अचूक भविष्यासाठी

Submitted by रमेश रावल on 24 August, 2018 - 05:33

मला लहानपणापासून ज्योतिषाची आवड आहे. प्राथमिक धडे मी माझ्या काकांचा कडून घेतले. पण मी आपला नव्या पिढीचा नवा ज्योतिषी त्यामुळे मी नवमांश कुंडली,चंद्र कुंडली पुढे कृष्णमूर्ती पद्धत शिकल्याने सब , दशा - गोचर इत्यादी सर्व पाहायचो ( अजून अष्टकवर्ग बल,भाव-भावेश नियम बरेच आहेच )
हे सर्व अचूक उत्तर देता यावे यासाठी धडपड...
पण जेंव्हा मी माझ्या काकाजवळ हि गोष्ट बोले तेंव्हा ते म्हणत, जर तू जास्त गणिताच्या खोलात शिरलास तर त्यातच अडकून पडशील..
हे शास्त्र शिकून लोकांना उपयोगी कधी पडणार..
मी अनुभवलंय माझे काका फक्त साधी कुंडली,नवमांश व गोचर एवढच बघायचे आणि त्यांची उत्तरे ९०% पेक्ष्या जास्त बरोबर यायची .. ना अष्टकवर्ग, ना इतर षोडशवर्ग कुंडल्या , ना सब , ना बाकी काही...
इतर ज्योतिषांचे काय मत आहे

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

बंडूचे बाबा आज मध्यरात्री मरणार आहेत असे ज्योतिषाने सांगितले. सकाळी बाबा जिवंत होते पण दूधवाला गेल्याची खबर आली. जर गणितं नीट सोडवली असती तर अचूकता आणता आली असती.

He paha sadgruhastaho...mi ha prashna jyotish abyasakanna vicharla aahe...tumhi ekhada niyam vichara jyotish daha sangtil... koni mhanel navmansh paha koni mhanel astakvarg, koni Lal kitab sangel koni jameni , yat navin jyotish abyasak adakun padlya mul achuktesathi nemak Kay pahayala,shikayla have te mahatvache...mazhe kaka mhanat Durga devichya ashirvadane mazhe khare yete bhavishya...pan shtrala ashi upasana nako asaye ...pahije asato to niyam .... Jar tumacha ya shatravar vishwas nasel tar yethe abhipray nahi dilat tari chalel...

@प्रीत००९
हो आहेत पण आत्ता त्यांचे वय झाले आहे..आमच्या गावात एकजण पंचपक्षी विद्या जाणतो हे कळाले. नेमकं काय असतं हे जाणून घेण्यासाठी
मी व माझे मित्र त्यांच्या घरी गेलो होतो ते घरी नव्हते असे त्यांच्या बायकोने सांगितले व विचारले कि काय काम आहे. मी काही नाही असे बोलून परत दुसऱ्या दिवशी गेलो तेंव्हा ते शेतात गेले होते. त्यांची बायको म्हणाली काय झालं तुम्ही काल पण आला होता काही बोल्ला नाहीत. मी म्हणालो आम्ही भेटतो त्यांना शेतावर जाऊन. त्यांची बायको म्हणाली तुम्ही असे दोघे तिथे आलाय मला काळजी वाटते नक्की काय झालंय सांगा. त्यांनच्या जीवाला उगीच घोर नको म्हणून मी सांगितलं कि मला पंचपक्षी विद्या शिकायची आहे म्हणून आलो होतो.
त्या म्हणाल्या कुणाचा रे तू.. मी सांगितलं रावळाचा.. शंकर रावळ माझे काका .. तेंव्हा त्या म्हणाल्या
तुझा काका पंचक्रोशीत प्रसिद्ध असताना आमच्याकडे कसा आलास?

