भुताशी सामना

Submitted by सचिन पगारे on 12 August, 2018 - 04:11

रामुला भुताखेताच्या, रहस्यकथा वाचायची फार आवड.भुतापासुन बचाव करण्यासाठी तो खिशात नेहमी हनुमानचालिसा ठेवत असे आणि रामरक्षा  स्तोत्र तर त्याचे तोंडपाठ होते. रोज पहाटे उठल्यावर रामु दोन तास नेहमी पुजापाठ करी. त्याच्या हातात अनेक रंगबिरंगी गंडे असत. बोटात ग्रहतार्यांच्या अंगठ्या, खिशात मंतरलेल्या अंगार्याची पुडी. असा सर्व रामुचा बंदोबस्त असे.

एकदा रामु तालुक्याला गेला काम अपेक्षेपेक्षा उशीरा झाले. गाव  दोन मैलावर होते. रात्रिचे बारा वाजले होते. रामनामाचा जप करत रामु चालला होता तेवढ्यात त्याला आपल्या पाठिमागे कुणीतरी येतेय अशी शंका आली त्याने मागे पाहिले तर कोणच नव्हते. आपल्याला भास झाला असेल असे समजुन रामु पुढे चालु लागला तोच त्याला पाठुन हलकासा स्पर्श झाला.रामु झपाट्याने मागे फिरला पण मागे कुणीच नव्हते. हा प्रकार साधा नाही ह्यची त्याला जाणिव झाली.भुताखेतावर त्याचा विश्वास असला तरी सामना मात्र कधीच झाला नव्हता. मनात किंचित धाकधुक होती पण भुताशी सामना करण्यासाठी लागणारी सारी सामग्री त्याच्यापाशी होती.
तो निडरपणे म्हणाला,'कोण आहे? हिंमत असेल तर समोर ये'. मी तुला भित नाही'.पण कोणच समोर आले नाही. रामु मोठमोठ्याने रामरक्षा म्हणु लागला. कोणीच समोर येत नाही हे पाहुन त्याने खिशातली हनुमानचालिसा काढली डोक्याला लावली व स्वताशीच हसत मागे फिरला आणि पाहतो तर काय त्याच्यासमोरच एक लठ्ठ व्यक्ति उभी होती. गाल लोंबलेले, भलामोठा पोटाचा नगारा, इनशर्ट, बो असा त्याचा अवतार होता. तो रागाने रामुकडे पहात होता पायात चक्क बुट होते.  रामुने चाचरत विचारले,तु कोण आहेस'?

'अरे तुला इतकही समजत नाही का?  हया इतक्या अंधार्या रात्री, सुनसान जागी एकतर चोर असणार नाही तर भुत' तो लठ्ठोबा शांतपणे म्हणाला।

'पण तु चोर आहेस का भुत'? रामु चाचरत म्हणाला.

लठ्ठोबा भडकला,
' ये पोरा,मला चोर म्हणुन माझा अपमान करु नकोस. जिवंत असतानाही कुणाच्या पै ला मी हात लावला नाही आणी मेल्यावर हे लांच्छन. थांब आता मी काही तुला सोडत नाही' असे बोलुन तो दोन पावले पुढे झाला. त्याला दोन पावले पुढे आलेला पाहुन रामु झपाट्याने चार पावले मागे गेला.

रामु म्हणाला,तु भुत आहेस तर तुझे पाय उलटे हवेत  तु भुत नाहीस'.

लठ्ठोबा हसुन म्हणाला,'भुताचे पाय उलटे असतात हे तुला कुणी सांगीतले?भयकथा वाचुन तुझा गैरसमज झालाय. आम्ही रात्रीच नाही तर दिवसाही फिरतो. पण आम्हाला भुक मात्र रात्रीचीच लागते. आणी आता मला खुप कडाडुन भुक लागलीय तु आजच माझ जेवण आहेस . दुसर्या कुठल्या भुताने तुला पाहायच्या आधीच मला तुला खावे लागेल".

