तुम्ही सिगारेट कशी पिता / ओढता / फुंकता / चोखता?

Submitted by ऋन्मेऽऽष फोटो अपलोड on 15 July, 2018 - 12:29

लहानपणी एक जिम कॅरीचा चित्रपट पाहिला होता. तो त्यात सिगारेट तोंडाने ओढून नाकातून बदामाकृती धूर काढायचा आणि पोरींना ईम्प्रेस करायचा.
तो झाला जिम कॅरी, तो काहीही करू शकतो. पण माझ्या कॉलेजातील मित्रही धूराची सर्कले बनवण्यात पटाईत होती. तोंडातून आत घेतलेला धूर नाकातून सोडण्यात माहीर होती.
प्रत्येकाचे सिगारेट फुंकायचे वेगवेगळे प्रकार. कोणाला सोबत चहा लागायचीच, तर कोणाला चकणा म्हणून मिंटॉसची गोळी.
काही जण सिगारेटमधील तंबाखू काढून त्यात काहीतरी मिक्स करायचे, आणि ते मिश्रण पुन्हा सिगारेटमध्ये भरून सिगारेट ओढायचे.
एक मित्र होता ज्याला सिगारेटचा शेवटचा झुरका टॉयलेटमध्ये जाऊन मारल्याशिवाय प्रेशरच यायचे नाही. तेवढ्यासाठी म्हणून तो शेवटचे थोटूक कॉलेजच्या आत टॉयलेटमध्ये घेऊन जायचा. नशीब कधी पकडला गेला नाही.

एक्झामच्या आधी अभ्यासाच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सारे स्ट्डी नाईटसच्या नावाखाली कॉलेजमध्येच पडीक असायचो.
सुट्ट्यांचा आणि सुट्ट्याचा उपभोग एकत्रच घेतला जायचा.
सिगारेट्सचा नुसता खच पडायचा. पण हळूहळू जेव्हा आर्थिक बजेट बोंबलू लागायचे तेव्हा लोकं विड्या देखील न लाजता ओढायचे. अर्थात मी यात कुठेच नसायचो.

पण तो सिगारेट विडीच्या थोटूकांचा कचरा पाहून कधी ना कधी पकडले जाणार होतोच. एकदा अशीच धाड पडली आणि ईतर फुंकणार्‍या पोरांसोबत मलाही आत घेतले गेले. मी सिगारेट पित नाही हे आमच्या एचओडीना सांगून सांगून थकलो. पण मी मस्तीखोर असल्याने माझी अशी वाह्यात ईमेज होती की मला कुठलेच व्यसन नाही हे पचनी पडायलाच त्यांना जड जात होते. शेवटी मी म्हणालो की मी माझ्या आईचे पत्र आणतो, मग तर सोडाल. पण मग कॉलेजलाच हे प्रकरण वाढवायचे नसावे जे त्यांनी बहुधा जास्त ताणून धरले नाही. ईतरांना कडक आणि मला सौम्य शिक्षा देऊन प्रकरण संपवले. माझी शिक्षा सौम्यच असल्याने मी निर्लज्जपणे (जो त्याकाळी अंगात ठासून भरला होता) तिचा स्विकार केला.

असो, तर माझी स्वत:ची सिगारेटची कारकिर्द लहानपणी नकली सिगारेटच्या आकाराची गोळी चोखण्यापासून सुरू झाली आणि कॉलेजमध्ये गुडंग गरम या गोडूस सिगारेटला येऊन संपली. ते धूर आत घेणे व सोडणे, ईटस टू स्किलफुल, शेवटपर्यंत नाहीच जमले Sad
पण आता आनंदच वाटतो ते नाही जमले आणि एका व्यसनापासून वाचलो याचा ...

नाही म्हणायला सिगारेटच्या पाकीटातील सोन्याचांदीचा कागद जमवायचा छंद एकदा शाळेत असताना लागला होता, पण तो या धाग्यावर अवांतरच होईल म्हणून त्या आठवणींबद्दल लिहीत नाही.

असो, आपलेही काही अनुभव असतील तर येऊ द्या ..
आणि ज्यांनी सिगारेट या व्यसनाला कायमचे सोडून मात दिली असेल त्यांचे तर या धाग्यावर पहिले स्वागत आहे Happy

अरे हो, आणि आम्ही कॉलेजला असताना हुक्याचे काहीतरी फॅड आले होते, ते अजूनही आहे का? अगदी सीसीडी मध्ये जाऊन कॉफी पिल्यागत लोकं हुक्याचा आस्वाद घ्यायचे. त्याचेही अनुभव कोणाला असतील तर लिहा..

आपलाच कृपाभिलाषि
भ.भा.

विषय: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

एक धागा गाजला म्हणून केवळ टीआरपी साठी तसलाच दुसरा काढला. ह्याला काय अर्थ आहे? आता "तुम्ही कोणते इलेक्ट्रिक शॉक अनुभवले आहेत" असा पण धागा काढणार आहात का?

तसलाच ?

तुम्ही शाहरुख आहात तर तो सलमान आहे. तुमचे धागे 100 करतात, त्याचे 200/300 करतायत.
कंबर कसा - सुपरस्टार पद धोक्यात आहे ☺️

चोखणे या संदर्भात - मी सिगरेट ओढत नाहि पण १८ होल्सचा राउंड संपल्यावर लाउंजमध्ये अनकट, अनलिट सिगार सिंगल माल्टमध्ये बुडवुन चोखणे हा एक वेगळाच अनुभव आहे...

तुम्ही शाहरुख आहात तर तो सलमान आहे. तुमचे धागे 100 करतात, त्याचे 200/300 करतायत.
कंबर कसा - सुपरस्टार पद धोक्यात आहे>>>>>>>>>>
इधर गंगाधरही शक्तिमान है!

राज, मी ते लहानपणी खाऊची सिगारेट चोखायचो त्या अनुषंगाने चोखणे टाकले होते.
पण अनकट, अनलिट सिगार सिंगल माल्टमध्ये बुडवुन चोखणे हे ऐकणे माझ्यासाठी नवीनच आहे.

असो, धाग्याला अनुसरून दिलेल्या प्रतिसादाबद्दल आभार. सिगारेट या व्यसनाला दारूईतकी प्रतिष्ठा नाहीये याची कल्पना आहे.

सिगरेट कुस्करून टाकून,
>>>
कागदासह कि नुसता तंबाखू तंबाखू?
निदान फिल्टर तरी हवा. तोच तुमचे आयुष्य वाढवतो.

<< ...अनलिट सिगार सिंगल माल्टमध्ये बुडवुन चोखणे हा एक वेगळाच अनुभव आहे...>>-

आधीं हे टोस्ट त्या चहात बुडवून खा ; सिगार त्या कशात बुडवून
कधी नाही खाल्ला, म्हणून मग बसा खुशाल कुढत !!
habits.jpg