नो प्रोब्लेम ...

Submitted by यशू वर्तोस्की on 3 August, 2012 - 12:27

प्रत्येक प्रोब्लेम्ला उत्तर हे असताच. ते सोडवायला कधी वेळ हवा असतो , कधी पैसा हवा असतो तर कधी मानसं . या तीन गोष्टींच्या टप्प्या पलीकडला प्रोब्लेम अस्तित्वातच नसतो ....वपुर्झा ..व . पु . काळे यांनी काही वर्षांपूर्वी या ओळी लिहिल्या आणि प्रोब्लेम्स कडे पाहायचा आपला नजरीयाच बदलून गेला.
त्या आधीचा माझं जगणं म्हणजे ' बाहर है प्रोब्लेम घरमे है प्रोब्लेम ...आगे पीछे आजू बाजू प्रोब्लेम हि प्रोब्लेम ' असे होते.
मला आठवतंय लहानपणी शाळेत असताना गणित हा विषय म्हणजे माझं शत्रू नंबर वन . उदाहरण संग्रह सोडवून तयार ठेवणे हा माझ्या समोरचा मोठा प्रोब्लेम असे. तेंव्हा मी विचार करीत असे कि देवा काही तरी जादू होवूदे आणि मी मोठा होवू दे म्हणजे गणिते संग्रह सोडवून तयार ठेवण्यापासून माझही सुटका होईल . त्या वेळी मनावर इतका ताण असे की मला रात्री झोपेत स्वप्नात सुद्धा गणिताच्या बाकरेबाई दिसत ( अर्थातच छडी घेवून मला चोपताना ). यथावकाश पुढच्या वर्गात गेल्यावर हे असे प्रोब्लेम म्हणजे अगदी हास्यास्पद वाटू लागतील असे नवीन प्रोब्लेम सुरु झाले . मार्क मिळवणे , ११ वी , डिग्री ची अडमिशन . त्यानंतर परत प्रत्येक ठिकाणी परफॉरमन्स . कधी पिकनिकला जायला घरातून पैसे मिळत नसत किंवा परीक्षेत मार्क मिळत नसत दोन्हीही प्रोब्लेमच.
पुढे नोकरीला लागल्यावर कचेरीत जे अनुभव आले त्यापुढे अभ्यास करणे खूपच सोपे असे वाटू लागले आणि तेंव्हा मार्क मिळवणे हा आपल्या पुढचा प्रोब्लेम होता हे जाणवून हसू येवू लागले .
माझा आणि स्वातीचा प्रेम विवाह ...वाचायला मस्त आणि रोमांटिक वाटते, पण आई वडिलांना हे सांगणे ( त्यांना बाहेरून कळण्याच्या आधी ) म्हणजे मोठेच अग्नीदिव्यं . " इकडे कमवायचा पत्ताच नाही आणि प्रेमं करतायत " वगैरे असे संवाद ऐकावे लागतील किंवा घराबाहेर काढतील असे उगीचच वाटत राही आणि मनावर ताण येत असे, त्यात अंतर जातीय म्हणजे त्यावर कळसच. त्या वेळी मस्त कविता वगैरे वाचणे किंवा गजरा घेणे , एकाच शहाळ्याचे पाणी पिणे करण्याचे सोडून आम्ही दोन दोन तास फक्त याचा विचार करून घाबरण्यात घालवत असू . यथावकाश लग्न ठरले आणि त्याच सुमारास सुरतेचा प्लेग सर्वदूर पसरित होता , मुंबई मध्ये हि या रोगाचे बळी गेले होते. माझ्या कचेरीतील सहकारी मला सांगत " या रोगाची एकदा बाधा झाली की माणूस एकदम वरच " परत माझ्या पोटात गोळा , देवाशाप्पात सांगतो की माझी फिरतीची नोकरी होती आणि टेरिटरी नेमकी गुजरात आता मी बोहोल्यावर उभा राहतो की नाही एक नवा प्रोब्लेम समोर उभा आणि आता ते आठवून खो खो हसत बसतो. प्रोब्लेम झाले नाहीत असे नाही पैशाची कमी , सेटल नसणे , असे अनेक प्रश्न दररोज समोर उभे ठाकत होते आणि आम्ही त्याला कसे तोंड दिले ते आता आठवत देखील नाही.

या अनुभवातून आम्ही असे शिकलो की कोठलाही प्रोब्लेम असो त्या परटीक्युलर वेळेस खूप मोठा वाटत असतो परंतु ती वेळ निभावून गेल्यानंतात काही काळाने अगदी सामान्य वाटू लागतो. आता याचे कारण त्याचा प्रभाव कमी झाला किंवा आणखी मोठा प्रोब्लेम पुढे आला असे वाटते. ( आता याला प्रोब्लेम्स म्हणायचे की तात्कालिक ताण तणाव ). म्हणजेच वेळ हे या गोष्टीवरचे औषध असते.

आता मोठे झाल्यावर आपल्या मुलांचे वागणे , त्यांचे शिक्षण, करियर , आपल्या पालकांबरोबरचे आपले संबंध , कधी कधी आपल्या जोडीदारा बरोबरचे आपले संबंध , जोडीदाराला जडलेली व्यसने आणि त्यातून येणारे आर्थिक आणि मुख्यतः सामाजिक ताण तणाव , हे काही लॉंगटर्म प्रोब्लेम असू शकतात पण नीट शांतपणे विचार केल्यावर आपल्याला हे नक्की जाणवेल ..की याला काळानुसार सोल्युशन मिळणारच , अगदी लगेच नसेल पण काही काळानंतर सोल्युशन नक्की मिळणार .

