हल्ली

Submitted by रुपेंद्र कदम 'रुपक' on 10 August, 2018 - 00:08

काळजावर करत असते घाव हल्ली
टाळतो आहे तुझे मी नाव हल्ली

तू नको भरवूस शाळा पावसाची
या नभाचे चालते घुमजाव हल्ली

मी सुखांना चेक करतो रोज आता
हळुच करते वेदना शिरकाव हल्ली

कोणत्या दगडास माझा देव मानू
सांगतो प्रत्येकजण जर 'भाव' हल्ली

भेट दे काट्याकुट्यांचे शहर मजला
टोचतो आहे फुलांचा गाव हल्ली

रोज रस्सीखेच होते जीवनाशी
सोडला खेळायचा मी डाव हल्ली

जीवनाच्या पार त्याला जायचे का
पळवतो गाडी अशी भरधाव हल्ली

वेगळा जर किर्तनाचा विषय नव्हता
बदलला आहे तुझा बरताव हल्ली

कोणते गारूड केले वादळाने
विसरते आहे किनारा नाव हल्ली

© रुपेंद्र कदम 'रुपक'
✍ पुणे 09 ऑगस्ट 2018

Group content visibility: 
Use group defaults

मस्तच.

गुस्थाकी मुआफ... रुपकजी

आपली गझल थोडी मला भावली आणि कळली तशी आपणास सुपूर्त करत आहे तिचा स्वीकार करावा ....

लपवितो आहे मनीचे घाव हल्ली
टाळतो आहे तुझे मी नाव हल्ली

नको भरवू शाळा रिमझिम पावसाची
मेघांचे त्या चालते घुमजाव हल्ली

मी सुखांना जवळ करतो रोज आता
तरी करते वेदना शिरकाव हल्ली

कोणत्या दगडास मानू देव माझा
सांगू कुणाला हात जोडतो 'पाव' हल्ली

बरे वाटे काट्या कुट्यांचे शहर मजला
बोचतो आहे फुलांचा गाव हल्ली

मी हरत राहिलो खेळ माझा तुझ्यासाठी
सोडला तू खेळायचा का डाव हल्ली

वाट पाहत थांबली असशील तिथे
पळवतो गाडी अशी मी भरधाव हल्ली

बोल माझा जर तुला लागला नव्हता
बदलला आहे का तुझा बरताव हल्ली

दिशाहीन केले मनाच्या वादळाने
विसरते आहे किनारा ही नाव हल्ली