आयुष्य हा एक पाण्याच्या प्रवाहातला फसवा भोवरा झालंय. वरवर पाहताक्षणी वाटतं की, सगळं ठीक आहे, पाणी खळाखळा वाहतंय, पण तसं काहीच नसतं. तसं वाटणं हा केवळ आभास असतो. एक प्रश्न सोडवला की दुसरा , तो सुटला की तिसरा अशी प्रश्नांची मालिका तयारच असते तुमच्या मनाचा आणि बुद्धीचा भुगा करायला! बरं, ही प्रश्नांची एकसंध मालिका नसून साराच गुंता असतो. ह्या समस्या सोडवता सोडवता माणूस ह्या चक्रात असा फसतो की सुटका करून घेणं निव्वळ अशक्य! तो सुटण्याची जेवढी अधिक धडपड करेल तितका त्या भोवऱ्यात खोल खोल ढकलला जातो. खरंच, ह्या भोवऱ्यातून बाहेर पडणं आणि पुन्हा वाहत्या प्रवाहात सामील होणं शक्य आहे का? असेल तर कसं?
असामान्य लोक प्रवाहाच्या विरुद्ध पोहतात असं म्हटलं जातं. पण मग ते भोवऱ्यात अडकत नसतील का? का ते सरळसोट आयुष्य धिक्कारून , आधीच सुखासीन आयुष्याचा सरळ प्रवाह सोडून काहीतरी नवीन, वेगळं करण्याच्या उद्देशाने प्रवाहाच्या विरुद्ध जात असतील का? पण समजा, अवघड अशी वाट स्वीकारून प्रवाहाच्या विरुद्ध पोहताना भोवऱ्यांच्या तावडीत सापडले तर? मग अजून बिकट अवस्था होत असेल ना? अशा वेळेला महान लोक काय करतात? एकदा भोवऱ्यात अडकल्यानंतर मुख्य आणि सरळ प्रवाहात येणं केवळ कठीणच नाही तर अशक्यच असतं. कशी सोडवणार ही समस्या? का ही समस्याच सोडवायचीच नसते? जसं चाललंय त्या परिस्थितीला सामोरे जात राहणे आणि आलेला दिवस आनंदाने घालवणे हे ह्या प्रश्नाचे समाधान आहे का?
असले तरी असे करणे जमणार आहे का? इतकं सोपं आहे का ते? मग त्या न सोडवलेल्या समस्येचं काय? आपण आपल्या मनाचं काहीबाही समजावून समाधान करू, पण तो भोवरा मनाला स्वस्थ बसू देईल का? कोण देईल ह्या प्रश्नांची उत्तरे?
"आदिती........"
आईच्या ह्या हाकेसरशी आदिती भानावर आली आणि पुन्हा पुस्तकात डोकं घालून M३ ची गणितं सोडवू लागली.
-------------------------------------------------------------------------------------------------------
**किल्ली**
--------------------------------------------------------------------------------------------------------
---------------------------------------------------------------------------------------------------------
M ३ = engineering mathematics
ह्या कथेतला शेवटच्या २ ओळी सोडल्यास वरचा भाग, मी इंजिनीरिंगला असताना सेमिस्टर परिक्षेच्या आदल्या दिवशी अभ्यास करत असताना (M ३ चा पेपर नव्हता पण माझा
) एका कागदावर खरडला होता. आज तो कागद शोधून ह्या शब्दांना मायबोली वर सादर करत आहे.
ह्या लिखाणाची जन्म तारीख आहे: १९/४/२०१२
भोवरा (लघुकथा)
Submitted by किल्ली on 17 July, 2018 - 15:01
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Use group defaults
शेअर करा
एकदा भोवऱ्यात अडकल्यानंतर
एकदा भोवऱ्यात अडकल्यानंतर मुख्य आणि सरळ प्रवाहात येणं केवळ कठीणच नाही तर अशक्यच असतं.
>> येता तुम्ही प्रवाहात परत पण तोपर्यंत भोवरा तुमची हालत खराब करतो.