सांगण्याचं तात्पर्य हेच कि मी माझ्या काकांकडे ज्योतिष शिकतोय म्हंटल्यावर मी त्यात तरबेज असे खूप जणांचा गावीही समज आहे
पण वस्तुस्थिती हि आहे कि काकांचे भविष्यातील अचूकता त्यांच्या उपासनेमुळे आहे व आपली उपासना दुसऱ्याला देता नाही येत... त्यामुळे ते मला स्वतासारखे तरबेज नाही करू शकत
त्यासाठीच वरील प्रश्न मी विचारला आहे कि उपासना सर्वांनाच माझ्या काकासारखी नाही करता येणार.. आणि मी ज्योतिषाला एक विज्ञान म्हणून पाहत आहे तिथे निश्चित सूत्र,नियम हवेत.. त्यासाठी काय करावे हे ज्योतिषांना विचारले आहे.. त्या बाबतील कृष्णमूर्ती पद्धत खूप उपयुक्त आहे. पण त्यातहि काही उणिवा आहेत. तो विषय मोठा होईल म्हणून इथे टाळतो.

रमेश जी माझे कुटुंब व मी अत्यंत त्रासात आहोत.मला पत्नीला कालसर्पयोग आहे. तसेच काही जण म्हणतात पितृदोष आहे. तेव्हा मला त्यांना भेटायचं आहे. कृपया मदत करावी.
धन्यवाद.

@प्रीत००९
मी वेगळ्या अर्थाने प्रश्न चालू केला होता. वयक्तिक प्रश्न व उत्तरे या साठी नाही
तरीही तुम्ही अडचणीत असाल तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो मला या नंबर वर संपर्क साधा ९१५६१३४३४८(कृपया व्हाट्सअप करा कंपनीमध्ये कॉल कदाचित receive नाही करू शकणार )
असा माझा संपर्क दिल्याने कदाचित हा जाहिरातीचा प्रकार काहींना वाटेल तर मी अगोदर स्पष्ट करतो
माझे काका काहीही फी घेत नाहीत.. गावातील लोक अगदी तास तास बसून १०रुपये देणारे आहेत तरी कधी त्यांनी ठराविक अशी फी नाही मागितली
आत्ता माझा सुरवातीला संपर्क देण्यामागील हेतू हा कि काही लोक्काना ज्योतिषाची चेष्टा करायची असते. मी अनुभवलंय ते पण त्यांचे वय लक्षयात घेता त्यांच्या बाबतील तसे नको व्हायला. खरंच तुमची अडचण असेल तर त्यांना कॉन्टॅक्ट करा..

रमेश,
इथे टीका, निंदा करणारे आहेत तसे ते सगळीकडेच असतात. ज्याअर्थी मायबोली प्रशासनाने ज्योतिष भविष्य हा विभाग उपलब्ध करुन दिला आहे, त्याअर्थी ज्योतिषविषयक लेख, चर्चा करण्यावर प्रशासनाचा आक्षेप नसावा.
मीदेखील फलज्योतिषाचा अभ्यास करत आहे. या शास्त्राचे बरेच पडताळे येतात.
वर तुम्ही पंचपक्षी विद्येचा उल्लेख केला आहे. त्यावर श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे महाराज यांनी एक छोटासा ग्रंथ लिहिला आहे. त्याच्या श्लोकांचे मराठीत भाषांतर केल्याची एक PDF मला नेटवरून सापडली. थोडे गुगल करुन मी तुम्हाला लिंक देतो.
त्या PDF च्या आधारे तुम्हास काही शिकता आले, समजले तर पाहा. ज्याअर्थी श्री टेंबेस्वामींनी या विषयी लिहिले आहे, म्हणजे ते नक्कीच उपयोगी असेल.
मी सध्या फलजोतिष नीट शिकून पाया भक्कम करु पाहत आहे, शिवाय इतर काही करायला वेळही नाही त्यामुळे पंचपक्षीची माहिती वरचेवरच वाचली. समजून घ्यायला वेळ लागेल असे वाटते.

http://www.shrivasudevanandsaraswati.com/Wangmay.php

या लिंकवर. रजिस्टर करा. डाउनलोड करायला लिंक मिळेल. नाहीतर मला तुमचा मेल आयडी कळवा. मी इ मेल करीन