कर्ज वगैरे प्रोब्लेम पैशाने सुटतात , काही प्रोब्लेम काळ गेल्यावर सुटतात , काही प्रोब्लेम योग्य माणसे बरोबर असतील त्यानेही सुटतात . परंतु याकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन कसा आहे यावर हे सगळे नेहेमीच अवलंबून असणार आहे . आपल्या फालतू इगो मुळे , खोट्या प्रतिष्ठेपायी , इतरां बरोबरच्या फालतू आणि नाकोत्या पातळीवर केलेल्या बेसलेस आर्थिक आणि सामाजिक प्रतिष्ठेच्या कोम्पीटिशन पायी आपल्या मनाला आपण उगाचच झुलवत आहोत का याचा प्रथम विचार करायला हवा . वैयात्तिक नाते संबंधात आपण आपल्या जोडीदाराबरोबर वागताना किमान माणुसकीची भावना बाळगून आहोत का ? की आपण नेहमी मालकी हक्काचाच विचार करतो ? . आणि आपण स्वतः चुकत आहोत का याचा कधी आपण विचार करतो का ? हे सर्व प्रश्न एकदा आरश्य समोर उभे राहून स्वतःला विचारून पाहावेत उत्तर आपल्याला मिळेलच. आणि त्यातूनही काही असे प्रोब्लेम निर्माण झाले असतील की ज्याला सोल्युशन दिसत नाही तर आपल्या इतर मित्र आणि स्नेह संबंधांचा राबता वाढवून आपण ते काही काळाकरिता नक्की डायल्युट तरी करू शकतो आणि पुढे वेळ गेल्यावर त्याला सोल्युशन नक्की मिळणार . पण सोल्युशन मिळवताना मला हवे तेच सोल्युशन मिळाले पाहिजे असा हट्ट मात्र सोडायला लागणार. प्रत्येकवेळी आपल्या मनासारखे होईल असे नाही . पण जे सर्वोत्तम सोल्युशन समोर येईल ते मोकळ्या मानाने स्वीकारणे आणि त्याला अनुसरून पुढे जाणे असेच करावे लागेल.
प्रोब्लेम शिवाय जगण्याला मजा नाही . दररोजच्या जेवणात फक्त गोड पदार्थच सारखे सारखे खावे लागले तर काही दिवसांनी त्याचा देखील उबग येईल. कधी तरी जिभेला झोंबली तरी मिरचीची झणझणीत चव हवीच. प्रोब्लेमला मोकळ्या मानाने सामोरे जायला हवे. कोणी म्हणेल की असे कसे शक्य आहे ..त्या वेळी असा विचार करावा की आणखी १ वर्षा नंतर याच दिवशी आपण काय करत असू?...हाच प्रोब्लेम आपल्या समोर असेल ? आपल्याला कदाचित त्रास झालेला असेल परंतु प्रोब्लेम संपलेला असेल हे नक्की. मोठ्या प्रोब्लेम करिता थोडा मोठा काळ विचारात घ्यावा अगदी ५ वर्षा ते १० वर्षे देखील चालेल. मला आठवते की बिझनेस मध्ये एखाद्या ऑर्डर फायानालायाझेशनच्या दिवशी आम्ही किती ग्यास वर असू ऑर्डर मिळावी म्हणून किती आटापिटा करत असू ...जसा काही जीवन मरणाचा प्रश्न ..परंतु त्या दिवशी रात्री अगदी ओर्देर मिळाली नाही तरी मनावरचा ताण संपलेला असे आणि एखादी ऑर्डर गेली तर आपण काही खड्यात जात नाही असा विचार करून आम्ही स्वतःची समजूत देखील काढत असू . आणि खरच आम्ही कधी खड्यात गेलो देखील नाही. एकदा वेळ निघून गेली की प्रोब्लेम छोटा वाटू लागतो हेच खरे....आणि कोणीही मेले तरी इतर माणसे जगण्याचे सोडून देणार नसतात आणि आपल्या जाण्याने काही जग संपत नाही

त्यामुळे प्रोब्लेमना सकारात्मक विचारांनी सामोरे जावू या . प्रोब्लेम हे या जगण्याचा भाग आहेत. कोणीही या जगात प्रोब्लेम शिवाय जगत नसतो फक्त ते तो आपल्या पाशी उघड करत नाहीत. अगदी गोष्टीतील सुखी माणसाला देखील कडाक्याच्या थंडीत सदऱ्याची आठवण नक्की येत असणार . आपल्या स्वतःची कीव करणे बंद करूया . कदाचित आपल्याला प्रोब्लेम आवडायला लागतील सुद्धा .

जीवनाच्या दुखानवर करा तुम्ही प्रेम...निराशेला विसरा आणि खेळ नवा गेम ..
मंत्र अगदी सोपा आनंदाने जपा......नो प्रोब्लेम नो नो नो प्रोब्लेम ...

यशोधन वर्तक

Group content visibility: 
Public - accessible to all site users