कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?

Submitted by mayurdublay on 4 August, 2018 - 11:05

एखाद्या कंपनी मध्ये मॅनेजर होणे किती शहाणपणाचे आहे?

मॅनेजर म्हणून काम करताना तुम्हाला काय वाटते?

तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का?

तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?

तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?

आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?

तुम्हाला काय वाटते याबद्दल? तुमचा काय अनुभव आहे?

शब्दखुणा: 
Group content visibility: 
Use group defaults

<<<तुमच्या टीम ने काय काम केले त्यावरच तुमची लायकी ठरते का? तुमची टीम कसे वागेल त्याचे खापर तुमच्यावर फोडले जाते का?>>>
हो. टीमकडून चांगले काम करून घेणे नि त्याची जबाबदारी घेणे हेच मॅनेजरचे मुख्य काम असते.

<<<आणि तुमच्या वर खापर फुटणार म्हणून तुमची टीम निवांत असते का?>>> असे होऊ नये हे बघणे हे पण मॅनेजरचे काम असते.

<<<तुमच्या स्वतःच्या कामाला काही किंमत राहते का?>>>
वरील गोष्टी हेच तुमचे स्वतःचे काम.
त्या उप्पर शिवाय, आपल्याबरोबर आपल्या टीममधील लोकांची प्रगति होईल हे बघणे, जुन्या पद्धति बदलून नवीन अधिक एफिशियंट पद्धती तयार करणे, कंपनीचा फायदा कसा वाढेल नि खर्च कसे कमी होतील यास हातभार लावणे ही हि मॅनेजरचीच कामे असतात. तर मॅनेजर होण्यापूर्वी हे सगळे जमणार आहे का ते बघूनच मॅनेजर व्हावे.
त्यासाठी काय गुण लागतात हा वेगळा बाफ.

आमच्या वेळी MBA चे डिग्री को्र्स नव्हते, तर कोणीही पदवी पर्यंत शिकलेला हुषार आणि कामसू माणूस मँनेजरचा जाँब घेऊ शकत असे.त्या वेळी सामान्य मराठी माणूस, नको ते वरिष्ठांच्या शिव्या खाणे, नको ती जास्तीची जबाबदारी, विनाकारण ,नोकरी गेली तर काय घ्या...?,अशी मनाची समजूत घालून मँनेजरच्या नोकरी पासून चार हात लांबच राहत असे.आम्ही मात्र मँनेजरच्या नोकरीत30 वर्षे धमाल केली.सकाळी घरातून बाहेर पडल्यापासून रात्री घरी परतेपर्यंत सर्व खर्च कंपनीचा असे, त्यामुळे जास्तीचे पैसे कमवायची तशी फिकीर नसायची. विमानप्रवासासाठी AI/IA याच कंपन्या असायच्या.बहुराष्ट्रीय कंपनी असल्यामुळे सुरूवातीपासूनच कामाचे प्रशिक्षण दिले जायचे. आठवड्याचे,महिन्याचे,सहामाही व वर्षाचे टार्गेट पुर्ण केल्यावर जास्तिचा मोबदला पगाराव्यतिरिक्त दिला जायचा.त्यामुळे टार्गेट पुर्ण करायची एक वेगळीच नशा असायची. त्यासाठी रात्रीचा दिवस करायची तयारीही असायची.कंपनीच्या यशाचे वर्षातून 1-2 वेळा सेलिब्रेशन केले जायचे व त्यामध्ये मँनेजर्सच्या फँमिलीला आवर्जून निमंत्रण असायचे.माझे तर तरूण पिढी ला सांगणे आहे की त्यांनी मँनेजरचा जाँब अगदी करिअरच्या सुरूवातीपासनूच घ्यावा.आजकाल MBA सारखे व ईतर प्रोफेशनल कोर्सेस केल्यावर तुम्ही रेडिमेड मँनेजरच असता.जर त्याच कंपनीत व्यवसायाचे टक्केटोणपे खात टिकून राहिलात तर वयाच्या ४५-५० शी पर्यंत तुम्ही MD/CEOअशा पदापर्यंत पोहोचु शकता.