अमेरिकेतील डॉर्मंट झालेल्या बँक खात्यातील पैसे परत कसे मिळवावेत?

Submitted by निवांत पाटील on 21 August, 2018 - 12:43

भारतात परत येते वेळी बँकेतील खाते तसेच सुरु ठेवले होते, त्यात कधीतरी लागतील यासाठी १९०० डॉलर्स ठेवले होते. पण खात्याचा वापर गेले ५ वर्षे झाला नाहीय. बँकेने फेब २०१८ मध्ये नोटीस मेल केली होती पण माझ्यकडुन ती चेक झाली नाही. आज बँकेचे पत्र भारतातल्या पत्यावर आल्यावर या गोष्टीची माहिती झाली. Withdrawal Escheat fee and Escheated या सदराखाली सगळा बॅलन्स डेबिट दाखवला आहे.
हा फंड स्टेट कडे जमा होतो अशी माहिती मिळाली. तर भारतात असताना ही रक्कम आपण क्लेम करु शकतो का? नेट वर शोधाशोध सुरुच आहे पण कोणाला फर्स्ट हँड माहीती असेल तर कृपया इथे लिहा.
कारण मिशिगन स्टेट मध्ये अन्क्लेम्ड प्रॉपर्टीस चा सर्च करताना ५९ पाटील सापडले पण माझे नाव त्यात नाही.
धन्यवाद.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

आम्ही इकडे परत आल्यावर तिकडच्या बँकेशी संपर्क केला होता. मग त्यांनी भारतात चेक पाठवला. तो इथल्या बँकेत जमा केला.
पण आमचे अकाऊंट डॉर्मेंट झाले नव्हते.

धन्यवाद .... पैसे आता स्टेट क डे जमा झालेत, तिकडुन कसे मिळवावेत?

Your response must be received before May 23 of this year or your funds will be forwarded to the State of Michigan on June 1 of this year and a $75.00 fee will be assessed. After July 1, you may contact the State of Michigan Treasury Department to obtain these funds.

फक्त या मेलला उत्तर न दिल्याने असं झालं आहे.

पैसे नक्की मिळतील. नव्यानेच पैसे बँकेकडून स्टेट ट्रेझरीकडे हस्तांतरीत झालेत तर यादीत नाव यायला कदाचित थोडा वेळ लागेल. यादी अपडेट करायचे त्यांचे स्केड्युल असते. बँकेने १ जुलै नंतर ट्रेझरीशी संपर्क करायला सांगितले आहे तर त्या नुसार फोनवर संपर्क करा आणि जोडीला बँन्केने पाठवलेल्या पत्राची कॉपी फॅक्स करा.
अनक्लेम्ड प्रॉपर्टी ही योग्य कालावधीत स्टेटकडे हस्तांतर करणे हे बंधनकारक असते. त्यामुळे तुम्हाला बँकेने पत्र पाठवले आहे तर पैसे हस्तांतरीत होवून योग्य व्यक्तीला किंवा वारसाला खात्रीने मिळतील.
आमचे रिवार्ड पॉइंट्स टाईप पैसे जमा झाले होते. ऑनलाईन नोंद करुन आम्ही विसरुनही गेलो होतो की त्या प्रोग्रॅमबद्द्ल. काही वर्षांनी प्रोग्रॅम बंद झाल्याची इमेल आली पण आम्हाला काही संदर्भही लागला नाही. त्यानंतर दोन वर्षांनी नवर्‍याच्या कोवर्करला अनक्लेम्ड प्रॉपर्टीच्या यादीत आमचे नाव दिसले. ट्रेझरीशी संपर्क केल्यावर १५ दिवसात चेक आला.

जवळ जवळ १ लाख ३३ हजार रुपये आहेत कि वो... सोडु नका... आजकाल आपल्या परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर हँडल वर काही अडचण पोस्ट केली तर मा. मंत्री लगेच लक्ष घालुन निवारण करतात असे ऐकलेय.. ते करुन पहा..!!

आमचे रिवार्ड पॉइंट्स टाईप पैसे जमा झाले होते. ऑनलाईन नोंद करुन आम्ही विसरुनही गेलो होतो की त्या प्रोग्रॅमबद्द्ल. काही वर्षांनी प्रोग्रॅम बंद झाल्याची इमेल आली पण आम्हाला काही संदर्भही लागला नाही. त्यानंतर दोन वर्षांनी नवर्‍याच्या कोवर्करला अनक्लेम्ड प्रॉपर्टीच्या यादीत आमचे नाव दिसले. ट्रेझरीशी संपर्क केल्यावर १५ दिवसात चेक आला.>>> प्रोसिजर सोपी दिसतेय.