छान लिहिलंय -हे सांगायचे
छान लिहिलंय -हे सांगायचे राहिले ☺️
धन्यवाद च्रप्स
धन्यवाद च्रप्स
छान !
छान !

लेखाला एका हाकेनं कथा बनवलंत ! मला वाटलेलं गल्ली चुकली की काय...
छान लिहिलंय किल्लीतै!
छान लिहिलंय किल्लीतै!
आनंददा
किल्लीतै तळटिपेने अगदी परीक्षेच्या वेळातच नेलं बघ!
परीक्षेत असंच होतं. मन अभ्यास सोडून दुसरं काहीही करायला तयार असतं. समोरची साधी भिंतही इंटरेस्टिंग वाटू लागते.पुस्तकातलं अभ्यासाचं सोडून अगदी प्रस्तावना वाचावीशी वाटू लागते. मग धरुन-पकडून स्वतःला अभ्यासासाठी मनवावं लागतं. 
M3 was a nightmare for sure..
M3 was a nightmare for sure..
कथा कुठे आहे?
कथा कुठे आहे?
लिहिलय खुप छान! हा आणि असे काही प्रश्न प्रत्येकालाच पडतात कधी ना कधी. जे ऊत्तर सापडायच्या अगोदर प्रश्न विसरतात किंवा मुद्दाम बाजूला टाकतात ते परत प्रवाहाच्या दिशेने वहायला सुरवात करतात. मात्र ज्यांना या प्रश्नाचे ऊत्तर सापडते, किंबहुना जे हट्टाने शोधतात ते मात्र खऱ्या अर्थाने प्रवाहाच्या विरूध्द पोहायला सुरवात करतात.
@शाली:
@शाली:
हो
परिक्षेच्या काळात अभ्यास करताना , M ३ चे प्रॉब्लम्स सोडवताना अदितीच्या मनातील हे प्रश्न (वरचा लेख )आहेत.
आईच्या हाकेने ती तंद्रीतून बाहेर येते आणि अभ्यासात परत डोकं घालते , अशी साधारण कथा आहे
@ आनंद.
लेखाला एका हाकेनं कथा बनवलंत>>>
आनंद., शाली, मी चिन्मयी, द्वादशांगुला धन्यवाद
मन अभ्यास सोडून दुसरं काहीही करायला तयार असतं. समोरची साधी भिंतही इंटरेस्टिंग वाटू लागते.पुस्तकातलं अभ्यासाचं सोडून अगदी प्रस्तावना वाचावीशी वाटू लागते. मग धरुन-पकडून स्वतःला अभ्यासासाठी मनवावं लागतं>>>>>अगदी अगदी , असच होतं , मी मुंग्यांची रांग शोधून त्यातल्या मुंग्या मोजत असे
वा किल्लीताई.. मस्तय..
वा किल्लीताई.. मस्तय..
आनंददादा
मन अभ्यास सोडून दुसरं काहीही करायला तयार असतं. समोरची साधी भिंतही इंटरेस्टिंग वाटू लागते.पुस्तकातलं अभ्यासाचं सोडून अगदी प्रस्तावना वाचावीशी वाटू लागते. मग धरुन-पकडून स्वतःला अभ्यासासाठी मनवावं लागतं>>>>>>>>>>+1111112
मला परीक्षेच्या आधी अभ्यासाच पुस्तक सोडून दुसरी वाचायला आवडतात... पुन्हा मन अभ्यासाकडे वळवायला फार कष्ट लागतात...बराच वेळ अभ्यास केल्यावर मला अत्यंत फाल्तु प्रश्न पडतात ज्याला काही उत्तर नसतात.. म्हणजे अमूक व्यक्तीच नाव हे का ?वगैरे.......मग शून्यात बघत बसत असा तिसराच विचार करायची सवय आहे मला...
