धागे सुखदुःखाचे

Submitted by संगीता थूल. on 5 August, 2018 - 06:34


धागे सुखदुःखाचे

हसण्यासारखे क्षण आयुष्यात नसतीलही कदाचित ...........
म्हणून का सतत रडायचेच असते?
आनंदाचे क्षण असे येतातच किती जीवनात......
म्हणून काय आयुष्य जगायचेच नसते?
आयुष्याची गुंफणच मुळी असते
सुखदुःखाच्या धाग्याची.....
त्यातील सुखाच्या गाठीच
तेवढ्या उकलायच्या.......
दुःखाचे सैल धागे हळुवारपणे
सोडून द्यायचे असतात........
जगण्यातील आनंद उपभोगता यावा म्हणून.
मात्र दुःखाशिवाय सुखाची किंमत कळत नाही.......
पण एक असावे........
दुःखानंतर सुख दिसावे
सुखानंतर दुःख अनुभवणे कठिणच......
जीवनात सुखदुःखाचे चक्र तर गतीमान असणारच....
आणि जीवनाचा आनंद घेणेही क्रमप्राप्त .....
आणि म्हणूनच........
नशिबाने आपल्या वाटेला आलेले जीवन....
मग ते कसेही असले.........
तरीही ते जगत रहायचं.........
हसत रहायचं...........
स्वतः साठी .......
आणि इतरांसाठी सुद्धा.
प्रा.सौ.संगीता थूल
किशोर नगर,अमरावती. 0721-2671010
9422957171

Group content visibility: 
Public - accessible to all site users