवा करतील त्याची पेंग्विनसारखी थुकदाणी

आणि लीहितील त्यावर " माझा खाऊ मला द्या "

मी फक्त ऐकलं होतं त्याच्याबद्दल

भरभरून मिळणाऱ्या अनुदानाबद्दल

निसर्गप्रेमींच्या त्यागाबद्दल

अन गहाणवट पडलेली सरकारी अक्कल

अखेर बघायचं राहूनच गेलं त्याला

माळरानाच्या माळेतला कोहिनूर निखळला

तो जाताच क्षणी , लांडग्याने नंबर लावला

एकदा का त्याला कायमचा गिळला

मग प्रगतीचा मार्ग मोकळा झाला

): प्रगतीचा मार्ग मोकळा झाला ):

सिद्धेश्वर विलास पाटणकर

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

किंवा करतील त्याची पेंग्विनसारखी थुकदाणी

आणि लीहितील त्यावर " माझा खाऊ मला द्या " ....हम्म!

कसा धन्यवाद देऊ , या सांत्वनाला

माळढोक महाराष्ट्रातून निघून गेला

आज महाराष्ट्रातलं माळरान पोरकं झालं

चला दोन अश्रू गाळूया

दोन मिनिट श्रद्धांजली फक्त

पुढं अजून कोण संपतंय ते पाहूया ( आता लांडगा असेल बरं का )

पुन्हा तेच नवीन मुखवटा घातलेले ( अ डा ण * ट सरकार )

पुन्हा दोन अश्रू

पुन्हा दोन मिनिट श्रद्धांजली

पुन्हा पुढं जायचं

असंच पुढं पुढं करत करत

एकमेकांचं थोबडे बघायचं