नवीन लेखन दाखवण्यासाठी काही छोटे बदल

Posted
5 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
5 वर्ष ago

मोबाईल वरून मायबोली पाहणे अजून सोपे होण्यासाठी,नवीन लेखन दाखवण्याच्या सुविधेत काही छोटे बदल केले आहेत.

या अगोदर
whats_new_before.jpg

आता
whats_new_after.jpg

विषय: 
प्रकार: 
शब्दखुणा: 

कॅलेंडर आयकॉन काढल्यावर आता बरच ठिक दिसतं आहे. त्वरीत कार्यवाहीबद्दल धन्यवाद. Happy
नवीन प्रतिसाद संख्या लाल करता येईल का? डाव्या बाजुचं 'नवीन' एकदम उठून दिसतं आहे आणि लक्षात येतं आहे पण उजवीकडचं तितकं येत नाहीये.

पराग +1 धन्यवाद आणि लाल रंग दोन्ही साठी.
बारका बग राहिलाय. माझ्यासाठी नवीन वर कॅलेंडर नाही दिसते पण मायबोलीवर/ ग्रुपमध्ये नवीन वर अजूनही दिसतंय.

>डाव्या बाजुचं 'नवीन' एकदम उठून दिसतं आहे आणि लक्षात येतं आहे पण उजवीकडचं तितकं येत नाहीये.
डाव्या बाजूचे "नवीन" सगळा धागाच नवीन आहे हे सुचवण्यासाठी आहे. डाव्या बाजूचे "नवीन" प्रतिसाद नवीन सांगण्यासाठी आहे.
जर सगळा धागाच नवीन असेल तर आधी प्रतिसादाकडे लक्ष द्या हे बरोबर होणार नाही. जर धागा नवीन नसेल (फक्त प्रतिसाद नवीन असतील तर) डावीकडे नवीन दिसत नाही.

Gmail, Yahoo Mail मध्ये जशी आपल्या आवडीची theme निवडता येते तसे आपल्या आवडीचे layout निवडायची सुविधा देता येईल का???

नवीन लेखनामध्ये - शीर्शक, गृप आणि तो धागा काढल्याची तारीख + वेळ हे एकाखालोखाल येतं. आणि पुढल्या कॉलम ला धागाकर्त्याचं नाव आणि त्याखाली प्रतीसादसंख्या येते.
यामध्ये शीर्शकाखाली दोन लाईन्स वाया गेल्या सारखं होतंय कारण तिकडे नंतर काही बदलत नाही (अपवाद- 'नवीन'/'बदलून' हे लाल रंगात येतं)
इथे दुसर्‍या रांगेत - जर गृप समोरच धागा तयार केल्याची फक्त तारीख दिली तर एक लाईनस्पेस वाचेल आणि तसाही टाईमस्टँप गरजेचा नसल्यानी काही फरक पडणार नाही, माझ्यामते.
या स्क्रीनशॉट मध्ये लाल रंगाच्या चौकटीत जे दिलंय त्यावरून अंदाज येइल...
Untitled.jpg

कॅलेंडरचा आयकॉन काढला ते बरे झाले पण तसाच आयकॉन ज्या धाग्यांवर प्रकाशचित्रं आहेत त्यांना ईंडिकेटर सारखा लावता येईल का?

जब वी मेट मधील 'मै अपनी फेवरिट हूं' च्या चालीवर लेखकही त्याचा स्वतःचा आवडता असणारच ना. मग त्याच्या स्वतःच्या धाग्यावर नवीन प्रतिसाद आल्यास... त्याच्या ईतर आवडत्या लेखकांच्या धाग्याप्रमाणे तो 'अजून वाचायचय' लिस्टच्या वरती दिसायला हवा असे वाटते. Proud

गेले काही महिने मी एक गंमत पहातो आहे.
मी टीपापा या बाफ च्या ग्रूपचा सदस्य आहे. मी जेंव्हा मायबोली वर नवीन वर क्लिक करतो तेंव्हा माझ्यासाथी नवीन मधे जर टीपापा वर माझ्यासाठी नवीन काही असेल तर ते दिसते. मी ते बघतो. नंतर दुसरे काही बघतो मग पुनः मला टीपापा वर जाऊन लिहावेसे वाटते. पण काय आश्चर्य? तो बाफच दिसत नाही.
कुठेच सापडत नाही - सगळीकडे बघितले - हितगूज विषयानुसार, माझ्या गावात, मुंबई, अमेरिका कुठ्ठेच नाही. मग कुणितरी नोड नंबर दिला. आता हे सगळे नोड नंबर लिहून ठेवायचे का?

एकदा का धाग्यातले नवीन प्रतिसाद पाहून झाले की तो धागा पुन्हा पाहायचा झाल्यास "...node/34..../ go_to_end_of_file असे हवे आहे.

@नन्द्या४३ आणि Srd
एकदा धाग्यातले प्रतिसाद पाहून झाल्यावर पुन्हा तो धागा पहायचा असेल तर "ग्रूपमधे नवीन" अशी टॅब आहे ती पहा.
groupposts.jpg

Pages