धन्यवाद गमभन
त्या लिंक वर पुस्तकाचे नाव दिसले पण डाउनलोड च्या url ला redirect नाही झालं
कृपया या मेल वर पाठवा :-ramesh.510rawal@gmail.com

@michto
mail id द्या pdf पाठवतो. हे ज्ञान सर्वांना मिळावे व याचा प्रचार व्हावा असे मला वाटते.
उगीच ज्योतिष खरे कि खोटे हा वाद घालण्यापेक्षा सर्वानी मिळून का शिकू नये,समजावून घेऊ नये,आपापल्या अनुभवावर तपासून पाहू नये?
याच हेतूने मी youtub वर परिपरिक ज्योतिष माहिती देण्यास सुरवात केली आहे. हेतू दोन कि माझा हि मध्ये राहिलेला अभ्यास चालू व्हावा व इतरांना
ज्यांना हे शास्त्र शिकायचे आहे पण वेळ मिळत नाही क्लास लावायला किंव्हा भरमसाट फी देणे जमत नाही त्यांना हि माहिती मिळावी.
त्या निम्मिताने ज्योतिष अभ्यासकांची ओळख वाढावी व ज्ञानाची देवाण घेवाण व्हावी.
पण दुर्दैवाने मला नमूद करावेसे वाटते कि या पवित्र क्षेत्रात खूप घाणेरडे राजकारण हि चालते. लोक्काना योग्य मार्ग न दाखवता,भीती दाखवून पैसे
उकळले जातात. त्यात कोणी असे फुकटात हे शास्त्र शिकवन्याची भाषा करत असेल तर त्याला तसे करू दिले जात नाही, भ्रामक समजुती पसरवल्या जातात.
म्हणून ज्यांना या शास्त्रा विषयी आवड आहे , शिकायचं आहे त्यांच्या साठी आपण हा विषय continue करूया असे मला वाटते.
इथे पुढील लोक्कांचे स्वागत असेल
१. जे लोक या शास्त्राला मानत नाहीत,त्यांच्याकडे काही प्रश्न आहेत व उत्तरे जाणून घेण्याची उसुक्ता आहे आणि त्यांच्या मनात असलेल्या प्रश्नासंदर्भात ते चर्चा करू इच्छितात.
२. जे ज्योतिषी आहेत व त्यांना हे सेवा भावाने करायचे आहे ज्ञानाची देवाण घेवाण करून ज्ञान वाढवायचं आहे.
जे जे आपणासी ठावे। ते ते इतरांसी सांगावे। शहाणे करुन सोडावे। सकळ जन।। या कॅटेगरीतले..
३. जे नुकतेच शिकत आहेत, शिकण्याची इच्छा आहे.
पुढील लोक्कानी न यावे असे वाटते
१. जे लोक या शास्त्राला मानत नाहीत,तशी पूर्ण त्यांना खात्री आहे व कधी मानण्याची तयारीहि नाही व निव्वळ वादा साठी येऊ पाहणारे.
२. वयक्तिक प्रश्न विचारू पहाणारे.

कोणाला इंटरेस्ट असेल तर अभिप्राय द्यावा.. एखादी कुंडली वरून एखाद्या गोष्टीवर विचार विनिमय करावा
उदाहरणार्थ माझा प्रश्न :- परदेशगगमन कोणत्या भावावरून व योगावरून पाहतात ? दिनांक ५नोवेंबर १९८४ सायंकाळी १९:०३ मिनिटे फलटण जिल्हा सातारा. हि व्यक्ती खूप प्रयत्नाने परदेशी नोकरीसाठी गेली. परदेश गमनाची तारीख ३जानेवारी२०१२.
हि व्यक्ती २००८ पासून जाण्यासाठी धडपड करत होती. तर या कुंडली वर विचार करून ती नेमकी याच कालावधीत का गेली , कोणत्या योगामुळे गेली
यावर चर्चा व्हावी. असे मला वाटते..