रामु गांगरुन गेला म्हणाला, पण मी तुझे काय वाकडे केलेय?.
'मी कुठे म्हणालो तु माझे वाकडे केलेस.पण तु माझे अन्न आहेस, तुला ती हिंदीतली म्हण आठवत असेल,'घोडा घाससे दोस्ती करेगा तो खायेगा क्या? तसेच भुत इन्सानसे दोस्ती करेगा तो खायेगा क्या ?अशी आमच्या भुत लोकांमध्ये म्हण आह'े.

आता मात्र रामु घाबरला भुताला घालवण्यासाठी तो डोळे
  मिटुन जोरजोरात रामरक्षा म्हणु लागला.सर्वत्र शांतता पसरली.शितल वारे वाहु लागले. रामुने डोळे
उघडले समोर कुणीच नव्हते. त्याने निश्वास सोडला हाताल्या मंतरलेल्या अंगठ्यांचे चुंबन घेतले व तो जाण्यासाठी निघाला. तोच त्याच्या खांद्यावर हात पडला रामुने दचकुन मागे पाहिले तर रामुच्या खांद्यावर हात ठेवुन ते लठ्ठ भुत दात विचकुन हसत होते.
रामु झटक्यात बाजुला झाला रामरक्षे लाही हे भुत बधत नाही हे पाहुन त्याचे धाबे दणाणले. तो खिशात हात घालुन मंतरलेला अंगारा काढु लागला. लठ्ठोबा पुढे येउ लागला ते पाहुन रामुने झटपट खिशातुन अंगार्याची पुडी काढली व दरडावला,'थांब, तिथेच.
त्याचा आवाज ऐकुन लठ्ठोबा जागीच थांबला व म्हणाला,'काय काढलस खिशातुन.
रामु म्हणाला,'हा मंतरलेला अंगारा आहे हा तुझ्यावर टाकला तर तु भस्म होउन जाशील. अरे मी रामु आहे कुणा भुताच्या हातुन मरायला मी जन्माला आलो नाही' असे बोलुन रामु मोठमोठ्याने हसायला लागला. तोच लठ्ठोबाने झटपट हालचाल केली नि रामुच्या हातुन मंतरलेल्या अंगार्याची पुडी काढुन घेतली व ती उघडुन कुतुहलाने त्यात बघु लागला आपल्या हाताचे एक बोट त्या अंगार्यात बुडवुन हसु लागला. अंगार्याचा स्पर्श होउनही भुताला काही झाले नाही हे पाहुन रामु थरथर कापु लागला त्याची सारी हत्यारे भुतासमोर बोथट वाटत होती.
तितक्यात ते लठ्ठ भुत पुढे आले आणी रामुला म्हणाले 'Thanku Very Much'.
भुत आपले आभार कशाला मानतेय तेच रामुला समजेना. भुत म्हणाले,' तुझ्याकडे अजुन एखादी पुडी आहे का अंगार्याची?
रामुने हताशपणे दुसर्या खिशातली पुडी काढुन भुताला दिली.

भुत आनंदाने हसु लागले. भुताचा आनंद पाहुन मनात कुठेतरी सुटकेची आशा रामुच्या मनात पालवली.भुताने शेकहँन्डसाठी रामुच्या पुढे हात केला रामुने घाबरतच त्याला शेकहँन्ड केला नी एक जोराचा चटका रामुच्या हाताला लागला. 'आयग मेलो'असे रामु ओरडला.रामु वेदनेने भुताला म्हणाला,'तु भुत आहेस तर तुझा हात थंड हवा हा इतका गरम कसा? लठ्ठोबा म्हणाला, 'अरे भुत हे थंडगार असते हे तुला कुणी सांगितले? तु भयकथा फारच वाचतोस वाटत'.