ईथे टाकल्याबद्दल धन्यवा द
आअमचेही खाते चालू आहे. बघते स्टेटस.
काही डेबिट ट्रान्झॅक्शन झालेली मागच्या वर्षी - तेवढे पुरे का?

>>काही डेबिट ट्रान्झॅक्शन झालेली मागच्या वर्षी - तेवढे पुरे का?<<

ऑनलाइन अ‍ॅक्सेस करुन बॅलंस चेक, वगैरे करत जा. सेविंग अकाउंट हि असेल तर छोटी अमाउंट दर महिन्याला (स्केड्युल्ड) चेकिंग मधुन सेविंगला (आणि वाइसवर्सा) ट्रांस्फर करत रहा.

बँकांच्या पॉलिसिज वरचेवर बदलत असतात. माझं एक अगदि सुरुवातीला उघडलेलं अकाउंट असंच डॉर्मंट होउन (शिवाय मिनिमम बॅलंसची पॉलिसी चेंज झाल्याने मेंटेनंस फि चार्ज झालेली) बंद पडण्याचा मार्गावर होतं. पेपरलेस ऑप्ट इन केल्याने घरी मेल आली नाहि; इमेल यावी अशी अपेक्षा, पण तीहि फोल ठरलेली. बँकेच्या मते तुम्ही अकौंट ऑन्लाइन अ‍ॅक्सेस करायला हवं होतं. (कॅन यु बिलिव धिस?) एनिवे, कस्टमर सर्विसला फोन केला - मेंटेनंस फि रिवर्स करुन घेतली आणि बॅलंस बंम्प्ड अप केलं. रेपच्या मते वर लिहिलेला उपाय केला तर अकाउंट डॉर्मंट होणार नाहि...

ओके. धन्यवाद. आता स्टेट च्या लिस्ट मध्ये नाव यायची वाट पहातो. बँकेशी कॉन्टक्ट करुन काही फरक पडेल असे वाटत नाही.
पैसे मिळाले कि इथे अपडेट करेन.
यात झालेली चुक म्हणजे, बँकेचा मेल म्हणजे फक्त स्टेटमेंट असेल असे वाटल्याने दुर्लक्ष झाले.

अजुन एक माहीती हवी होती ती म्हणजे, आपला सोशल सिक्युरीटी नं ला काही व्हॅलिडीटी असते कि लाइफ लाँग तो आपल्या आयडेंटीशी सल्ग्न रहातो, आपण युएस च्या बाहेर बरीच वर्षे वास्तव्य असल्यास. त्या फॉर्म मध्ये ती माहिती लिहायची आहे. व्हॅलिड विसा ची आवश्यकता बहुतेक नसावी.

मलाही एक प्रश्न पडलाय ... अमेरिकेतील बँक अमेरिके बाहेर नवीन डेबिट कार्ड पाठवते का? माझ डेबिट कार्ड एक्सपायर होणारे आणि मी अमेरिके बाहेर आहे..

मला आठवतं त्याप्रमाणे एसएसएन कधी एक्सपायर होत नाही. आयटीन (डिपेंडंटना मिळतो तो) तीन सलग वर्षे कर विवरणपत्रे भरली नाहीतर रीअ‍ॅक्टीव्हेट करून घ्यायला लागतो.
डेबिट कार्ड अमेरिकेबाहेरचा पत्ता असेल तर बाहेर पाठवायला काही हरकत नसावी. अर्थात बँकेशी कन्फर्म करा.

अजुन एक माहीती हवी होती ती म्हणजे, आपला सोशल सिक्युरीटी नं ला काही व्हॅलिडीटी असते कि लाइफ लाँग तो आपल्या आयडेंटीशी सल्ग्न रहातो, >> कायमचा तोच राहतो... मी २००५ नंतर २०११ ला वापरला आहे.

आता स्टेट च्या लिस्ट मध्ये नाव यायची वाट पहातो. >> तुम्ही आतापासून लागणार्या कागदपत्रची तयारी करुन ठेवू शकता... त्याचाशी कसा
कॉन्टट करायाच त्याची माहिती काढून ठेवू शकता..