छान लिहिले आहे !!! मी तरी
छान लिहिले आहे !!! मी तरी प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जाण्यापेक्षा प्रवाहाच्या दिशेने थोडे तिरकस पोहत काठावर येणेच प्रिफर करतो. माझा M1 ते M5 कधीच पहिल्या प्रयत्नात सुटला नाही. एका वेळी तर M क्लिअर होणार नाही हे माहित असल्यामुळे मी त्यानंतरच्या विषयाचा( ज्या मध्ये सुद्धा पास होणे कठीण वाटत होते) अभ्यास करत होतो.
धन्यवाद गोल्डफिश, आदीसिद्धी
धन्यवाद गोल्डफिश, आदीसिद्धी
शून्यात बघत बसत असा तिसराच
शून्यात बघत बसत असा तिसराच विचार करायची सवय आहे मला>>> +!११ मला पन
छान लिहलय
छान लिहलय
त्यामुळे हे असं काय जाणवलं नाही कधी पण इंटरेस्टिंग प्रोसेस आहे अश्याना चिडवायला मजा येते 
मला तंद्री लागत न्हवती मी पुस्तकच आदल्या दिवशी उघडयचो त्यामुळे फक्त पासिंग कॅल्कूलेशन करत अभ्यास करायचा
धन्यवाद अक्षय दुधाळ
धन्यवाद अक्षय दुधाळ
माझा M1 ते M5 कधीच पहिल्या
माझा M1 ते M5 कधीच पहिल्या प्रयत्नात सुटला नाही.
>>> M4 ani m5 suru zale ka ata?
>>> M4 ani m5 suru zale ka
>>> M4 ani m5 suru zale ka ata?
Submitted by च्रप्स on 19 July, 2018 - 02:37 >> आत्ता आहे कि नाही ते माहित नाही. आमच्यावेळेला होते. साल १९९९.
छान
छान
धन्यवाद पवनपरी11
धन्यवाद पवनपरी11
मस्त आहे पण M1 M2 म्हंजे काय
मस्त आहे पण M1 M2 म्हंजे काय ?
engineering mathematics १ ,
engineering mathematics १ , engineering mathematics २
धन्यवाद गरुड
engineering mathematics १ ,
engineering mathematics १ , engineering mathematics २>>>
आसं अस्त व्हय.
धन्यवाद:स्मित:
M4 ani m5 suru zale ka ata>>>
M4 ani m5 suru zale ka ata>>>>मी तर फक्त M ३ दिलाय , थेट द्वितीय वर्षाला प्रवेश घेतला होता ना , पुणे विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयात !!
त्यामुळे M १, M २ च्या भानगडीतून सुटले !
मी पण मी1,2 आणि 3 दिले. 4 आणि
मी पण मी1,2 आणि 3 दिले. 4 आणि 5 नव्हते आमच्या वेळेस.
हाहाहा केवढा गहन प्रश्न त्या
हाहाहा केवढा गहन प्रश्न त्या कोवळ्या वयात - गणिताचा भोवरा
मी पण दहावी नंतर डिप्लोमा
मी पण दहावी नंतर डिप्लोमा करून डायरेक्ट सेकंड इयर ला अडमिशन घेतलं. त्या m3 मुळे इयर डाऊन झाले असतं अक्षरशः. अजूनही कधीकधी परीक्षा सुरू आहे आणि माझा काहीच अभ्यास झाला नाही अशी स्वप्ने पडतात.
धन्यवाद सामो, नौटंकी
धन्यवाद सामो, नौटंकी
तुझं मन पळपुटं आहे किल्ली! गप
तुझं मन पळपुटं आहे किल्ली! गप अभ्यास करायचा सोडून उगा आपलं आयुष्य नि भोवरा बिवर्याच्या गप्पा करत बसतं ते.
अगदी बरोबर ओळखलंत चिमण
अगदी बरोबर ओळखलंत चिमण

धन्यवाद
@चिमण
@चिमण
१२ च्या वर्षी तर मी पण m 3
१२ च्या वर्षी तर मी पण m 3 दिला होता, सोबतीला m1 आणि m2 घेऊन. एका फटक्यात 3 काढले होते.