रामु म्हणाला, 'तुला अंगारा दिल्याने तु इतका खुश का झालास?
त्यावर लठ्ठोबा म्हणाला, 'भुताचे लाइफ हे तुम्हाला वाटते तितके इझी नाही आहे. आम्ही इथे घनटाट जंगलात रहातो इथे सार्याच गोष्टिंचा तुटवडा. जिवंत असताना मस्त दोनदा काँलगेटने ब्रश करायचो. जंगलात कसल आलय काँलगेट नि पेप्सोडंट, झाडाच्या काटकीने दात घासावे लागतात. आता तु दोन पुड्या अंगारा दिलास म्हणजे पंधरा दिवस दात घासायचा प्रश्न सुटला. दाताचे आरोग्य हे फार महत्वाचे आहे आमच जेवण काय तर मास नि रक्त तोंड सर्व वशाट होउन जाते'.
आणी तो रामुकडे पाहुन हसु लागला त्याला प्रतिसाद म्हणुन रामुही अंगारा देणार्या मांत्रिकाला मनातल्या मनात शिव्या देत क्षिणपणे हसला.
'चल, आता बस झाल मला भुक आवरत नाहीये' असे बोलुन रामुला लठ्ठोबाने आपल्या कवेत घेतले. रामुने सुटण्यासाठी बरीच ताकत लावली पण ती व्यर्थ आहे हे रामुच्या लक्षात आले नि त्याने प्रतिकार करणे सोडुन दिले. लठ्ठोबाचा चेहरा हा रामुच्या मानेकडे गेला त्याने दात विचकले व रामुच्या नरडीचा घोट घेणार तितक्यात रामु त्याला म्हणाला,' मी मरणार हे निश्चित. पण मरणापुर्वी मला एका प्रश्नाचे उत्तर दे'.

लठ्ठोबाने उघडलेले तोंड बंद केले नि म्हणाला, 'विचार लवकर, भुकेने अँसिडिटी वाढलीय'.
रामु म्हणाला, मी इतके जपजाप्य केले, मंत्र म्हणालो तरी तुला काहीच कसे झाले नाही? प्लिज माझ्या या प्रश्नाचे उत्तर दे. मनावर कुठलेही ओझे ठेउन मला मरायचे नाही आहे. नाहीतर मीही भुत बनुन भटकत राहिल'.

लठ्ठोबाने आपले तोंड रामुच्या कानाशी नेले व म्हणाला,'तुझा अंगारा, मंत्र, जपजाप्य याचा माझ्यावर काहीच परिणाम झाला नाही,कारण मी.... मी... ख्रिश्चन धर्मिय भुत आहे.

रामुचे डोळे विस्फारलेलेच राहिले नि लठ्ठोबाने त्याच्या नरडीचा घोट घेतला...

विषय: 
Group content visibility: 
Use group defaults

पगारे ,आप आये बहार आयी .येत जा अधूनमधून अशाच छान हलक्याफुलक्या कथा घेऊन ,मजा येते वाचायला. धन्यवाद!

हेहेहे... रामू इतका भयकथा वाचायचा तर ख्रिश्चन भूताविषयीचीपन माहिती असायला हवी होती त्याला.. पण जाव दे..

{{{ हेहेहे... रामू इतका भयकथा वाचायचा तर ख्रिश्चन भूताविषयीचीपन माहिती असायला हवी होती त्याला.. पण जाव दे.. }}}

हो पण धागालेखकाने हिंदू काय किंवा ख्रिश्चन काय कुठल्याच धर्माच्या भयकथा वाचलेल्या दिसत नाहीत. ख्रिश्चन धर्मीय भूत हिंदूना / ख्रिश्चनांना किंवा कुठल्याच धर्माच्या माणसांना खाऊ शकत नाही. ते माणसाला कवटाळूही शकत नाही उलट त्याने तसा प्रयत्न जरी केला तरी माणूस त्याच्यातून आरपार सहीसलामत बाहेर निघतो. घोस्ट सिनेमात हे डिट्टेलवारी दाखवलंय.

धागालेखकाने मानेवर चावणार्‍या व्हँपायरलाच किरिस्तांव भूत समजून कथा लिहिलिय.

आता दुसरा भाग पण लिहा -
मग तो रामू पण भूत झाला नि त्याने, ज्या धर्माचे नाव घ्यायचे नाही, अश्या धर्मातल्या माणसाला खाल्ले. भूत समाजात धार्मिक दंगली सुरु झाल्या! नि त्याच्या मुळे जिवंत माणसांत पण दंगली झाल्या.